Intro : King Kohli म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली भारताचा माजी कर्णधार आहे.त्याच प्रमाणे जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी तो एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळख आहे. त्याची खेळासाठी मैदानातील Energy,Fitness आणि Consistency पाहून त्याला Run Machine सुद्धा म्हणतात. अशा खेळाडूची Virat Kohli Biography In Marathi मधून त्याची कारकीर्द,जीवन,रेकॉर्ड,आणि संपूर्ण माहिती Marathi Biography मध्ये मिळेल.
बालपण आणि क्रिकेट सुरुवात
विराट कोहली माहिती सुरुवात करतांना त्याच्या बालपणापासून सुरुवात करू. विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्ली मध्ये झाला. लहानपणापासून क्रिकेटचे आकर्षण विराट कोहलीला होते. त्याची आई सामान्य गृहिणी होती आईचे नाव सरोज कोहली आणि वडील प्रेम कोहली. पेशाने ते वकील होते. त्यांनी मुलाची आवड लक्षात घेऊन विराट कोहलीला वयाच्या 9 व्या वर्षापासून प्रशिक्षण देण्याचे ठरविले.
क्रिकेट करीयरच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात
विराट कोहलीने क्रिकेट ची सुरुवात त्याच्या Domestic संघातून केली. तेथील त्याची लक्षणीय फलंदाजी पाहून U19 मध्ये निवड झाली.तिथून पुढे त्यांनी संघाच्या कर्णधार असतांना 2008 साली U19 World Cup देशाला जिंकून दिला. आणि ह्याच विजयाने त्याची निवड भारतीय संघात झाली. भारतीय संघात निवड झाल्यानंतर त्याची फलंदाजी अजून धारधार आणि चमकदार झाली.
Virat Kohli International Career आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीचे पदार्पण झाल्यापासून त्यांनी क्रिकेट च्या सर्व format मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून अनेक रेकॉर्ड त्याचे नावे केले. त्याच सोबत अनेक शतकं आणि अर्ध शतकं त्याचे नावे आहेत अनेक सामनावीर आणि मालिकवीर पुरस्कार त्याच्या नावे करून घेतले. Virat kohli career stats पुढील प्रमाणे आहे.
| फॉरमॅट | एकूण धावा | शतक | अर्ध शतक | Best |
| ODI | 14797 | 54 | 77 | 183 |
| T20 | 4188 | 01 | 38 | 122 |
| Test | 9230 | 30 | 31 | 254 |
| IPL | 8730 | 08 | 64 | 113 |
आता विराट कोहली टेस्ट क्रिकेट आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत झाला असून तो एकच वन-दे फॉरमॅट खेळतो.
कर्णधार म्हणून कामगिरी
विराट कोहली 2017 साली कर्णधार पदाची धुरा स्वीकारल्या नंतर भारतीय क्रिकेट मध्ये कमालीचा बदल घडून आला. विराट कोहलीने fitness ची परंपरा भारतीय क्रिकेट मध्ये सुरू केली.त्याच्या Aggresive शैली मुळे प्रेक्षक Test Cricket कडे वळू लागले. तो कर्णधार असतांना विशेषतः test cricket चे Winning टक्केवारी खूप चांगली आहे. त्यांनी अनेक महत्वाच्या मालिका भारताला जिंकून दिल्या.

Virat Kohli Records विक्रम
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 80+ शतके करणारा जगातील दूसरा खेळाडू.
- वन-डे क्रिकेट मध्ये 50+शतके करून सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला.
- सर्वात फास्ट ODI धावा 8000,9000,10000,11000,12000,करणारा पहिला खेळाडू कोहली ठरला.
- वनडे क्रिकेट मध्ये त्याच्या नावावर 13000+ धावांची नोंद आहे.
- त्याचा avarage 57+ आहे जो वनडे क्रिकेट मध्ये खूप उच्च मानला जातो.
- एकाच वर्षात 6 वनडे शतक करणारा तो पहिलाच आहे ही कामगिरी त्याने 2017 साली केली होती.
- Test Cricket मध्येही ही विराट कोहलीने 9000+ धावा केल्या.
- टेस्ट क्रिकेट च्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक Win टक्केवारी असलेला कर्णधार म्हणून ओळख. 40 पेक्षा जास्त सामने जिंकला.
- T20 क्रिकेट मध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्यांमध्ये त्याचे नाव 4000+ धावा.
- T20 क्रिकेट मध्ये अनेक वेळा सर्वाधिक धावा करून Man Of The Tournament पुरस्कार जिंकला.
- Ipl मध्ये सर्वाधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू आहे 8000+ धावा आणि 8 शतके त्याच्या नावावर आहेत.
- IPL च्या इतिहासात एकाच सीजन मध्ये 973 धावा बनविल्या असे पहिल्यांदाच झाले होते त्या सीजन मध्ये त्याने 4 शतके केली.
- म्हणून ह्या कामगिरीमुळे त्याला प्रेक्षक King Kohli म्हणतात.
Virat Kohli Personal Life वैयक्तिक आयुष्य
- कुटुंब
विराट कोहलीची आणि सरोज कोहली गृहिणी आहेत आणि वडील प्रेम कोहली हे वकील होते. तसेच Virat Kohli चे भाऊ विकास कोहली आणि बहिणीचे नाव भावना कोहली आहे.
- Turning Point
विराटच्या आयुष्यातील आणि क्रिकेट कारकीर्दीतील Turning पॉईंट म्हणजे त्याच्या वडिलांचे निधन ठरले. तेव्हा तो 2006 मध्ये रणजी ट्रॉफीचा सामना खेळत होता. वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशीही तो सामना खेळत होता. तो सामना जिंकवून तो नाबाद आला होता. यातून त्याचे क्रिकेट केलेले समर्पण आणि त्याची मेंटल शक्ति दिसून आली होती. - Virat Kohli Marrage विवाह
Virat कोहलीने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याची आणि अनुष्का शर्माची भेट एका Ad shoot दरम्यान झाली होती. आणि त्यानंतर ओळख आणि भेटी वाढून त्याचे रूपांतर प्रेमात झाले होते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनी त्यांची Love Story मैदानातही अनुभवली होती.
त्यानंतर 2017 साली इटली मध्ये Virat ने अनुष्का सोबत विवाह केले. त्यानंतर त्यांची ओळख ही Virushka नावाने प्रसिद्ध झाली.

Virat Kohli Lifestyle जीवनशैली
Sachin tendulkar ला आदर्श मानणाऱ्या विराट कोहलीला त्याच्या प्रमाणे खेळण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी त्यांनी त्याचे आयुष्य खूप Discipline बनवले. अगदी खाणे सुद्धा शुद्ध शाकाहारी अन्न तो Follow करायला लागला. क्रिकेटसाठी शरीराला जी ऊर्जा लागते ते मिळविन्यासाठी तो Junk Foods टाळायला लागला.
दररोज न चुकता Gym workout आणि क्रिकेट सराव करतो. त्याच प्रमाणे अगदी पाहिला रागीट असणारा कोहली हा आता खूप शांत आणि मनावर नियंत्रण मिळवून Focused दिसतो, याचे कारण आहे. अध्यात्म विचार त्यांनी आपल्या आयुष्यात स्वीकारले. कधी तो महाराजांच्या आश्रमात तर कधी तो भारतातील प्रसिद्ध मंदिरात दिसतो.
त्यामुळे त्याच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि स्वतःवरील विश्वास वाढलेला दिसत आहे.
Virat Kohli Social Media Life
संपूर्ण आशिया खंडामद्धे सर्वात जास्त social media Followers असणारा तो एकमेव व्यक्ति आणि खेळाडू आहे. Virat kohli चे Instagram वर 275 Million Followers आहेत.
त्याच प्रमाणे तो अनेक Brands चा Brand Ambassador आहे. त्याचे स्वतःचे अनेक Brands उदा.One 8,Stay Wrong. इ.
त्याच्या Look मुळे देखील तो जगभर प्रसिद्ध आहे. आणि त्याची खासियत म्हणजे एवढी प्रसिद्धी मिळूनही तो सगळ्यांजवळ खूप नम्र दिसत असतो.
Virat Kohli Awards पुरस्कार
Virat kohli याच्या कामगिरी मुळे जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनला त्याच सोबत त्याने देशाचेही गौरव केले. याच कामगिरीची दाखल घेत भारत सरकारने त्याला अनेक सर्वोच्च पुरस्कार दिले त्यातील काही पुढील प्रमाणे.
पद्मश्री पुरस्कार
विराट कोहलीचे भारतीय क्रिकेट ला मिळालेले योगदान पाहून सरकारने 2017 साली विराट कोहलीला भारताच्या चौथ्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
2018 रोजी भारत सरकारने विराट कोहलीचा भारतीय सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मान केला.याचे कारण ही त्याची क्रिकेट मधील उत्कृष्ठ कामगिरी होती.
अर्जुन पुरस्कार
2013 साली श्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विराट कोहलीला सरकारने अर्जुन पुरस्काराने गौरविले. याचे कारणही त्याचे क्रिकेट मधील योगदान आणि उत्कृष्ट अशी खेळीच होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पुरस्कार [ICC Awards]
Virat कोहलीच्या Consistently दिलेल्या perfomance मुळे Icc ने ही दाखल घेत क्रिकेट मधील खूप महत्वाचे पुरस्कार दिले जे खूप कमी खेळाडूंना मिळतात.
- ICC Cricketer Of The Year पुरस्कार
2017 आणि 2018 मध्ये सलग दोन वर्ष त्यांनी हा पुरस्कार जिंकून एक विक्रम केला. म्हणजे आपण कल्पना करू शकतो तो त्याच्या वेळेला कोणत्या Form मध्ये होता. हा पुरस्कार म्हणजे त्या दोन वर्षात तो जगातील एक नंबरचा खेळाडू होता.
- ICC ODI Player Of The Year
हा पुरस्कार तर त्यांनी तीन वर्ष जिंकला 2012,2017,2018 साली तो एकदिवसीय क्रिकेट मध्ये तो Rank मध्ये नंबर 1 होता म्हणून त्याला ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. - ICC Test Player Of The Year पुरस्कार
2018 मध्ये त्याने टेस्ट क्रिकेट मध्ये ही आपली छाप सोडली आणि त्याला हा पुरस्कार बहाल करण्यात आला होता.
आणि एवढे पुरस्कार मिळून त्याची क्रिकेट मधील भूक कमी झालेली नाही तर 2027 ला होणाऱ्या World Cup साठीही तो सज्ज दिसतोय. म्हणून त्याला प्रेक्षक King Kohli म्हणतात.
FAQ:
- Virat Kohli Age
Ans : विराट कोहली आता 37 वर्षाचा आहे. - Virat Kohli Wife
Ans : विराट कोहलीची wife अनुष्का शर्मा आहे.
Conclusion
विराट कोहलीने भारताच्या नव्हे तर जग भरातील तरुणाई मध्ये आणि त्यांच्या विचारसरणी मध्ये बदल घडवून आणला आहे त्याच्या कडून खूप जण खूप काही शिकतात. Virat Kohli Biography In Marathi मधून हेच शिकायला मिळते की,आयुष्यात शिस्त मेहनत आणि साकारात्मक विचार असतील तर यश मिळतेच. म्हणून कोणाला आदर्श बनवायचे असेल तर माझा आदर्श virat kohli असेल.
Also Read Popular Articles
U19 World Cup 2026
T20 World Cup 2026
Thomas Adison Biography In Marathi
Chtrapati shivaji Maharaj Information In marathi