Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi महाराजांचे प्रेरणादायी विचार

छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार | chatrapati shivaji maharaj quotes in marathi हे महाराजांमधे असणारे सर्व गुण दाखवणारे आहे आपला राजा सर्वगुण संपन्न ह्याचे हे quotes म्हणजे दाखले आहेत ,हे quotes फक्त वाचू नये तर हे महाराजांचे गुण आपण जगलो पाहिजे.अवघा जग महाराजांकडून प्रेरणा घेत आहे तर आपण घेतलीच पाहिजे हाच आमचा हेतू आणि महाराजांना मानाचा मुजरा आहे.

  • भक्त प्रल्हादानंतर नरसिंह रयतेसाठी अवतरला होता हिरण्यकक्षप नंतर त्याने अफजलखान फाडला होता
  • निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी ||
  • स्वराज्य स्थापना आणि तिचे महत्त्व आणि निर्धार सांगणारे हे वाक्य. “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हकक आहे आणि तो मी मिळवणारच”.
  • गनिमांच्या देखता फौजा रणशुरांच्या फर्फुरती भुजा ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी .
  • तयास देखता दुर्जन धाके बैसती प्रचीतीचे तडाखे बंड पाशांडाचे वाखे सहजचि होती.
  • “अस्ते कदम अस्ते कदम अस्ते कदम महाराज,गडपती  गडश्वपती भूपती,प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्ठावधानजागृत,अष्ठप्रधानदैष्ठीत न्यायालंकार मंडित,शास्त्रस्त्रशस्त्र पारंगत,राजनीती धुरंधर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की…..
  • अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुद्धा घडलो असतो वदले शिवछत्रपती…
  • स्वराज्याचे खरे वैभव आणि सामर्थ्य हे आपल्या दुर्गाच्या किल्ल्यांमध्ये आहे.
  • शत्रूला कधीही कमी लेखू नये प्रत्येकाचा आदर करा.

शत्रू कितीही क्रूर असो मृत्यू नंतर वैर संपत.

Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi
  • रयतेची काळजी आणि संरक्षण करणारा रयतेचा जाणता राजा.
  • खरा योधा तोच आहे ज्याच्याकडे प्रसंगाला सामोरं जाण्याचं साहस आहे.

सगळं गमावलं तरी खचून जाऊ नका महाराजांनीही शून्यातून स्वराज्य उभं केलं.

  • जो पर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयावर दृढ आहात तोपर्यंत तुमचा पराभव कोणीही करू शकत नाही.
  • स्वराज्याचे स्वप्न हे शौर्याच्या बळावर साकार करता येते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार Chatrapati Shivaji Maharaj Motivational Thoughts

Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi हे जगातील संपूर्ण मनुष्य जातीला कोणत्याही प्रसंगातून सोडविण्याची ताकत ही महाराजांच्या विचार धारेत आहे आणि ही विचारधारा तुमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी विचार खाली दिलेले आहेत.

एका राज्याची खरी ओळख ही न्याय आणि धर्म जपणे आहे जी महाराजांमधे ठळक दिसते.

महाराजांनी निष्ठावंत आणि विश्वासू मावळे जोडले ते कसे हे सांगणारे विचार

Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

ह्या संघर्षाच्या आयुष्यात जेव्हा कधी सगळं शून्य झाल्यासारखं वाटेल तेव्हा एका ऊर्जेची गरज असते.आणि ऊर्जा हवी असेल प्रेरणा हवी असेल तर संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा उत्तम स्रोत नाही.महाराजांच्या एका स्मरणाने प्रेरणा मिळते

  • आपल्या माणसाजवळ प्रेमाने आणि आदराने राहावे तर त्यांचा विश्वास जिंकता येतो.
  • बलाढ्य शत्रूला नमवून महाराजांनी दाखवलं की,शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.
  • जर सेवा करायचीच असेल तर आपल्या मातृ भूमीची करा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे.
  • युद्ध हे फक्त वैर संपवण्यासाठी नसते तर ते न्यायासाठी असते.
  • प्रतीपचंद्र लेखेव् वर्धिष्णू विश्ववांदिता शाहसूनो शिवशैशा मुद्रा भद्राय राज्यते
  • आपल्या मोजक्याच आयुष्यात असे कार्य करावे की, युगाच्या अंतापर्यंत आपली किर्ती राहील.
  • अठरापकड जाती एकत्र करून भेदभाव संपवून ज्यांनी मानवता धर्म जपला तो आमचा राजा.
  • शत्रूच्या मुलीला देखील ज्यांनी सुखरूप आदराने घरी पाठवलं तो आमचा राजा.
  • प्रत्येकात एक श्रेष्ठ सामर्थ्य आहे त्याला ओळखून त्याचा आदर करा.- छत्रपती शिवाजी महाराज

Shivaji Maharaj Status In Marathi

  • आपली संस्कृती आणि आपला धर्म बुडता कामा नये ,आणि हेच आपलं कर्तव्य आहे – महाराज
  • दिल्लीच्या दरबारात भर सभेत स्वाभिमान जपत औरंग्याला देखील धडकी भरवणारे आपला राजा.
  • ब्रम्हांडाच्या तिजोरीतून एक मौल्यवान उल्का भारत वर्षात धडकली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
  • शिवरायांचे छावे आम्ही मनाप्रमाणे राहू आमच्या मर्जीविना झुंजण्या कोण सांगतो पाहू तेज अनोखे पाहुनी दिपली आलमगीराजी मती नकार देणारे हे केवळ दोघे छत्रपती
  • स्वराज्याशी मावळे उमगती साधुनी बळोपासना मारुती श्रीरामा कृपा करिती त्यावरी छत्रपती स्वराज्य मनी पेरती
  • इथे फक्त दिल्लीचे तख्तच नाही झुकले काळालाही झुकवून गुलामीला गाडून सोनेरी युगाचा आरंभ झाला होता
Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi
  • अश्वारूढ होऊन देव माझा अवतरला नसता तर आज आपले तेहतीस कोटी देव बंदिस्त असते यवनांकडे
  • रणांगणातील शौर्याप्रमाणे किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्वाची ठरते खलबतखान्यातील युद्धनीती
  • सिंहगर्जना काय असते जाऊन विचार त्या दिल्लीच्या दरबाराला अजून त्या भिंतींचा कंप गेला नसावा
  • सहनशीलतेचा अंत असा झाला की अफझलखानाची अवस्था पाहून कल्पना येते की जनतेने किती जुलूम सहन केला असावा
  • फक्त पातीच्या धारेने नव्हे तर स्वामी निष्ठा ,शौर्याच्या आणि कर्तृत्वाने योध्याला तलवार शोभून दिसते

छत्रपती शिवाजी महाराज सुविचार मराठी

  • धर्माची ज्योत विजताना फडफडली अन् ह्या प्रांतात ठिणगी पडली अधर्माला धडकी भरवून आवाज झाला हुजुर्र… हुजुर्र..मराठा आ गये….!
  • ह्या पृथ्वीला आपल्या जन्माआधी करोडो वर्षे झाली पण महाराजांना फक्त ३५० ही गोष्ट किती सुंदर आहे
  • महाराजांची आणि आमची पहिली भेट इयत्ता चौथीमध्ये झाली
  • अनंत ब्रम्हांडाच्या खजिन्यातून एक उल्कारत्न धरतीला धडकलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या रत्नाच्या तेजाने एक वलय निर्माण झालं ते म्हणजे “स्वराज्य”.
  • स्वामिनिष्ठा काय असते जाऊन विचारा त्या रायगडास.
  • त्या चंद्रास तेज सूर्यामुळे तैसेचि हे आयुष्य आम्हास तुमच्यामुळे राजं.
  • पौर्णिमेचा मित्र भासणाऱ्या शत्रूपेक्षा अमावस्येचा काळाकुट्ट अंधार हा स्वराज्याचा सहकारीच
  • जेव्हा प्रसंग मोठा असतो पण धर्म महत्वाचा असतो तेव्हा आपल्या विजयाच्या वाटा आपल्यालाच निर्माण करायच्या असतात.
  • बापाचा साम्राज्य पुढे वाढविण्यात एक वेगळंच सामर्थ्य लागतं आणि ते बापकडूनच मिळत
Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi For Students

तुम्ही विद्यार्थी असाल म्हणजेच तुम्ही आता शिक्षणाच्या प्रवाहात असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान हे छत्रपती शिवाजी महाराज पाहिजेत. कारण त्यांच्या आयुष्याची गाथा पहाल तर खूप यश अपयश,सुख दुख असे क्षण असून त्यावर संयमाने मार्ग काढून यश कसा मिळवता येतो हे तुम्हाला शिकता येईल.

  • सगळं संपलं असे जेव्हा वाटेल तेव्हा पुरंदरचा तह आठव महाराजांची ही हीच अवस्था होती,पण सर्व शून्य झालं असतांना शून्यातून स्वराज्य उभं केलं.
  • वेळ वाया घालवू नको,अजून वेळ गेलेली नाही,महाराजांनी वयाच्या 16 व्या वर्षी लढाई जिंकले.
  • ध्येय निश्चित कर,आयुष्यात काय करायचं आहे हे स्पष्ट कर,तर इथे पोहचता येईल
  • जेव्हा जेव्हा अभ्यासाला कंटाळा येईल तेव्हा तेव्हा महाराजांना आठव,अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात काय करून गेले आपल्यासाठी.
  • प्रयत्न करतांना कारण सांगत राहू नकोस,तुझ्याकडे जे आहे त्याच्या पासून सुरुवात कर,महाराजांनी स्वराज्यासारख स्वप्नं मूठभर मावळेच सोबत घेऊन पूर्ण केले होते.
  • महाराजांची दूरदृष्टि शिक,आज जे काही करतोस त्याने येत्या दोन वर्षात कुठे असशील ह्याचा विचार कर.

Chatrapati Shivaji Maharaj Motivational Quotes In Marathi

  • सगळ्याच गोष्टी ताकतीने होतं नसतात काही युद्ध बुद्धीने जिंकायची असतात.
  • दुसऱ्याला सल्ला देण्याआधी त्यात आपण स्वतः हा असायला पाहिजेत
  • कोणताही निर्णय घेताना त्याच्या दाही दिशांनी विचार करावा
  • स्वतःच्या तत्त्वांशी इतकं प्रामाणिक राहावं की,लाखोंसमोरही मान खाली झुकता कामा नये.
  • ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत उत्तर देण्याची तयारी ठेवावी
  • एक जीवन आहे असं जगायचं की,सूर्य चंद्र असे पर्यन्त जगाने आठवावे
  • जगाने आठवण काढण्यासाठी जगासाठी निस्वार्थपणे काहीतरी करावं लागतं

Conclusion

Chatrapati Shivaji Maharaj हे फक्त एक व्यक्ति म्हणून पाहू नये,ती एक असामान्य शक्ति आहे 350 वर्षानंतरही महाराजांचे फक्त नाव प्रसंगावर मात करायला बळ देते.
महाराजांच्या विचार धारेवर राहून आपण आयुष्य जगलो तर आपल्या एक माणूस म्हणूनही जगता येईल हेच त्यांच्या चारित्रयातून शिकायला मिळतं. chatrapati shivaji maharaj quotes in marathi लिहण्याचा हाच हेतु आहे की,आयुष्यात स्वप्न पहा पण त्याचा हेतु योग्य ठेवा आणि ते पूर्ण होई पर्यन्त प्रामाणिकपणे प्रयत्न करा तर नक्कीच यश मिळेल.

अजून वाचा –
self Love Quotes In Marathi
Motivational quotes in marathi