50+ मराठी कविता संग्रह | Best Marathi Poem | Marathi Kavita

मराठी कविता : आपल्या मनातील भावना मांडण्याचा एक प्रभावी पारंपरिक मार्ग म्हणजे कविता,कवितांच्या माध्यमातून कित्येक कवींनी आयुष्याचा सार,असार,सुख दुख,अनेक प्रश्न आणि उत्तर,प्रेम,तर कधी वैर ही कवींनी मराठी कविता यांच्या माध्यमातून व्यक्त केल आज आपण अशाच माझ्या स्वलिखित मराठी कविता पाहणार आहोत जय तुम्हाला नक्कीच भावतील यात शंका नाही
मराठी कवितेची परंपरा संत साहित्यापासून झाली संतांनी समाजाची अवस्था सुख,दुख,भक्ति,प्रेम ह्या भावना कवितेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचवली. आज ही तरुण वर्ग कवितेचा मोठा चाहता आहे. सोशल मेडियावर ही भरपूर पप्रमाणात मराठी कविता शेअर केल्या जातात.

आई मराठी कविता Marathi Poem Aai

प्रत्येकाचं अस्तित्व असणारी आई हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा नातं असतं.आई च महत्व आणि आई कळण्यासाठी शब्दही अपुरे पडतात तरीही आम्ही aai marathi poem लिहण्याचा प्रयत्न केला आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल

तुज वाचोनि आई मी काहीच नाही

तुज वाचूनि आई मी काहीच नाही
न्म जरी घेतले कोटी ही फेड शक्य नाही
वात्सल्य नजरेत तुझ्या बघता माझ्याकडे

चुकल्या सारख होई दूर ती जेव्हा जाई
निवांत मन होई पदराची ऊब अंगावरी

त्माही तूच , हक्क तुझा या श्वासावरी
श्वर तर नथमस्तक जन्मघेण्या तुझ्या उदरी

मीतर तुझाच अंश मग स्तुती ती काय आई
कारण ही तू माझ्या साऱ्या आयुष्याचे

हीम्मत ही तुझ्या हास्याने साचे
रण स्पर्श तुझा अन सामर्थ्य भरे एकाकी

नाही अशक्य काही हस्त तुझा माझ्या मस्तकी
ही_सारी दुनिया बाजूस जिंकण्या शब्द पुरेसा आई

तुज वाचोनि आई मी काहीच नाही

आई म्हणजे….

आई म्हणजे तप्त उन्हात विसवणारी सावली जशी,
आई म्हणजे भरकटलेल्या नावेला किनारा जशी…,

आई म्हणजे मुसळधार पावसात अडोसा जशी,
आई म्हणजे प्रार्थनेतला देव प्रत्यक्ष जसा,

आई म्हणजे पाण्याचा गारवा आणि सुखाचा उगम,
आई म्हणजे वाऱ्याची शीतलता आणि स्वर्गाचा संगम..,

आईचा एक स्पर्श आणि नवी उमेद अंकुरे,
आईचा एक शब्द आणि वाट ही बहरे….,

आई म्हणजे ब्रह्मांडाच्या ऐश्वर्याची तिजोरी,
आई म्हणजे देवांसाठीही मायेची शिदोरी…..

मराठी कविता

माझी आई

पूर्ण दिवस तिचा कुटुंब
सेवेतच निघून जाई
पण कधी न थकवा
तिज तीच माझी आई

पदस्पर्श करताच तिचे मी
चित्तास मिळे ही सुख शांतता
सोबती संकटकाळी मदतीस
तीच माझी आई

प्रफुल्लित चेहरा पाहताच तिचा
मनीचे दुख विसरून मी जाय
घरची लक्ष्मी माझा आसरा
तीच माझी माय

मायेचा सागर आणि वात्सल्याची खाण
जगण्यातील सात्विक भाग
स्वतःच्या मनीच्या विसरूणी यातना
जगण्यास देते मज नवप्रेरणा

अशा ह्या देवरूपी आत्म्याच्या
मी अखंड सेवेत असावं
आम्हा दोघांचा नातं पाहुणी
त्या ईश्वराला ही कोडं पडाव

बालपण मराठी कविता Marathi Poem On Childhood

प्रत्येक जण बालपणी निरागस निष्पाप आणि सुंदर असतो. हे असं बालपण प्रत्येकाचं सुखाचं असतं आपण प्रत्येकजण हे प्रत्येकाच्या आवडीचे असतो प्रत्येकजण आपले लाड करत असतो. ते दिवस पुनःहा आठविण्यासाठी बालपण मराठी कविता वाचून नक्की शेअर करा.

श्रीमंती

एक रुपयात होतो आम्ही आमचे राजे
न कसले टेंशन ना कसले ओझे

मातीत आम्ही रंगलो न कसल इन्फेक्शन
जगलोच आम्ही असे सोडला नाही एक क्षण

कपडे फाटलेले मस्तीने मालकटलेले
दिन रात्र जसे आम्हासाठी एकवटलेले

काळवेळेच नसे कधी भान
तहान भूक तर आम्ही
ठेवली होती गहान

कधी फुटली डोकी तर कधी ढोपर ही फुटले
जगलोच असे की वेदानेचे काहीच नाही वाटले

दु;खाला  तर आम्ही ओळखतच नव्हतो
उत्साहाने तेव्हा बेभान सुटलो होतो
-Ranjit shinde

बालपणीचे निष्पाप गुन्हे

कडेवर घेतल ज्यानी केस मी ओढली 
चॉकलेट न देता कानाखाली सोडली….. 

मुखात बोट येता कडकडून चावलो 
ओठांवर हास्य फुलले कसे पोटभर जेवलो …..

मैत्री खेळण्याशी होता दुसऱ्यांची ही चोरली 
खेळता खेळता कित्येकदा भांडी मी फोडली .. ….

रांगता रांगता खूपदा गेलो मेणबत्तीवर 
विझवून टाकली ती ही निष्पाप हिमतीवर ….

वाढता वाढता वाणी वळू लागली ,
शिव्याही वाटाव्या गोड बोबडे बोल बोलू लागली ……

शेतकरी मराठी कविता Marathi Poem Farmer

जो जगाचा पोशिंदा पण जगाला त्याच्या वेदना आणि भावना कळत नसतात असा शेतकरी आणि त्याच्या भावना मराठी कविता मधून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आक्रोश

शेतकऱ्याची प्रार्थना कस जगाव शेतकार्याने
सांगशील का रे देवा महागाईच्या
दुनियेत झालायत्याचा खवा ..

निसर्गावर आहे अवलंबून त्याच्या जीवनाचा ठेवा ,
निसर्गच उलटा फिरलाय तुला वाटत नाही का रे हेवा ..

सांगड त्याची निसर्गाची पण
निसर्गच कहर करतोय कधी ओल्या तर
कधी सुक्या दुष्काळा चा बहर करतोय ..

डिजिटल या दुनियेत फेसबुक
whatsapp ने पोट भरणार नाही
शेतकर्याशिवाय जगाला खायला
अन्न मिळणार नाही ….

भरल्या डोळ्यांनी  बांधावर बसलाय
बघ जगाचा पोशिंदा ,
तूच दे त्याला आता आधारचा खांदा
नाहीतर पीक लागलीत टांगणीला
तसा शरीर ही लावेल टांगणीला ..

सार सारं संपलाय त्याला वाटू लागल आहे
शेवटची आशा म्हणून करतोय तुझ्या धावा …..

आभाळा सांग जगू तरी कसं

निळ्याभोर आकाशाच छप्पर गळू लागलं
पाण्यावर हे जीवन आज छळू लागलं

काळ्या मातीतून उगवलो तीही आज गिळू लागली
श्वास चाले ह्या वायुवर तेही बदलले चक्री वादळी

क्षणोक्षणी धडकी काळजात मृत्यूची भीती सर्वत्र
मायबाप जाऊन हरपले निरागस लेकरांचे छत्र

गारवा देणाऱ्या पावसांनी दिला आज चटका
घरटही भरलं पाण्याने त्यात कशी घालवू घटिका

महामारीने दंश करून जागीच बसवलं
आता कुठे जगत होतो त्यात परिस्थितीने फसवलं

प्रेम मराठी कविता Marathi Poem On Love

मराठी कवितांसाठी प्रसिद्ध असणारा हृदयस्पर्शी विषय म्हणजे प्रेम.प्रेमात पडलेली प्रत्येक व्यक्ति ही कवीच असते असं म्हणावं लागेल कारण कित्येक प्रियकर प्रियसिने आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मराठी प्रेम कविता रचल्या असतील अशाच काही प्रेम व्यक्त करणाऱ्या माझ्या स्वलिखित प्रेम कविता खाली दिल्या आहेत त्या नक्की वाचा.

गुलाबी गारवा 

गुलाबी हा गारवा रातही काळोखी,
साथ नाही तुझी एकांतही अनोळखी……,

चांद हा ऐकला चांदण्या चमकल्या,
साथ ना तुझी दिशा त्या कुठल्या……,

काळोखी प्रवास साथ रजनीचर,
वाट ही अधुरी प्रकाश हा धूसर……,

चालतो एकला सोबती सावल्या,
थांबलो विसाव्या अन् रातराणी गंधाळल्या…….

marathi kavita

स्पर्श तुझा

प्रत्येक तुझा तो स्पर्श मज जिवंतपणा तो देतो…..,
आवाज तुझा तो सखे मज वाऱ्या सवेही जाणवतो…..,

अपुरी ही साथ जरी मज पाऊले दोनी भासते…..,
स्मरतो सोबतीचा क्षण श्वासांची धडपड ही वाढते……,

आठवण तुझी ती येता दुरी असुनी अंतर संपवुनी जाते…..,
ऊन पाऊस मिळता तो इंद्रधनू भुलवुनी जाते…..,
सोबती तुझ्या चालता सखे मज ही तैसेचि होते…

ओढ 

ओढ ही तुझी निराळी  हा दुरावा दूर करते,
ओढ ही किमया तुझी क्षणाला युग भासते,

भेट व्हावी तुझी अशा या विरहा वेळी,
एक होऊनि दोघे दुःख संपवू सगळी,

विश्व माझे सगळे तुझ्यात म्हणे ही ओढ,
जगेन श्वास बनवून तुला तोडुनी जगाचा दोर,

असह्य विरह हा अश्रू ते संपले
पाऊले थकले दोन्ही परी
ओढीने तुझ्याकडे  ओढले……

पीक अश्रुंचे 

अश्रुंचे दाणे विरहाच्या मातीत नकळत पेरले जातात ,
कष्ठांचे ढग अन घामाच्या पावसात अंकुरतात,….
एक एक क्षणाचे मोल वेचून मातीवर डोकावतात,…

जुन्या जखमेने रोज नव्या जोशाने वाढतात,….
सूर्याची ती उबदार किरणं हिरवेगार
अन भावुक करुनि जातात,….

जगाला विसरुनी वाढता वाढता जगावर राज्य करतात….
एका विरहाने तेच जगाला गोडवा देऊन
हृदयात तीच बीज पेरूनी जातात…..

निराशा 

मनातले शब्द बोलण्यात ना आले 
चालण्यात माझे अस्तित्व संपले .. 
परिस्तिती समोर हातश मी होऊन 
स्वप्न मी माझे पुसले .. 

खूप बोलवसं वाटत कधी 
धनाचे आकर्षण माझ्याकडे ना चमकले 
आणि मी ही बोलणे सोडले ..
 
अकर्षणा शिवाय साथ देईल 
असा हात नाही उमगला 
आणि मी ही माझा मार्ग शोधला .. 

रंगवला होता आकाश सारा 
पण सारेच स्वप्न ते ,
वास्तवाने दिला चटका आणि
स्वप्न ही पाहणे सोडले.. 

सर्वस्त केले उद्ध्वस्त मी 
तुलनाच संपली मागण्याची 
कारण ही बोलकी सारी 
निष्कारण माझ्या जगण्याची

वाट

वाट पाहणं सोडून दिलं
वाट मात्र तीच आहे…..
दूर गेली क्षितिजापार
वाट मात्र तीच आहे…..
हिरव्यागार कडा सुकून गेल्या दोन्ही
वाट मात्र तीच आहे…..
गेले पावसाळे अनेक आणि उन्हाळे
वाट मात्र तीच आहे…..
कित्येक आले येऊन गेले वाटसरू
वाट मात्र तीच आहे…..
पाऊलखुणा उमटून गेल्या
वाट मात्र तीच आहे…..
कित्येक लोटल्या रात्र
सूर्या सम उजळले दिन
ती वाट मात्र सारखीच आहे…..
कित्येकाने घेतले विसावे
कित्येकाने यावे जावे
ती वाट मात्र तिथेच आहे….
कित्येकाने चुकून अडावे
अन अडून चुकावे
ती वाट मात्र मोकळीच आहे…..
कित्येकाने किती चुकावे
प्रत्येकवेळी माफ करावे
कितीदा करावे मलाच माफ
कितीदा करावं मनास साफ
ती वाट मात्र अशीच आहे…….
कितीदा हसून जगाशी जुळावे
कितीदा दुरावून नव्याने मिळावे
ती वाट मात्र अशीच आहे….
कितीदा व्हावी ओळख नव्याने
कितीदा अनोळखी खोटे बहाणे
ती वाट मात्र तीच ती आहे…..

मराठी कविता

विरह

निरागस चिमुकल्या डोळ्यात स्वप्न असे रुजते,
अपुऱ्या अशा अपेक्षेने रोज सजूनी रोज विसकटते…,

मन हे भोळे हातुनी निसटणाऱ्या मृगजळात गुंतते,
क्षण क्षण त्यातच रममाण होऊनि शेवटी थकून जाते…,

रोज आठवावे ,रोज मिळावे ,रोजचं हे झुरणे
रोज बोलावे की अबोलने हे वाटते रोजचेच मरणे…,

डोळे स्थिरावती रोज पाऊल वाटेकडे
निराशेने झुकती डोळे पडती अश्रुंचे शिंतोडे….,

स्पर्श वाऱ्याचे मूरता अंगी मन स्वप्नी मग्न होतो
वारा सरोनी जाता विरह मन सुन्न करोनि जातो….,

आस

आस तुझ्या येण्याची एक प्रवास सुरू आहे,
पहिल्या पावसाची आस जशी त्या मातीला आहे,

काहीच नाही मी तुझ्या भेटीनं काही व्हायचं आहे,
थकलो नाही अजुनी आस कायम ही वाट नवी आहे,

जगलो नाही अजुनी तो जिवंतपणा सवे जगायचा आहे,
मरतो रोज क्षणोक्षणी आस नव्याने जन्मताहे,

न संपणारा,न थकणारा तुझ्याविना पण तुझ्या
संगे एक प्रवास सुरू आहे

हसरे दुःख

जे बोलल्याशिवाय दिवस जायचा नाही
आज विसरुनी मी जिवंत आहे,
न बोलता स्तब्ध नाती
खंत मात्र टोचत आहे…..

खांद्यावर मिरवलं ज्यांनी
त्यांनी पायदळी तुडवल आहे,
बोट धरून चालवलं ज्यांनी
पण पाठ मात्र फिरवली आहे…..

बोलणं केलं बंद तरी
आवाज माझा आठवत आहेत,
श्वास समजलो ज्यांना
श्वासाविना जगत आहे…..

जवळचे जवळ असुनी
जवळीक नाही उरली,
अहंकार श्रेष्ठ झाला अन
नाती ही हरली,

सुर्याविना पहाट नव्हती
आज त्याच्या विना उजाडत आहे,
सुर्यास्ताशिवाय सायंकाळ वेडी
चंद्रानेच भागवत आहे….

सगळ्यांसाठी जगता जगता
विसरुनी गेलो जगणं,
हसरे दुःख सारे
मरणालाही सांगणं…..

आमचे काही Popular लेख

लवकरात लवकर वजन कसे कमी करतात
वजन कसे वाढवावे घरगुती उपाय
Break up quotes in marathi

गाव मराठी कविता gaav marathi kavita

माणूस आपल्या दैनदीन आयुषयात एवढा व्यस्त झाला आहे की त्याला स्वतःकडे आणि नात्यांकडे लक्ष द्यायला ही वेळ ठेवला नाही तो कोणत्या तरी सुखाच्या मागे पळत आहे जे मृगजळ प्रमाणे आहे . आणि ते मिळवण्यासाठीतो काय काय गमावून बसतो आणि तो काय बनतो , ज्याच्यात सुख आहे त्यापासूनच कसा दुरावतो ही दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे .

दुष्काळी नाती

बरसात प्रेमाची दुरून दुरावली
हिरवळ नात्यांची मरून हरवली ..
ढगही ही प्रश्नांचे उत्तरवीणा पळती
अशी ही दुष्काळी नाती ..

तिरस्कारच्या उन्हाणे तप्त होता विश्वास,
गैरसमजाचे तडे पडती
अशी ही दुष्काळी नाती ..

ओसाड पडून माळ भासती
संवादाचे पक्षी तिथे का फिरकती ,
अश्रू ना आशेचे अंकुर ना फुटती
अशी ही दुष्काळी नाती ..

झाडे माणुसकी आधार तरी
पान आपुलकी गळून सारी ,
सावली शब्द संपून काटे टोंचती
अशी ही दुष्काळी नाती

दुष्काळात फक्त आठवणींचे सांगाडे
हिरवळ मागील आठवत नजर बागडे
तरी ते मृगजळ हाती ना सापडती
अशी ही दुष्काळी नाती ..

आस लागून एक हाकेच्या पावसाची
अबोल्या तहानेला बोलून तृप्ततेची
अशी अंकुरावी नव्याने ही
दुष्काळी नाती ..दुष्काळी नाती …..

मराठी कविता

व्यथा गावची

सहज माझ्या मित्राकडे गावाचा विषय काढला,
त्याचा चेहरा कोरा कागद जसा पांढरा पडला

काल त्याने स्टेटस वर पाहिली गावची सुंदर पाटी ,
खरंच का रे असंच आपलं गाव आहे का रे एकमेकांसाठी

तो म्हणाला गावी जाता काळजात धड धड होते
जुनं सारं वैभव आठवून मन रडकुंडीला येते

तीन दिवस सुट्टी आहे कसं होईल माझं
तोंड फिरवणाऱ्या माझ्याच रक्ताचं मला पेळेल का रे ओझं

मी म्हणालो अरे वेड्या असं का म्हणतोस
सारं सगळं ठीक आहे तरी का कण्हतोस

काय सांगू मित्रा आम्ही सारे बहीण भाऊ,
कोण कोणाशी बोलत नाही मी कुठे जाऊ

आता कुणी कुणाकडे जात येत नाही,
स्वतःपाई दुसऱ्यांसाठी मुळीच वेळ नाही

असे कसे सारे बदलले मला प्रश्न पडतो,
जुने सारे क्षण आठवून मी एकटाच रडतो

गाव

गाव म्हणजे आता झाले सगळे शाहाने,
आम्ही सगळे एक आहोत उरले फक्त हे बहाने…

माणुसकी स्वार्थाकडे गहाण आहे,
नाती गोती फक्त सोय उरली आहे…

अहंकार ठासून भरला आहे,
स्वार्थ राक्षस प्रत्येकात शिरला आहे…

दुःख एकाचे दुसऱ्याला मनोरंजन आहे,
अश्रू एकाचे दुसऱ्याचे सुख बनले आहे,

मातीतले खेळ नव्हे,खेळाची माती झाली आहे,
एकमेकांचे संवाद नव्हे,नेटच्या जाळ्यात मग्न आहे,

नाती जिव्हाळ्याने नव्हे,पैशाने गणले आहे,
राहायला दिसायला फक्त एक आहे,
माणूस ,कुटुंब,घर,गाव,वेगळं झालं आहे

मातीचे मोल

श्वासांवर जगतो सारे पैशांमुळे स्वार्थ आहे….,
देहातला देव अर्थ आहे देवावीण श्रीमंती अनर्थ आहे….,

क्षुल्लक जरी कारण तुटून आम्ही पडतो,
श्वास थांबता राखेमध्ये कारणाविना सडतो….,

माणसांकडे बघून आम्ही तोंड आमची फिरवतो
गेल्यावर शोधलं त्याला पण काळचक्र गिरवितो….,

हर्ष ज्याचे हिरावले ते हर्ष पुन्हा नाही,
हात सोडूनि दुरावले तो स्पर्श पुन्हा नाही…..,

आज ज्याला रडवलं उद्या तो नसणार आहे,
माझ्यासमोर जळताना मी खरंच का हसणार आहे….

आयुष्यावर मराठी कविता Marathi Poem On Life

आयुष्य जगत असताना आयुष्यात खूप सारे प्रसंग संकटे ,चढ उतार येत असतात ते व्यक्त करण्यासाठी माध्यम असतात तर कोणी शांतच उत्तर देत असतो आयुष्याला असेच ह्या आयुष्यातील काही मला आलेले प्रसंग मी मराठी कवितेच्या माध्यमातून मांडला आहे.marathi poem on life मध्ये आयुष्याची अनेक वळण तुम्हाला पाहायला मिळतील.

जीवना

जीवना प्राण तळमळला
डुबलो रे या मायिक भोवरा
ने मज ने तुझ्या पैलतीरा,
जीवना प्राण तळमळला….

जीवना प्राण तळमळला
हृदयी दुखावले अन्
अश्रू सागर खवळला
जीवना प्राण तळमळला….

जीवना प्राण तळमळला
जबरदस्ती ही श्वासांची
मरण असा दुरावला,
जीवना प्राण तळमळला….

जीवना प्राण तळमळला
शरीराचा डाव सारा
मन दुःखी खेळला,
जीवना प्राण तळमळला….

जीवना प्राण तळमळला
स्वप्नांचा सुख सगळा
आयुष्य कधीच संपला,
जीवना प्राण तळमळला…..

एकच ध्येय

ध्येय जरी एक वाटा ह्या निराळ्या,
धाव ही लोभीक मृत्यूकडेच वळल्या….

स्वार्थीसुख धावे मृगजळ मलाच सारे हा खोटा खेळ,
सुखाची आशा होते निष्फळ वाद हा बीजं अंकुर कठीणकाळ….
.
अश्रू वाहले दुःखी सावरण्याची हिम्मत नाही,
अधिकार गमावला स्वार्थी नात्याला किंमत नाही…..

माणूस म्हणोनि घेतो जनावरांत फरक नाही,
आयुष्यासारखा स्वर्ग शेवटासारखा नरक नाही….

माणसाचा देव

देवाचं देवपण माणसात असतं असं म्हणतात
मग मदतीच्या वेळी माणसं का अशी रेंगाळतात

देव आणि माणुस यांच्यात नातं तरी काय असतं
बघायला गेलो तर एक सेकंदाचा अंतर नसतं

जवळी परी देव असा अनोळखी
संकटात मात्र मनी स्मरणाची पालखी
रात्रंदिनी मग देवच दिसतो
दुःखातच देव कसा काळजात वसतो

चुका पोटात घेऊन माफ करत असतो
कोरी पाठी असताना संचित उभा करतो.

अचूक

चूक उमगली की, सारेच प्रश्न सुटतात
उत्तरं सारी अत्तरा सारखी गंधाळतात,

चूक उमगली की, सारेच दुःख संपतात
सुखाचा उगम अन ऐश्वर्य झरे खळखळतात,

चूक उमगली की, गैरसमज दुरावतात
समजूतदारपणा उंचावून नाती स्थिरावतात…

चूक उमगली की , वाटा मोकळ्या वाटतात
कुठेही करावा प्रवास दिशाच आपल्या होतात ,

चूक उमगली की, वेदना कमी होतात
उपाय टोकदार जरी , तितकेच सुखावतात,

चूक उमगली की, पुन्हा घडत नाही
विस्कटलेली घडी पुन्हा बिघडत नाही…..

मराठी कविता ‘”काळ कलाकार”

कोणाचा वाढदिवस कोणास श्रद्धांजली
काळाची ही कसली अनोखी साखळी

कोणास पैसा काहीच नाही
कोणासाठी तोच होतो सर्वकाही

कोणी बुडाला दुःखाच्या डोही
कोणी तरंगतो आनंद प्रवाही…..

आहे कोणी खुशमोजक्या आयुष्यावर….
कोणी पोहचला निर्णयी आत्महत्येच्या टोकावर…..

काळही पालटत बाजी कोळसाही होतो हिरा ,
चमकणाराही इथे होतो क्षणांत मावळणारा……

काळाचे खेळ सारे क्षणही फासे दोरे,
जिंकलो वाटताच हे खेळ संपणारे…..

वाद संवाद

संवादाची सुरुवात विसरून
तब्बेत कशी आहे हे विचारण्याची
औपचारिकता सुरू झाली.

पाठीमागे ओरबाडे म्हणून तोंडावर गोड
बोलण्याची सुरुवात झाली.

दुसऱ्याचे यश आपल्यासाठी
अशक्य वाटून आडकाठीचा
उगम झाला.

मी आणि तू तुझे आणि माझे
ही भेद भिंत उभारून नात्यात दरी खोल झाली.

नुसतं वायफळ वाहून रिकाम्या जागी
दिखाव्याचा जन्म झाला.

जिवंतपणी वैर अतूट मृत्यूनंतर
माणूस भला होता
हा वाक्य प्रसिद्ध झाला.

पाऊस मराठी कविता marathi kavita rain

पाऊस हा प्रत्येकासाठी सारखा नसला तरी पावसातील आठवणी सुखावणाऱ्या असतात त्याच काही आठवणी मी माझ्या पाऊस मराठी कविता मध्ये आणल्या आहेत ज्या तुम्हाला पावसाची आठवण नक्की करून देतील

ही पावसाळी वाट….

हिरवीगार आणि थंड ओलसर पहाट,
दोन्ही कडेने गावताची सजावट
अशी ही पावसाळी वाट…..

कधीकाळी चाललो एकटा
आज सोबती झऱ्यांचाही थाट,
एकवेळ स्तब्ध पानांचा सुळसुळाट
अशी बोलकी ही पावसाळी वाट…..,

कधी वळणावर पाण्याचा पाट,
आजूबाजूस कधी हिरवळ घनदाट,
चालताना साथ घाली झुडुपात तो किलबिलाट
अशीही जिवंत पावसाळी वाट…..

पावसा तुझ्या सरी

पावसा तुझ्या सरी लांब लांब लांब……
मोजू का रे पावसा थांब थांब थांब……

चिमुकले चिमुकले केवढे ते थेंब….
काय सांगू तुला काय त्यांचा नेम….

वाऱ्यासंगे तू खेळतोस पळापली…,
खेळामुळे तुझ्या आमच्या धावपली…,

का रे तू असा तू टाहो फोडून रडतो…,
अंगणी आमच्या समुद्र भरतो…,

वर्षभर तू का नाही राहत वस्तीला…,
पूर येऊ दे ना रे आमच्या मस्तीला………

पावसाची चादर

पाण्याच्या चादरी वर आभाळाची नक्षी,
आभाळात उडेन मी जसे उडतात पक्षी,

हिरव्या हिरव्या गवतावर झुळत फुलपाखरू,
झाडावर चढेन मी जशी खारू चढते तुरुतुरु,

चिखलात दडून बसला बेडूक मामा,
उड्या मारेन मी ओढ्यात मोठं होऊद्या थोडं थांबा……

श्रावणमास marathi kavita

सारांश – एकदा का श्रावण मासाची चाहूल लागली की सगळं निसर्ग नाविण्याने फुलायला लागतो.वातावरणातही एक वेगळी प्रसन्नता जाणवायला लागते की मनाला ही प्रसन्न करून जाते .असा श्रावण मास आपल्याला भान विसरायला भान पडतो,पुन्हा एकदा निसर्गाच्या प्रेमात पडतो .त्याच श्रावण मासाचं वर्णन करणारी आमची कविता श्रावणमास marathi kavita

श्रावणात या वाटाही सजल्या डोंगराने धबधब्यांची
माला गळ्यात घातल्या
भुलवुनी जातात गोष्ठी श्रावणातल्या………

वाऱ्यासवे पावसाच्या हलक्या येरझारा
उनसावलीचा खेळ माळरानी मोर पिसारा
हा नखरा श्रावणाचा सुख वाटणारा………

क्षणांत आभाळी इंद्रधनू प्रगटे
माळ थव्यांची सुरेल गाती गीते
आकाशी सप्तरंग घेऊनि श्रावण हा इथे…….

नवनवे पाहुणे धरतीवरी अवतरले
स्वागती सुमन सुगंधासह फुलले
श्रावणा तुझ्या कलांनी अंतरंग भुलले……..

फुलपाखरं फुलावरी अलगत विसावले
मकरंदासह त्यांनी श्रावण सेविले
श्रावणा ही विलोभनीय तुझी पाऊले……..

प्रेरणादायी कविता Motivational Poem Marathi

चार पाऊले

चार पाऊलं “स्व”सिद्धतेची
चार दिशेने सुख दुःखाच्या
चार क्षणाला येरझारा

लाचार प्रसिद्धी साचार विचार
आचार सांगण्या खटाटोप प्रचार…..

संचार “मी”चा अभिमानी उच्चार
सदाचार मुखवटा खोटा पाहुणचार…..

चार खांदे उचलून घोष दिवस चार
चारचौघे गोड अवघे दिवस फक्त चार…..

सुविचार चार वाचण्या गोड गोड फार
मन लाचार वाचून तरी कोण तो काय उपचार….

दूर दूर स्वतःहा पासुनी

दूर दूर स्वतःपासून सुख ना भेटले
दूर दूर गर्दीत कुठे व्यर्थ वणवे पेटले…..

दूर दूर स्वतःपासून स्वप्न अंधळे नटले
दूर दूर नेण्या सगळे स्तुतिसहित झटले…..

दूर दूर जवळी तरी पोहचलो कधी ना तिजोरी
तारुण्याची मानुन मज्जा गुंतोंन मानसिकतेचे भोवरी…..

दूर दूर रसा पासून तळाशी गेले जगणे
दूर दूर चवी पासुनी लाळेने अशेवरी ठेविले…..

दूर दूर जीवनापासून मज्जेत काळ लोटला
दूर दूर मुळापासून उंचजाण्या दूर दूर झटला…..

दूर दूर एका पासून दुसरे भोवती दाटले
मी ना झालो कधी माझा दुसरेही माझेच वाटले…..

रत्नपेठी

आयुष्या इतकं कठीण
आयुष्या एवढं सोपं काहीच नाही
आयुष्या इतकं कुरूप
आयुष्या इतकं सुंदर काहीच नाही
आयुष्या इतकं दुर्गंधी
आयुष्या एवढं सुगंधी काहीच नाही
आयुष्या इतकी गुंतागुंत
आयुष्या एवढं सरळ काहीच नाही
आयुष्या इतकं बेरंग
आयुष्या एवढं रंगबिरंगी काहीच नाही
आयुष्या इतकं दुःख ,पण
आयुष्या एवढं सुख कशात नाही
आयुष्या सारख प्रश्न
आयुष्या सारख उत्तर नाही
आयुष्यात एवढं मरणं
आयुष्या इतकं जगणं नाही
आयुष्या इतकी धावपळ
आयुष्या एवढी स्थिरता कुठे नाही
आयुष्या इतकी थकान, पण
आयुष्या एवढी विश्रांती नाही
आयुष्या इतकं दारिद्र्य
आयुष्या एवढी श्रीमंती कोणती नाही

प्रेरणादायी कविता marathi kavita : आयुष्य जगताना कधी कधी प्रत्येकाला किती संघर्ष करावा लागतो मग तो स्वतःच्या भविष्यासाठी असो किंवा जवळच्या व्यक्तींसाठी ,तो लढा प्रत्येकाला द्यावाच लागतो हे दाखवणाऱ्या ह्या कविता

संघर्षात या चहुबाजूंनी चक्रव्यूही जखडलो,
बंदिस्त साखळीत या नकळत मी घडलो…..

ओठांमध्ये दुःख दाबले मनात शांत ही वादळे,
डोळ्यांत अश्रू सुकले अन हृदयही पाझरले…..

तुटूनी पडलो आत हृदयी ही ठिणगी स्वप्नांची ,
वळेल आयुष्य हवेसरशी घेऊनि ज्वाळा यशाची…..

जबाबदारी अन कर्तव्याखाली स्वप्ने दबली सारी,
स्मितहास्य फुलवुनी ओठी पचवला वर्तमान विषारी…..

जिवलग

जिवलगांस जपता जपता माझ्यावरी मी रुसलो,
निराशेस झेलीत मी क्षणभर मलाच हसलो…,

नात्यातील गोडवा आजवर फक्त मी ऐकला,
वास्तवात डोकावताना भेटतो माझा मी एकला…,

नात्यांच्या बागेत अनुभवले अश्रुंचे काटेरी कुंपण,
जिवलग वेचता गमावले हक्काचे सुंदर क्षण…,

चालेन आता एकला मार्ग माझा निराळा
थांबवू न शके मज हाक माझी अमर्याद अंतराळा…..

नवी भरारी

आलस्य थरांखाली ज्वलंत निखारे ,
एक फुंकर पुरे अन् पेटणारे….,

झटकली आज राख आळसाची,
उजळली तव दीप-समई चैतन्याची….,

आशेच्या झोक्यावरचा थांबविता सुखद झोका,
निराशेनेही थांबवला दुःखद चटका ….,

चिंता करून भविष्याची गंज जडला बुद्धीला ,
वर्तमानी चालुनी पुस्तके उजलेन त्या शक्तीला…..,

ठेवूनि जिद्द चिकाटी गाठेन म्हणतो ध्येय,
घेईन कष्ठांच्या पंखानी भरारी,
हा एकच उपाय …..हा एकच उपाय……

बेरंग

फुलांनी रंग आज उधळले असमानी,
एकच दिन जगण्या बळ
घेतले फुलपाखरांनी…..,

पानांनाही कळले अस्तित्व
आपुले देठ आहे,
शेवटी संपर्क आपुलाही
मातीशी थेट आहे……,

खगांनिही घेतली भरारी
नभ आपुले करण्या,
माघारी यावंच लागे
कर्तव्य पूर्ण करण्या…….,

फुलेही आज फुलली
दाही दिशा गंधाळल्या,
मार्गस्थ झाल्या भुंग्या सहित
खोट्या शकला सगळ्या…