Emotional Breakup Quotes In Marathi अपुऱ्या प्रेमाच्या भावना
Marathi Breakup status ही घटना सोपी नसते.त्या वेदना शब्दाने ही व्यक्त करता येत नसतात. विरहा मधे काहींचं आयुष्य ही संपून जाते. breakup status marathi मधून सावरायला खूप वेळ लागतो. अशा विरहाच्या कथा आपल्या इतिहासातही आढळतात.आणि जर तुम्ही देखील अशा नको वाटणाऱ्या ब्रेकअप मधून जात असाल आणि ते व्यक्त करण्यासाठी शब्द शोधत असाल तर breakup quotes in marathi मधून तुम्हाला heartouching Breakup Quotes मिळतील जे तुम्ही शेअर करू शकता आणि स्वतः हा जवळ relate करू शकता.
Sad breakup quotes in marathi
Marathi breakup quotes
Emotional breakup quotes in marathi
Breakup quotes in marathi for girl
Breakup quotes in marathi for boy
Breakup quotes in marathi for whatsapp
Marathi breakup shayari
Breakup status in marathi
Sad breakup quotes in marathi
आपलं मन जिथे स्थिरावले जिथे सुखी झाले अशी व्यक्ती ज्या वेळेला सोडून जाते त्यावेळेला त्या मनाची काय अवस्था होते ते या sad breakup quotes in marathi मधून तुम्हाला feel होईल.तुमच्याबाबतीत हे घडलं असेल तर तुम्ही ralate करू शकाल.
जिवंतपणी मरण काय असतं ना ते माझ्याशिवाय कोणाला माहित नसेल
सगळं काही छान आहे पण तीच व्यक्ती आपली नसेल तर सगळं नकोस वाटतं
पुन्हा तू माझी होशील का माहीत नाही
• एक गैरसमज आणि आपण दोन झालो कायमचे
• ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो तीच व्यक्ती क्षणाक्षणाला रडवून जाते
• आयुष्य जगायला शिकवलं तुझ्या प्रेमाने आणि एकटं कस राहावं हे शिकवलं तुझ्या जाण्याने.
• तुझ्या प्रत्येक क्षणाने माझं आयुष्य भरून गेलंय फक्त आयुष्यात तूच नाहीस.फक्त आठवणीच राहिल्या
• एखाद नातं ज्यावेळी संपत तेव्हा उरतात त्या फक्त आठवणी आणि दुःख.
• हातात हात घेऊन आयुष्याच्या रस्त्यावर चालत होतो आता तुझ्या शिवाय चालण्याची सवय झाली मला.
• जरी विरह झाला तरी आठवणींच ओझ हे आयुष्य भर मनात उरतच.
• ते कायम सोडून जातात जे प्रेमात साथ देत नाहीत.
• तू जवळ नसतानाही तुझी आठवण मला कायम छळते
• ज्या व्यक्तीला आपण सर्वस्व मानलं तीच व्यक्ती एक दिवस तेच सर्वस्व हिरावून घेते.
• तू गेलास निघून आयुष्यातून पण माझं मन अजून तिथेच थांबून आहे.
• जे मन प्रेमात हरलं आहे ते पुन्हा पाहिल्यासारखं नाही होतं
Marathi breakup quotes मराठी ब्रेकअप कोट्स
• तुझ्याशिवाय जगणं म्हणजे आयुष्यच अपूर्ण आहे
• जेव्हा प्रेम सोडून जातं तेव्हा आपली ओळखही तिथेच संपून जाते
• तुझ्या प्रेमाने शिकवलं की प्रेमात खूप वेदनाही आहेत.
• तू दूर गेलास माझ्यापासून पण माझं मन अजूनही तुझ्याजवळ येतं
• तुझ्या सोबत असताना माझा एक एक क्षण आनंदी झाला आणि तू सोडून गेल्यावर पूर्ण आयुष्यच दुःखी झालं
हे ही वाचून घ्या – motivational Quotes In Marathi
• तुझं हे असं जाणं मला सतत आठवणीत राहिलं
• तुझ्या जाण्याने फक्त तूच नाही माझही काहीतरी हरवलं आहे
• जगात हरवलेली प्रत्येक गोष्ट सापडते फक्त माझ्या प्रेमाशिवाय.
• तुझी साथ अपुरी होती पण तुझ्या आठवणींनी मात्र मला कायम साथ दिली.
• एकवेळ प्रेमातून सावरता येत पण त्या आठवणींच्या वेदना सतत राहतात.
• तुझ्याशिवाय आयुष्य ओसाड वाटतं
• प्रेम संपलं पण मी तुझाच असेन
• माझं होतं तेच माझ्या पासून हरवलं आता जगात माझं म्हणण्यासारखं माझ्या कडे काहीच नाही
Emotional breakup quotes in marathi
प्रेम जेवढं गोड तेवढच ते दुःखही देणार आहे प्रेमाच्या आठवणी आयुष्य नकोस करून सोडतात.आणि त्या आठवणी कोणाकडे व्यक्त ही नाही करू शकत. अशाच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी काही शब्दांचा प्रयोग आम्ही emotional breakup quotes in marathi मधे केला आहे तो तुम्हाला नक्की भावेल.
• दुसऱ्याचं आयुष्य आपल्याशिवाय आनंदी पाहून कधी कधी दूर जावं लागतं.
• मनाला झालेल्या जखमेचा आवाज होतं नाही आणि सांगताही येत नाही
• तुझी भेट नाही होतं पण रोज तुझ्या आठवणी येतात भेटायला
• प्रेमात एकदा धोका मिळाला की पुन्हा विश्वास बसणं अशक्य असतं
• कुठेतरी पुन्हा भेटलो तर नजरेला नजर नको मिळवू आठवणी जाग्या होतील
जगात फक्त त्याच व्यक्तीला ओळखत होतो तीच व्यक्ती आज अनोळखी आहे.
नंबर तुझा अजून save आहे पण massage आणि call करण्याची हिंमत नाही होतं एवढं दुरावलो आहोत आपण.
अनेक स्वप्न रंगवली होती तुझ्यासोबत आयुष्याची आणि फक्त एक वादळ आलं आणि सगळे रंग बेरंग झाले.
Breakup quotes in marathi for girl
एक मुलगी जेव्हा आई वडिलांचा , भविष्याचा विचार न करता एका मुलावर जीवापाड प्रेम करते आणि त्याच्यासाठी सगळ्याच्या त्याग करायला तयार होते.पण सगळं सोडून त्याच्यासोबत गेल्यावर तोच मुलगा सोडून गेला तर…तर काय भावना असतील या प्रेमाच्या त्याच भावना breakup quotes in marathi for girl मधे व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. मुलींसाठी ब्रेकअप कोटेस.
काच फुटली तर आवाज होतो पण हृदयाचं काय
• माझी इच्छा होती तो (ती) मला मिळावी पण नशीब नव्हतं.
• तुलाही लवकर कळेल की तुझ्या आयुष्यात मी होतो ते काय होतं.आणि मी आयुष्यात नाही ते तू काय गमावलसं ते.
• रोज येणारी ही संध्याकाळ मला खूप उदास करून जाते,सतत वाटत कोणी तरी दूर चाललय.
• तू दुरावलीस म्हणून बरं झालं नाहीतर मला आयुष्य कळलं नसतं म्हणून तुला धन्यवाद.
• हे जग वेगळं आहे एकाला विसरण्यासाठी दुसऱ्याला साथ द्यावी लागते
Breakup quotes in marathi for boy
Breakup status marathi हे तुम्हाला आतून मजबूत ही बनवतात breakup हा तुम्हाला खूप काही शिकवून जातो,आपला कोण आणि परका कोण याची ओळख ही breakup मधून होते.म्हणून हे काही breakup quotes in marathi मधून जे विचार आणले आहे ते तुम्हाला उपयुक्त ठरतील ते आपल्या मित्र , मैत्रीणीना शेअर करा.
• ज्या दिवशी अशी झोप येईल की,असा झोपेन की तू उठवशील पण मी कधीच उठणार नाही,आणि तू रडत राहशील.
• ज्याच्या विश्र्वास असतो तीच व्यक्ती विश्वास घात करते तेव्हा जगावरून विश्वास उडतो.
• सोडूनच जायचं होतं तर सांगायचं ना,तुझ्या पासून हसत हसत दूर झालो असतो.
• का कोणासाठी आता सतत झूरत राहायचं,आयुष्य मस्त जगायचं प्रत्येकक्षण आता enjoy करायचा.
• तुझा हा खेळ मला माहीत असता तर कधीच मी खेळलो नसतो.
• प्रेमाच्या नावाखाली करियर बर्बाद केलं आणि प्रेम फक्त अंधश्रद्धा आहे एवढंच कळलं.
• मी परत येईन अशा खोट्या आशेवर आता राहू नकोस,विसर आता…
• सोडून जायचं असेल तर बिंदास जा,पण एकच लक्षात राहूदे मी पण कोणाच्या मागे मागे जात नाही.
Breakup quotes in marathi for whatsapp
Breakup हा संपुर्ण आयुष्य नाही त्यातून बाहेर पडून एक नवीन सुरूवात एक नवं आयुष्य सुरू करता येत म्हणून स्वतःला सांभाळायला शिका आणि त्यातून बाहेर पडा.
• आयुष्यात तुम्हाला खंबीर व्हावं लागेल तुम्हालाच लढा द्यावा लागेल,लोक फक्त सल्ला देतात साथ नाही.
• शस्त्राने झालेल्या जखमा भरून जातात पण शब्दाने झालेली जखम कधीच भरली जात नाही
• दुःख फक्त लोकं देतात मृत्यू उगाच बदनाम आहे
• एखादी वस्तू तुमच्या जवळ असतो तोपर्यंत तिची किंमत नसते पण तीच दूर जाते तेव्हा तिची किंमत कळत असते
• आपला माणूस पुढे जायला पाहिजे पण आपलेच आपल्या प्रगतीला घाबरत असतात.
• ज्यांना आपण आपले मानतो ते आपले असतीलच असं नाही,वेळ आली की खरी रूप समोर येतात.