100+Sad Quotes In Marathi
Sad Quotes In Marathi आयुष्यात येणाऱ्या प्रसंगातून कधी कधी एकटेपणा जाणवत असतो त्यामध्ये माणसाला कोणाची तरी साथ हवी असते आणि ती साथ मिळाली नाही तर तो त्याचं दू :खाना आपला साथी बनवतो आणि मग जे अनुभवतो ते आम्ही ह्या Sad Quotes In Marathi मधून घेऊन आलो आहोत जे तुम्ही नक्की relate कराल तुमच्या आयुष्याशी .
थोडे दिवस कोणालाही दिसू नका
लोक तुम्हाला विसरून जातील,
तुमच्या असण्याने नसण्याने
कोणाला फरक पडत नाही ,
हे कारण पुरेसं नाही का
स्वतःहा साठी जगायला.
आपण आयुष्य कल्पनेत जगत असतो,
काळ वेळ अशा जागी नेऊन सोडते ज्याची
कल्पनाही कधी केली नसेल.
हे ही वाचा – motivational quotes in marathi
कोण कधी आणि का जवळ आला
आणि का दुरावला हे पाहणं,आणि आठवून हसणं
ही ज्याची विनोदाची व्याख्या असेल त्याच्यासाठी दुःख ते काय उरले.
शब्दांनो घ्या समजून
ही भावना
रेषांवरही माझ्या उभे
करा अर्थानां
दुसऱ्याच्या मनात निर्माण केली जाते
ती सर्वात महाग जागा असते,
कारण तिची किंमत करता येत नाही
आणि एकदा का ती गमावली तर
पुन्हा निर्माण करणे जवळजवळ
अशक्यच असते
बोलून विचार करण्यापेक्षा आधी विचार करून बोला
असं म्हटलं जातं,
पण मी म्हणतो माणूस हा विचार केल्याशिवाय
बोलूच शकत नाही,फक्त त्याचे विचार
योग्य नसल्यामुळे तो कधी हसवणारे
तर कधी रडवणारे बोल बोलत असतो
जमीन जिथे संपून आकाश जमिनीला
टेकल्या सारख वाटतं
आणि दुःख संपून सुखी झाल्यासारखं
वाटतं ते क्षितीज.
दोन्ही भ्रम एक दृष्टीचा आणि एक मनाचा.
नवं ,वेगळं आणि काहीतरी मोठं करण्यासाठी रक्तात जी
आग लागते ना ती गरिबीतून पेटते ,त्या गरिबीचा मी श्रीमंत माणूस आहे
सोबत आणि साथ यात खूप
फरक आहे.
जे सोबत आहेत त्यांची साथ
असेलच अस नाही
पण जे साथ देतात ते सोबत
असतीलच असंही नाही
अचानक काहीच लिहता येत नाही
अनुभवातून मनाकडे आलेली लकेर
थांबवता आली पाहिजे
माझी पायवाट असताना
मला हायवे कडे बघण्याची
गरज वाटतं नाही.
मी ही तिथेच पोहचणार आहे
पण अपघाताशिवाय.
कोणी तुमच्या बद्दल कल्पनाही केली नसेल
असं काहीतरी करायचं असेल तर,सगळ्यांजवळ सगळं बोलून नाही होतं, एक डाव राखून खेळ खेळावा लागतो.
दुसऱ्याचा स्वाभिमान आपल्याला अहंकार वाटतो,
आणि आपला अहंकार आपल्याला स्वाभिमान वाटतो.
खूप जीव लावून पाहावं
पण जेव्हा त्याची जाणीव
त्या व्यक्तीला न होता
आपल्याला दुय्यम स्थान मिळतं,
ही जाणीव आपल्याला झाली की ,
शांत पण तिथून निघावं…..
- माझ्या मोबाइल मध्ये असे दहा तरी नंबर सेव आहेत पण ती माणसं ह्या जगात अस्तित्वात नाहीत . काहीतरी राहून गेलं असा वाटत कधी कधी तो म्हणजे संवाद .
- कोणाची सवय कधी लावून घेऊन नका ,परिस्थिति बदलली लोक बदलतात आणि तुम्ही तिथेच राहता .
- कोणासाठी कधी जास्त उपलब्ध राहू नका लोक वापर करून फेकून देतात .
- गरज असेल तर लोकं तुम्हाला शोधत येतील आणि तुम्हाला ती आपलीच वाटतील .
माझ्या जवळ जास्त मानसं टिकली नाही ,कारण मला मानसं हवी होती आणि माणसाना माझ्याकडील पैसा .
प्रेमाची तुलना पैशाजवळ झाली आणि प्रेम हरल .
आपलं यश जग साजरं करत पण आपल्याच माणसानं ते पचत नसतं .
आपल्याला दुखावणारे आपलेच असतात.
जय व्यक्ति वर जेवढ जास्त प्रेम कराल तीच व्यक्ति तुम्हाला जास्त दुख देते .
रातही हवीशी वाटे मना
नाविन्य जन्मे या जीवना
माझाचि मला देई ही निद्रा
सुखस्त पाहे कृष्णमयी मुद्रा
रातही हवीशी वाटे मना
साथही शांततेच्या खुणा
शांत राती रातकीडा किर-किरे
चांद्रमास घट्ट चांदण्याचे पहारे
रातही स्थिर करी अंतःकरणा
नवे अंकुर पुनश्च या जीवना
क्षणिक संवाद मज मुक्त करी
सुख जैसे गवसे पुरेआयुष्यभरी
पौर्णिमेचा चंद्र निःशब्द करी
शिथिल चांदणे मनःशांत जरी,
सूर्य जसा भासे ज्वालेचा गोळा
चंद्र असा हसे जणू शांततेचा सोहळा,
काय नातं असावं हे वसुंधरेसी
तिच्यासाठी सोशी या कळारासी,
काय असेल चांदण्याच्या तृप्ततेची कोर
का एवढा आतुर होतो तो चकोर,
का असा हा रात्री दिवसाचा भास
चंद्रकिरणे जणू सावलीचा अभास,
सूर्य चंद्र मला कधी वाटतो एक
एका नाण्याच्या ह्या बाजू अनेक…..
रात ही वेडी किमया नियतीची
निळ्याभोर नभासवेड्या वेडी प्रीत रातीची
दिन दावेना दिशा सुखकर बाजूची
रात्रही प्रगटवे चांदणी हिरे माणके पाचूची
रात ही हवीशी वाटे मजला
नभ शोभुनी दिसे कृष्णवर्णा
गारवा हा कृष्णचरण स्पर्श
चंद्रमा जणू सुदाम्याचे हर्ष
साऱ्या दुखाना हरवण्याचा एकच उपाय म्हणजे रात्र आणि त्यातील सुखाची झोप…🥰🥰ती तुमच्या वाट्याला येवो,good night…sweet dreams…
सुखाची झोप लागण्यासाठी दिवसभर मेहनत करावी लागते तीही स्वतः हा जवळ प्रामाणिक राहून.good night 😴😴