दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांची आतुरता संपली.
Maharashtra Board 10th Result 2024 : दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती . 27 मे 2024 रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला उत्सुकता होती ती ह्या निकालाची आणि आता ती आतुरता संपली आहे.दरवर्षी पेक्षा दहावीचा निकाल यंदा त्या प्रमाणे लवकर लागला आहे.आता ते विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन पाहू शकणार आहेत.
इथे पाहू शकता तुमचा निकाल –
महाराष्ट्राचा दहावीचा निकाल टक्केवारी 95.81 लागला आहे.त्यामधे नेहमी प्रमाणे मुलींनी बाजी मारली .
मुलींचा निकाल टक्केवारी 97.21 असा आहे.
आणि त्याच बरोबर मुलांचा निकाल टक्केवारी 94.56 असा लागला.
राज्यात एक नंबर हा कोकणचा आहे 99 टक्के लागला
आणि सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे 94.73
महाराष्ट्रातील काही जिल्हे व त्यांचा निकाल खालील प्रमाणे.
पुणे | 96.44 |
नागपूर | 94.73 |
संभाजीनगर | 95.19 |
मुंबई | 95.83 |
कोल्हापुर | 97.45 |
अमरावती | 95.58 |
नाशिक | 95.28 |
लातूर | 95.27 |
कोकण | 99.01 |
ठाणे | 95.21 |
कल्याण | 95.86 |
धाराशिव | 95.88 |
नांदेड | 93.99 |
15,17,802 विद्यार्थी ह्या वर्षी महाराष्ट्रात दहावीला पास झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.
हे ही वाचा – Good thoughts in marathi