Chatrapati shivaji maharaj speech in marathi 2024 शिवजयंती भाषण

Chatrapati Shivaji Maharaj Speech In Marathi 2024

विषय : chatrapati shivaji maharaj व त्यांचे अद्भुत दुर्ग व्यवस्थापन तंत्र .निश्चयाचा महामेरू I सकळ जनांसी आधारू I
अखंड स्थितीचा निर्धारु I श्रीमंतयोगी II

गड किल्ले नियोजन
⦁ पाणीसाठा
⦁ धान्यसाठा
⦁ सौचालय योजना

 

chatrapati shivaji maharaj speech in marathi शिवजयंती भाषण

chatrapati shivaji maharaj speech in marathi शिवजयंती भाषण   chatrapati shivaji maharaj यांना मुजरा करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो .
एकाच व्यक्ति मध्ये सर्व गुण असणे अशक्यच , पण भारत वर्षात महाराष्ट्राच्या मातीने असेही सर्वगुण संपन्न सामर्थ्य पाहीलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ,फक्त युद्ध नव्हे , तर विज्ञान , गणित , भूगोल , इतिहास ,पुराण ,शास्त्र ह्या सगळ्यात पारंगत असणारा आपला जाणता राजा , दूरदृष्टि असणारा आपला राजा , रयतेची जाण असणारा आपला राजा , म्हणजे chatrapati shivaji maharaj .

गड किल्ले नियोजन Chatrapati shivaji maharaj speech in marathi 

महाराजांच्या सर्वगुण मधील एक गुणांची साक्ष देणारे “दुर्ग व्यवस्थापन तंत्र “कसं असावं हे महाराजांच्या गड किल्ल्यांकडे पाहून शिकायला मिळते .
कोणतीही technology devoleped नसताना केवळ बुद्धी आणि मनुष्यबळावर ज्या वास्तु उभारल्या गेल्या त्या आजही काळाच्या ओघात तशाच उभ्या आहेत . गड किल्ले फक्त उंचीवर बांधायचे एवढच नाही , तर होणारे युद्ध आणि त्याचे परिणाम ही जाणून किल्ल्याची रचना ,शत्रू ने वेढा दिला तर राजाने सुखरूप त्या गडावरुन दुसऱ्या गडावर पोहचण्यासाठी चोर वाटा ज्यांचा पत्ता शत्रूला ही लागणार नाही . अशी रचना .शत्रूला चकवा देणाऱ्या वाटा ज्या वाटेवरून शत्रूचा नाश होईल असे मार्ग . ऊंची वरून वाहणारे वारे त्यांचा वेग आणि त्यामुळे गडाच्या भिंतीवर होणार परिणाम ह्या सगळ्याचा अभ्यास करून तशी रचना . तसेच मुसळधार पाऊस आणि त्यामुळे होणरया समस्या त्यांच्यावर उपाय योजना आखून तशी गडावर सोय ,मुळसधार पाऊसामुळे दरड कोसळण्याची शक्यता जाणून उपाय केले जायचे .

तर कोणत्या वर्षी पाऊस पडला नाही आणि दुष्काळ स्थिति आली तर पहिला प्रश्न पाणी टंचाई येऊ शकते तिथे ही उपाय केले गेले , आज आपण महाराजांच्या कोणत्याही गड किल्ल्यावर गेलो तर आपल्याला ह्या बुद्धी कौशल्याचा दर्शन होतो . म्हणजे पाहायला गेलो तर chatrapati shivaji maharaj सर्व क्षेत्रातले इंजिनिएर होते .थोडा विचार करा आज आपण साधं घर बांधल तरी त्यात काय कुठे करायच ते राहूनच जातं आणि मग सारखं सारखं घर दुरुस्त करत राहतो . पण महाराजांनी जे गड किल्ले उभारले ते संपूर्ण अभ्यास करून आणि आजतागायत ते तसेच आपल्याला दिसतात .

पाणीसाठा chatrapati shivaji maharaj 

आज आपल्या शहरांमध्ये जास्त पाऊस पडलं की जागोजागी पाणी साचत ,महाराजांनी याचा साठीही उपाय गड किल्ल्यांवर केला त्याकडे पाहून आपण शिकायला पाहिजे,गडाचे दरवाजे लाकडी असायचे ,दरवाजा जवळ पाणी साचून मग ते पावसाच्या पाण्याने खराब होऊ नये ,म्हणून दरवाजाच्या दोन्ही बाजूला मोठे छिद्र तेही कोणाला दिसणार नाही असे ज्याच्यातून पाणी बाहेर जाईल आणि ते साचणार नाही ,असे केलेले उपाय आज तुम्हाला कित्येक किल्ल्यांवर पाहायला मिळतील .

एखाद्या वर्षी पाऊसच पडला नाही आणि दुष्काळी परिस्थिति ओढवली तर या समस्येवर ही उपाय गड किल्ल्यांवर केलेला दिसतो ,तो म्हणजे पाणीसाठा म्हणजेच तलाव निर्मिती,किल्ला बांधताना “आधी खडक फोडूनी तळी बांधावी “असे आज्ञा पत्र महाराजांनी दिले होते , मोठ मोठे कातळ फोडून त्याला तलावाचे आकार दिले जात ,अशी तळी रायगडावर ही पाहायला मिळतील उदा . गंगासागर तलाव ,हत्ती तलाव . आजही ह्या शिवकालीन पाणीसाठा व्यवस्थापनाचे तंत्र वापरात आणले पाहिजे ,त्यामुळे शिवकालीन जलसंस्कृतीचा वारसा ही जपला जाईल .

धान्यसाठा

प्रत्येक किल्यावर एक धान्य ठेवण्याची जागा होती वेळ प्रसंगी घोडे असतील नाहीतर मावळे प्रत्येकाची काळजी घेतली गेली प्रत्येकाची सोय प्रत्येक गड किल्ल्यावर धान्य कोठारातून व्हायची असे कित्येक कोठार किल्ल्यावर आज पडक्या स्वरूपात पाहायला मिळतात .

सौचालय योजना Chatrapati shivaji maharaj speech in marathi 

फक्त धान्याची नाही तर , आताच्या सरकारची एक योजना आहे ती म्हणजे “हगणदारी मुक्त गाव”ही योजना शिवकालीन आहे असे आढळून येते कारण प्रत्येक गड किल्ल्यावर सुलभ सौचालय पाहायला मिळते , म्हणजे आपल्याला कळते की काय दूरदृष्टि असेल ,आणि कोणतेही यंत्र जवळ नसताना केवळ बुद्धी कौशल्य आणि मनुष्यबळ यांच्या जोरावर हे सगळ नियोजन बद्ध स्वराज्य उभं केलं गेलं जे आज फक्त आपल्यासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्श म्हणून उभं आहे .

Chatrapati Shivaji Maharaj हे गड किल्ले हेच आपल्या महाराष्ट्राचे ऐश्वर्य आहे आणि हे ऐश्वर्य जपणं ही आपली जबाबदारी आहे ,आपण या गड किल्ल्यांवर पर्यटन निमित्त जातं असतो तेव्हा आपण योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे , आपण किल्ल्यावर जाताना पाण्याने भरलेली बॉटल सोबत घेऊन जातो मग तीच बॉटल रिकामी झाली की,सोबत का आणू शकत नाही ,ह्याचा विचार आपण करायला पाहिजे .

खरच अशा जाणत्या राजास मानाचा मुजरा !!!!!!!
छत्रपती शिवाजी महाराज की !!!!!!
जय भवानी !!!!!जय शिवाजी !!!!!!

Chatrapati Shivaji Maharaj Speech In Marathi

इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरू शकत नाहीत .
किल्ला मराठी मुलूखाचा शिवरायाने लढविला |
राजा रायतेचा वाली त्याने इतिहास घडविला ||
बारा जातीच्या मावळ्यांचे असे पराक्रमी बळ |
गर्जे हरहर महादेव अंगी संचारले बळ ||
करी वैऱ्याची खांडोळी हाहाकार उडविला |
राजा रयतेचा वाली त्याने इतिहास घडविला ||
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज,योगिराज,श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मनाचा मुजरा . आदरणीय व्यासपीठ आज शिवजयंती निमित्ताने या मंचावर मला निमंत्रित केले प्रथम मी आयोजकांना धन्यवाद देतो . व येथे जमलेल्या सर्व शिवप्रेमी व स्पर्धकाना शिवजयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्या देतो . माझ्या भाषणाचा विषय आहे मासाहेब जिजाऊ ह्या शिव छत्रपतींच्या आदयगुरू .
युद्धनीती आणि धर्म दादो जिजाईचा , सुभेदारांच्या सुनेला मान दिला तो पुत्र आईंचा , गडकिल्ल्यांचा शिखरावर भगवा त्याने चढविला ,राजा रायतेचा वाली त्याने इतिहास घडविला . अशी जिजाऊ होऊन गेली शिकवण दिली माझ्या शिवबाला ,माझे प्रथम वंदन त्या मातेला .
ह्या चरोळ्यातून स्पष्ट होते की जिजाऊ महाराजांच्या आदयगुरू होत्या . आज हिंदू म्हणून मी सूर्य पाहतो ,पुजितो देवी देवतेला ,जन्म घेतलं जिजाऊनच्या उदरतून ,प्रथम सन्मानितो मी त्या मातेला . आपल्या जन्म दात्या मातेचा प्रथम सन्मान राखला पाहिजे अशी शिकवण जिजाउनी शिवबाला दिली. परस्त्रीला मातेसमान मानावे ,अन्याय असेल तिथे लढा देणे ,जो चुकत असेल त्याला शासन झालेच पाहिजे मग तो कोणीही का असेना , मग तो स्वतःचा सखा भाऊ जरी असेल ,अथवा स्वतःचा मुलगा,समजावून ऐकत नसेल तर जशास तसे उत्तर देणे,जर कोणी माझ्या लेकीबाळांवर सुनाबायानवर जुलूम अत्याचार करत असेल तर त्याचे हात पाय कलम करावे,आपल्या धर्मप्रमाणे इतर धर्मचाही सन्मान करणे,आपले हक्क,अधिकार,कर्तव्य,जबाबदऱ्या ह्यांची जाणीव असणे,माझ्या शेतकऱ्याला सुखी कर आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता परकीय चाकरी ,गुलामगिरी नको ,रायतेचे तुमचे आमचे सर्वांचे राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य पाहिजे. अशी शिकवण मासाहेबांनी राजांना दिली ,राजांना बाळवयातच ह्या गोष्टींचा बाळकडू मिळत होतं . व त्यातूनच राजे घडत होते .
राजे सहा वर्षाचे असताना शहाजी राजांनी ,राजे व जिजावू यांची रवानगी कर्नाटकातून पुण्याला केली . त्यांच्या सोबत निवडक विश्वासू मंडळी पाठविली.
त्यावेळचे पुणे म्हणजे एक ओसाड मालरानावरचे गाव. भोंडकी बोडकी घरं तरी सुद्धा रिकामी ,देवळे बंद,एखादा चिट पाखरू देखील उडताना दिसावा. अशी पुण्याची अवस्था ,आपल्या पोरीबाळींची ,सुनाबायाची अब्रू वाचविण्यासाठी जो तो घरदार सोडून आपापल्या शेतावर आणि रानावनात जाऊन राहत होते.भर दिवसात गावात लांडग्याचा संचार दिसायचा . राजे व मासाहेब पुण्यात आले त्यावेळी त्यांना राहायला घर सुद्धा नव्हतं . पुण्याच्या झांबरे पाटलांच्या मोडक्या वाड्यात त्यांनी आपला बिऱ्हाड थाटला . त्यावेळी विजापूरचा बादशहाच्या हुकुमावरून त्यांच्या सरदाराणे शेतीवर गाढवांचा नांगर फिरवला होता . व गावाच्या वेशीवर एक पहार आणि एक वाकडी मेढ ठेवली होती व या गावात जो कोणी राहण्याचा किवा शेती करण्याचा धाडस करेल त्याचा निर्वंश होईल अशी सर्वांच्या मनात भीती निर्माण केली होती . मासाहेबांनी आपली माणसे चारही दिशेला पाठवली आणि सर्वाना पुण्यात येऊन राहण्याची विनंती केली . परंतु प्रत्येकाच्या तोंडून एकच उत्तर की आमच्या कुटुंबाचा निर्वंश होईल . ज्याना जिजाऊनबद्दल खात्री होती ते पुण्यात येऊन राहून लागली . ती सुद्धा हाताच्या बोटावर मोजावी एवढी च ,पुण्यात येऊन मासाहेबांना आठ दहा दिवस झाले असतील त्यांनी गावात ढोल ताशा च्या गजरात मिरवणूक काढली त्यांचे सहकारी आणि गावात आलेली कुटुंब त्यांना एकत्र करून त्या थेट गावाच्या वेशीवर पोहचल्या आणि आई भवानी चे नाव घेऊन दोन हाताने रायरावाणी रोवलेली काढून फेकून दिली , आणि म्हणाल्या काय बरं वाईट होईल ते पहिल माझ्या कुटुंबाच होईल ,माझ्या कुटुंबाचा निर्वंश होईल, अशा त्या गरजल्या आणि शेतात आपल्या पुत्राच्या हातात सोन्याचा नांगर देऊन तो शेतात फिरवला . ही सुरुवात मी माझ्या पुत्रा पासून करते . अशा त्या ओरडून म्हणू लागल्या,मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगते ,माझ्या जीवात जीव असे पर्यन्त इथल्या एकाच्या ही केसाला धक्का लागू देणार नाही अशा त्या अविशाने गरजल्या . ही बातमी वाऱ्या सारखी सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात पसरली . गाव सोडून गेलेल्या सर्व लोकांना धीर आला . भरभरा सर्व माणसे आपापल्या स्वगृही परतली. पुनः पुणे पहिल्या सारखे गजबजले . पुण्याच्या दाही दिशा बोलू लागल्या. कसबा गणपतीची मूर्ती दूर्वा फुलांनी सजू लागली .पुण्याचे रुपंच पालटून गेले. गाव कामगार स्वतःचा संसार समजावा तसा घाम गाळून काम करू लागले . न्यायनिवाडा करण्यासाठी मासाहेब जातीने स्वतः हा आपल्या बालराजेना घेऊन सदरावर घेऊन बसंत . सर्वाना न्यायही समतोल मिळे राजांना मासाहेबांचा अभिमान वाटायचा , मी सुद्धा मोठा झाल्यावर असाच न्याय निवाडा करेन .
पावसाळ्यात पार्वती लगतचा ओढा असा वाहायचा असा वाहायचा की सर्व झोपड्या खोपड्या ,शेती भाती साफ धूपुन जायच्या . मासाहेबांनी या ओढ्याला ठिकठिकाणी बंधारे बांधून या बंधाऱ्यांचा पानी शेतीसाठी सोयीनुसार फिरवन्याची व्यवस्था केली . त्यामुळे शेतीसुद्धा लागवटीखाली आली . मासाहेबांनी सर्व शेतकऱ्याना ओसाड जमिनी लागवटी खाली आणण्यासाठी बिनव्याजी कर्जे दिली . शेतसारा माफ केला व सर्वाना शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले . मासाहेबांनी आज्ञा द्यावी आणि ती सर्वानी हौसेने झेलावी असे वातावरण पुण्यात निर्माण झाले एका स्त्रीने पुण्याचा काया पालट केला नव्हे तर हिंदवी स्वराज्याची संकल्पना जनतेमध्ये सोडली व ती सत्यात उतरविण्याचे स्वप्न शिवबाने पूर्ण केले .
जय भवानी | जय शिवाजी | जय जिजाऊ
जय हिंद जय महाराष्ट