Motivational Thoughts In Marathi हे आपल्या आयुष्यात स्वप्न,ध्येयपूर्ती साठी किती महत्वाचे असतात हे ह्या लेखातून कळते. कधी कधी आयुष्यात खूप काही अडथळे येतात,कधी परिस्थिति रडविते तर कधी माणसे,यामधून आपण आपल्या ध्येयापासून दूर जातो. म्हणून परिस्थिति कशीही असो आपण आपल्या ध्येयावर Focus राहण्यासाठी Motivational Thoughts In Marathi हे तुम्हाला एक नवी ऊर्जा देतील हा आमचा विश्वास आहे.
Motivational Thoughts In Marathi प्रेरणादायी विचार
लोकांनी कितीही काहीही बोलो आपल्यावर फरक नाही पडला पाहिजे आपण आपल्या ध्येयावर ठाम झालो पाहिजे इतका स्वतःवर विश्वास Motivational Thoughts मधून नक्की मिळतो.
1. कोणाला काही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही आपल्या कर्मांचा लिखाण ईश्वर करतोय
2. कर्मात एवढी शुद्धता असावी की,आपल्याला आपली बाजू मांडण्याची गरजच भासू नये.
3. लक्षात ठेव,इतिहासातील सगळा संघर्ष हा अस्तित्वाचा होता आणि त्या अस्तित्वाला अर्थ जमीन आणि भाषा होती.
4. आयुष्यातील सगळ्यात मोठी संधी म्हणजे “कर्माची फळं मिळतातच” हे माहीत असणं.
5. कर्मात एवढा प्रामाणिकपणा असावा की,देवाने उत्तर दिल्यावर आपल्याला प्रश्न पडू नये.
6. ह्या जगात आपला कोण ह्यापेक्षा आपण कोणाचे हे कळलं की,आयुष्य सोप्पं होतं.
7. लक्षात ठेवा,जगात एकमेव गोष्ट अशी आहे जिला पर्याय नाही ती म्हणजे “मृत्यू”.
8. जगाची संपूर्ण माहिती असणाऱ्या मानवाला स्वतःबद्दल एक अंश ही माहीत नाही.
9. मागून फक्त लाचारी मिळते आदर आजही कमवावा लागतो .
10. कोण सोडून गेला यापेक्षा कोण जोडून राहिला यात आनंद असतो.

Motivational Status In Marathi प्रेरणादायी स्टेटस
- लक्षात ठेव,तुझी लढाई तुझ्याजवळ आहे लोकांच्या गुंत्यात गुंतू नको.
- प्रत्येकाला पाण्यात पाहायचा नसतो सरल काठीही पाण्यात वाकडीच दिसते.
- दुनियादारीच्या युद्धात जितका लढशील तितकाच अडकशील इथे जिंकण्याचा एकच उपाय बाहेर पडणे.
- सगळेच चांगले आणि सगळेच आपले वाटत असतील ना तर नात्यात एकदा पैशांचा व्यवहार करून बघ,सगळा भ्रम दूर होईल.
- वाईट काळात सोडून गेलेल्यांची यादी बनवले,चांगल्या वेळेत वाचून नक्की दाखवेन
- तुझे स्वप्न,ध्येय कोणाजवळही सांगू नको,अचानक झोप उडविण्याची मज्जा वेगळीच असते.
- ज्यांना ज्यांना जिवापाड जपलं ना त्यानीच बदनामी केली.
- येऊ दे कितीही वाईट दिवस आणि वाईट प्रसंग त्यामधून शिकायला मिळेल.
- मेहनत करताना विश्रांती घे पण थांबू नको.
- कोणीही साथ नाही दिली तरी चालेल फक्त साथ स्वतःवरच्या विश्वासाची पाहिजे.
Motivational Quotes In Marathi प्रेरणादायी कोट्स
- ज्याला कष्टच नाहीत त्याला यशाची चव काय कळणार
- वाडवडिलांच्या संपत्तीवर रुबाब दाखवून कर्तृत्व सिद्ध होतं नसते
- मित्रा पैसे कमवं,सध्या पैसे असतील तर तुझ्या शब्दाला किंमत आहे
- झाला टाइमपास करून, गेले सगळे सोडून आतातरी स्वतःकडे लक्ष दे
- फक्त एक वर्ष स्वतःच्या ध्येयावर Focus कर,मागची फुकट गेलेली दहा वर्षांची फरपाई भरून काढशील.
- जो देव श्वासासाठी कोणामध्ये भेदभाव नाही दाखवत, तो पैशांमध्ये दाखवेल का,तुला ही मिळेल मेहनत थांबवू नको.
- आज माझ्याकडे काहीच नाही म्हणून सगळे विसरलेत पण एक दिवस नक्की येईल,की सगळे कॉल करतील आणि मला वेळ नसेल.
- मी काय करू शकतो हे फक्त मलाच माहीत आहे म्हणून लोक काय बोलतात याने मला फरक नाही पडत
- कायमची झोप उडाले आता स्वप्न पूर्ण होई पर्यन्त थांबणार नाही
- आजची माझी लहान सुरुवात खूप जणांची झोप उडवणार आहे

Motivational Thoughts In Marathi For Business
सध्याच्या घडीला मराठी माणूस ही व्यवसायात मोठ्या प्रमाणात उतरायला सुरुवात झालेली दिसून येत आहे. पण व्यवसायात आपल्याला टिकायचे असेल किंवा यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या मध्ये कमालीचा संयम असावा लागतो. आणि हाच संयम Motivational thoughts in marathi मधून शिकायला मिळतो. व्यवसाय फक्त पैसा नव्हे तर व्यवसायातून एक उत्तम व्यक्तिमत्व घडत असते.
- लगेच यश मिळत नाही सुरुवातीला तोटा सहन करावाच लागतो
- व्यवसायाची पहिली पायरी आपली भाषा नम्र पाहिजे
- व्यवसाय म्हणजे फक्त पैसा मिळवण्याचे साधन नाही जगण्याची कला आहे.
- संयम,शिस्त,नम्रता,भाषा,कल्पनाशक्ती,बुद्धी,यांचा मिलाप म्हणजे व्यवसाय असतो
- व्यवसाय मनाला एका ठिकाणी मनाला स्थिर करतो .
- फक्त पैशाचा हेतु नव्हे तर माणुसकीने माणूस जोडला की,व्यवसाय मोठा होतो
- मेहनत हा व्यवसायाचा श्वास आसतो
- तर ग्राहक हा व्यवसायात देव असतो
- आपल्या छोट्या व्यवसायावर आपल्याला प्रेम करता आले पाहिजे
- एक व्यवसाय तुझी सारी स्वप्न पूर्ण करण्याची ताकत ठेवतो
- व्यवसायात प्रामाणिकपणा ग्राहकांचा विश्वास जिंकून घेत असतो
- कोणता व्यवसाय कुठे करता ह्याला खूप महत्व असते
- ज्याला स्वतःच्या व्यवसायात नोकर बनता आलं तोच व्यावसायिक
Motivational Thoughts In Marathi For Student
एक विद्यार्थी म्हणजे काय आणि त्या शिक्षणाचा हेतु काय पाहिजे हे कळण पास होण्यापेक्षा महत्वाचे असते हेच आपण ह्या Motivational Thoughts in marathi मधून शिकणार आहोत
- एक विद्यार्थी म्हणजे एक सुजाण नागरिक बनण्याची प्रक्रिया असते
- विद्यार्थी म्हणजे फक्त marks आणि certificate हा हेतु नसतो
- एक विद्यार्थी म्हणजे ह्या देशाची दिशा ठरवतो
- शिक्षणाने संस्कार घडले तोच विद्यार्थी
- शिक्षणाचा हेतु फक्त नोकरी आणि पैसा नसतो
- एक विद्यार्थ्याने संपूर्ण समाज सुशिक्षित व्हावा या हेतूने शिक्षण घ्यावे
- संस्काराशिवाय शिक्षण शून्य असते
- मला का शिकायचे आहे कारण मी पाहिलेली गरीबी इतरांनी पाहू नये
- शिक्षणाचा खरा अर्थ माणूस घडवणे असतो
- प्रामाणिकपणा शिवाय सुशिक्षित ही शिक्षितच असतो
- शिकलो म्हणजे मोठा व्हायचं नसतं लहान होता आलं पाहिजे
- स्वप्न मोठी असावीत आणि आपली कष्ट करण्याची तयारी त्यापेक्षा मोठी असावी
- गरुडा सारखी झेप घ्यावी विद्यार्थाने
- शिक्षण म्हणजे अन्यायविरुद्ध लढण्याचे शस्त्र आहे

conclusion
Motivational Thoughts In Marathi मधून प्रत्येकाला एक नव चैतन्य मिळून प्रत्येकजण आपल्या स्वप्नांकडे मार्गस्थ व्हायला पाहिजे हाच ह्या Marathi motivational thoughts चा हेतू आहे.
आणि तो हेतू प्रत्येकाने हे विचार वाचून साध्य कराल हीच अपेक्षा आहे. वेळोवेळी अडथळे, प्रसंग,निराशा वाट्याला येऊनही न थांबता प्रयत्न करायला प्रेरणा ही विचारातून मिळत असते आणि हीच प्रेरणा आम्ही तुम्हाला प्रेरित करण्यासाठी मराठीतील उत्कृष्ट असे विचार घेऊन आलो.
आणखी वाचा –
Motivational quotes in marathi
मराठी प्रेरणादायी विचार