100+Heart Touching Mother Quotes In Marathi आईवरचे प्रेम अजून घट्ट करा.

Best Mother Quotes In Marathi हे आई वरचे प्रेम वाढविण्यासाठी,व्यक्त करण्यासाठी आणि आई ह्या नात्याचा अर्थ कळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.आईच वर्णन आपण नाही करू शकत कारण आपण तिच्या मुळे आहोत,प्रत्येकाचे अस्तित्व आई पासून आहे म्हणून आपल्या मराठीत म्हण आहे स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना भिकारी,म्हणून आईच आपलं जग आहे हे mother’s day quotes in marathi तुम्हाला तुमचे आई च्या नात्याला अजून घट्ट करेल अतूट बनवेल यात शंका नाही.

Aai Motivational Quotes In Marathi आई प्रेरणादायी विचार

⦁ आई म्हणजे मायेने भरलेला ममतेचा विशाल सागर आहे आई म्हणजे प्रेमाचा निरभ्र अभेद आकाश आहे,आई म्हणजेच लेकराची श्रीमंती आहे.

⦁ जगात निस्वार्थ आणि नितळ प्रेम कोण करत असेल तर ती आई आहे.

⦁ आई मुळेच देवदेवता ही आहेत एवढी आई महान आहे.

⦁ जिने छत्रपती शिवाजी महाराज घडवले तीही आई आहे.

⦁ जगात सुंदर काय असेल तर ती आईची ममता आहे.

mother quotes in marathi

⦁ स्वतः दुःख चटके सहन करून आपल्याला बाळाला सुखाचे आयुष्य देते ती आई असते.

⦁ आईच्या स्पर्शात खूप सामर्थ्य असते.

⦁ पायाला ठेच लागली तरी पहिला शब्द ओठांवर येतो तो म्हणजे आई गं.

⦁ आईच्या कुशीत विसाव्याची उब असते.

⦁ आईचा आशीर्वाद मिळणं म्हणजे साक्षात देव भेटल्या सारखं आहे.

Aai Suvichar Marathi आई सुविचार मराठी

हे aai marathi quotes वाचून तुम्ही तुमच्या आईचा चेहरा आठवा हे Quotes नक्कीच तुम्ही relate करू शकता. mother’s quotes in marathi हे फक्त तुम्ही वाचू नका तर तुमच्या मित्र मैत्रीणीना, नातेवाईकांना share करा.जेणे करून त्यांच ही आईवरील प्रेम द्विगुणित होईल.

⦁ आपल्या मुळे आईला आनंद होणं ह्या सारखं सुख नाही.

⦁ आई चे अनंत उपकार आहेत ते फेडता येत नाही पण आपण आईच्या सुखचा कारण बनता यायला हवं.

⦁ आई सारखे त्याग कोणाला शक्य नाही.आणि ते त्याग फक्त आपल्या बाळासाठी करत असते.

⦁ माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण तोच असतो जेव्हा आईच्या चेहऱ्यावर हसू असतं.

⦁ जगातली सगळ्यात सुंदर दृश्य म्हणजे आईच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य.

mother quotes in marathi

⦁ आयुष्याच्या प्रवासाचे पहिलं पाऊल टाकलं ते आईचं बोटं धरून .

⦁ आईच्या सावलीची शीतलता कशातही नाही.

⦁ देवही जिला शरण जातात ती आई आहे

⦁ देवाला ही जन्म घेण्यासाठी आई पाहिजेच

⦁ देवांचेही देव आईच्या उदरी जन्म घेतात ही आईची श्रेष्ठता आहे.

Heart Touching Aai Quotes हृदयस्पर्शी आई कोटस्

आई ही फक्त एक व्यक्ति किंवा एक स्त्री नाही तर त्या पलीकडे ती एक शक्ति,एक आधार,आणि भावना आहे जिथे प्रत्येकाचे अस्तित्व जन्म घेऊन फुलते,फलते,आणि विसावते,आईचे महत्व अनन्यसाधारण असून ते अवर्णनीय आहे ह्याची जाणीव करून देणारे विचार heart touching mother quotes in marathi मध्ये पाहायला आणि जाणवायला मिळतील.

⦁ प्रेम, माया,दया,क्षमा, करुणा,ममता,ह्या सगळ्या भावना एकाच ठिकाणी मिळतात ती आई.

⦁ ह्या ब्रम्हांडात निर्मळ निखळ अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे आईचे प्रेम.

⦁ हिरकणी कथा प्रत्येकाला माहीत आहे यातून आईचे त्याग आणि कष्ट बाळासाठी किती असतात हे दाखवते

⦁ आईचे प्रेम अचल असते जे कधीही संपत नाही तर ते वाढत जाते.

⦁ जगातली सगळ्यात सुरक्षित जागा ही आईच्या कुशीत असते.

mother quotes in marathi

⦁ सगळ्या संकटातून सुरक्षा करण्याचे सामर्थ्य आईच्या कृपा छत्रा मधे आहे.

⦁ आईचा आधार हा आपल्याला डळमळू देत नाही.

⦁ आईचं प्रेम हे कशातही तोलता येत नाही ,ते अमूल्य आहे अनमोल आहे.

⦁ आईचा प्रत्येक शब्द आपल्याला योग्य वाट दाखवत असतो.

⦁ आईने ठेवलेला खांद्यावर हात माझ्यात हिंमत देतो नव्याने सुरुवात करण्याची.

Aai Marathi Status मराठी आई स्टेटस

हे आपल्या प्रत्येकाला आई चे आपल्या आयुष्यातील महत्व आणि आपल्या आयुष्याला महत्व हे आई मुळे आहे तिचा आदर आपण करायला पाहिजे,जिने आपल्याला ह्या जगात आणलं,तिला आपल्याला तिच्या वाईट काळात सांभाळ करायला पाहिजे ही जाणीव देण्यासाठी mother’s day quotes in marathi चा हेतू आहे.

⦁ आईचे प्रेम म्हणजे पृथ्वीवरील अमृत आहे ज्याने ह्याचा स्वाद घेतला तो तृप झाला.

⦁ आई म्हणजे परीस आहे जिचा स्पर्श झाला आणि आयुष्याचे सोने झाले.

⦁ मनातले दुःख मनात ठेऊन बाळासमोर कायम हसतमुख राहणारी फक्त आई असते.

⦁ आईचं फक्त असणं हेच खूप काही असल्यासारखेच आहे

⦁ आपण कितीही शिकलो तरी काही प्रश्नांची उत्तरं आई कडेच मिळतात

⦁ संपूर्ण जगाचं अस्तित्व एक आईच असते.

Mother’s Day Wishes In Marathi For Whatsapp

Mother’s day सगळेच साजरा करतात पण तो एकाच दिवसापर्यंत ठेवायचा नसतो mother’s day आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक दिवशी साजरा करायचा असतो.

कारण आई फक्त आपली जन्मदाती नाही तर, तर आपली पहिली शक्ती,भक्ती, मुक्ती आहे. असा तुमचा प्रत्येक दिवस आईच्या स्मरणाचा करण्यासाठी खाली काही Mother’s Quotes In Marathi दिले आहेत जे तुम्ही तुमच्या बायकोला, मैत्रिणीला,मित्राला,भावाला,नातेवाईकांना आणि विशेषतः आईला mother’s day च्या निमित्तानेही शेअर करू शकता.

⦁ आईसाठी दिवस नसतो पण आईमुळेच आपला दिवस असतो.

⦁ एकवेळ मंदिरात जायला विसरलास तरी चालेल पण आईला नमस्कार करून बाहेर पड देवही तुझ्यावर प्रसन्न होईल.

⦁ आईचे आपल्यावर उपकार नसतात तर परोपकार असतात. उपकाराची परतफेड होते परोपकाराची नाही.

मला आईसाठी स्वप्नं पूर्ण करायची आहेत.

⦁ जेव्हा जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा आईचा चेहरा आठव नववर्जा संचारेल.

⦁ आईच्या श्रेष्ठत्वाची तुलना नाही मग ती आई कोणाचीही असो.आई ही आईच असते.

⦁ आई ही अशी शांतता आहे जिथे फक्त प्रेमाचा आवाज कानी येतो.आई तुला mothers day च्या खूप शुभेच्छा

⦁ आई तुझ्यासाठी देवाकडे काय मागणार तो देव ही तुझ्या उदरी जन्म घेतो.

mother quotes in marathi

Emotional Mother Quotes In Marathi आई भावनिक मराठी कोटस्

आईने स्वप्न पहावीत आणि लेकराने ती पूर्ण करावीत असं कर्तृत्व असावं

⦁ आईने बोट दाखवावा आणि ती गोष्ट पूर्ण करण्या संपूर्ण आयुष्य पणाला लावावं

आईच्या सेवेत सगळ्या देवांचे आशीर्वाद दडलेले असतात

⦁ आईची एक नजर बाळावर पडली की बाळाची वाढ होते एवढं सामर्थ्य आहे

समानतेचे प्रतीक आहे आई

⦁ सर्व तीर्थाचे अधिष्ठान आहे आई

आईच्या अश्रू मध्ये विश्व नष्ट करण्याचे सामर्थ्य असते

⦁ ज्या घरात आईचे सन्मान आहे तिथे लक्ष्मी नांदते

⦁ ज्याने ज्याने आईच्या आज्ञेचे पालन केले त्या प्रत्येकाला यश प्राप्त झाले

⦁ तू कितीही श्रीमंत हो आई सोबत नसेल तर आपण भिकारीच

जो आईला विसरला तो गरीब

⦁ ज्याच्या सोबत आई आहे त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही

Aai Marathi Quotes आई मराठी कोटस्

आईचे महत्व : अगदी संतांनी देखील आपल्या आपल्या अभंगातून वेळोवेळी आईचे महत्व जगाला पटून देण्याचा प्रयत्न केला आहे. आई हे फक्त एक नातं नसून ते प्रत्यक्ष देवाचं स्वरूपच आहे. हे मातृ देवो भव : हे फक्त तत्वज्ञान नसून आपली जीवनशैली व्हायला पाहीजे इतकाच आमचा प्रयत्न आणि हेतूही आहे. आणि तो तुमच्यापर्यंत पोहचेल आणि तुमचं आई वरील प्रेम अजून घट्ट होईल हीच अशा आहे.

⦁ संपूर्ण जगाने दूर टाकलं तरी आई जवळ असते

⦁ आईच्या कुशीतला विसावा पैशाने नाही तर भाग्याने मिळतो

⦁ आईचे हसणे ही समाधानाची व्याख्या आहे

⦁ सगळ्यात मोठा आधार आई शब्दात आहे

⦁ आईच्या नजरेत निस्वार्थ प्रेम वाहत असतं

⦁ आई म्हणजे जगातील चालतं फिरतं पवित्र मंदिर आहे

⦁ जीवंत स्वर्ग पाहिला जेव्हा मी आईच्या चरणावर मस्तक ठेवला

⦁ आई म्हणजे फक्त घरं सांभाळत नसते तर तिच्यामुळे घराला घरपण येतं

  • मातेने वरून वरून कुरवाळलं ना तरी मनातील जखम बरी होते

आणखी वाचा –

Birthday Wishes For Father
संकष्टी चतुर्थी 2026
50+ मराठी कविता संग्रह
Anniversary Wishes In Marathi
Good Morning Quotes In Marathi