aai marathi kavita आई मराठी कविता :
aai marathi kavitaआई मराठी कविता : आई म्हणजे वात्सल्य आणि म्हणजे प्रेम ,आई म्हणजेच देव अजून आई म्हणजेच सर्वस्व आई साथी दुसरी उपमा नाही . आई सारखे दैवत साऱ्या जगतात नाही ,आपल्या मराठी साहित्यात आपण किती वेळा वाचलं आणि अनुभवल ही आहे . स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी . अस म्हणतात की देवाला प्रत्येकाच्या घरी जाता नाही आल म्हणून त्याने आईची निर्मिती केली आणि ही सत्य आहे , मग ती आणि माणसाची असो किवा कोणत्याही प्राण्याची तिथे ततेच प्रेम आणि वात्सल्य दिसत आणि हेच सांगणारी ही आमची कविता aai marathi status आई मराठी कविता
- आई
- तीच माझी आई
- आईचं वर्णन नाही
आई म्हणजे.
हेही वाचा – Birthday Wishes In Marathi
motivational quotes in marathi
aai marathi kavita मध्ये आई हा शब्द जरी लहान असला तरी तो महान आहे आई शिवाय आपलं अस्तित्व काय आहे हा विचार केला तर ह्या पृथ्वी वरचा कोणताही प्राणी आई शिवाय काहीच नाही . आई सोबत असेल तर अशक्य ही आपण करू शकतो .ही भावना व्यक्त करणारी आई कविता . आणि या कवितेची रचना ही आम्ही विशिष्ट अशी केली आहे प्रत्येक ओवीचा पहिलं अक्षर वाचा एक विशिष्ट असा अर्थपूर्ण वाक्य तयार होतो तो नक्की वाचा .
आई
तु_ज वाचूनि आई मी काहीच नाही
ज_न्म जरी घेतले कोटी ही फेड शक्य नाही
वा_त्सल्य नजरेत तुझ्या बघता माझ्याकडे
चु_कल्या सारख होई दूर ती जेव्हा जाई
नि_वांत मन होई पदराची ऊब अंगावरी
आ_त्माही तूच , हक्क तुझा या श्वासावरी
ई_श्वर तर नथमस्तक जन्मघेण्या तुझ्या उदरी
मी_तर तुझाच अंश मग स्तुती ती काय आई
का_रण ही तू माझ्या साऱ्या आयुष्याचे
ही_म्मत ही तुझ्या हास्याने साचे
च_रण स्पर्श तुझा अन सामर्थ्य भरे एकाकी
ना_ही अशक्य काही हस्त तुझा माझ्या मस्तकी
ही_सारी दुनिया बाजूस जिंकण्या शब्द पुरेसा आई
तुज वाचोनि आई मी काहीच नाही
_ranjit shinde
aai marathi kavita मध्ये तीच माझी आई ह्या कवितेत आई आणि तिची आपल्यासाठी करत असलेली मेहनत ही सहसा ण दिसणारी आहे पण वेळ काढून आई आपल्यासाठी काय काय करत असते हे तुम्ही पाहायला पाहिजे आणि ती पाहण्यासाठी ही कविता नक्की वाचा . आई म्हणजे विसावा देणारी सावली आहे .
तीच माझी आई
अख्खा दिवस तिचा हा कुटुंब सेवेत निघून जाई ।
पर कधी न थकवा तिज
तीच माझी गोड आई ।।
पदस्पर्श करताच तिचे मी
चित्तास मिळे ही सुख शांतता ।
सोबतीस संकटकाळी मदतीस
हीच होती माझी प्रेमळ माता ।।
प्रफुल्लित चेहरा पाहताच तिचा
मनीचे दुःख मी विचारून जाय ।
घरची लक्ष्मी माझा आसरा
तीच माझी कष्टाळू माय ।।
माया ममतेचा सागर वात्सल्याची खाण
जणू जगण्यातील सात्विक भाग ।
स्वतःच्या मनीच्या विसरुनी यातना
जगण्यास देते मज नवप्रेरणा ।।
आशा या देवरूपी आत्म्याच्या
मी अखंड सेवेत असावं ।
आम्हा दोघांचं नातं पाहून
त्या ईश्वरालाही कोडं पडावं ।।
_nirvighna shinde
aai marathi kavita मध्ये आईच वर्णन नाही ही कविता अबोल करणारी आहे,आईच वर्णन काय करणार,कारण आई ने आपल्याला जन्म दिला ती आपल्या आधी होती तिच्या बद्दल आपण काय जाणणार आईला कोणत्या वस्तूची उपमा देणार ती उपमेच्या आणि तुलनेच्या पलीकडे आहे ,आई तुझ वर्णन नाही हेच तुझ वर्णन आहे .
आईचं वर्णन नाही
आई आज लेखणी हाती घेतली
काहीतरी लिहावं वाटलं
तुझ्यासाठी
खरं सांगू का आई
काय लिहावं
कुठून सुरुवात करावी
आई खरंच आज
लेखणी चालत नाही
लेखणीही अपुरी
तुझ्यासमोर
जगातली सगळी सूंदर
वर्णनं जरी तुला दिली
तरी ती अपुरीच वाटतात
आणि लिहण्यासाठी पूर्ण माहिती लागते
तुझं रूप तर
माझ्या साठी अजून अकलनियच आहे
तुझ्या प्रेमाचं मी फक्त
स्वाद घेऊन निरीक्षण
करू शकतो पण वर्णन अशक्यच.
Marathi poem on mother आई फक्त एकच असते देह एकच असतो पण ती किती प्रकारे आपलं आधार असते हे ह्या आई म्हणजे.. ह्या कवितेत तुम्हाला समजेल ,ही कविता प्रत्येकाने वाचायला पाहिजे कारण आई कळणे सोपं नाही ,तुम्ही वाचा आणि तुमच्या मित्र,भाऊ,नातेवाईक share करा.
आई म्हणजे….
आई म्हणजे तप्त उन्हात
विसवणारी सावली जशी,
आई म्हणजे भरकटलेल्या नावेला
किनारा जशी…,
आई म्हणजे मुसळधार पावसात
अडोसा जशी,
आई म्हणजे प्रार्थनेतला
देव प्रत्यक्ष जसा,
आई म्हणजे पाण्याचा गारवा
आणि सुखाचा उगम,
आई म्हणजे वाऱ्याची शीतलता
आणि स्वर्गाचा संगम..,
आईचा एक स्पर्श
आणि नवी उमेद अंकुरे,
आईचा एक शब्द
आणि वाट ही बहरे….,
आई म्हणजे ब्रह्मांडाच्या
ऐश्वर्याची तिजोरी,
आई म्हणजे देवांसाठीही
मायेची शिदोरी….
देवा पुन्हा बालपण दे
आयुष्याच्या सौंदर्यातील ते सोनेरी पान दे
देवा नको हे जगणे जीवघेणे मला पुन्हा बालपण दे
तारुण्याच्या उंबरठ्यावरून मागे मागे आता फिरावस वाटतय
मोठ झाल्यावर कळतंय आयुष्य फार फार छळतय
होईन साहेब घेईन गाडी स्वप्ने आता बास सारी
साऱ्या पाहिल्या स्वप्नांवर घालीन आता विरझन रे
धडपडलेल्या जिवापेक्षा धडपडणारी पाऊले बरी होती
उनाड असायचा दिवस तरी निवांत झोप खरी होती
नको ही बॅग लॅपटॉप वाली
मला माझ्या शाळेचं दप्तर दे
अनेक प्रश्न विचारांनी डोक्याचं आता भुगा होईल
उद्या जगण्याच्या चिंतेमधे आजच जगणं विरून जाईल
इच्छा आकांक्षा नकोत आता समाधानच जगू दे
आयुष्याची मशाल विझन्याआधी आईच्या कुशीत निजू दे.
शुभम जाधव