100+Best Guru Purnima Quotes In Marathi  गुरू पौर्णिमा कोट्स मराठी

गुरुपौर्णिमेसाठी खास guru purnima quotes in marathi, Massage,Status, Wishes.

guru purnima quotes in marathi आयुष्याच्या प्रवासात पुढे योग्य दिशेने जाऊन यश,प्रताप,आणि कीर्ती मिळवायची असेल तर गुरू हा पाहिजेच,गुरू शिवाय काहीही शक्य नाही.तुम्ही महाभारत,रामायण, कोणताही काळ पाहा मोठमोठे योद्धे,विर पराक्रमी घडले त्या प्रत्येकाच्या मागे गुरूंचा हात होता.म्हणून असं कोणताही क्षेत्र नाही ज्यात गुरू नाही,प्रत्येक कला अवगत करण्यासाठी गुरू हवा असतोच.म्हणून हे Quotes हे गुरूंचे महत्व आणि माहात्म्य दाखवणारे आहेत.

Gurupurnima status in marathi मराठी स्टेटस

• Gurupurnima wishes in marathi

•  गुरुपौर्णिमा मराठी संदेश

• गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीत

• gurupurnima quotes in marathi

Gurupurnima Quotes In Marathi

गुरुर ब्रम्हा, गुरूर् विष्णू, गुरुर् देवो महेश्वरा गुरू साक्षात परब्रह्म, तस्मेश्री गुरुवे नमः

अंधार असणाऱ्या वाटेवरून प्रवास करतानागुरू हा प्रकाश आहे. गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

समुद्रातील वादळात भरकटून दिशाहीन झालेल्या नावेला किनारा मिळावा तसा गुरू हा आयुष्यात योग्य दिशा आणि मार्गदर्शन करतो. गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातला पहिला गुरू म्हणजे “आई”जिने प्रत्येकावर संस्कार केले.आणि त्यामुळे आपलं भविष्य उज्ज्वल घडवलं.आई गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

महाराजे घडले, योद्धे प्रतापी झाले,कोणी सर्व बुध्दीशाली कुशाग्र झाले,हे सर्व गुरूंना शरण गेले म्हणून किर्तीरुपाने उरले.अशा गुरूंना मी नतमस्तक गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरूंची फक्त मूर्ती समोर ठेऊन जो धनुर्विद्या पारंगत झाला,त्या एकलाव्या सारखी निष्ठा गुरूंवर असावी गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आपण कितीही श्रीमंत आणि ज्ञानी झालो तरीही आपली जागा ही गुरूंच्या पायाजवळ असते गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Gurupurnima massage in marathi गुरुपौर्णिमा मराठी संदेश

गुरूपौर्णिमेच्या शूभेच्छा जर तुम्ही शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. guru purnima quotes in marathi मधून आम्ही जगातील प्रत्येक गुरूंना गुरुदक्षिणा देण्याचा प्रयत्न केला आहे.येथील प्रत्येक Quotes हा गुरूंना समर्पित आहे . जे तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर मित्रांना शिक्षकांना शेअर करू शकता.

ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा झाला त्या गुरूंना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आज आपण ज्या ठिकाणी आहोत आणि ज्या पदावर आहोत त्याच श्रेय फक्त गुरू आहेत . हे कायम स्मरणात राहावं.गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

तिन्ही लोकं हे गुरूंना शरण जातात हे माहात्म्य आहे गुरूंचे .

आयुष्याच्या तप्त उन्हात सावली सारखे असतात गुरू,जिथे कायम विसावा असतो. अशा गुरूंना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरूंवर कायम विश्वास असावा.कारण आपल हित हे जगात कोण जाणत असेल तर तो एकमेव गुरू आहे.

जग जिंकण्याचा सामर्थ्य ज्याच्या एका शब्दात आहे तो गुरू आहे.म्हणून गुरू हा महान आहे.गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सोबत असणाऱ्या एक गुरू मुळे लाखोंच्या सैन्यावर विजय प्राप्त करता येतो .अशा गुरूंना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

अर्जुनाला श्रीकृष्ण गुरू म्हणून लाभले आणि विजय कोणाचा झाला हे अवघं जग जाणत म्हणून गुरू महान आहे.

ज्याच्या कडे गुरुंबद्दल आदर प्रेम, निष्ठा, विश्वास आहे तोच विद्या प्राप्त करू शकतो.

Gurupurnima Quotes In Marathi

Gurupurnima wishes in marathi मराठीत शुभेच्छा

गुरू हा तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे हे तुम्हाला ह्या guru purnima quotes in marathi मधून जाणता येईल.आणि हे प्रत्येकाला कळाव यासाठी तुम्ही हे Quotes तुमच्या मित्र मैत्रीणीना, नातेवाईकांना नक्की share करा.

गुरू हाच देव आहे,गुरू हाच श्वास,गुरू हेच सुख,आणि गुरूचाच ध्यास.

गुरूंचा एक स्पर्श हा दुःखाच्या सावलीचा नाश करतो आणि सुखाचा वर्षाव करतो .Happy guru Purnima 🙏🙏

आई पेक्षा मोठा गुरू ब्रम्हांडात नाही, माता रुपी गुरूंना शतशः नमन,गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

उधाणलेल्या समुद्रारुपी आयुष्याला शांत करणारा, शांत ज्ञानाचा सागर म्हणजे गुरू आहे🙏🙏

बाळाच्या चालीने आणि बाळाच्या बोलिने बोलून त्याला स्वतःच्या पायावर चालायला शिकवणाऱ्या गुरूना guru purnima quotes in marathi मधुन तुम्ही तुमच्या गुरूंना शूभेच्छा द्या.

गुरू शिवाय दुनिया कळत नाही,ना दुनियादारी म्हणून गुरू खूप महत्वाचे आहेत आयुष्यात.

आपल्या चुका दाखवणारा ही आपला गुरू असतो मग तो आपल्याला शत्रू वाटला तरीही तो गुरू असतो कारण आपल्याला तो योग्य मार्ग दाखवत असतो.

Gurupurnima Quotes In Marathi

ज्यांच्या कडून काहीना काही शिकायला मिळत तो गुरू असतो मग तो माणूस असो नाहीतर मुंगी .🙏🙏

आयुष्यात कितीही प्रगती पथावर गेलो तरी एकदा मागे वळून पाहिलं की गुरू दिसतोच.🙏🙏गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

शिष्याला जगा समोर यश मिळवून देऊन जो कायम प्रसिध्दी पासून दूर पडद्यामागे राहणारा गुरू किती महान असेल.🙏गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

स्वतःचा त्याग करून शिष्याला सर्वस्व प्राप्त करून देतो तो गुरू महान असतो.🙏🙏

कुठे थांबावं,कुठे चालावं,कुठे बोलावं,कुठे शांत व्हावं,कोणाजवळ जावं,कोणापासून दूर ह्याची सांगता करतो तो गुरू.

गुरूचे कर्तृत्व नसते गुरू मुळे कर्तृत्व असते.

राजा शिवछत्रपती जिने घडवला ती राजमाता जिजाऊ सर्वश्रेष्ठ गुरू आहे.🙏🙏

गुरू हाच परीस आहे,ज्याचा स्पर्श होताच आपल्या आयुष्याचं सोनं होतं गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

ज्याचा गुरूवर विश्वास आहे तोच सर्व विद्या अवगत करू शकतो🙏🙏

आयुष्यात वादळं भासणाऱ्या प्रत्येक संकटाला शांत करतो तो गुरू.🙏🙏

आधी करून तेच आपल्याला सांगतो तोच गुरू.🙏🙏

आयुष्य येणारी प्रत्येक संकट हे देखील आपल्याला काहीना काहीतरी शिकवत असतात.🙏🙏

Gurupurnima Quotes In Marathi

Guru Purnima Quotes In Marathi मधे आपण गुरूचे माहात्म्य अगाध आहे हे पाहिलं,

गुरूचे वर्णन शिष्य करू शकत नाही.शिष्याची जागा ही कायम गुरूंच्या चरणाजवळ कारण गुरू हा त्रिलोक्यात श्रेष्ठ असतो.