छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार | chatrapati shivaji maharaj quotes in marathi
•chatrapati shivaji maharaj quotes in marathi महाराजांची विचारधारा
•chatrapati shivaji maharaj motivational quotes महाराजांचे प्रेरणादायी विचार
•chatrapati Shivaji Maharaj Inspirational thoughts
Chatrapati shivaji maharaj quotes in marathi महाराजांची विचारधारा
हे महाराजांमधे असणारे सर्व गुण दाखवणारे आहे आपला राजा सर्वगुण संपन्न ह्याचे हे quotes म्हणजे दाखले आहेत ,हे quotes फक्त वाचू नये तर हे महाराजांचे गुण आपण जगलो पाहिजे.अवघा जग महाराजांकडून प्रेरणा घेत आहे तर आपण घेतलीच पाहिजे हाच आमचा हेतू आणि महाराजांना मानाचा मुजरा आहे.
भक्त प्रल्हादानंतर नरसिंह रयतेसाठी अवतरला होता हिरण्यकक्षप नंतर त्याने अफजलखान फाडला होता
निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी ||
स्वराज्य स्थापना आणि तिचे महत्त्व आणि निर्धार सांगणारे हे वाक्य. “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हकक आहे आणि तो मी मिळवणारच”.
गनिमांच्या देखता फौजा रणशुरांच्या फर्फुरती भुजा ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी .
तयास देखता दुर्जन धाके बैसती प्रचीतीचे तडाखे बंड पाशांडाचे वाखे सहजचि होती.
“अस्ते कदम अस्ते कदम अस्ते कदम महाराज,गडपती गडश्वपती भूपती,प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्ठावधानजागृत,अष्ठप्रधानदैष्ठीत न्यायालंकार मंडित,शास्त्रस्त्रशस्त्र पारंगत,राजनीती धुरंधर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की…..
अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुद्धा घडलो असतो वदले शिवछत्रपती…
स्वराज्याचे खरे वैभव आणि सामर्थ्य हे आपल्या दुर्गाच्या किल्ल्यांमध्ये आहे.
शत्रूला कधीही कमी लेखू नये प्रत्येकाचा आदर करा.
शत्रू कितीही क्रूर असो मृत्यू नंतर वैर संपत.

रयतेची काळजी आणि संरक्षण करणारा रयतेचा जाणता राजा.
खरा योधा तोच आहे ज्याच्याकडे प्रसंगाला सामोरं जाण्याचं साहस आहे.
सगळं गमावलं तरी खचून जाऊ नका महाराजांनीही शून्यातून स्वराज्य उभं केलं.
जो पर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयावर दृढ आहात तोपर्यंत तुमचा पराभव कोणीही करू शकत नाही.
स्वराज्याचे स्वप्न हे शौर्याच्या बळावर साकार करता येते.
एका राज्याची खरी ओळख ही न्याय आणि धर्म जपणे आहे जी महाराजांमधे ठळक दिसते.
महाराजांनी निष्ठावंत आणि विश्वासू मावळे जोडले ते कसे हे सांगणारे विचार
Chatrapati Shivaji Maharaj motivational quotes in marathi महाराजांचे प्रेरणादायी विचार

ह्या संघर्षाच्या आयुष्यात जेव्हा कधी सगळं शून्य झाल्यासारखं वाटेल तेव्हा एका ऊर्जेची गरज असते.आणि ऊर्जा हवी असेल प्रेरणा हवी असेल तर संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा उत्तम स्रोत नाही.महाराजांच्या एका स्मरणाने प्रेरणा मिळते
आपल्या माणसाजवळ प्रेमाने आणि आदराने राहावे तर त्यांचा विश्वास जिंकता येतो.
बलाढ्य शत्रूला नमवून महाराजांनी दाखवलं की,शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.
जर सेवा करायचीच असेल तर आपल्या मातृ भूमीची करा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे.
युद्ध हे फक्त वैर संपवण्यासाठी नसते तर ते न्यायासाठी असते.
प्रतीपचंद्र लेखेव् वर्धिष्णू विश्ववांदिता शाहसूनो शिवशैशा मुद्रा भद्राय राज्यते
आपल्या मोजक्याच आयुष्यात असे कार्य करावे की, युगाच्या अंतापर्यंत आपली किर्ती राहील.
अठरापकड जाती एकत्र करून भेदभाव संपवून ज्यांनी मानवता धर्म जपला तो आमचा राजा.
शत्रूच्या मुलीला देखील ज्यांनी सुखरूप आदराने घरी पाठवलं तो आमचा राजा.
प्रत्येकात एक श्रेष्ठ सामर्थ्य आहे त्याला ओळखून त्याचा आदर करा.- छत्रपती शिवाजी महाराज
आपली संस्कृती आणि आपला धर्म बुडता कामा नये ,आणि हेच आपलं कर्तव्य आहे – महाराज
दिल्लीच्या दरबारात भर सभेत स्वाभिमान जपत औरंग्याला देखील धडकी भरवणारे आपला राजा.
ब्रम्हांडाच्या तिजोरीतून एक मौल्यवान उल्का भारत वर्षात धडकली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
शिवरायांचे छावे आम्ही मनाप्रमाणे राहू आमच्या मर्जीविना झुंजण्या कोण सांगतो पाहू तेज अनोखे पाहुनी दिपली आलमगीराजी मती नकार देणारे हे केवळ दोघे छत्रपती
स्वराज्याशी मावळे उमगती साधुनी बळोपासना मारुती श्रीरामा कृपा करिती त्यावरी छत्रपती स्वराज्य मनी पेरती
इथे फक्त दिल्लीचे तख्तच नाही झुकले काळालाही झुकवून गुलामीला गाडून सोनेरी युगाचा आरंभ झाला होता

अश्वारूढ होऊन देव माझा अवतरला नसता तर आज आपले तेहतीस कोटी देव बंदिस्त असते यवनांकडे
रणांगणातील शौर्याप्रमाणे किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्वाची ठरते खलबतखान्यातील युद्धनीती
सिंहगर्जना काय असते जाऊन विचार त्या दिल्लीच्या दरबाराला अजून त्या भिंतींचा कंप गेला नसावा
सहनशीलतेचा अंत असा झाला की अफझलखानाची अवस्था पाहून कल्पना येते की जनतेने किती जुलूम सहन केला असावा
फक्त पातीच्या धारेने नव्हे तर स्वामी निष्ठा ,शौर्याच्या आणि कर्तृत्वाने योध्याला तलवार शोभून दिसते
धर्माची ज्योत विजताना फडफडली अन् ह्या प्रांतात ठिणगी पडली अधर्माला धडकी भरवून आवाज झाला हुजुर्र… हुजुर्र..मराठा आ गये….!
ह्या पृथ्वीला आपल्या जन्माआधी करोडो वर्षे झाली पण महाराजांना फक्त ३५० ही गोष्ट किती सुंदर आहे
महाराजांची आणि आमची पहिली भेट इयत्ता चौथीमध्ये झाली
अनंत ब्रम्हांडाच्या खजिन्यातून एक उल्कारत्न धरतीला धडकलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या रत्नाच्या तेजाने एक वलय निर्माण झालं ते म्हणजे “स्वराज्य”.
स्वामिनिष्ठा काय असते जाऊन विचारा त्या रायगडास.
त्या चंद्रास तेज सूर्यामुळे तैसेचि हे आयुष्य आम्हास तुमच्यामुळे राजं.
पौर्णिमेचा मित्र भासणाऱ्या शत्रूपेक्षा अमावस्येचा काळाकुट्ट अंधार हा स्वराज्याचा सहकारीच
जेव्हा प्रसंग मोठा असतो पण धर्म महत्वाचा असतो तेव्हा आपल्या विजयाच्या वाटा आपल्यालाच निर्माण करायच्या असतात.
बापाचा साम्राज्य पुढे वाढविण्यात एक वेगळंच सामर्थ्य लागतं आणि ते बापकडूनच मिळत

अजून वाचा – self Love Quotes In Marathi