marathi birthday wishes for mother प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घडक म्हणजे आई वडील .ज्यांच्या मुले आपला जन्म झाला तेच आपले सर्वस्व असतात. त्यांच्या उपकाराची फेड शक्य नसते. असं असलं तरी आपण जास्तीत जास्त क्षण आनंदाचे देणं हे ही आपलं कर्तव्य असतं. त्या आनंदाच्या क्षणामाधील एक क्षण म्हणजे आई बाबांचा वाढदिवस असतो. अशा वाढदिवसावेळी त्यांना प्रेमळ अशा शुभेच्छा देण्यासाठी birthday wishes in marathi for mother घेऊन आलेलं आहे मराठीतील प्रेमळ,गोड,सर्वोत्कृष्ट आणि निवडक शुभेच्छा संग्रह. ज्याच्या माध्यमातून तुम्ही आई बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळं आनंद आणू शकता.अशा तुमच्या प्रेमळ आई वडिलांना द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत .
Birthday Wishes In Marathi For Mother आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
⦁ देवाच्या आधी माझ्या आयुष्यात जिचा अस्तित्व आहे,आणि जीच्यामुळे माझं अस्तित्व आहे त्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
⦁ फुलासारखी नाजुक आणि सुंदर,सूर्याच्या कोवळ्या किरणां सारखे जिचे शब्द आहेत,जिचा धरती प्रमाणे आधार आहे अशा आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
⦁ सगळ्या प्रश्नावर जीच्याकडे आहे उत्तर,कोणताही कठीण प्रसंग सहज सोपा करून देणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
⦁ परिस्थिति कितीही वाईट असली तरी धीर देणारी एकमेव व्यक्ति म्हणजे माझी आहे,भविष्यातील माझी वाट दाखवणारी माझी आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ मी आज जे काही आहे माझ्या सगळ्या यशाचं कारण तूच आहेस आई happy birthday aai
⦁ मी कितीही मोठा झालो तरी माझी लहान बाळासारखी जपणारी माझी काळजी घेणारी आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
⦁ जगातील सगळ्यात सुरक्षित आणि विसावा देणारी जागा म्हणजे माझी आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मुलीकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा Daughter’s loving wishes for marathi
आई आणि मुलीचे नाते जगावेगळ असतं आणि ते नातं अजून घट्ट होण्यासाठी एकमेकांचा वाढदिवस हे खूप चांगलं निमित्त असतं त्यासाठी आईच्या वाढदिवसाला मुलीकडून काही खास शुभेच्छा संदेश इथे दिले आहेस.
⦁ माझा आदर्श माझी आई,माझा देव माझी आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy birthday Aai
⦁ माझ्या मनातली आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जिच्याजवळ सांगते अशी विश्वासू जागा म्हणजे माझी आई.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
⦁ लहानपणापासून ते आतापर्यंत तू मला काहीच कमी पडू दिलं नाहीस कायम माझ्या आनंदासाठी झटत राहतेस.तुला ही काहीच कमी पडू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
⦁ माझं बोट धरून मला चालायला शिवणाऱ्या आईचा मी ही तिच्या वाईट वेळात आधार होईन आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
⦁ प्रत्येक गोष्टीत माझं लाड करणारी माझी आई तुला हवी ती गोष्ट आणण्यासाठी हे माझं आयुष्य वेचेन आई . तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ मलाच स्वतःच जग समजणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy birthday aai
⦁ आई जशी मी तुझ्यासाठी देवाने दिलेली भेट आहे तशीच माझ्या आयुष्यातील देवाने दिलेली सुंदर भेट तू आहेस तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना
सुंदर आणि प्रेमळ लहान वाढदिवस संदेश Beutiful Lovely And Shorts Birthday Massage
आईच्या वाढदिवसाला तुम्हाला तिला विश करण्यासाठी शुभेच्छांची मेजवानी घेऊन आलो आहे ज्यात कमीतकमी शब्दांत तुमच्या भावना मांडू शकता असे शॉर्ट्स मेसेज खाली दिले आहेत जे मराठीत आईला शुभेच्छा देऊ शकता
⦁ प्रेमाची सावली आणि दुखात मावली अशी आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
⦁ माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आनंद यावा हा प्रयत्न कायम करेन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
⦁ सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या आईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

⦁ तुझी साथ असणं म्हणजेच माझं यश आहे Happy Birthday Aai..!
⦁ तुझी नजर माझ्यावर पडली की देवाची कृपा होते आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
⦁ प्रेम,करुणा,दया,क्षमा,शांती ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ म्हणजे आई. आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
⦁ मायेचा समुद्र आहेस तू आई happy birthday to you mom..!
⦁ आकाशासारखं मन असणाऱ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
⦁ एक मुलगी कशी असावी हे तूच घडवलं मला आई तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!
⦁ आई एवढे कष्ट सहन करून तू जन्म दिला मला तुझे उपकार फेडण शक्य नाही तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
निष्कर्ष : आईचा वाढदिवस म्हणजे हा तो क्षण ती संधी असते जिच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता की आईचे तुमच्या आयुष्यातील स्थान काय आहे तुमचं किती प्रेम आहे ज्यामुळे आपल्या नात्यातील प्रेम आपुलकी अजून घट्ट होऊन नातं अतूट बनेल. शुभेच्छा जरी छोट्या असल्या तरी त्यामागील भावना ह्या शब्दात ही मांडता येत नसतात.कारण आईच आपल्या प्रत्येकाजवळ असणारे नाते हे जगावेगळ असतं,म्हणून आईचा वाढदिवस ही खरंच आपल्यासाठी खूप मोठी संधीच असते तिच्यासाठी काही आनंदाचे क्षण निर्माण करण्याची म्हणून ही संधी चुकवू नका.
Special Birthday Quotes in Marathi For Mother आईसाठी स्पेशल वाढदिवसाचे कोटस
हे quotes असे आहेत जे तुम्ही ग्रीटिंग कार्ड वरही लिहून देऊ शकता गिफ्ट मध्येही देऊ शकता ज्याने आईला आनंदाचा धक्का मिळेल.आईला whatsapp करू शकता असे काही वाढदिवसाच्या शुभेच्छा आईसाठी पाहुयात.
⦁ जसं मला श्वास महत्वाचा आहे त्याच प्रमाणे जीवन जगताना आई तू महत्वाची आहेस. आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
⦁ आई चंद्रापेक्षा सुंदर आणि शीतल आहेस तू Happy birthday aai
⦁ तूच शारदा, तूच सरस्वती ,तूच लक्ष्मी ,आई तूच दुर्गा आहेस माझी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
⦁ माझ्या आयुष्याची सुरुवात तू,ध्येयही तू,यशही तू,सुखही तू, समाधान तू,आधार तू,आकार तू,माझं संपूर्ण आयुषचं तू आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
⦁ उनातून तप्त झालो असताना सुखावणारी हवेची लकेर म्हणजे आई तू,रडत असताना अचानक गालावर उमटणार हसूही तू. aai happy birthday

Mother Birthday Massage For Whatsapp आईसाठी व्हाटसप्प संदेश
जरी कामानिमित्त आईपासून दूर असलेत तरी तुमच्या भावना आई पर्यन्त पोहचविण्यासाठी हे mother birthday wishes in marathi खूप उपयुक्त ठरतील. इथे काही shorts and sweet sms दिले आहेत ते तुम्ही आईला पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकाल.
⦁ आई आज घरट्यापासून दूर जरी असलो तरी तूच मला उंच भरारी शिकवली आहेस पुन्हा भेटू लवकरच आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
⦁ सगळं कसं सावरून घ्यायचं हा गुण शिकवणाऱ्या देवस्वरूप आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
⦁ सहनशक्तीचा ज्वलंत उदाहरण म्हणजे आई तू आहेस तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
⦁ प्रत्यक्ष त्यागाचं प्रतीक आहेस तू आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
⦁ पृथ्वीवरचा जीवंत तीर्थक्षेत्र आई तू आहेस. मला फक्त तुझा आशीर्वाद पाहिजे. आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
⦁ मायेचा अखंड वाहणारा झरा आहेस आई Happy Birthday Aai
⦁ जगातील एकमेव निस्वार्थ प्रेम करणारी देवता आहेस तू आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
⦁ माय म्हणजे मायेचा समुद्र तू ,आई म्हणजे आकाशाचा छत्र तू ,जननी म्हणजे जीवनदान तू..Happy Birthday आई
⦁ देवाचा ध्यास तू,देवाचे स्वप्न तू,देवाचे पूर्णत्व तू,जगाचे अस्तित्व तू ,आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आईचा वाढदिवस तुम्ही अजून खास कसा बनवू शकता ?
⦁ कविता : तुम्ही स्वतः हा लिहलेली एखादी कविता आईला तिच्या समोर वाचून दाखवू शकता तो क्षण आईसाठी खास होऊ शकतो
⦁ Gretting Card : एखाद भावनिक पत्र लिहू शकता आणि कार्ड मध्ये देऊ शकता
⦁ Gift : आईला कोणत्या वस्तूची गरज आहे आणि ती वस्तु खूप वर्ष आईला मिळाली नाही अशी गोष्ट शोधा आणि तीच गिफ्ट देण्याचा प्रयत्न करू शकता हा ही क्षण खास होऊ शकतो आईसाठी
⦁ एखादं निर्णय : आयुष्यातील असं एखादं निर्णय घेऊ शकता ज्याने सगळ्यात जास्त आनंद आईला होईल
आणखी वाचा – Motivational Thoughts in Marathi