Marathi Bhasha अभिजात मराठी भाषा म्हणजे काय 2024

जाणून घ्या भाषेला अभिजात दर्जा कधी दिला जातो ? 

Marathi bhasha : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार कधी याकडे अनेक वर्ष मराठी भाषिकांची आशेची नजर होती . अनेक प्रयत्न चालू होते परंतु केंद्राकडून प्रयत्न चालू आहेत अशी तीच तीच उत्तर येत होती . परंतु आगामी निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार ने मोठा निर्णय घेतला आहे .
आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा गौरव बहाल केला आहे . ज्ञानेश्वरांनी जपलेली माय मराठी आता अभिजात भाषा झालेली आहे .
आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा बनवण्यासाठी आपल्या लिलाचरित्र ,ज्ञानेश्वरी ,विवेकसिंधु आशा ग्रंथ साहित्याचा मोठा हातभार लागला .
केंद्रीय मंत्री आश्विन वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती ,केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर दिली .
मराठी सोबतच कन्नड ,तेलगू,मल्याळम आणि बंगाली ,आसामी ,पाली,आणि प्राकृत भाषेला आता हा दर्जा प्राप्त झाला आहे .
मराठी भाषेने अभिजात दर्जा मिळवण्यासाठी जे निकष लागतात ते पूर्ण केले .
मराठी भाषेचा प्रवास हा महा महारठी,मरहट्टी,महाराष्ट्री प्राकृत,अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी असा आहे .
या निर्णयामुळे मराठी भाषेचा प्रसार जगभरात झपाट्याने झालेला दिसून येईल ,
एक भाषेला “अभिजात”भाषा असा दर्जा कसं प्राप्त होतो ? काय असतात निकष ?जाणून घ्या .
देशात आता पर्यन्त सहा भाषानां हा दर्जा मिळालेला आहे .१.तामिळ(२००४) २.संस्कृत(२००५) ३. कन्नड (२००८) ४. तेलुगू (२००८). ५ . मल्याळम (२०१३) . ६. ओडिया (२०१४) .

निकष खालील प्रमाणे .

१). भाषेचे वय हे दीड ते अडीच हजार वर्षे असून भाषा ही प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावी.
२). भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावेत.
३) भाषा प्राचीन असून तिच्या आधुनिक रूपाचा गाभा कायम असावा . भाषेचे साहित्य हवं जे साहित्य त्या भाषिकाना मौल्यवान वाटेल ४) अस्सल साहित्यिक परंपरा असावी .
५) अनेक भाषांमधून ती घेतलेली नसावी .
६) त्या भाषेतीलल साहित्याचे स्वरूप आधुनिक रुपापेक्षा वेगळे असावे .
मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे हे दाखवणारे अनेक पुरावे केंद्रा कडे दाखल करण्यात आले . महाराष्ट्र राज्य जन्माला येण्यापूर्वी जवळ जवळ अडीच हजार वर्षे आधी प्रचलित होती.असे त्या अहवालात उल्लेख केला आहे.अकरा कोटी लोकांची मराठी भाषा ही जगातली १० व्या ते १५ व्या क्रमांकाची भाषा आहे . मराठी भाषा ही देशातली एक महत्वाची राष्ट्रीय भाषा आहे , मराठी भाषेचे ऐतिहासिक पुरावे देत आणि अनेक शतकांमध्ये अनेक साहित्यकाणी दिलेल्या योगदानामुळे मराठी भाषा ही अभिजात स्वयंसिद्ध आहे

काय फायदा होईल ?

मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जा मुळे अनेक मराठी भाषिकाना फायदा होणार आहे .
घटनेच्या परिशिष्ठत अभिजात भाषा म्हणून नोंद झाल्यानंतर ,दोन व्यासंगी माराठी अभ्यासकाना दरवर्षी आंतरराष्ट्रीय महत्वाचा पुरस्कार मिळत राहील .
मराठी भाषेचे सखोल अध्यायनाचे केंद्र स्थापन केले जातील ,
मराठी भाषेच्या विकासासाठी दरवर्षी केंद्राचे ५०० कोटी रुपयांचे अनुदान मिळेल .ते भाषा जतन आणि संवर्धन साठी उपयुक्त ठरेल .
अनेक उद्योगक्षेत्र ,मराठी शिक्षणक्षेत्र मध्ये मराठीचा प्रसार होईल .
आणि मराठी भाषेमध्ये रुचि वाढली तर अनेक ठिकाणी रोजगाराच्या संध्या उपलब्ध होतील .
जर मराठीकडे जगाचा लक्ष वेधल गेलं तर अनेक भाषांमधून अनुवाद वाढून येईल .


हे ही वाचून घ्या – नवरात्री उत्सव नऊ रंग आणि त्यांचे महत्व