8 ते 10 दिवस चालणारा हा होळी सण प्रत्येक वर्षाच्या फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला देशभर लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. Holi Information In Marathi जर तुम्ही शोधत असाल तर ह्या लेखात holi chi marathi mahiti दिली आहे ज्यामध्ये इतिहास,पौराणिक कथा आणि महत्व, शुभेच्छा तसेच परंपरे बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात जर गणपती नंतर कोणत्या सणाची लोक वाट पाहत असतील तर तो “होळी” हा सण आहे

होळी मराठी माहिती Holi Marathi Information
अगदी बालपणापासून जर कोणत्या सणाचे आकर्षण असेल तर होळीचे. माझ्या प्रमाणे तुमच्याही म्हणजेच प्रत्येकाच्या अशा गोड आठवणी असतात. आता होळी म्हणजे काय आणि ती कशी साजरी करतात ते आपण साध्या भाषेत समजून घेऊ Holi Information In Marathi मध्ये.
कारण होळी साजरी करण्याच्या पद्धती परंपरा ह्या प्रत्येकाकडे वेगवेगळ्या असू शकतात.आपण जी होळी साजरी करतो ती फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला पण होळी हा सण एकच दिवसाचा नसतो तर तो 6 ते 7 दिवस चालणारा उत्सव आहे. महाराष्ट्रात परंपरा म्हणजे पहिली होळी.. दुसरी होळी.. तिसरी होळी आणि मग मोठी होळी अशा प्रकारे रोज होळी दहन केले जाते. त्याचे कारण काय,महत्व काय,आणि कथा कोणती सर्व पुढे पाहू
- Holi Date : होळी कधी असते
अनेकजण जर होळी कधी असते विचारत असतात तर लक्षात ठेवण्यासाठी सोपं म्हणजे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी असते. इंग्रजी महीने आणि तारीख मागे पुढे होऊ शकते म्हणून मराठी तिथी समजून घेतली की लक्षात ठेवणं सोपं जातं.
त्याच प्रमाणे Holi 2026 मध्ये कधी आहे तर 2 मार्च ला होळी आणि 3 मार्चला धूलिवंदन आहे. - धूलिवंदन म्हणजे काय
तर होलिका दहन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आनंद साजरा केला जातो त्याला धूलिवंदन म्हणतात. त्यादिवशी प्रत्येकाला सुट्टी असते.पहाटे पहाटे लोकं उठून वेगवेगळे रंग एकमेकांना वेगवेगळे रंग लावतात. दिवसभर आनंदाचे वातावरण शहरापासून ते गावोगावी असते.

महाराष्ट्रात होळी कशी साजरी करतात
महाराष्ट्रात मुख्यतः गावाकडे होळी खूप मोठ्या उत्साहाने साजरी करतात. मुंबईकर मंडळी सुट्टी काढून special होळीसाठी गावी येतो. गावाकडे दिवसभर लाकडं गोळा करून ती रचून एक छोटा होमासारखा आकाराची होळी तयार करतात. आणि संध्याकाळी ढोल वाजवत तिचा दहन करण्यात येतो. महाराष्ट्रात होळीला “शिमगा” ह्या नावाने ओळखले जाते. शिमग्याच्या सणाच्या खूप परंपरा आहेत त्यातील काही परंपरा पाहू.
- शिमगा
शिमगा म्हणून साजरा होणाऱ्या ह्या सणात घरोघरी पुरणपोळी सारखा फराळ केला जातो. - सोंग
ह्याला शिमग्याचा सोंग म्हणतात. यामध्ये गावातील काही मंडळी विविध पेहराव करून अनेक प्रकारचे सोंग घेतात. त्यातील प्रसिद्ध सोंग म्हणजे“शंकासुर”. सोशल मेडियावर काळे कपडे,डोक्यावर टोपी आणि मोठ्या मोठ्या दाडी मिश्या असणारा हा शंकासुर तुम्ही पाहिला असेलच - बोंब
होलिका दहन करते वेळी पूजन करते वेळी होळीच्या भोवताली प्रदक्षिणा घालतात एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की मोठ्या आवाजाने सर्वजण मागणे मागतात त्याला बोंब म्हणतात - नवस
अनेक ठिकाणी नवस बोलण्याची प्रथा आहे होळी दहनपूर्वी लोक होळीला नवस बोलतात आणि होळी दहन झाली की,हातातील नारळ पेटक्या होळी मध्ये फेकतात अशी प्रथा आहे - होळी दहनाची गाणी
अनेक ठिकाणी गाणी बोलण्याची प्रथा आहे आणि ती गाणी खूप जुनी पण अर्थपूर्ण असतात हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला एकदा गावी होळी साजरी करायला जायलाच पाहिजे
होळीची पौराणिक कथा आणि महत्व
हिरण्यकश्यप नावाचा राक्षस राजा होता त्याने महाविष्णूची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून वरदान मागून घेतले. आणि तो स्वतःला अमर समजू लागला. ह्याच अभिमानामुळे त्याने त्याच्या राज्यात देवाचे नाव घेण्यास सक्त मनाई केली आणि त्याचेच नाव घेण्याचे नियम बनविले.
पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा एक निष्ठावंत भक्त होता तो सतत विष्णूचे स्मरण करत असे. वडिलांनी सांगितले तरीही प्रल्हाद त्यांचे न ऐकता देवाच्या भक्तीत रममाण होतं असे. तेव्हा संतापलेल्या वडिलांनी त्याला मारून टाकण्यासाठी खूप प्रयत्न केले. एकदा त्याला गरम तेलात टाकले पण ते तेल भक्तीच्या प्रभावामुळे थंड झाले.
एक प्रयत्न निष्फल झाल्यानंतर ही प्रल्हाद स्मरण करतच राहिला म्हणून हिरण्यकश्यपने त्याला हत्तीच्या पायी दिले पण तो हत्तीच भक्त प्रल्हादला पाहून शरण गेला.
त्यानंतर हिरण्यकश्यपने त्याच्या सेवकाला आज्ञा देऊन कडेलोट करण्यास सांगितले,कडेलोट केल्यानंतर ही विष्णुनी त्याला हवेतच सांभाळले त्याचे संरक्षण केले.
हे बातमी समजल्यानंतर हिरण्यकश्यप अजून क्रोधित झाला आणि त्याची बहीण म्हणजेच होलिका जिला ती स्पर्श करेल ते भस्म होईल पण होलिकेला अग्नि भस्म करू शकणार नाही असा वरदान मिळाला होता. त्यामुळे भक्त प्रल्हादला मारण्याची जबाबदारी हिरण्यकश्यपने होलिकेवर दिली.
होलिका फक्त प्रल्हादला घेऊन चित्ते मध्ये बसली आणि सगळे राक्षस प्रल्हादला हसू लागले. पाहता पाहता ही होलिकाच जाळून राख झाली आणि भक्त प्रल्हाद अग्नि मधून स्मरण करत बाहेर आला. असा महाविष्णूच्या भक्तीचा महिमा आहे.
- महत्व
ह्या सणाचे महत्व खूप आहे होळी हा अधर्मावर धर्माच्या विजयाचा प्रतीक असणारा सण आहे. आपण प्रामाणिक आणि सत्याच्या बाजूने कर्म करत असू तर आपला नाश कोणी करू शकत नाही हेच सांगतो होळीचा सण.
होळीच्या सणाचे वैज्ञानिक कारण आहे ते म्हणजे थंडीच्या ऋतुत येणारा हा सण होळीमुळे ऊब मिळून त्वचेला नव चैतन्य मिळत ऊर्जा वाढते.
होळी 2026 शुभेच्छा Happy Holi Wishes In Marathi
10 होळीच्या शुभेच्छा खाली दिलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या प्रियजणांना देऊन नात्यातील गोडवा आणि सणातील उत्साह वाढवू शकता .
- वाईट विचार,वाईट सवयी, जळून जाऊन यशाचा अग्नि उजेड करो तुमच्या आयुष्यात.. तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा.
- देवावर विश्वास ठेव त्याने भक्त प्रल्हादालाही तारलं आहे. तर तुझं वाईट कोण करेल. Happy Holi
- स्वतःच्या कर्मावर विश्वास पाहिजे हेच सांगते होळी. होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
- ज्याचे कर्म शुद्ध तोच वाचतो अग्नीतून नाहीतर होलिकेचीही राख झाली. होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
- वडील राक्षस असूनही मुलगा भक्त झाला. म्हणून दोष इतरांना देऊ नको तुझं यश तुझ्या हाती आहे. Happy Holi.
- या होळीमध्ये अज्ञान जळून जावो आणि ज्ञानाच्या प्रकाशात प्रत्येकजण घडो. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
- नैसर्गिक रंग वापरू या पर्यावरण जपू या. Happy Holi.
- ह्या होळी मध्ये तुमचे सारे दुख,संकटे जळून जावो. तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
होळी कधी आहे ?
ह्यावर्षी होळी 2 मार्च ला आहे आणि दुसऱ्या दिवशी 3 मार्चला धूलिवंदन आहे.
Conclusion
होळी 2026 Holi Information In Marathi मध्ये आपण पहिले की होळी हा फक्त दहनाचा सण नव्हे तो धर्म रक्षणाची जाणीव देणारा,ऐक्य साधणारा,संस्कृति,परंपरा,भक्ति-भाव जपणारा हा सण आहे. ज्या शास्त्रीय,वैज्ञानिक,पौराणिक अशी कारण आहेत.
म्हणून काळाच्या ओघात आपण कितीही शिकलो आणि पुढे गेलो तरी, असा आपल्या आयुष्याला महत्व आणि आयुष्य घडविण्याचा धडा शिकवणारा हा सण आपण सर्वांनी मिळून जपला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा सण जपताना पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.
लोकप्रिय लेख वाचा
महाशिवरात्रीचे महत्व
रोज चालण्याचे 10 अद्भुत फायदे
ChatGPT म्हणजे काय