100+ Best Motivational Quotes In Marathi प्रेरणादायी विचार
तुमच्या आत्मविश्वास वाढविण्यासाठी तुम्ही Motivational Thoughts शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात हे प्रेरणादायी विचार वाचून तुम्ही रोज तुमचा confidence boost करू शकता.आणि इतरांना ही शेअर करू शकता.
- Famous Marathi Motivational Quotes
- Life Quotes In Marathi
- Marathi Quotes for Success
- inspirational Life quotes in marathi
Famous Marathi Motivational Quotes(मराठी प्रेरणादायी विचार)
- कष्टाचे फळ कधी ना कधी मिळतेच (Hard work pays off sometimes )
- हे ही दिवस बदलतील (This will change these days.)
- आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या कामावर प्रेम करा (If you want to be successful in your life Love your hardwork)
- ज्या देवाने इथपर्यंत आणलं आहे तोच पुढे घेऊन जाईल…! (God who has brought this far will take it further)
- नेहमी सत्याचा विजय होतो (Truth Always Wins)
- फक्त मन शांत ठेवा वेळ आणि दिवस बदलून जातील (प्रसंगात घाईघाईने निर्णय घेणं चुकीचं ठरू शकत.म्हणून प्रसंगाच्या वेळी डोक शांत ठेवून विचार केला तर मार्ग निघतो.)
- कर्माची फळं मिळतात मग ते वाईट असो किंवा चांगले(कोणी कोणाचं वाईट करत नसतो तर आपण केलेल्या कर्माचे परिणाम आपल्या समोर येत असतात मग ती कधी चांगली तर कधी वाईट असू शकतात)
- जे Life मधे आवश्यक आहे त्याकडे लक्ष द्या बाकी सगळ्यांना दुर्लक्षित करायला शिका.
- प्रत्येकाने संघर्ष केला आहे तुमच्याच आयुष्यात संकट नाहीत म्हणून तुम्ही ही संघर्ष करा.
- आयुष्य खूप छोटे आहे तणाव घेऊन का.
- कोणाच्या life मधे फक्त option म्हणून राहण्यापेक्षा एकटं राहणं केव्हाही चांगलं
Life Quotes In Marathi (आयुष्यावर प्रेरणादायी विचार
अनेक दुःख,अपयश,प्रश्न आणि ह्या मुळे आलेली नैराश्यता संपवायची असेल तर त्यात मोलाचा वाटा हा प्रेरणादायी विचारांचा असतो असेच Motivational quotes in marathi तुमचे आयुष्य बदलायला नक्की मदत करतील आणि तुमची Success कडे वाटचाल सुरू होईल हीच अपेक्षा आहे.

- पैशाने श्रीमंत असलेली माणसे life मधे खूप भेटतील पण मनाने श्रीमंती असणारी माणसं जास्त नाही भेटत
- आयुष्य किती आहे माहीत नाही पण जे आहे ते असं जगा की तुमच्या नसण्यामागे ही तुम्ही असायला पाहिजे
- तोंड बंद ठेवला तर मासा ही गळाला लागत नाही तुम्ही ही शांत रहा अडचणीत येणार नाहीत
- Life मधे प्रत्येक क्षण आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कारण गेलेली वेळ पुन्हा आणता येत नाही
- आपल्याला मिळालेलं आयुष्य चांगलं किंवा वाईट नसत ते आपण कस बनवतो या वर आहे
- आयुष्यात पैसा जास्त नाहीत कमावला तरी चालेल पण शरीर कमवा हीच खरी संपत्ती आहे
मराठी प्रेरणादायी विचार Marathi Motivational Thoughts
- आयुष्यात लोकं काय म्हणतील हा विचार तुम्ही करू नका तुम्हाला योग्य वाटतं ते करा
- आयुष्यात कशाच्याही अधीन होऊ नका सगळ्या गोष्ट योग्य त्याच मर्यादित करा
- वस्तूंचा वापर तुम्ही करा कारण वस्तू आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी नव्हे
- ज्यावेळेला तुम्ही एखाद्या वस्तूच्या अधीन होता त्यावेळेला आयुष्यातला आनंद निघून जातो
- आयुष्यात सुख,समाधान,आनंद,यश,कीर्ती,पाहिजे असेल तर मर्यादा खूप महत्वाची ठरते
- सगळ्यांचं आयुष्य बदलणं शक्य नाही पण तुम्ही तुमचं आयुष्य बदला
- स्वतःला चांगलं बनवायचं आहे एवढं की तुमचे चाहते एक दोन नाही लाखो असतील
- आयुष्यात तुम्हाला तितकंच मिळेल जेवढे तुम्ही कष्ट केले आहेत त्याच्या पलीकडे काहीच मिळत नाही
- आयुष्य घाबरत नाही जगायचं स्वतः कष्ट करून अभिमानाने जगायला शिका
- Life मधे तुम्ही जेवढे प्रामाणिक राहाल तितकेच प्रसंग जास्त उभे राहताततुम्ही स्वतः हा जवळ प्रामाणिक नसाल तर तुम्हाला सुखाची झोप ही लागणार नाही
- पैसा कमावणे म्हणजे यशस्वी होणे ही व्याख्या बदलत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी नाहीत
Marathi Quotes for Success(यशस्वी होण्यासाठी विचार)
Life मधे प्रत्येकाची काही स्वप्न,ध्येय असतात आणि ती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो पण अनेकदा निराशा हाती येते आणि नव्याने त्या स्वप्नपूर्ती साठी नव्याने न थकता न थांबता,नव्या उर्जाने पुन्हा आपण प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे असते .कितीही पडलो तरी नव्याने उभ राहण्यासाठी प्रेरणादायी विचारांची आवश्यकता असते असे विचार आम्ही Marathi Quotes for Success मधे ज्यांना Success मिळवायची आहे त्यांच्यासाठी घेऊन आलो आहोत.
- यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं कोणतंही क्षेत्र असेल त्यात सातत्य खूप महत्वाचे आहे
- प्रत्येक यशामागे एक खूप मोठा त्याग असतो
- यशस्वी होण्याआधी खूप दुःख,वेदना,चटके सोसावे लागतातच
तुमच्या सोबत जे काही वाईट झालं त्यातून काहीतरी शिका,त्याचा विचार करत बसू नका.आयुष्य बदलणारे Good thoughts Good thoughts in marathi खूप लाभदायक ठरतील.कारण आपलं मन हे खूप चंचल आहे, जसं बहिणाबाई चौधरी नी म्हटल आहे “मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर”किती हकाल हाकल तरी फिरतो माघार “ज्याच मन प्रसन्न त्याच आयुष्य सुंदर पण तेच मन कशाने प्रसन्न होतं,भक्ती गीत,कीर्तन,भजन त्याच बरोबर चांगले विचार ऐकल्याने.प्रत्येकाला मदत करा कारण जे पेराल तेच उगवत असत आता तुम्ही काय पेरता यावर तुमचं सुख दुःख अवलंबून आहे.
- आयुष्य एकदाच आहे त्याचा उपयोग दुसऱ्यांच्या हितासाठी करा त्यातच तुमचे हित आहे.
- मरण हे प्रत्येकाला आहे पण आयुष्यात असे काही करा की तुम्ही गेलात तरी लोकांच्या चर्चेत जिवंत पाहिजे.
- जग सुंदर आहे फक्त तुमचा दृष्टिकोन सुंदर पाहिजे.
- तुमचा श्वास सुरू आहे,तुमचं शरीर ठीक आहे,अजून जगण्यासाठी काय हवं .

Positive Thoughts In Marathi
- दुसऱ्याला दुखावून आपण कधी सुखी नाही होऊ शकत म्हणून प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न करा.
- मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं कोणी वाईट नाही करू शकत यावर विश्वास ठेवा.
- रोजच्या कामातून स्वतः हा साठी वेळ काढा मग आयुष्य सुंदर होऊन जाईल.
- आजूबाजूला पहा,सुदंर पक्षी ,प्राणी,निळा आकाश,हिरवीगार झाडी, पक्षांचा किलबिलाट हे आयुष्य खूप सुखद करतात.
- दुसऱ्याला मदत करून आनंद होत असेल तर हे निरोगी मनाचा लक्षण आहे.
- ज्याच्या कडे गाडी बंगला आहे तो श्रीमंत नसतो.ज्याचे ज्याचे विचार आणि आचार सुंदर तोच श्रीमंत आहे.
- वरून सुंदर असण्यापेक्षा मन आणि हृदय सुंदर हवं.
- तुमच्याकडे असणारे सुंदर शब्द हेच तुमची श्रीमंती आहे.
- तुम्ही माणूस आहात मग माणुसकीचं दर्शन तुमच्या वागण्यावरून घडायला पाहिजे.
- तुमचे विचार एवढे सुंदर हवेत की तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाकडे ती सुंदरता यायला पाहिजे.
- जो मनाला पवित्र करतो त्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ नाही.
- कधीच स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याची फसवणूक करू नका.कारण कर्माची फळ भोगावी लागतातच.
- असूरी वृत्तीने कमावलेलं धन तुम्हाला कधी सुखी नाही करू शकत.
- केलेले कष्ट कधी वाया जात नाहीत.
- बुध्दी प्रत्येकाकडे आहे पण त्या बुध्दीचा वापर हा प्रत्येकाच्या हितासाठी तेव्हा करता जेव्हा तुमच्यावर चांगले संस्कार असतात.
Good thoughts in marathi हे फक्त वाचण्यासाठी नाहीत तर त्या प्रमाणे आयुष्य जगण्याच्या हेतूने आम्ही लिहले आहे.good thoughts वाचून तुमच्या मनात थोडा जरी बद्दल झाला तर ते आमचं यश असेल.
Life Motivational Quotes In Marathi
आयुष्य जगताना चढ उतार हे येतच असतात पण त्यात खचून न जाता खंबीरपणे त्याला सामोरी जाण्याची हिम्मत ही एका साथी मुळे मिळत असते पण ही साथ कोणा एका व्यक्तीची पाहिजे असे नाही ती विचारांची ही असू शकते आणि म्हणून तुम्हाला साथ देण्यासाठी Motivational Quotes In Marathi हे नक्कीच तुमच्या उपयोगी येतील.
- कोणाच्याही गोष्टी मनाला लागून घ्यायच्या नसतात ,जो बोलतो त्याचं कर्तृत्व पाहावं आधी काय आहे.
- तुम्ही जसं बोलता तसेच कर्म करत असाल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील.
- अशी तुमच्याकडे एक गोष्ट आहे जी तुमच्याकडे असून दुसऱ्याला देऊ शकता आणि दिलं तर ती तुमच्याकडे अजून वाढते ती म्हणजे “आनंद”.
- आनंद हा विकत घेता येत नसतो तो कमवावा लागतो स्वतः हा जवळ प्रामाणिक राहून आणि तुम्ही इतरांजवळ कसा व्यवहार करता यावर आनंद अवलंबून असतो.
- प्रामाणिक केलेल्या कर्माची फळ देखील तितकीच गोड असतात.
- नेहमी सत्याचा विजय होतो मग थोडा उशीर होईल पण सत्यच जिंकेल.
- आयुष्याच्या मार्गावर पडायला तर पाहिजे त्याने तर कळत, हसतात कोण,पाहतात कोण आणि सावरायला येतात कोण.
- देवावर विश्वास ठेवा आणि कामावर प्रेम करा हे दोघे तुम्हाला संकटात एकटं पडू देणार नाहीत.
- आपल्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आलेले स्मित हास्य ही आपली श्रीमंती आहे.
- परिस्थीती गरीब असली तरी लाज वाटू देऊ नका ,विचार श्रीमंत ठेवा.
Conclusion
मला असं वाटत विचार म्हणजेच फक्त शब्द आणि अक्षरे नाहीत तर एक सकारात्मक ऊर्जा आहे जी जगण्याला योग्य दिशा देऊन योग्य मार्गावर आणते म्हणून आज पर्यन्त आपण जे काही ऐकत आलो तसेच आपल्यावर संस्कार झाले.
आणि जसे संस्कार तसे आपण कर्म करत राहिलो इतका सगळा फरक हा एका विचाराने होत असतो म्हणून Motivational Quotes In Marathi हे मी खूप महत्वाचे समजतो प्रत्येक वाचकासाठी.
आणखी वाचा
Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi