Thomas Edison Biography In Marathi थॉमस एडिसन संपूर्ण माहिती मराठी

ओळख (Introduction): फक्त वैज्ञानिक नाही तर जिद्द,कष्ट,चिकाटी,अपयशातून यश मिळवणाऱ्या विजयाच नाव म्हणजे थॉमस एडिसन (thomas alva edison ). फक्त जगाचा इतिहास नव्हे तर संपूर्ण जगाची मानसिकता बदलणारे नाव म्हणजे थॉमस एडीसन. आजचे तंत्रज्ञान विकसित झालेले पाहतो त्याचे जनक,विजेचा दिवा,फोनोग्राफ,चित्रपट कॅमेरा,यांसारख्या संशोधनामुळे आजचे जीवन शक्य झाले आहे. अशा महान मानवाची म्हणजे thomas edison biography in marathi थॉमस एडीसन यांच्या आयुष्याची संविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.

थॉमस एडिसन थोडक्यात परिचय
संपूर्ण नाव : Thomas Alva Edison
जन्म : 11 फेब्रुवारी 1847
जन्म ठिकाण : मिलाण,ओहावो,अमेरिका.
व्यवसाय : वैज्ञानिक,संशोधक,व्यावसायिक,
ओळख : 1000+ शोधाचे जनक
मृत्यू : 18 ऑक्टोबर 1931

बालपण आणि कुटुंब

एका सामान्य घरात जन्माला येणारे थॉमस एडिसन ह्याचे वडील सॅम्युअल एडिसन आणि आई नॅन्सी एडिसन ह्या शिक्षिका होत्या.एडिसन लहानपणापासून जिद्दी,जिज्ञासू,आणि प्रत्येक गोष्ट अशीच का असे अनेक प्रकारचे प्रश्न विचार असत. कोणतीही गोष्ट कशी चालते त्या मागील तंत्र जाणून घेण्याची त्यांची तीव्र इच्छा असे.

शालेय जीवन आणि अडचणी

शालेय जीवनात ते जास्त शाळेत शिकू शकले नाहीत,फक्त तीन महिनेच ते शाळेत गेले,त्यानंतर शिक्षकांनी त्यांना मंदबुद्धि आणि “ढ”समजून काढून दिले.
एकदा एडिसनच्या घरी शाळेतून पत्र आले होते आणि ते पत्र आईने पहिले त्यात एडिसन तुमचा मुलगा मंद असल्यामुळे कोणताही शिक्षक त्याला शिकवू शकत नाही म्हणून त्याला शाळेतून काढून टाकण्यात येत आहे असे स्पष्ट लिहले होते. ते पाहून आईच्या डोळ्यात अश्रु भरून आले.
ते एडिसन ने पाहून विचारले आई काय लिहल आहे पत्रात तेव्हा आईने सांगितले बाळा तू एवढा खूप हुशार,बुद्धिमान आहेस म्हणून तुला शिकविण्यास कोणते शिक्षक पात्र नाहीत म्हणून तुला आजपासून मीच घरी शिकवणार आणि तेव्हा पासून आईने त्यांना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली होती.
कारण आईने त्यांच्यातील क्षमता आणि गुणवत्ता ओळखली होती. आईच्या मार्गदर्शनामुळे एडिसनची वाचन क्षमता,प्रयोग आणि विचार क्षमता सुधारली.

व्यवसाय आणि शिक्षण सुरुवात

वयाच्या बाराव्या वर्षी एडिसनने रेल्वे मध्ये वर्तमान पत्रे आणि खाऊ विकायला सुरुवात केली. ते फक्त खाऊ विकायचे नाहीत तर त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी रेल्वेमधेच लहान प्रयोगशाळा सुरू करून प्रयोग विकायला ही सुरुवात केली. आणि हे करता करता त्यांना टेलिग्राफ मशीन बद्दल आवड निर्माण झाली.

पहिला यशस्वी शोध

1869 साली थॉमस एडिसनने आपला पहिला महत्वाचा आत्मविश्वास वाढविणारा शोध लावला जरी हा शोध
इलेक्ट्रिक वोंट रेकॉर्डर जरी हा शोध व्यावसायिक दृष्ट्या फार यशस्वी झाला नसला,तरी तो त्यांच्या ह्या प्रवासाला योग्य दिशा देणारा ठरला होता.
संशोधनाचे स्वप्न आणि प्रयोगशाळा
जगातील पहिली औद्योगिक प्रयोगशाळा त्यांनी न्यू जर्सी मध्ये Menlo Park Laboratory नावाने सुरू केली.आणि इथूनच मोठमोठे क्रांतिकारी शोध लागून ही प्रयोगशाळा त्यांच्या यशाचे केंद्रबिंदू बनले.

विजेचा दिवा (Electric Bulb)

thomas edison biography in marathi

थॉमस एडिसनचा सर्वात मोठा शोध म्हणजे विद्युत दिवा
जगाचा इतिहास बदलणारा हा क्रांतिकारी शोध ठरला ज्याने संपूर्ण जगाला प्रकाशात आणले आज जगात जो काही प्रकाशाचा झगमगाट दिसतो आहे तो ह्याच शोधामुळे.
अनेक प्रयोग करून त्यांनी एक दीर्घकाळ चालणारा विजेचा बल्ब जगाला दिला.
हा प्रयोग त्यांनी 10000 व्या प्रयोगाला यश मिळाले. त्यांनी एकदा म्हटलं होतं की मी 9999 वेळा चुकलो नाही तर मी 9999 चुकीचे मार्ग शोधून काढले ज्याने विजेच्या दिव्याचे शोध लागू शकत नाही.

विजेच्या दिव्याची प्रेरणा : एकदा एडिसन शेकोटी जवळ बसले असता आईने त्यांना घरी येण्यासाठी आवाज दिला त्यांनी घरी जाताना शेकोटी विझविण्यासाठी मूठभर माती शेकोटीवर टाकली तेव्हा तो अग्नि विझला नाही तर तो मंद गतीने स्थिर पेटत राहिला त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं जोपर्यंत अग्नीला ऑक्सीजन मिळत होता तोपर्यंत तो जास्त पेठत होता पण ज्यावेळेला त्याच अग्नि वर माती टाकल्या मुळे ऑक्सीजन मिळायचे कमी झाल्यामुळे अग्नि खूप वेळ शांत पेटत राहिला.इथून त्यांना विजेच्या दिव्याची कल्पना आली आणि यशाचे अनेक प्रयोग सुरू झाले.

फोनोग्राफ आवाज रेकॉर्ड करणारा शोध

thomas edison biography in marathi
phonograph

संगीत आणि मनोरंजन कक्षेत्रात क्रांति घटवून आणणारा पहिला आणि सर्वात मोठा महत्वाचा शोध ठरला. 1877 मध्ये एडिसनने असा यंत्राचा शोध लावला जो आवाज रेकॉर्ड ही करू शकत होता आणि प्ले ही करू शकत होता.

चित्रपट कॅमेरा आणि सिनेमासृष्टीचा जन्म

आज आपण पाहणाऱ्या चित्रपट सृष्टीचा जन्म हा थॉमस एडिसन यांच्या Motion Picture Camera (Kinetoscope)शोधाने लागला. आजचा चित्रपट सृष्टीचा हा उद्योग ह्याच शोधावर आधारित आहे.

thomas edison biography in marathi

थॉमस एडिसन यांचे काही मुख्य शोध (Invention)

⦁ थॉमस एडिसन याचे काही महत्वाचे शोध खाली दिले आहेत.
Electric Bulb (विजेचा दिवा)
⦁ Phonograph
⦁ Motion Picture Camera
⦁ Carbon microphone
⦁ Electric Generator
⦁ Telegraph (सुधारणा)

एकूण 1000 पेक्षा जास्त पेटंट thomas edison यांच्या नावावर नोंद आहेत.
Thomas Edison यांचे यशाचे सूत्र होते = कष्ट करा ,नवीन प्रयोग करा ,आणि कधीच थांबू नका.

त्यांचे व्यक्तिमत्व आणि सवयी

Thomas Edison यांना इतरांपेक्षा वेगळे करणारे काही गुण आणि सवयी ज्याचा अवलंब आपण केला पाहिजे.
⦁ रोज 18 तास काम मग तक्रार नाही

⦁ सतत वचन आणि प्रयोग

⦁ कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही

⦁ कल्पक विचार ज्याने नवीन शोध लागतात.

थॉमस एडिसन यांचे प्रेरणादायी विचार Thomas Edison Quotes In Marathi

⦁ यशामध्ये 1% प्रेरणा आणि 99% कष्ट असतात

⦁ स्वप्न पाहणारे कमी असतात पण तेच जग बदलतात

⦁ जगाने ज्याना वेड समजलं आहे त्यानीच जग बदललं आहे.

⦁ अपयश येणार आहे पण तुमच्यावरचा आत्मविश्वास तुम्हाला संयम शिकवतो

मृत्यू आणि वारसा

18 ऑक्टोबर 1931 रोजी thomas edison यांचा मृत्यू झाला.
पण त्यांचे विचार शोध प्रेरणा आजची जीवंत आहेत जणू त्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आजचे जे काही आपण तंत्रज्ञान पाहत आहोत हे त्यांच्याच कल्पनाशक्तिचे फलित आहे असं म्हणावं लागेल.
थॉमस एडिसन यांना धन्यवाद दिल्या पाहिजेत आपण आज जे काही बल्ब बघतो ,चित्रपट पाहतो संगीत ऐकतो हे फक्त त्यांच्यामुळे शक्य झालं आज त्यांचा आयुष्य कित्येक उद्योजकांसाठी,संशोधकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

निष्कर्ष : थॉमस एडिसन यांचे जीवनचरित्र आपल्याला शिकवते की “अपयश हा आयुष्याचा शेवट नाही तर यशाची सुरुवात असते”. शाळेत नापास झालेला किंवा शाळेतून काढून दिलेला मुलगा एक महान संशोधक बनतो. हेच ह्या चारित्राचे सार आहे. जे आपल्याला आपल्या आयुष्यातील अपयशांना सामोरे जायला बळ देईल.
जर तुमच्यात जिद्द,विश्वास,मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्हाला तुमचे स्वप्नं पूर्ण करण्यापासून कोणतीही कमजोरी थांबवू शकत नाही.

अजून वाचा – Motivational Quotes In Marathi
chatrapati shivaji maharaj quotes marathi