gaav marathi kavita गाव मराठी कविता : गाव म्हटल की नाळ जोडलेली दिसते ती मातीशी,गाव म्हटल की तिथे आपुलकी ,प्रेम,दया,माणुसकी,एकता ह्या सगळ्यांचा जन्म हा गावापासून होतो,गाव म्हणजे जणू स्वर्ग च भासतो कारण तिथे काय कमी आहे सगळ पुरून वूरलेले दिसते अगदी खाद्य पदार्थापासून ते आरोग्य पर्यन्त सगळ्या गोष्टी ह्या जीवनाला पूरक असतात . शुद्ध हवा,नैसर्गिक वातावरण,हे अगदी मनाला प्रसन्न करून टाकत ,पैशांसाठी शहराकडे वळलेल्या प्रत्येकाला गावाची आठवण सतावत असते,मग ते प्रत्येक सणाला त्या निमिताने गावाकडे वळतात,असा सुंदर गाव आम्ही gaav marathi kavita मधून तुमच्या समोर घेऊन आलो आहोत .
हे ही वाचा – 100+ marathi kavita मराठी कविता
गाव
मित्राकडे
गावाचा विषय काढला,
त्याचा चेहरा कोरा कागद,
जसा पांढरा पडला ……..
काल त्याने स्टेटस वर
पाहिली गावची सुंदर पाटी ,
खरंच का रे असंच आपलं
गाव आहे का रे एकमेकांसाठी ?……
तो म्हणाला गावी जाता
काळजात धड धड होते
जुनं सारं वैभव आठवून
मन रडकुंडीला येते…….
तीन दिवस सुट्टी आहे
कसं होईल माझं
तोंड फिरवणाऱ्या माझ्याच
रक्ताचं मला पेळेल का रे ओझं ?…..
मी म्हणालो अरे वेड्या
असं का म्हणतोस
सारं सगळं ठीक आहे
तरी का कण्हतोस……
काय सांगू मित्रा आम्ही
सारे बहीण भाऊ,
कोण कोणाशी बोलत नाही
मी कुठे जाऊ…….
आता कुणी कुणाकडे
जात येत नाही,
स्वतःपाई दुसऱ्यांसाठी
मुळीच वेळ नाही…..
असे कसे सारे बदलले
मला प्रश्न पडतो,
जुने सारे क्षण आठवून
मी एकटाच रडतो….
गाव
गाव म्हणजे आता झाले सगळे शाहाने,
आम्ही सगळे एक आहोत उरले फक्त हे बहाने…
माणुसकी स्वार्थाकडे गहाण आहे,
नाती गोती फक्त सोय उरली आहे…
अहंकार ठासून भरला आहे,
स्वार्थ राक्षस प्रत्येकात शिरला आहे…
दुःख एकाचे दुसऱ्याला मनोरंजन आहे,
अश्रू एकाचे दुसऱ्याचे सुख बनले आहे,
मातीतले खेळ नव्हे,खेळाची माती झाली आहे,
एकमेकांचे संवाद नव्हे,नेटच्या जाळ्यात मग्न आहे,
नाती जिव्हाळ्याने नव्हे,पैशाने गणले आहे,
राहायला दिसायला फक्त एक आहे,
माणूस ,कुटुंब,घर,गाव,वेगळं झालं आहे
गाव मराठी कविता ही गावाची सुंदरता ही मनाला भारावून टाकणारी असते आणि ती पावसाळ्यात अजून वाढते ह्याच सुंदरतेच वर्णन आम्ही ह्या gaav marathi kavita मध्ये केलं आहे .
वसुंधरेच्या कुशीत
गाव माझे
डोंगरांचे किनारी
गाव माझे….
वृक्षांच्या मैत्रीत
गाव माझे
मातीच्या सुंगधात
गाव माझे….
निळसर छताखाली
गाव माझे….
काळ्याभोर चांदण्यात
गाव माझे
सूर्याचे पहिले किरणं
गाव माझे….
शुद्ध हवेत हवेशे
गाव माझे
पक्षांच्या किलबिलमध्ये
गाव माझे
धुक्यात शोधून घ्यावे
गाव माझे….
गुलाबी थंडीत उबदार
गाव माझे
कथेतील स्वर्ग
गाव माझे….
विसाव्याचे नाव
गाव माझे
निसर्गाचे दर्शन
गाव माझे….
माझ कोकणच गाव
सुखा समाधानाने भरलेली नाव
म्हणजे माझ्या कोकण च गाव
शहर देईल पैसा पाणी
मोठ करेल तुझ नाव
याच्या तुलनेत तोलशिल का
गाव च्या समाधाना च भाव
शहराच्या वर्दली मध्ये माणुसकी शिल्लक आहे का ?
राम राम पाव्हणं कसा गेला दिवस
विचारणार कोणी आहे का ?
गावी मात्र चटणी आणि मीठ भाकर
प्रत्येकाच्या नशिबी आहे समाधानाची ढेकर
आता वेड्या तूच ठरव
तुला कशाची हाव
आता म्हणशील शहर शहर
कष्ट करशील रात्रंदिवस
घेशील मोठे बंगले गाडी
सारं काही नव नव
म्हातारपणाच्या काठीला मात्र
विश्रांतीसाठी गाव च हवं
आम्हीही आता शहरातच रे
बालपण मात्र गावी गेलं
शरीर फक्त शहरी आल
मन मात्र गावीच राहील
जगण्यासाठीच्या धडपडीत
खर जगणं गावीच राहील
आता हे सार गाऱ्हाणं कोणापुढे मांडावं
पुन्हा कधी भेटेल गाव
इथे कोणालाच नाही ठाव
शुभम जाधव
Aayushya marathi kavita मराठी कविता : पण गावाकडे आयुष्याची दुसरी बाजू खूप दुख देणारी आसते,कदाचित दुष्काळ ग्रस्त परिस्थिति वोढवली तर आणि अति वृष्टि झाली तर त्याचे दुख या कवितेत मांडल आहे.
___________________________________________
आभाळा सांग जगू तरी कसं
निळ्याभोर आकाशाचं छप्पर
गळू लागलं,
पाण्यावर हे जीवन
आज तेही छळू लागलं….,
काळ्या मातीतून उपजलो
तीही आज गिळू लागली,
श्वास चाले त्या वायुवर
बदलले विनाशी चक्रीवादळी….,
क्षणोक्षणी धडकी काळजात
मृत्यू भीती सर्वत्र,
मायबाप जाऊन हरपले
निरागस लेकरांचे छत्र….,
गारवा देणाऱ्या पावसानेही
दिला आज चटका ,
घरटं ही भरलं पाण्याने
त्यात कशी घालवू घटिका…..,
महामारीने दंश करून
जागीच बसवलं,
आता कुठे जगत होतो
त्यात परिस्थितीने फसवलं….,
_रंजीत शिंदे
______________________________________________________________
मरण झालंय सोपं ….. जगणं अवघड झालंय
कोणी महापुरात जातोय ….कोणी दरडीखाली येतोय
मरण झालंय सोपं….जगणं अवघड झालंय
कोणी कोरोना पॉझिटिव्ह निघतोय
तर कोणाला ऑक्सिजन कमी पडतोय
मरण झालंय सोपं….जगणं अवघड झालंय
कोणी रस्त्यावर धडकतोय
कोणी स्वतःलाच लटकवतोय….
धडधाकट असणारा माणूस
माशासारखा तडफडतोय….
मरण झालंय सोपं….जगणं अवघड झालंय
कधी चक्रीवादळ… कधी तौक्ते वादळ
कधी कोरोना…. तर… कधी महापूर
या सर्वांमुळे मात्र माणसाचा झालाय
चकनाचूर
सगळं सुरळीत झालाय अस वाटतं
की पुन्हा होतोय लाँकडाऊन होतोय
खरंच मरण झालंय सोपं…. जगणं अवघड झालंय
संकटे , अडचणी, दुःख, धोके
किती किती म्हणून सोसावे
काय करेल माणसांनी,
आता निसर्गच आवळतोय फासे
देवा काहीतरी मार्ग त्याला दाखव
माणूस सगळी कडून घुसमटतोय
मरण झालंय सोपं….जगणं अवघड झालंय
_शुभम जाधव
_____________________
देवा आता सहनशीलता
संपत आली रे….
निसर्गाची ही कोपणी आता
नाही सोसत रे….
आम्ही कोकणकर
आम्ही मुरुडकर
अस समोरच्याला
अभिमानाने सांगतो…..
येणाऱ्या प्रत्येक संकटांना
आम्ही हिंमतीने सामोरे जातो
पण आता परिस्थितीच
हाताबाहेर चाललीय रे …….
देवा आता सहनशीलता……..
कोरोना,वादळ, महापुर
निसर्गच लागलाय
आग ओखायला
साधा भोळा कोकणी माणूस
किड्या मुंग्यांसारखा
लागलाय मरायला…..
मुरुडकर किती खंबीर
हेच पाहतोस कारे …….
देवा आता सहनशीलता ……..
काहीजण जिवावर उदार होऊन
इतरांना सहकार्य करत आहेत
तर काहीजण या परिस्थिती मध्येही
घाणेरड राजकारण करत आहेत
या संकटात सुध्दा आनंदाने जगू रे
देवा फक्त तुझ्या मायेचा
आशिर्वाद आमच्या पाठीशी राहुदे……
देवा आता सहनशीलता
संपत आली रे ..
निसर्गाची ही कोपणी आता
नाही सोसत रे…..
– शुभम जाधव
_________________________________________
Birthday Wishes For Husband in marathi
माणसाप्रमाणे प्रेमाने
बोलावं
एकदा माणूस म्हणून जगावं…..
चालता चालता सहज
त्या पानांवरच्या पाण्याला
स्पर्श करून झाडांशी बोलावं
एकदा माणूस म्हणून जगावं……
प्राण्याला एकदा लळा लावून
जिव्हाळ्याचं नातं देऊन बघावं
एकदा माणूस बनून जगावं…..
रडता रडता एखाद्याला
दुःख विसरून हसवून बघावं
एकदा माणूस बनून जगावं…..
आई बाबांना वृध्यापि
आधाराने निश्चिंत करावं
एकदा माणूस बनून जगावं…..
प्रत्येक वर्षी एक झाड लावून
जगवून बहरलेलं पाहावं
एकदा माणूस बनून जगावं…..