100+दिवाळीच्या मराठीत शुभेच्छा | Happy Diwali Wishes In Marathi 2025

Happy Diwali Wishes In Marathi 2025 चे हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे . दीपावली हा सण प्रकाशाचा तसेच त्या प्रकाशातून अनेक बोध घेण्याचा सण म्हणून साजरा केला जातो .अंधारावर प्रकाशाचा विंजय तसेच वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण ओळखला जातो .साधारण चार ते पाच दिवस चालणारा हा सण चंद्रमास आश्विन आणि कार्तिक महिन्यात म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या मध्यात हा सण साजरा होतो .ह्या सणाच्या अनेक कथा आहेत ह्या दिवशी प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या सह अयोध्येत आगमन केल म्हणून दिवाळी साजरी केली जाते . ह्या पवित्र सणाच्या दिवशी तुमच्या आवडत्या व्यक्तीला Happy Diwali Wishes In Marathi मधून शुभेच्छा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणा .

⦁ Happy Diwali Wishes In Marathi
⦁ Diwali Quotes In Marathi
⦁ Diwali Status In Marathi
⦁ Happy Diwali Massage In Marathi
⦁ मराठीत दिवाळीच्या शुभेच्छा
⦁ Diwali Wishes In Marathi

Happy Diwali Wishes In Marathi दिवाळीच्या शुभेच्छा मराठीत

⦁ साहेबांच्या दिवाळीत झगमगाट दिसला,कार्यकर्त्याच्या घरी लेकरू एका फटाक्यापायी रडून रडून अंधाऱ्या गोधडीत शांत झोपला

⦁ आपल्या विवेकाच्या दिव्यावर आपलं बुद्धीचं धन कायम तेजाळत राहो आणि आपल्या आयुष्याची दीपावली ह्या श्रीमंतीत जावो 🪔

happy diwali wishes in marathi

⦁ दीपावली ही फक्त प्रकाशाची नाही तर गरिबी, अत्याचार भ्रष्टाचार अन्यायावर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक आहे.

⦁ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा Happy Diwali 🪔

⦁ एक दिवा लाव अंगणात नव्हे हृदयात तोही ज्ञानाचा🪔

⦁ तुमचं आयुष्य दीपावली मध्ये काढलेल्या रांगोळी प्रमाणे सुंदर होवो.Happy Diwali 🪔

⦁ अंगणात रांगोळी, दारात दिवे,सीतामाई सोबत श्रीराम यावे,आणि ह्या राष्ट्राचे रामराज्य व्हावे,दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🪔

⦁ मंडपात लावलेल्या आकाश कंदिलासारखं सुंदर, देखणं, ऐश्वर्य संपन्न व्हावं तुमचं आयुष्य,तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

⦁ मनातल्या रावणासारख्या विचारांवर श्रीरामांसारख्या संयमाने, सीतामाई सारख्या विश्वासाने आणि लक्ष्मणांसारख्या निश्चयाने विजय मिळवावादीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔 Happy Diwali

⦁ एक श्रीराम अयोध्या आगमनाने एवढं सुख येत असेल तर श्रीराम विचाराने आयुष्याचे दिवाळी नक्की होईल दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

⦁ जसं प्रत्येक घर उजळलं,रांगोळ्या उमटल्या, दारी तोरणं शोभली, गंध दरवळला त्याच प्रमाणे मनात ज्ञान ही जन्मावा ह्या दिवाळीत 🪔Happy Diwali

happy diwali quotes in marathi

⦁ दिवाळी हा फक्त संपत्ती,मिठाई,सजावट, कपड्याचा सण नव्हे.हा प्रकाशाचा विजय आहे मनातल्या. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

⦁ अंगणात दिवा लावण्यापेक्षा कोणाच्या तरी आयुष्यात दिवा लावू ज्ञानाचा.Happy Diwali 🪔

⦁ कोणाची तरी गरजू ची मदत करू हीच खरी दिवाळी हाच खरा अर्थ दिवाळीचा .Happy Diwali 🪔

⦁ अंगणात काढलेल्या रांगोळी पेक्षा माझ्या मनातील विचारांची रांगोळी सुंदर असावी.Happy Diwali 🪔

⦁ दारात लावलेल्या कंदिलाप्रमाणे माझे ध्येय, विचार हे स्पष्ट असावेत. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

⦁ श्रीरामाचं आगमन माझ्या आचरणात होणं म्हणजेच दिवाळी. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

⦁ आयुष्यात आजपासून मी कोणालातरी योग्य वाट दाखवेन हेच सांगते दिवाळी.Happy Diwali 🪔

⦁ धनत्रयोदशी धनाचे पूजन करून त्याजवळ प्रामाणिक राहणे सांगते दिवाळी. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

⦁ गोड फराळ खाद्य पदार्थ सांगतात. वैखरी वर शब्दही गोड ठेव.सांगते दिवाळी.Happy Diwali 🪔

⦁ नवनवे कपडे परिधान केले पण मन मात्र मलिन, जीर्ण विचाराने ठेऊ नको हे सांगते दिवाळी.Happy Diwali 🪔

Diwali Quotes In Marathi दिवाळी मराठीत विचार

खरंच हिंदू धर्मातील आपले सण हे किती अर्थ पूर्ण आहेत जे आयुष्याला एक नवं वळण,नवी सुरुवात करून द्यायला दरवर्षी येतात.आपण ते स्वीकारून त्याप्रमाणे आपली परंपरा संस्कृती जपली पाहिजे.Diwali Quotes In Marathi मध्ये अशा शुभेच्छा आम्ही घेऊन आलो आहोत ज्या खरंच तुम्हाला दिवाळी ह्या सणाचा खरा अर्थ सांगून जातील.हे विचार, ह्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला शेअर करून त्याचं मनही प्रसन्न करा.

⦁ दिव्यांच्या ह्या सणात तुमचं आयुष्य उजळून निघो.शुभ दीपावली🪔

⦁ तुझी प्रगती तुझं यश त्या दिव्या प्रमाणे तेजाळत राहो. तुला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

⦁ आपले आई बाबा त्या दिव्या प्रमाणे स्वतःहा अंधारात राहून तुम्ही मला कायम प्रकाश दिलात.तुम्हाला प्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

happy diwali wishes in marathi

⦁ अंधार संपवून प्रकाशाची सुरुवात करणाऱ्या सणाच्या शुभेच्छा.शुभ दीपावली🪔

⦁ दिव्यांच्या प्रकाशात तुझी स्वप्न उजळून येवोत. शुभ दीपावली 🪔

⦁ ह्या दिवाळीला आनंदाचा सुखाचा संपत्तीचा फटाका तुझ्या आयुष्यात फुटो. शुभ दीपावली 🪔.

Happy Diwali Status In Marathi दिवाळी स्टेटस मराठी

आयुष्याला अर्थपूर्ण करणारं सण म्हणजे दीपावली. खरंच किती आयुष्यात सकारात्मकता येते ह्या मोजक्याच दिवसात. दिवाळीतील प्रत्येक वस्तू आपल्याला काहीतरी बोध देते. मार्ग दाखवते. असा लख्ख प्रकाशाने भरलेल्या सणाचे Happy Diwali Status In Marathi आम्ही आपल्यासोबत शेअर केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्ही हे ते नक्की आपल्या. नातेवाईकांना,मित्र मैत्रिणींना शेअर कराल.

⦁ आपली मैत्री दिवाळीतील रांगोळी प्रमाणे असावी.जरी प्रत्येक रंग वेगळा तरी एकत्र येऊन शोभून दिसावी. शुभ दीपावली 🪔 Happy Diwali 🪔

⦁ आयुष्यात एक मित्र किंवा मैत्रीण असावी जी त्या दिव्याप्रमाणे असावी.अंधारात मार्ग दाखवणारी.Happy Diwali 🪔

⦁ कंदील प्रमाणे आपला बाप असतो स्वार्थाने भरलेल्या जगात. बापाचा आधार लांबून ही जाणवतो. शुभ दीपावली 🪔

⦁ जसे खाद्य पदार्थ गोड बनवले आणि एकमेकांना वाटले तसेच सुख दुःख ही वाटावीत. शुभ दीपावली 🪔

happy diwali wishes in marathi

⦁ माझ्यामुळे कोणाच्यातरी आयुष्यात अंधार नाहीसा होऊन लख्ख प्रकाश पडावा.Happy Diwali 🪔

⦁ दिवाळीतील रांगोळी आणि फराळ प्रमाणे आपणही माणसांमध्ये मिसळून राहावं. शुभ दीपावली 🪔

Happy Diwali Massage In Marathi दिवाळीचे संदेश मराठीत

ह्या दिवाळीची सुरुवात आपल्या प्रियजनानां मेसेज करून करा. आणि आपल नातं तेजस्वी आणि अतूट बनवा आमच्या happy diwali massage in marathi सोबत . त्यासाठी खाली दिलेले गोड सुंदर मेसेज नक्की वाचून शेअर करा . तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा .

⦁ दिवाळीचा पहिला दिवा जसा खास आहे. तसाच माझ्या खास व्यक्ति साठी हा दिवाळीचा पहिला मसेज खास आहे. शुभ दीपावली प्रिय

⦁ आपल्या ग्रुप मधील सर्व सदस्य हे माझ्या दारातील प्रत्येक दिव्यासारखे आहेत. तुम्हाला दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा .

happy diwali wishes in marathi

⦁ शुभ दीपावली ..तुमच्या आयुष्यात ही दिवाळी प्रकाश,समृद्धी,भरभराट घेऊन येवो . Happy Diwali .

ह्या दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला आरोग्य धन संपदा प्राप्त होऊन उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना . शुभ दीपावली .

⦁ ही दिवाळी तुम्हाला व कुटुंबाला मंगलमय जावो. शुभ दीपावली .

⦁ ह्या दिवाळीने तुमच्या आयुष्यात भरभराट येवो ऐश्वर्याची.शुभ दीपावली .

⦁ ह्या दिवाळीने तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा नाहीसा होवो.शुभ दीपावली .

Diwali Motivationl Quotes In Marathi

हिंदू धर्मातील प्रत्येक सण हा आनंदाचा ,उत्साहाचा प्रतीक असतोच पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तो उर्जेचा प्रतीक असतो . प्रत्येक सण हा एक नवीन उर्जे सोबत नवी सुरुवात ,नवी आशा ,घेऊन येतो . असेच उर्जेने भरलेले दिवाळी ह्या सणातले काही क्षण आम्ही diwali motivational quotes in marathi मधून खाली घेऊन आलो आहोत. त्यात काही सुखाचे तर काही दुखाचे क्षण असू शकतात कारण दिवाळी ही प्रत्येकाची सारखी नसते.

  • श्रीमंत दिवाळीची आतुरतेने वाट पाहत होता आणि तिकडे कष्ट करणारा गरीब बापाच्या मनात दिवाळीची भीती खात होती .
  •  पैसेवाले दिवाळी प्रकाशात साजरी करत होते आणि झोपडीतून गरीब ती पाहत  होता .
  • दिवाळी फक्त पैशाने साजरी होतं नसते ,शेवटी बाहेरचा झगमगाट काही उपयोगाचा नसतो.
  • आपल्याला पुरून उरला तर दुसऱ्याची ही दिवाळी गोड करावी माणसाने .
  • दिवाळी फक्त फोटो आणि सेल्फी पुरती नसावी ती मनातून उठून दिसावी .
  • रांगोळी वेगवेगळ्या महागड्या रंगाची असो नाहीतर मातीची त्यामागचा भाव महत्वाचा .
  • दिवाळीला नाही फराळ बनवता आला परिस्थिति मुले तर नाराज होऊ नको कारण माणसं खातात गोड ,पण बोलतीलच ह्याचा भरवसा नसतो .

आमच्या काही लोकप्रिय पोस्ट-  dussehra quotes in marathi दसऱ्याच्या शुभेच्छा