Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi मध्ये ह्या भारत वर्षाला लाभलेला हा जगाच्या इतिहासातील महान,पराक्रमी,दूरदृष्टि असलेला तसेच जनतेशी नम्र,वाडीलधाऱ्यांना शरण आणि मातीशी एकनिष्ठ असलेला जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. Shivaji maharaj information in marathi ह्या मध्ये आपण अशा राजाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत,जी प्रत्येकाच्या संघर्षामद्धे संजीवनीच ठरेल.
महाराजांनी कायम अन्याय,अधर्म,ह्यांच्याशी लढा देऊन स्वराज्याची निर्मितो करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले,अशा राजाची संपूर्ण माहिती,युद्धनीती,धैर्य,शौर्य,न्यायनीती,प्रशासन कौशल्य,आणि जनतेवर असणारे निस्वार्थ प्रेम या लेखात पाहणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म आणि बालपण
Shivaji Maharaj History In Marathi ची सुरुवात इथून होते. अवघा मुलुख गुलामीच्या अंधारात चाचपडत असताना. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज नावाचा क्रांतिसूर्य उगवला. सर्व बाजूंनी गुलामी ह्या मुलूखाला विळख्यात घेण्याच्या तयारीत असताना. आईसाहेब जिजाऊनी लहान शिवबावर शौर्याचे संस्कार केले. जसे जसे शिवबा मोठे होतं होते तसे त्यांना अनेक भाषा ओळख,राजनीति,युद्धनीती,न्यायनीती,यांसारख्या कौशल्याची बीज पेरली.

स्वराज्य स्थापना
महाराष्ट्रातील जनतेवर,स्त्रियांवर,शेतकऱ्यांवर होणारा अत्याचार,अन्याय महाराजांनी पाहिला होता.आणि ह्याचा नाश करण्यासाठी महाराजांनी मोजक्याच पण विश्वासू मावळ्यांना सोबत घेऊन वयाच्या सोळाव्या वर्षी 19 एप्रिल 1645 रोजी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
महाराजांची युद्धनीती व कौशल्य
मोजकेच मावळे घेऊन लाखोंच्या सैन्याला पराभूत करणे अशक्य होते. म्हणून कधीकधी शत्रूवर चालून जाण्याऐवजी शत्रूला सह्याद्री मध्ये बोलावून आपल्या बुद्धीच्या जोरावर युद्ध करून पराभूत करणे. ह्या युद्धनीतीने स्वराज्याला अनेक लढाया जिंकून दिल्या
शत्रूवर हल्ला करायचा असल्यास कमीतकमी मावळे सोबत घेऊन विजय मिळवण्यासाठी “गनिमी कावा” सारख्या युद्धनीतीचा अवलंब केला.
स्वराज्याला कलाटणी देणाऱ्या लढाया
स्वराज्य साकारणे सोपे नव्हते महाराजांनी एकाच वेळी मुघलशाही,आदिलशाही,कुतुबशाही,इंग्रज,डच,फ्रेंच,अशा सम्राज्याना तोंड दिले होते. स्वराज्यावर चालून आलेला शत्रू हा स्वराज्याचा नाश करणे हाच हेतु घेऊन येत असे. अशी आपल्या अस्तित्वाची लढाई असताना त्यातून मार्ग म्हणजे लढाई जिंकणे.अशा अनेक लढाया महाराजांनी बुद्धी कौशल्यावर जिंकून स्वराज्याचे अस्तित्व जिंकून ठेवले.
- प्रतापगडची लढाई

10 नोव्हेंबर 1659 रोजी झालेली ही लढाई मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई होती.विजापूरच्या सुलतानाने स्वराज्याचा नाश करण्यासाठी अफजलखानला पाठवले. त्याने स्वराज्यात येताना अनेक मंदिरांचा नाश केला,स्त्रियांवर अत्याचार केला.त्यामुळे सामान्य जनतेत भीती निर्माण झाली होती.
अफजलखानाने मैत्रीच्या नावावर महाराजांना भेट घेण्याचा निर्णय घेतला. वेळ आणि ठिकाण ठरले.प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी शामियाना बनविण्यात आला.
महाराजांना अफजलखानच्या कपट स्वभावाचा पुरेपूर अंदाज होताच म्हणून महाराजांनी भेटीपूर्वी वाघनख आणि कट्यार सोबत ठेवली होती. महाराजांनी ह्याच भेटी मध्ये अफजलखानला ठार केले.
आणि नंतर मोठे युद्ध झाले ज्यामध्ये खूप गनिम कापला गेला. आणि मराठ्यांना मोठा विजय मिळाला.
ह्या विजयाचा परिणाम असा झाला की,महाराजांची कीर्ती देशभर पसरली आणि अनेक मोठमोठ्या सरदारांना शिवाजी महाराज ह्या नावाची धडकी भरली. आणि स्वराज्य अजून बलाढ्य बनले.
- शाहिस्तेखानावर हल्ला
औरंगजेबचा अजून एक विश्वासू सरदार म्हणजे हा शाहिस्तेखान. 1660 साली त्याला औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा पराभव करून स्वराज्याचा नाश करण्यास पाठवले होते. त्याने पुण्यावर हल्ला करून जिंकून ताबा मिळवला आणि तिथेच लालमहालात मुक्काम ठाकला.
शाहिस्तेखान सतत स्वराज्यावर हल्ला करून जनतेला त्रास देत होता. त्याला धडा शिकविण्यासाठी महाराजांनी त्याच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला बुद्धी कौशल्याची ओळख देणारा होता. हा हल्ला इतिहासात “गनिमीकावा” म्हणून ओळखला जातो. मोजक्याच मावळ्यांची फौज तयार करून रात्रीच्या वेळी हल्ला करायचा ठरविले. काही मावळे वेश धारण करून मुघल सैन्यात पाठविले.
- अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुघलांची झोप उडाली
- महाराजांनी स्वतःहा शाहिस्तेखानाच्या खोलीत जाऊन त्याच्यावर वार केला.
- हल्यात शाहिस्तेखानाची तीन बोटं कापली गेली.
- झालेल्या मोठ्या गोंधळामुळे शाहिस्तेखान पाळून गेला.
- शाहिस्तेखानाचा मान,दरारा कमी झाला.
- ह्या मोठ्या हादऱ्यामुळे औरंगजेबाने त्याला बंगालला पाठविले
घोडखिंडची लढाई Ghodkhind Battle Marathi
1660 साली झालेल्या पावनखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडखिंडच्या लढाईने मराठ्यांच्या ताकतीचा,शौर्य,बुद्धी,कौशल्य,बलिदान,नेतृत्व,आणि निष्ठेचा सर्वोच्च दाखला दिला होता. सिद्धी जौहरने पन्हाळ्याला वेढा दिल्यानंतर ठाण मानून किल्ल्याच्या पायथ्याशी बसला.परिस्थिति गंभीर झाल्यामुळे महाराजांनी पन्हाळा सोडण्याचा निर्णय घेतला आणि युद्धनीती आखली गेली.खिंडीची जागा अरुंद असल्याचा फायदा घेत मराठ्यांनी महाराजांना विशाळगडावर जाण्यासाठी हाच मार्ग निवडला.
महाराजांना सुरक्षितपणे विशाळगडावर पोहचविण्यासाठी सर्व मावळे सज्ज होते. काही मोजक्या मोवळ्यांसह महाराज पुढे गेले आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी त्याच्या फौजेने घोड खिंडीत शत्रूला रोखून धरले होते. ह्या लढाईत निष्ठावंत मराठ्यांनी स्वराज्यासाठी आणि महाराजांसाठी बलिदान दिले होते. “लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही निष्ठा इथेच दिसून आली होती.
बाजीप्रभू देशपांडेनी ह्या लढाईत पराक्रम गाजवला होता. जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत त्यांनी खिंड लढविली होती. महाराजांना अशा अजगराच्या विळख्यातून बाहेर काढण्यात यश आलं आणि घोडखिंड मराठ्यांचा पवित्र रक्ताने पावनखिंड झाली. अशा अनेक लढाया ज्या स्वराज्यासाठी महत्वाच्या ठरल्या.
गड व किल्ले

महाराजांनी 300+ गड किल्ले जिंकले आणि राखले सुद्धा. गड आणि किल्ले हे फक्त माती आणि दगडांचे प्रतीक नव्हते ते मावळ्यांसाठी प्रत्यक्ष मंदिरं होती. आणि प्रत्येक गड म्हणजे एक मावळाच होता. एक किल्ला जिंकला म्हणजे तो मुलुख ताब्यात येत होता. म्हणून प्रत्येक गड आणि किल्ला हा जिंकणे स्वराज्यासाठी महत्वाचे होते. महाराजांनी मराठे सरदार आणि मावळ्यांच्या साथीने अटकेपार हे साम्राज्य पसरवून अवघा मुळख मराठा केला.
महाराज नौदलाचे जनक
समुद्र किनारा परकीयांच्या हल्ल्यापासून सुरक्षित करण्यासाठी महाराजांनी समुद्री किल्ले आणि विश्वासू सरदार नेमले त्यातील सिंधुदुर्ग किल्ला,जंजिऱ्याच्या सिद्धीला ताब्यात ठेवण्यासाठी जंजिरा किल्ल्यासंमोर पद्मदुर्ग किल्ला उभा केला. नौदलातील विश्वासू सरदारांपैकी सरखेल कान्होजी आंग्रे हे होते.
राज्याभिषेक
संपूर्ण रयतेसाठी हा अभिमानाचा क्षण होता. एक मराठा राजा होतो ही गोष्ट सामान्य नव्हती. सर्व बाजूनी अनेक वैरी असतांना त्यांच्या समोर त्यांना नमवून आपलं साम्राज्य उभ करून राज्याभिषेक करून घेणे हे ह्या भारत वर्षात पहिल्यांदा झाले होते. हा सोहळा म्हणजे प्रत्येक सुलतानी सम्राज्याच्या छाताडावर पाय ठेवून जपलेले अस्तित्व आणि स्वाभिमान होता.
1674 साली रायगडावर मोठ्या थाटात राज्याभिषेक सोहळा पूर्ण झाला आणि महाराजांना “छत्रपती”उपाधी मिळाली. स्वराज्याला राजा मिळाला.
म्हणून महत्वाचा होता राज्याभिषेक
महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या आणेक गडकिल्ले जिंकले पण त्या काळात एक राजा ही मान्यता मिळण्यासाठी राज्याभिषेक महत्वाचा होता . ह्या सोहळ्याने रयतेमद्धे आत्मविश्वास वाढला होता. मराठा साम्राज्याला एक अधिकृत रूप मिळण्यासाठी राज्याभिषेक होता. स्वराज्याला हक्काचा वाली मिळाला होता.
शिवाजी महाराजांचे निधन
छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 50 व्या वर्षी मरण पावले. 3 एप्रिल 1680 साली रायगडावर हा सूर्य मावळतीला गेला. महाराजांना काही दिवसापासून ताप आणि अशक्तपणा होता. आणि इतिहासकारांच्या मते महाराजांच्या निधनाला हेच कारण होते.
महाराजांच्या निधनाने स्वराज्याचे न भरून येणारे नुकसान झाले पण स्वराज्य पुढे वाढविण्यासाठी छत्रपती संभाजी राजे गादीवर बसले आणि स्वराज्य पुढे चालविले.
Conclusion
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक व्यक्ति नव्हेत तर एक राजा ,एक नेता आणि एक व्यक्ति कसा असावा त्यात कोणते गुण असावेत हे chatrapati shivaji maharaj information in marathi मधून शिकायला मिळते. स्त्रियांचा आदर,धर्मनिरपेक्ष,न्याय,नीती,निर्णय क्षमता,असे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व न भूतो न भविष्याती आहे. महाराजांनी स्वराज्य संकल्पना ही आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकविते, आज महाराज संपूर्ण जगासाठी प्रेरणा देणारे ऊर्जा स्रोत आहे. महाराजांचे विचार त्यांचे आयुष्य हे आपल्याला जगताना वेळोवेळी उपयोगी पडतात.
आणखी वाचा
Chatrapati shivaji Maharaj Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi