प्रेरणादायी कविता marathi kavita :
प्रेरणादायी कविता marathi kavitaआयुष्य जगताना कधी कधी प्रत्येकाला किती संघर्ष करावा लागतो मग तो स्वतःच्या भविष्यासाठी असो किंवा जवळच्या व्यक्तींसाठी ,तो लढा प्रत्येकाला द्यावाच लागतो हे दाखवणाऱ्या ह्या कविता.प्रेरणादायी कविता marathi kavita
कविता
●संघर्ष ●जिवलग ●नवी भरारी ●बेरंग ●हसरे दुःख
संघर्ष
संघर्षात या चहुबाजूंनी
चक्रव्यूही जखडलो,
बंदिस्त साखळीत या
नकळत मी घडलो…..
ओठांमध्ये दुःख दाबले
मनात शांत ही वादळे,
डोळ्यांत अश्रू सुकले
अन हृदयही पाझरले…..
तुटूनी पडलो आत हृदयी
ही ठिणगी स्वप्नांची ,
वळेल आयुष्य हवेसरशी
घेऊनि ज्वाळा यशाची…..
जबाबदारी अन
कर्तव्याखाली
स्वप्ने दबली सारी,
स्मितहास्य फुलवुनी ओठी
पचवला वर्तमान विषारी…..
___________________________________________
हे ही वाचा – 10+मराठी धार्मिक कविता
जिवलग
जिवलगांस जपता जपता
माझ्यावरी मी रुसलो,
निराशेस झेलीत मी
क्षणभर मलाच हसलो…,
नात्यातील गोडवा आजवर
फक्त मी ऐकला,
वास्तवात डोकावताना
भेटतो माझा मी एकला…,
नात्यांच्या बागेत अनुभवले
अश्रुंचे काटेरी कुंपण,
जिवलग वेचता गमावले
हक्काचे सुंदर क्षण…,
चालेन आता एकला
मार्ग माझा निराळा
थांबवू न शके मज
हाक माझी अमर्याद अंतराळा…..
___________________________________________
नवी भरारी (marathi kavita)
आलस्य थरांखाली ज्वलंत निखारे ,
एक फुंकर पुरे अन् पेटणारे….,
झटकली आज राख आळसाची,
उजळली तव दीप-समई चैतन्याची….,
आशेच्या झोक्यावरचा थांबविता सुखद झोका,
निराशेनेही थांबवला दुःखद चटका ….,
चिंता करून भविष्याची गंज जडला बुद्धीला ,
वर्तमानी चालुनी पुस्तके उजलेन त्या शक्तीला…..,
ठेवूनि जिद्द चिकाटी गाठेन म्हणतो ध्येय,
घेईन कष्ठांच्या पंखानी भरारी,
हा एकच उपाय …..हा एकच उपाय……
___________________________________________
बेरंग
फुलांनी रंग आज उधळले
असमानी,
एकच दिन जगण्या बळ
बळ घेतले फुलपाखरांनी…..,
पानांनाही कळले अस्तित्व
आपुले देठ आहे,
शेवटी संपर्क आपुलाही
मातीशी थेट आहे……,
खगांनिही घेतली भरारी
नभ आपुले करण्या,
माघारी यावंच लागे
कर्तव्य पूर्ण करण्या…….,
फुलेही आज फुलली
दाही दिशा गंधाळल्या,
मार्गस्थ झाल्या भुंग्या सहित
खोट्या शकला सगळ्या……….
___________________________________________
हसरे दुःख
जे बोलल्याशिवाय दिवस जायचा नाही
आज विसरुनी मी जिवंत आहे,
न बोलता स्तब्ध नाती
खंत मात्र टोचत आहे…..
खांद्यावर मिरवलं ज्यांनी
त्यांनी पायदळी तुडवल आहे,
बोट धरून चालवलं ज्यांनी
पण पाठ मात्र फिरवली आहे…..
बोलणं केलं बंद तरी
आवाज माझा आठवत आहेत,
श्वास समजलो ज्यांना
श्वासाविना जगत आहे…..
जवळचे जवळ असुनी
जवळीक नाही उरली,
अहंकार श्रेष्ठ झाला अन
नाती ही हरली,
सुर्याविना पहाट नव्हती
आज त्याच्या विना उजाडत आहे,
सुर्यास्ताशिवाय सायंकाळ वेडी
चंद्रानेच भागवत आहे….
सगळ्यांसाठी जगता जगता
विसरुनी गेलो जगणं,
हसरे दुःख सारे
मरणालाही सांगणं…..
___________________________________________
नाती मराठी कविता marathi kavita nati
सारांश :
पहिल्या सारखा माणसांच्या नात्यात गोडवा उरला नाही , हा पाहिले पैसे कमी होते , भौतिक सुख साधने कमी होती पण कोणाला काहीच कमी पडत नव्हत . कारण माणूस माणसात होता एकमेकाना धरून होता .
पैशाच आकर्षण वाढल आणि हा नात्याच धागा सुटला गेला ,आता माणूस पैशांवर अवलंबून राहायला लागला आणि माणूस माणसापासून दुरावला .
आता कोणी समोर आला तरी फक्त करायच म्हणून नमस्कार त्यात नसतो प्रेम ना आदर , ना आपुलकी . ही दाखवणारी ही आमची नाती मराठी कविता marathi kavita nati जी नककी मनाला भावते .
____________________________________________________________________________
दिखावा
संवादाची सुरुवात विसरून
तब्बेत कशी आहे हे विचारण्याची
औपचारिकता सुरू झाली.
पाठीमागे ओरबाडे
म्हणून तोंडावर गोड
बोलण्याची सुरुवात झाली.
दुसऱ्याचे यश
आपल्यासाठी अशक्य वाटून
आडकाठीचा उगम झाला.
मी आणि तू
तुझे आणि माझे
ही भेद भिंत उभारून
नात्यात दरी खोल झाली.
नुसतं वायफळ वाहून
रिकाम्या जागी दिखाव्याचा
जन्म झाला.
जिवंतपणी वैर अतूट
मृत्यूनंतर माणूस भला होता
हा वाक्य प्रसिद्ध झाला.
—————————————————————————————————————————————–
सारांश :
जो पर्यन्त आपली चूक आपल्याला कळत नाही तो पर्यन्त मार्ग सापडत नाही , परिणामी अस्वस्थ वाटायला लागत आणि कुठे तरी आपल्यालाच चुकल्या चुकल्या सारख वाटत राहत , आणि सतत आपण दोष दुसाऱ्याना देत राहतो आणि सगळे आपल्ल्यापासून दुरावतात , पण जेव्हा आपली चूक आपल्याला कळते त्या वेळेला आपल्यामध्ये असाधारण बदल घडून येतो ,आणि सगळेच चांगले वाटायला लागते ही दाखवणरी आमची कविता .
चूक उमगली की,
चूक उमगली की, सारेच प्रश्न सुटतात
उत्तरं सारी अत्तरा सारखी गंधाळतात,
चूक उमगली की, सारेच दुःख संपतात
सुखाचा उगम अन ऐश्वर्य झरे खळखळतात,
चूक उमगली की, गैरसमज दुरावतात
समजूतदारपणा उंचावून नाती स्थिरावतात…
चूक उमगली की , वाटा मोकळ्या वाटतात
कुठेही करावा प्रवास दिशाच आपल्या होतात ,
चूक उमगली की, वेदना कमी होतात
उपाय टोकदार जरी , तितकेच सुखावतात,
चूक उमगली की, पुन्हा घडत नाही
विस्कटलेली घडी पुन्हा बिघडत नाही…..