ayodhya ram mandir आयोध्या श्रीराम मंदिर संपूर्ण माहिती
प्रभू श्री राम रामचंद्राचे आगमन पुन्हा होणार आणि त्यांच्या स्वागताला जन्मभूमी तयार झाली आहे , आयोध्येत पुन्हा दिवाळी साजरी होणार संपूर्ण देश उजळून निघणार आहे कारण आहे .
ayodhya ram mandir आयोध्या श्रीराम मंदिर संपूर्ण माहिती ,भारताचे पंतप्रधान मा . श्री . नरेंद्र मोदीं नीही प्रत्येक भारतीय जनतेला आवाहन केल की २२ जानेवारीला जेव्हा आयोध्येत प्रभू रामचंद्र विराजमान होतील तेव्हा आपण सर्वानी आपापल्या घरी एक ज्योत पेटवा प्रभू रामचंद्रांचे स्मरण म्हणून .
जगभरातून लोक भारतात विशेष म्हणजे ताजमहाल पाहायला येतात ,पण २२ जानेवारी नंतर जगभरातून लोक प्रभू रामचंद्रांचे हे भव्य मंदिर आणि साजिरे रूप पाहायला येतील ही मात्र खर . ही शाश्वती प्रत्येक प्रभू रामचंद्रांचे गण देत आहेत ,एवढी कशी आहे आणि असणार आहे ही वस्तु आहे आहे ह्या वस्तु मध्ये विशेष जे अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणार आहे . तर पाहू या ही मंदिर कस असेल .
वास्तु रचना :
ayodhya ram mandir आयोध्या श्रीराम मंदिर संपूर्ण माहिती
⦁ हे मंदिर पारंपरिक नागर शैली मध्ये बनवल जात आहे .
⦁ मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम )३८० फुट आणि रुंदी असेल २५० फुट आणि ऊंची असेल १६१ फुट असेल . म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता ही वस्तु कशी दिसेल .
⦁ मंदिराला तीन मजले मध्ये विभागल आहे ,आणि प्रत्येक मजल्याची ऊंची ही २० फुट असणार आहे ,ही वास्तु उभी असेल ३९२ खांबावर आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक विभागात जायला एकूण ४४ दरवाचे असतील .
⦁ प्रथम गर्भ गृहात प्रभू श्री रामचंद्रांचे बाल रूप विराजमान असेल ,नंतर पहिल्या तळघरात प्रभू श्रीरामचंद्रांचे दरबार असेल .
⦁ मंदिरात पाच प्रकारचे वेगवेगळे मंडप असतील ते (नृत्य मंडप ,रंग मंडप ,सभा मंडप ,प्रार्थना मंडप ,आणि पाचवा कीर्तन मंडप .)
⦁ ही वस्तु ह्या कारणामुळे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेईल ते म्हणजे मंदिराच्या प्रतेक खांबावर आणि भिंतींवर देवदेवतांचे मूर्ती नक्षी कामामध्ये कोरीव असेल .
⦁ भक्त गणना मंदिरात प्रवेश करायचे असल्यास ते पूर्व दिशेकडून ३२ पायऱ्या चढून सिंह द्वारातून होईल .
⦁ जे भक्त गण आपंग कीव वृद्ध असतील त्यांच्या साथी लिफ्ट ची ही सोय करण्यात आली आहे .
⦁ मंदिराच्या चारी दिशेने आयताकार परकोट असेल ,त्याची लंबी ७३२ मी . आणि रुंदी १४ फुट असेल .
⦁ त्या परकोटाची निर्मिती अशी असेल , चारी कानावर सूर्यादेव , मा भगवती ,गणपती आणि श्री शंकर यांना समर्पित चार मंदिर उभारले जातील ,तसेच उत्तर दिशेला अन्नपूर्ण आणि दक्षिण दिशेला श्रीराम भक्त हनुमंताचे मंदिर असेल .
मंदिराजवळ पौराणिक काळातील सीताकुप विद्यमान असेल .
⦁ प्रभू रामचंद्रांच्या मंदिर परिसरात अनेक देवतांची मंदिर उभारली जातील जसे काही जणू ते देव प्रभू श्री रामचंद्राणा वंदन करत राहतील . ती मंदिर अशी आसतील , महर्षि वाल्मीक , महर्षि वाशिष्ठ , महर्षि विश्वामित्र , महर्षि अगस्त्य , निशादराज , माता शबरी , व ऋषि पत्नी देवी अहिल्या ,यांना देवताना ही मंदिर समर्पित आसतील .
⦁ आणि दक्षिण-पश्चिम दिशेला नवरत्न कुबेर ,भगवान श्री शिव यांचे प्राचीन मंदिर यांचे जीर्णोद्धार करण्यात आले आहे , आणि तिथे जटायु ची प्रतिमा स्थापन केली गेली आहे .
मंदिराचे बांधकाम व सुविधा :
ayodhya ram mandir आयोध्या श्रीराम मंदिर संपूर्ण माहिती
मंदिराच्या संपूर्ण बांधकामात लोखंडाचा वापर नाही होणार ,तसेच जमीनवर concret मुळीच नसणार आहे .
मंदिराच्या खाली १४ मिटर जाड रोलर compected concrit (आरसीसी)बसवली गेली आहे , त्याला नैसर्गिक पाषणांचे रूप देण्यात आले आहे .
मंदिराला जमिनीच्या धूप पासून वाचण्यासाठी २१ फुट उंच plith ग्रेनाइट पासून बनवली गेली आहे .
मंदिर परिसरात मोकळ्या स्वरूपात सिवर ट्रीटमेंट प्लांट , वॉटर ट्रीटमेंट प्लांट , अंगिशमन साथी पाण्याची व्यवस्था आणि विशेष पॉवर स्टेशन उभ केल गेल आहे . कारण भरून होणाऱ्या व्यवस्थेवर अवलंबून न राहत प्रसंगी उपाय करता येतील .
दर्शनाला येणारे भक्त गण यांच्यात गर्दी होऊन कोणाला त्रास होऊ नये यासाठी २५ हजार क्षमता असलेले दर्शनार्थी सुविधा केंद्र नियोजन बद्ध उभारले आहे ,त्यात भक्त गणाचे साहित्य ठेवण्यासाठी लॉकर असतील त्याच सोबत , तपासणी केंद्र असेल .
मंदिर परिसरात सगळ्यात महत्वाच्या सुविधा म्हणजे स्नानघर , सौचालय , वॉश बेसिन , आणि इतर सुविधा उपलब्ध असतील .
या भव्य वास्तूचे चे निर्माण संपूर्ण भारतीय परंपरेनुसार करण्यात येत आहे . ही वास्तु एकूण ७० एकर जागेत विस्तारली आहे आणि त्यातली ७० % जमीन सदाहरित राहील .
ही वास्तु उभरण्याऱ्या अभियंत्यांचे म्हणणे आहे की ही मंदिर २००० वर्षापर्यंत उभ राहील एवढ भव्य उभारणी असेल . प्रत्येकाचे स्वप्न होऊन जाईल आयुषात एकदा तरी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घ्याव .
——————————————————————————————————————-
प्रभू श्री रामचंद्र की …..