Birthday wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes in marathi प्रत्येक नात्याला महत्व आहे प्रत्येक जण आपल्यासाठीच आहे अशी ही आपली प्रेमळ नाती असतात, आपण कोणाला मुळे तरी दादा बनतो,ताई बनवतो, आई बनतो,बाबाबनतो,मामा बनतो,म्हणजे प्रत्येक नातं हे किती महत्वाचे आहे ह्या वरून कळत.आणि त्या नात्याचा जन्म कोणाच्या तरी जन्माने होत असतो.असा जन्मदिवस प्रत्येकाचा असतो.आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणे म्हणजे त्या व्यक्तीला जिंकून घेण्यासारखे असते.अशा प्रत्येक व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज आपल्यासाठी काही शुभेच्छा Birthday wishes in marathi मध्ये घेऊन आलो आहोत त्या नक्कीच सगळ्यांना भावतील.आणि तुम्ही ह्या शुभेच्छा आपल्या आवडत्या व्यक्तीला देऊ शकता.Birthday wishes in marathi मध्ये पहिल्या शुभेच्छा आईसाठी.
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday wishes for mother)
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday wishes for mother)
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday wishes for brother)
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday wishes for sister)
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday wishes for friend)
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday wishes for girl friend)
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday wishes for husband)
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday wishes for wife)
हे ही वाचा – मराठी कथा
________________💌💝💐💐❤️❤️❤️_____
Birthday wishes in marathi मध्ये पहिल्या शुभेच्छा देणार आहोत आई साठी.
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes for mother
आई तुझ्यामुळे माझं अस्तित्व आहे माझी सुरुवात आणि शेवट तुझ्यात आहे ,तु झा प्रत्येक श्वास तू माझ्यासाठी वेचलास तू आई ,
ह्या सगळ्याची फेड अशक्य म्हणून माझं ही आयुष्य तुलाच लाभो आई तुला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा!!!!!
सगळ्यात आधी जगात मला ओळखणारी तूच होतीस आई नंतर सारी दुनिया,माझी पहिली नजर तुलाच शोधत होती असं आपलं नातं हे जगा निराळं आई,
माझ्या आवाजाने तुला माझे दुःख कळत होतं आई. एवढं वात्सल्य अजून कुठेच नाही,तुझीच बोटं धरून मी चालायला शिकलो,तुझ्या मुळेच मी ह्या जगात आहे आई,
तुझ्याविना मी काहीच नाही.तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!दंडवत
💐💐💐💐💌💌💌💌💝💝💝💝💐💐
Birthday wishes in marathi मध्ये दुसऱ्या शुभेच्छा बाबांसाठी देणार आहोत.
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
( Birthday wishes for father )
बाबा ,तुम्ही झिजलात माझ्यासाठी,
माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही पाहिलीत नाहीत स्वप्न
पूर्ण आयुष्य फक्त माझ्या करिता कष्ट केलेत ,तूच भाऊ तर कधी मित्र तर कधी देवच म्हणून उभे राहिलात पाठी.
तुमचेही स्वप्न पूर्ण करेन मी,आणि देईन संधी तुम्हाला ही मला डोक्यावरून मिरवण्याची
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा!!!!!
बाबा तुमचा प्रत्येक घामाचा थेंब
हा आमच्या साठीच होता
मला आनंद देण्यासाठी कधी तुम्ही
नाही विश्रांती कधी घेतली.
कधी तुमच्या डोळ्यात आम्ही अश्रू नाही पाहिले
एवढी ताकद फक्त एका बापामध्येच पाहिली.
तुमच्या समोर मी नतमस्तक बाबा!!!!!
तुम्हाला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा बाबा !!!!!
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
( Birthday nished for brother )
अख्खं जग सोबत नसलं तरी भीती नाही
कारण माझा भाऊ माझ्या पाठीशी कायम
राहतो.
खिसा झालाच कधी रिकामा तरी कोणा समोर हात पसरू दिले नाही असा भाऊ माझा आहे.
किती आली संकट, तरी हरलो कधीच नाही
कारण सोबत असा माझा भाऊ आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा !!!!!!
तुझा खांद्यावर एक हात असला की माझ्या हातात बळ येते
काहीही झालं तरी तुझा हात फक्त खांद्यावर असेल तर मी जग जिंकू शकतो एवढा विश्वास फक्त दादा तुझ्यावर आहे.
कारण लहानपणा पासून तू मला कधीच हरू ही नाही दिलं आहेस.तू हरून मला जिंकवलं आहेस असा फक्त तूच आहे
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!!
तुझं भविष्य समृद्धी आणि ऐश्वर्याची भरभराट होऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!!,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या!!!!
तुझ्या आयुष्यात यश,कीर्ती प्रताप प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या !!!!!♥
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा birthday wishes for sister
• कधी बनून आई माझा कान
धरणारी ताई ,असं गोड नातं जगात कोणतं नाही
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!!❤️
एकही दिवस तुझ्याजवळ भांडण झाल्याशिवाय
जात नाही,तरीही तुझ्या शिवाय राहता येत नाही.
अशी जगात एकमेव माझी ताई.
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!❤️
रक्षाबंधन वेळी हक्काने पैसे मागणारी आणि माझ्या न कळत ,पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी प्रेमळ ताई. तुला उदंड आयुष्य लाभो❤️तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!❤️
आई नंतरची आई म्हणजे ताई देव आणि आईचं दुसरं रूप म्हणजे ताई मी भाग्यवान माझ्या आयुष्यात आली अशी ताई. ताई तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा❤️❤️
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes for friend in marathi
• मित्रा तू जेव्हा पासून एक भाऊ म्हणून
पाठीशी उभा राहिलास तेव्हा पासून मला जगात
अशक्य असे काहीच वाटत नाही.
कोणत्याही वेळी आणि कोणत्याही संकटात
भावासारखा पाठीशी राहणाऱ्या माझ्या
मित्राला हृदयातून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
• नातं आपलं रक्ताचं नाही पण वेळेला
रक्ताचीही नाती जवळ नसताना जो उभा
राहिला तो तूच होतास मित्रा.
तुला उदंड आयुष्य लाभो ❤️ वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा❤️❤️❤️❤️
जीवाला जीव देणाऱ्या आणि वेळेला माझ्यासाठी जीव ही देण्याची तयारी असणाऱ्या माझ्या
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️
सगळे उपाय संपतात तेव्हा शेवटचा एक साथ देणारा माझा मित्र तूच आहेस ,रात्र असो मध्यरात्र कधीही वेळेकडे न बघता वेळेला धावून येणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️❤️तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️
असा हा माझा मित्र आणि अशी आमची खात्री जरी जग बदलल तरी बदलणार नाही आमची मैत्री ❤️❤️❤️अशा सुख दुखात साथ देणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ❤️❤️जगातली सर्व सुख तुला मिळो हीच देवाकडे मागणी
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
एक मित्र विश्वासु जर तुमच्याजवळ तर तुम्ही त्याच्या बळावर जग जिंकू शकता तो मित्र म्हणजे तूच आहे मित्रा,तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा,❤️❤️❤️
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्या ( birthday wishes for friend )
आज चंद्राचे चांदणे चमकले
श्वासाला मार्ग गवसले
आज नवल घडले येण्याने तुझ्या हे आसमंत ही सजले…♥
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या .. मैत्रिणी ♥♥♥♥♥♥
स्पर्श करता तुझ्या चिमुकल्या गाली तिकडे लाजाळू ही लाजले ♥फुलांचेही सौदर्य कमी पडले ♥आणि ते तुझ्या गोंडस रूपात जडले ♥♥वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या ♥♥
जिच्या सोबत बालपणाचा सुगंध अनुभवला ♥चिमुकल्या पावलांनी चालून अविस्मरणीय केला ♥कधी बनून बहीण तर कधी मैत्रीण सारखी ♥समजूत तू काढतेस ,पाहतोय मी तुझं पूर्णत्व ♥प्रत्येक वाढदिवशी तू , चंद्रा प्रमाणे ,♥कळी प्रमाणे फुलतेस ♥happy birthday to you friends
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्या♥ birthday wishes for husband in marathi
सात जन्मी साथ देशील वचन तू दिले♥तोल जाता प्रत्येक वाटेवर तू सावरले डोळ्यात आले अश्रु कधी ते तू पुसीले सुख दुखात सोबती मराहून ते वचन तू जपले तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या♥तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
साथ तुझी मिळाली आणि तोल जाता सावरला दु :ख सारे संपून गेले आनंद आवरेना तुझ्या एका येण्याने आयुष्य माझं सुखावलं तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या
देह जरी दोन परी मन एक झाले आतुट हे बंधन असे जुळून आले न सांगता जाणून घेतले सुख दु :ख माझे साथ तुझी अशीच मिळाली आणि हलके झाले ओझे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या
पहिली भेट तुझी आणि पहिला स्पर्श
अजूनही तो नवाच आहे
हृदयाच्या कोपऱ्यात तो स्पर्श तसाच आहे
पहिल्या भेटीला मी रोज भेटते .
आणि पुन्हा पुन्हा मलाच मी भेटते
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या
hubby marathi kavita birthday wishes for husband in marathi एक नवीन नातं पती पत्नीचं विश्वासाने बांधलेलं आणि प्रेमाने फुललेलं किती गोड असतं, आणि त्यात अजून ते बंध घट्ट करण्यासाठी एकमेकांचे सुरू असलेले प्रयत्न चालूच असतात अनेक माध्यमातून, मग ते राधा-कृष्ण असो नाहीतर सीता -राम असो,ह्या नात्यातले बंध काही निराळेच असते. शरीर दोन असतात,त्यात मनही दोन असतात पण मात्र प्रेमाची नाळ एकमेकांना जोडणारी एकच झालेली असते, एकमेकांशिवाय जगणं अशक्य होऊन जातं ,त्याच नात्याची वर्णन करणारी आमची ही कविता hubby marathi kavita birthday wishes for husband in marathi
बंध प्रेमाचे
प्रेम पावसाचा
सुगंध आहेस तू
प्रेमाच्या बरसणाऱ्या
धारा आहेस तू
प्रेमाने तुडुंब भरलेला
सागर आहेस तू
प्रेम म्हणजे……..प्रेम आहेस तू……
प्रेमाचे शब्दबोल आहेस तू
श्रीकृष्णाच्या बासरीचे नाद तू
प्रेमाचा गोडवा आहेस तू
प्रेम म्हणजे…….प्रेम आहेस तू……
प्रेमाचा नित्य रंग आहेस तू
सप्तरंगी प्रेमाचा तरंग तू
रातराणीचा गंधाळणारा परिमळ तू
प्रेम म्हणजे……प्रेम आहेस तू….
तिमिर आयुष्याचा प्रकाश आहेस तू
आयुष्याच्या पुरातला सुखद किनारा तू
आयुष्यातला आनंद आहेस तू
प्रेम म्हणजे…..प्रेम आहेस तू…..
आयुष्य सुंदर करणारा कलाकार तू
मनावर अधिराज्य करणारा राजा तू
प्रेम जिंकणारा सिकंदर आहेस तू
फक्त आणि फक्त माझा आहेत तू
प्रेम म्हणजे …..प्रेम आहेस तू…...
____________________
तुझं माझं नातं
सुखाच्या आनंदाचा उगम
म्हणजे तुझं माझं नातं….
सुखाच्या सरींचा संगम
म्हणजे तुझं माझं नातं…..
रेशमी धाग्यांचे बंध
म्हणजे तुझं माझं नातं….
मखमली फुलाने सजवलेले
तुझं माझं नातं…..
ईश्वराची कृपा
म्हणजे तुझं माझं नातं…..
एकश्वासात गुंफलेली दोन फुलं
म्हणजे तुझं माझं नातं…..
विश्वासाचे सुंदर उदाहरण
म्हणजे तुझं माझं नातं….
प्रेमाचा निखळ स्वछंद झरा
म्हणजे तुझं माझं नातं….
ओठांच्या चंद्रकोरेसारखं स्मितहास्य
म्हणजे तुझं माझं नातं….
बाळाचा निरागस खोडकरपणा
म्हणजे तुझं माझं नातं….
दुरावा असूनही साथ देणारं
तुझं माझं नातं….
शेवटानंतरही एकत्र असणार
तुझं माझं नातं….
तुझं माझं नातं जरा वेगळं आहे
हातात हात साथ तुझी
माझं सगळं आहे……
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️❤️❤️
आयुष्याच्या वादळात भरकटलेल्या माझ्या स्वप्नाच्या होडीला लाभलेला किनारा म्हणजे तू आहेस…..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको❤️❤️🥰
तुझ्या पासून सुरुवात आणि शेवटही तुझ्यात….❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..❤️❤️❤️
सावली सारखी साथ तुझी कठीण काळी आधार तुझा तुझी साथ हाच विजय माझा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..❤️❤️❤️