महाशिवरात्री 2026 : जाणून घ्या पूजा उपवास आणि महत्व

महाशिवरात्री 2026 : हिंदू धर्मात अत्यंत पवित्र,मंगल,श्रद्धा,भक्ति आणि विश्वासाचे प्रतीक मानला जाणारा सण म्हणजे महाशिवरात्री. भगवान श्रीशंकरांचे स्मरण,ध्यान,जप,पूजा,नामजप पुण्याई उभी करणारा हा सण प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्यावर्षी 15 तारखेला रविवारी फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षाच्या चतुर्थी तिथीला भारतासह जगभरात देखील साजरा महाशिवरात्री 2026 होणर आहे.

महाशिवरात्रीचे मराठी माहिती  :

पुराणांच्या उल्लेखानुसार भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह याच दिवशी संपन्न झाला होता. माता पार्वतीने कठोर तपस्या करून श्रीशंकरांना प्रसन्न करून घेतले होते. भगवान श्रीशंकरांनी देवी पार्वतीची भक्ति आणि निष्ठा हीच आपली शक्ति मानून देवी पार्वतीचा स्वीकार करून विवाह केला होता. याच दिवशी भगवान शंकराने तांडव नृत्य केले होते. म्हणून या दिवसाला अत्यंत पवित्र मानले जाते.

म्हणून शिवभक्त हे ह्या दिवशी अत्यंत कठोर उपवास करून,पिंडीवर अत्यंत भक्तीभाव पूर्वक रुद्राभिषेक करतात. आणि भल्या पहाटे उठून दिवसभर ॐ नम : शिवाय मंत्राचा अत्यंत निष्ठेने जप करतात. पहाटे उठून पूजा विधी झाल्यानंतरही रात्रभर नाम जपाने जागरण करतात.

समुद्रमंथन आणि महाशिवरात्री

समुद्रमंथन कथेचा संबंध महाशिवरात्रीशी विश्वास आणि भक्ति पूर्वक जोडला जातो. मोक्षप्राप्तीसाठी देव आणि दानवानी जे समुद्रमंथन केले तेव्हा समुद्र गर्भातून अनेक रत्न बाहेर पडले त्यातूनच “हलाहल” नावाचे विषही सापडले आणि त्यातून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले. त्यावेळी त्या विषाची तीव्रता इतकी होती की शंकरांचा कंठ निळा पडला तेव्हा पासून त्यांना “नीलकंठ” नाव पडले.

देवांना जागे ठेवण्यासाठी भक्तांनी रात्रभर भक्तिपूर्वक,नृत्य,भजन,कीर्तन,नामस्मरण सतत चालू ठेवले त्याच बरोबर पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी शंकरांनी तांडव नृत्य केले. सकाळी पृथ्वीची स्थिति स्थिर झाली म्हणून ह्या प्रसंगाची जाणीव ठेवण्यासाठी महाशिवरात्री साजरी केली जाते.

महाशिवरात्रीचे पौराणिक कथा

महाशिवरात्री भजन कीर्तन नामजप केल्यास मोक्ष प्राप्त होतो हे सांगणारी एक बोध कथा आपण लहानपणापसून ऐकत आलो.

एक शिकारी प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असे.शिकार करणे हा त्याचा दिनक्रम होता . एके दिवशी शिकार करण्यासाठी रात्री जंगलात गेला. एका दगडावर पाय देवून तो झाडावर चढला आणि शिकार दिसावी म्हणून झाडाची पान खुंटून खाली टाकून दिली आणि शिकारीची वाट पाहत होता.

त्यादिवशी शिकार काही झाली नाही पण त्याने ज्या दगडाचा आधार घेऊन झाडावर चढला तो दगड म्हणजे शंकरांची पिंडी होती आणि तो झाड म्हणजे बेलाचे झाड होते आणि त्यांनी जी पान खुंटून खाली फेकून दिली ती त्याच्या न कळत पिंडीवर पडली म्हणजे त्याच्या हातून न कळत पूजा घडली आणि शिकार न मिळाल्यामुळे उपवास ही घडला . आणि नेमकं त्यादिवशी महाशिवरात्री होती त्यामुळे न कळत घडलेल्या पूजेतूनही इतकं पुण्य मिळालं की तो मोक्ष प्राप्तीस प्राप्त झाला.असे महाशिवरात्रीचे महात्म्य आहे.

महाशिवरात्री 2026

महाशिवरात्रीचे दिवशी देशभरातील भाविक लाखोंच्या संखेने भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये तसेच 12 जोतिर्लिंग जवळ दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगेत उभे असतात. शंकरांना अत्यंत प्रिय असे बेल,धोतरा,दूध,मध आणि गंगाजल चरणी वाहिले जाते. तसेच 108 बेल पत्र वाहून त्या सोबत शंकरांचा मंत्र जपण्याची परंपरा जपली जाते.

दिवसभर मंदिरात आणि आजूबाजूच्या परिसरात प्रसन्न वातावरण आणि समाधान देणारी शांतता अनुभवास मिळते. म्हणून महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महात्म ही तितकेच आहे.
मनातील कुविचारांचा विषाचा नाश करावा आणि नाम,कीर्तनाची शांतता मनाला मिळवून द्यावी त्यातच खरा मोक्ष  आहे हेच सांगते महाशिवरात्र.

महाशिवरात्रीचे फायदे

  1. महाशिवरात्री उपवास केल्याने शरीराची पंचनसंस्था सुधारते.
  2. मंत्राचा जप केल्याने मानसिक आरोग्य प्राप्त होते.
  3. मन स्थिर झाल्याने नात्यातील संवाद वाढतो वैवाहिक जीवन आनंदमय होते
  4. दिवसभर स्मरण आणि जाणिवेत राहिल्याने पाप घडत नाहीत पण पापांचा नाश होतो.
  5. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा परिणाम आरोग्य सुधारते.

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा 2026

  • तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन तुमच्या आयुष्यात सुख समाधान येवो..! तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
  • भगवान शंकरांची कृपा कायम तुमच्या कुटुंबावर राहो..Happy Mahashivratri
  • भगवान शंकर तुमचं वैवाहिक आयुष्य आनंदमय करो.. Happy Mahashivratri
  • कितीही प्रसंग आले तरी शंकरांचे स्मरण करा.. परिस्थिति नक्की स्थिरावते.
  • तुमच्यातील कुविचारी विषाचा नाश होवो…ह्याच महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
  • आयुष्यातील आनंद,सुख,समाधान,यांवर उपाय एकच मात्र…महाशिवरात्र.
महाशिवरात्री 2026

 1. महाशिवरात्री 2026 कधी आहे ?
फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षात चतुर्दशीला यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 ला महाशिवरात्री आहे.

2. महाशिवरात्रीला उपवास का करतात ?
भगवान शंकरांची कृपा होऊन मोक्ष मिळावा म्हणून महाशिवरात्रीला उपवास करतात.

3. महाशिवरात्रीला कोणता मंत्र जपतात ?
महाशिवरात्रीला ॐ नम : शिवाय हा मंत्र भक्तगण अत्यंत विश्वास आणि निष्ठेने जपतात.

4. महाशिवरात्रीचे धार्मिक महत्व काय ?
इथे धार्मिक दोन कथा आहेत ज्या महाशिवरात्रीचे धार्मिक महत्व सांगतात
एक म्हणजे भगवान शंकर आणि देवी पार्वतीचे विवाह झाले आणि समुद्रमंथन वेळी भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन करून पृथ्वीचे रक्षण केले.

निष्कर्ष

म्हणून महाशिवरात्री हा फक्त एक सण नसून मन:शांती,आत्मशुद्धीचा हा पवित्र योग आहे. खरंच या दिवशी पूजा,उपवास केल्याने अडचणी,प्रसंग दूर होऊन आयुष्याचा मार्ग हा सोपा होतो. दुरावलेली नाती,आनंद,समाधान हे पुन्हा आपल्या हृदयात नांदायला लागतात हा महाशिवरात्रीचा महिमा आहे.

आणखी वाचा
संकष्टी चतुर्थी 2026
दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा