ChatGPT म्हणजे काय ? What is ChatGPT जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि वापर

आपल्या दैनंदिन जीवनात AI म्हणजेच Aritifical Intelligence हे शब्द काही वेगळे नाहीत मग कोणाचं शिक्षण जास्त असो वा कमी प्रत्येकजण हे शब्द वापरतोच. सध्याच्या वेळेला सगळीकडे धुमाकूळ घालणारा विषय म्हणजे AI आणि ChatGPT. आज प्रत्येकाच्या चर्चा ह्या फक्त ह्याच विषयावर आहे. म्हणून ChatGPT म्हणजे काय ? हे समजून घेणं मला महत्वाचं वाटतं

का एवढा हा विषय Trending आहे ? नेमका कसा करतात त्याचा वापर ? काय फायदा आहे त्याचा ? आणि नेमकं ChatGPT म्हणजे काय ? आज सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत या लेखामध्ये.

ChatGPT म्हणजे काय ? What is ChatGPT

Artificial Intelligence (AI) संबंधित असणाऱ्या ChatGPT चॅटबॉटची निर्मिती अमेरिकेतील Open AI संस्थेने केली. ChatGPT चे fullform म्हणजे Chat Generative Pre-Trained Transformer आहे.
समजण्यासाठी साध्या भाषेत सांगतो ChatGPT म्हणजे असा प्रोग्राम आहे ज्याच्याजवळ एखाद्या मित्राप्रमाणे गप्पा ही मारू शकता तुम्हाला हवा तो प्रश्न तुम्ही विचारू म्हणजेच एखाद्या माणसाप्रमाणे तुम्ही संवाद साधू शकता.
तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं नैसर्गिक पद्धतीने योग्य आणि सोप्या भाषेत उतर देण्याची क्षमता त्यात आहे.

ChatGPT निर्मिती कधी झाली ? History Of ChatGPT ?

ChatGPT ची निर्मिती 2022 मध्ये झाली असून ते gpt – 3.5 आणि आताच्या  gpt -4 अशा विकसित तंत्रज्ञानावर आधारित आहे. ChatGPT च्या लॉन्चिंगच्या अवघ्या पाच दिवसात 10 लाखाहून जास्त वापरकर्ते झाले होते ह्या  संख्येवरून समजत की chatgpt किती popular आहे.ChatGPT ची स्थापना  इलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमन यांनी मिळून केली होती.

ChatGPT हे काही फक्त 2022 मध्येच अचानक शोध लागला किंवा तयार केला असंही नाही त्यामागे खूप कष्ट संशोधन आहेत. ChatGpt चा आतापर्यंतचा प्रवास आपण थोडक्यात पाहू म्हणजेच सहज लक्षात येईल की,यंत्रणा काळानुसार,संशोधनानुसार, विकसित होतं इथं पर्यन्त आली.

तर याची सुरुवात 2015 मध्ये अमेरिकेतील OpenAI संस्थेची निर्मिती हे पहिलं पाऊल होतं त्यानंतर 2018 साली GPT-1 मॉडेल विकसित झालं त्याही पेक्षा विकसित असणारे version म्हणजे 2019 मध्ये GPT-2 आलं. सतत संशोधकांनी यावर काम करून अजून त्याला update करत 2020 साली ते विकसित होऊन GPT-3 आलं आणि आता ह्या सगळ्यापेक्षा प्रगत आणि advanced असणारे आणि खूप लोकप्रिय आणि उपयुक्त असणारे आपले ChatGPT 2022 मध्ये सर्वांसाठी वापरण्यास उपलब्ध करण्यात आले. आणि
अशा ChatGPT चा वापर कोट्यवधी लोक वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या प्रगतीसाठी करत आहेत. तुम्हाला अजूनही chatgpt म्हणजे काय ? त्याचा वापर कसं करायचा माहीत नसेल तर हा लेख पूर्ण वाचा आणि शिका.

ChatGPT हे सर्व कसे करते ? (How ChatGPT Works ?)

Chatgpt ला आपल्या सगळ्या प्रश्नाची उतरे अचूक आणि इतक्या लवकर कशी देता येतात हा प्रश्न मलाही पडला म्हणजे chatgpt मला तर जादुच वाटते तुम्ही कल्पना करा आणि ती माहिती तुमच्या समोर हजर करून देते पण हे सर्व CHatGPT ला कसं जमतं ते पाहू.
पहिलं म्हणजे CHatGPT हे लार्ज लॅंगवेज मॉडेल म्हणजेच (LLM) वर आधारित आहे. ChatGPT सगळ्या प्रकारची उत्तर सर्व भाषेत येण्यासाठी प्रशिक्षित केले जाते त्यासाठी लकरोडो वेबसाइट,पुस्तके,लेख,अनेक भाषा आणि माहिती वापरली जाते. जितकी जास्त माहिती तितकीच अचूक उत्तरे ChatGPT देते. तर हे प्रशिक्षण कसे दिले जाते step-by-step पाहू.
पूर्व प्रशिक्षण (Pre-Training):
ChatGPT ला आधीच इंटरनेटवरील सर्व क्षेत्रातील प्रचंड प्रमाणात माहिती लेख,भाषा,संवाद, OpenAI द्वारे मॉडेल मध्ये लोड करून ह्यांवर प्रशिक्षण देऊन वापरकर्त्यंची उत्तरे देण्यास तयार केले जाते.

भाषा समजून घेतो (Language Understanding)
आपण ChatGPT ला विचारलेला प्रश्न कोणत्या भाषेत आहे हे Analaysis AI करते आणि त्याचा अर्थ नेमका काय हे समजून त्या भाषेत उत्तरं तयार करते.

नेमका संदर्भ समजून घेतो (Context Analysis)
या प्रक्रियेत Users ने विचारलेल्या प्रश्नाचा नेमका संदर्भ समजून घेतला जातो आणि मग उत्तरं generate होतात.

उत्तरं देण्याची प्रक्रिया (Response Generaton)
वरील सर्व माहितीचे विश्लेषण केल्यानंतर त्या माहितीच्या आधारे योग्य,सोपं आणि एखाद्या व्यक्तीनेच दिल्या सारखं उत्तर आपल्या समोर येते.

ChatGPT चा उपयोग (Uses Of ChatGPT)

CHatGPT चा उपयोग फक्त प्रश्न विचारून उत्तरं मिळवणे आणि मनोरंजन करणे इतकाच नाही तर, शिक्षण,नोकरी,Freelancing,करियर,अशा तुमचं क्षेत्र कोणतंही असो तुम्हाला chatgpt सहज यशस्वी होण्यासाठी मदत करू शकते.

ChatGPT म्हणजे काय ?

⦁ ChatGPT बद्दल माझा Personal Experience

मी सध्या as a Content Writer आणि graphic Designer म्हणून काम करतो. ह्या क्षेत्रात काम करताना ChatGPT म्हणजे माझ्यासाठी एक वरदान म्हणून काम करतोय. chatGPT मुळे नवनवीन लिखानाच्या कल्पना आणि लिखाण किंवा एखादा लेख कसा असावा ह्याची योग्य आणि उत्तम मांडणी ChatGPT मुळे अगदी सोपी झाले.

म्हणजे एखादी माहिती copy paste करत नाही मी पण ChatGPT च्या मदतीने एक Idea मिळते माझ्या कल्पनाशक्ती मध्ये कमालीचा बदल झाला लिखानासाठी आणि मग माझ्या भाषेत मला कोणत्याही टॉपिक वर लिहणं सोप्पं होतं.
keywords research असो,किंवा seo friendly आर्टिकल कसा असावा याबद्दल माहिती असो अगदी सोप्या भाषेत समजून घेण ChatGPT मुळे शक्य झालंय.

⦁ ChatGPT शिक्षण क्षेत्रात (ChatGPT In Education)

जर तुम्ही विद्यार्थी आहात तर ChatGPT तुमच्यासाठी एक perfect Guide आहे. ChatGPT च्या मदतीने पहिली गोष्ट म्हणजे वेळेचे नियोजन योग्य करू शकता. त्यानंतर अभ्यासात notes काढणे असो,निबंध लेखन किंवा कोणताही प्रोजेक्ट असो तुम्ही विचारू शकता. ChatGPT च्या मदतीने तुम्ही परीक्षा तयारी करू शकता म्हणजे chatgpt तुमच्यासाठी एक मित्रच बनून मदत करेल.

Homework मध्ये मदत मागू शकता. किंवा कोणतं गणित समजत नसेल किंवा सूत्र समजत नसेल तर मदत मागू शकता. chatgpt तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगेल.

अनेक विद्यार्थ्यांना 10वी किंवा 12 वी नंतर काय करायचं हेच कळत नसतं नक्की कोणतं क्षेत्र निवडायच कळत नसतं. chatGPT तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार पुढे तुम्ही काय करायला पाहिजे हे योग्य रीतीने सांगत. खरंच पहिले कोणाला काही विचारताना लाज किंवा कमीपणा वाटायचा आता तुमच्याकडे ChatGPT आहे त्याला विचारा आणि मार्ग निवडा.

⦁ तुम्ही Blogger & Content Writer आहात

मग ChatGPT तुमच्यासाठी यशाची किल्ली आहे.

  1. Seo Friendly Blog Article कसा असतो किंवा कसा बनवतात या बद्दल योग्य माहिती ChatGPT च्या माध्यमातून मिळवून तुम्ही तुमचा आर्टिकल गूगल वर रॅंक करू शकता.
  2. तुम्हाला ब्लॉगिंग सुरू करायची आहे पण कोणत्या niche वर काम करायचं कळत नाही मग chatgpt ला विचारा तुम्हाला गूगल वर लोक काय शोधतात आणि कोणते विषय valuevable आहेत याची तंतोतंत माहिती मिळेल.
  3. किंवा सोशल मीडिया पोस्ट साठी content पाहिजे तर chatgpt पेक्षा दूसरा चांगला पर्याय नाही अनेक Instagram आणि youtubers हे पोस्टची स्क्रिप्ट हे chatgpt मदतीने बनवतात .

⦁ ChatGPT चे काही सामान्य वापर

तुम्ही तुमचंattractive resume बनवू शकता. तुम्ही Job शोधत असाल तर interview ची तयारी chatgpt च्या मदतीने करू शकता. आणि daily वापर करताना रोजच्या अडचणी कोणत्या आहेत त्या लक्षात घेऊन त्यावर उपाय काय असे अनेक प्रश्न chatgpt ला विचारू शकता.

⦁ व्यवसायासाठी ChatGPT (ChatGPT For Bussiness)

व्यवसाय कमीतकमी खर्चात कोणता व्यवसाय सुरू करता येतो अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर तुम्हाला नवनवीन आयडिया chatgpt कडून मिळतील. व्यवसायाच्या जाहिराती कशा करायच्या किंवा तुमचा जो कोणताही व्यवसाय असेल त्यामध्ये ग्राहकांसाठी Offer Idea तुम्ही मिळवू शकता.

ChatGPT वापरण्याचे फायदे काय ? Advatages Of ChatGPT

ChatGPT चा सर्वात महत्वाचा फायदा जो मलाही झाला तो म्हणजे वेळेची बचत. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त काम chatgpt मुळे शक्य होतं. आणि का सोयीस्कर आहे कारण ChatGPT हे तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असतं. कोणीही वापरू शकत कारण ChatGPT मध्ये Multi Laguages Programe आहेत तुम्ही कोणत्याही भाषेत वापरू शकता. Chatgpt मुळे माझ्या लेखन म्हणजेच Content writting चा दर्जा वाढला.
आणि हे सर्वांना परवडणारे आहे तुम्ही मोफत ही वापरू शकता.

ChatGPT म्हणजे काय

ChatGPT मुळे भविष्यात कसे असले ? ChatGPT In Future

भविष्यात chatgpt मुळे खूप मोठे बदल दिसणार आहेत ChatGPT ज्याला योग्य वापरता येत त्याला नोकऱ्यांची संधी निर्माण होतील त्याच बरोबर शिक्षण पद्धतीमध्ये मोठा जागतिक पातळीवर बदल दिसून येईल. प्रत्येक ठिकाणी Automation दिसून येईल ज्याला आतापासून सुरुवात झालेली दिसते.

ChatGPT कसे वापरायचे ? अकाऊंट कसे बनवायचे ?

Google वर search करा > OpenAI हे सर्च केल्यानंतर सर्वात पहिली वेबसाइट समोर येईल > Official ChatGPT From OpenAI >त्यानंतर >email ID ने Sign Up करून >Password सेट करा त्यानंतर ईमेल वर आलेल्या >Verification लिंक वर क्लिक करून >Mobile नंबर टाका आलेला >OTP टाकून >verification पूर्ण करा.

Account Create करा. आणि मग तुमच्या समोर >Home Page उघडेल आणि तिथेच >search bar दिसेल तिथून तुम्ही तुमच्या प्रवासाला सुरुवात करा.

निष्कर्ष Conclusion

ChatGPT म्हणजे काय ? हे समजून घेताना लक्षात आलं तंत्रज्ञानातील आपल्या साठीच विकसित केलेले साधन आहे त्यावर पूर्ण अवलंबून न राहता त्याचा योग्य व जबाबदरीने वापर करून आपण आपले काम सोपे करून ते दर्जेदार बनवू शकतो.

पूर्ण विश्वास आणि अवलंबून न राहता स्वतःची बुद्धी आणि अनुभव वापरुन ChatGPT चा वापर करणे महत्वाचे आहे
तर तुम्ही Digital Creator,Student किंवा Bussinesman असाल तर chatGPT चा योग्य वापर तुम्हाला तुम्हाला एक पार्टनर बनून प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो.

आणखी वाचा – Artificial Intelligence (AI) म्हणजे काय ?