Ratan Tata : आज माणसातला देव हरपला अवघ्या भारतीयांवर शोककला .
Ratan Tata : भारतीय उद्योग क्षेत्राचे रत्न ,जगभरातील उद्योग क्षेत्रात भारताला ऊंची वर नेऊन ठेवणारे टाटा सन्सचे प्रमुख रतन टाटा यांचे निधन झाले आहे . प्रत्येक भारतीयांच्या मनात आदर आणि प्रेरणा म्हणून निर्माण करणारे रतन टाटा होते . आज भारताने जे गमावल आहे त्याची भरपाई अशक्य आहे ,असा रत्न आज गमावला . अनेकणा नवीन आयुष्य देणारे ,फक्त माणसंच नाही तर प्राण्यांवर ही जिवापाड प्रेम करणारे आज एक प्रेमळ व्यक्तिमत्व आज हरपले. त्यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमावले नाही तर माणस ही जपली.असा माणसातला देव आज हरपला .
R
कितीही यशाच्या शिखरावर पोहचलो तरी आपले पाय कायम जमिनीवर असणारे असा खरा माणूस आज माणसातून काळाच्या पडद्याआड गेला . संपूर्ण देशात आज दुखवटा जाहीर करण्यात आला आहे .
काही दिवसांपासून अचानक त्यांची तब्बेत बिघडली आहे आशा बातम्या सोशल मीडिया वर येत होत्या पण ह्या सगळ्या अफवा आहेत असे Ratan tata नी स्वतः हा संगत खंडन केले होते ,माझे वयामुळे माझी वैद्यकीय तपासणी करत आहे असे त्यांनी सांगितले होते .त्या चिंतेचे कोणतेही कारण नाही .म्हणून अशा अफवा पसरवणे टाळावे अशी त्यांनी मध्यमाना विनंती केली होती .
काही दिवसांपासून त्याची प्रकृती चिंताजनक होती असे वारंवार कळत होतं आणि म्हणून त्यांना मुंबई मधील हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते . पण अखेर त्यांची प्राणज्योत माळवली आणि अवघ्या भारतीयांवर शोककला पसरली आहे
Ratan tata पुरस्कार : रतन टाटाना भारत सरकारने 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्म विभूषण अशा दोन सर्वोच्च गौरवाने गौरविले होते .
हेही वाचा – मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणजे नक्की काय ?
नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे नवे चेअरमन
9 ऑक्टोबर ला रतन टाटा यांचे निधन झाले होते.त्यानंतर टाटा ट्रस्ट ला पुढे कोण घेऊन जाणार किंवा रतन टाटांचा वारसा कोण चालवणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता . रतन टाटा यांच्या तोलामोलाची व्यक्ति आणि त्यांची भर ही कोणीही भरू शकत नाहीच पण त्याजागेसाठी मुंबईमध्ये झालेल्या मीटिंग मध्ये नोएल टाटा हे टाटा ट्रस्टला पुढे घेऊन जातील म्हणून तेच नवे चेअरमन असतील हा निर्णय घेण्यात आला . टाटा ग्रुपच्या अनेक कंपनी मध्ये नोएल टाटा यांची भागेदारी असल्यामुळे नोएल टाटा हे टाटा ट्रस्टच्या चेअरमन पदासाठी मजबूत हककदार ठरले.