खोकल्यावर घरगुती उपाय | Home Remedies For Cough In Marathi

सर्दी खोकल्याचा संसर्ग हा प्रामुख्याने हिवाळा आणि पावसाळ्यात होतो. वातावरणातील बदल आणि वातावरणाला अनुकूल असे शरीरात होणाऱ्या बदलामुळे खोकला सर्दी होत असते.कधी कधी आपल्या खाण्यामुळेही हा संसर्ग होत असतो.अशा खोकल्यावर घरगुती उपाय करण्याआधी तो नक्की कोणत्या प्रकारचा आणि किती प्रमाणात आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं तसेच खोकल्यावर घरगुती उपाय करण्याआधी खोकला कोणत्या प्रकारचा आहे हे जाणून घ्या.

खोकल्याचे दोन प्रकार

१. कोरडा खोकला (Dry Cough)
यामध्ये फक्त घशाला खवखव सुटते पण कफ बाहेर पडत नाही.

२. ओला खोकला (productive Cough)
यामध्ये सतत कफ बाहेर पडत आणि छातीत जमा होऊन छाती आणि घसा श्वास घेते वेळेस वाजत राहतो.

आता खोकल्याला करा राम राम.उपाय तुमच्या घरी.
खोकल्यावर घरगुती उपाय : एकदा का पावसाळा सुरू झाला की,थंडगार पाण्यासोबत ते पाणी दुषितही होऊन आपल्या घरा पर्यंत येतं आणि ते पाणी तसच प्यायलो तर पावसासोबत अनेक प्रकारे आपण आजारी पडतो,मग त्यात ताप,खोकला,सर्दी अशा प्रकारचे आजार होतात.मग त्यावर सगळ्यात पाहिलं उपाय म्हणजे दवाखाना ,दवाखाना म्हटलं की पैसे आले,गोळ्या,औषध अनेक,आणि त्यांचे साईड इफेक्ट ही अनेक होतात.ह्या सगळ्यांवर रामबाण औषध आम्ही घेऊन आलो आहोत तेही मोफत.

घरगुती उपाय म्हणजे काय ? What Is Home Remedies

घरामधे जे काही उपलब्ध आहे त्याने आपल्या आजारावर अनुभवाने प्रयोग करणे म्हणजे घरगुती उपाय होय .

घरगुती उपाय का करावेत ?

मेडिकल मधे जाऊन ज्या गोळ्या औषध घेतो त्यात केमिकल पासून बनलेले असतात आणि त्याचा शरीरावर कालांतराने परिणाम दिसून येतं असतं,म्हणून घरगुती औषद ही पूर्णपणे नैसर्गिक असतात आणि त्याचा दुष्परिणाम काहीच नाही आणि आर्थिक दृष्ट्या घरगुती उपाय सगळ्यांना परवडतील असे आहेत.म्हणून घरगुती उपाय हाच चांगला उपाय आहे.
माझा अनुभव
मी हे फक्त लिहायचं म्हणून नाही लिहत आहे तर माझा हा स्वतःचा अनुभव आहे की,हे उपाय करून फक्त खोकला किंवा सर्दी नाही तर अनेक समस्यांवर मला फरक जाणवला.कारण तुळस,लवंग,लिंबू,आले. मध हे पूर्णतः नैसर्गिक असल्यामुळे योग्य प्रमाणात मी सेवन केल्याने मला,पंचनसंस्था,श्वासाची समस्या,रक्तदाब,अशा अनेक प्रकारच्या समस्याचे प्रमाण योग्य ठिकाणी आले. पावसाळा आला की सामान्यतः सगळ्यामध्ये एक आजार दिसून येतो तो म्हणजे खोकला आणि तो थंड दूषित पाणी आणि वातावरणामुळे होतो,ह्याच खोकल्यावर तुमच्याच घरी घरगुती उपाय रामबाण औषध आहेत तेही एक नव्हे तर दहा ती कोणती आपण पाहू .

खोकल्यावर 10 रामबाण उपाय.

खोकल्यावर घरगुती उपाय

1) हळद आणि दूध
कोमट दुधामध्ये हळद मिक्स करून प्यावे .त्याने खोकल्यावर आराम येतो ,हळदी मधे अँटिबायोटिक गुणधर्म असल्यामुळे लवकर आराम मिळतो.

2) आला रस
आले आणि मध यांचे मिश्रण करून ते प्यावे त्याने लवकर आराम मिळतो कारण आल्यामधे अँटी – एपलेमेटरी व अँटी बायोटिक गुणधर्म असल्यामुळे ,लवकरात लवकर चांगला परिणाम दिसून येतो.किंवा आल्याचा छोटा तुकडा किसून त्यात रस काढा आणि त्यात एक चमचा मध घालून दिवसातून 2-3 चमचा घ्या हा कोरड्या खोकल्यावर गुणकारी उपाय आहे.

khoklyavar gharguti upay


3) तुळस
तुळशीची पाने चावून खाणे किंवा तुळशीच्या पानांचा रस आणि त्यात मध हे मिश्रण करून प्यायलो तर लवकर आराम दिसून येतो.किंवा कोऱ्या चहा मध्ये दोन तीन तुलसीची पाने घालून तो चहा घ्या.

4) लिंबू आणि मध
लिंबुचा रस हा एक चमचा मधात खालून मिश्रण करून प्यावं मध हा गळ्याला शांत करतो.आणि लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन हे आपल्या शरीरातील रोप्रतिकारक शकतो वाढवतो.

5) कोमट पाणी
नियमित कोमट पाणी प्यायल्यास खोकला येणं कमी होतं.तुम्ही ही हा साधा घरगुती उपाय करून पहा.

खोकल्यावर घरगुती उपाय



6) वाफ
गरम पाण्याची वाफ घेणे हा ही उत्तम उपाय आहे खोकल्यावर त्याने श्वसन मार्ग हा मोकळा होतो.

7) चहा
प्रत्येकाच्या आवडीचा विषय म्हणजे चहा पण हाच चहामध्ये आला ,तुळस,मिरी,लवंग टाकून प्यायलो तर खोकल्यावर लवकर आराम येतो.तर नक्कीच करून पाहा हा खोकल्यावर घरगुती उपाय.Home Remedies .

8) लवंग
लवंगचा काडा किंवा लवंग दाताखाली चावल्यास ही खोकल्यावर आराम दिसून येतो.

9) ओवा आणि गूळ
ओवा आणि गूळ तव्यावर गरम करून खावे ते खोकल्यावर खूप फायदेशीर ठरते.

10) गुळवेल (गिलोय)
गीलोयच्या रसाचे नियमित सेवन करत राहिल्यास श्वसनाचे आजार कमी होऊन खोकला ही नाहीसा होण्यास मदत होते.

home remedies on cough in marathi

लहान मुलांसाठी खोकल्यावर उपाय कोणते ?

रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे लहान मुलांमध्ये संसर्ग लवकर होऊन त्यांना कफ होत असतो त्यावर योग्य, सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धतीचे उपाय हे त्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे ठरतात.पण हे उपाय करताना बाळाचे वय लक्षात घेऊन उपाय करायला हवेत.

मधाचा उपाय (बाळाचे वय 1 वर्ष जास्त)
मेडिकल मध्ये honey सिरप ही मिळतो पण नैसर्गिक मध अर्धा चमचा झोपण्यापूर्वी दिल्याने झोप चांगली लागून खोकलाही कमी होतो आणि लवकर आराम मिळतो.

खोकल्यावर घरगुती उपाय
  • वाफ देणे (steam Inhalation)
    जेव्हा मुलाचे नाक बंद होऊन छातीची जड वाटते तेव्हा वाफ देणे हा उत्तम घरगुती उपाय ठरतो.हा उपाय करताना गरम पाणी एका भांड्यात घेऊन वाफ तयार करून मुलाला 10-15 दिल्याने कफ सुटायला मदत होते आणि नाक मोकळा होऊन आराम मिळतो.
  • हळदीचे दूध
    कोमट अशा दुधात चिमूटभर हळद टाकून मुलाला द्यावे त्यांनी खोकल्यामुळे घशाला आलेली सूज कमी होते.

डॉक्टरांकडे केव्हा जावे ?

जरी वरील घरगुती उपाय हे उपयुक्त सोपे,आणि कमी खर्चिक असले तरी.जेव्हा वेगळी लक्षण आढळतात तेव्हा दवाखान्यात जायला पाहिजे.ती लक्षणे पुढे दिली आहेत

  • दहा दिवस खोकला गेला नाही तर
  • खोकताना कफ सोबत रक्त पडत असेल तर
  • कफ आणि त्याच सोबत जर सतत ताप येत असेल तर
  • आणि श्वास घेताना दम किंवा अजून काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

खोकल्यावर घरगुती उपाय काढा ?

•तुळशीचा काढा
•आला आणि वेलचीचा काढा
•कांद्याचा रस
टीप : वरील सर्व उपाय हे मूलभूत माहितीसाठी आहेत. कफ किंवा कोणताही आजार गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

तर हे होते खोकल्यावर घरगुती उपाय Home Remedies तुम्ही ही प्रयोग करा ,काही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या,आणि तुम्हाला फायदेशीर ठरल्यास हे उपाय नक्की,आपल्या मित्र मैत्रीणीना, नातेवाईकांना share करा

आणखी वाचा –
लवकरात लवकर वजन कमी कसे करायचे
नैसर्गिक पद्धतीने वजन कसे वाढवावे