शाळेतले दिवस आणि आठवणी Marathi Articles

शाळेतले दिवस आणि आठवणी Marathi Articles

हे ही वाचा – तुमच्या बाळाला सुंदर नाव द्या baby boy name in marathi 

success marathi suvichar यशवी होण्यासाठी विचार 

Marathi Articles मध्ये आम्ही प्रत्येकाच्या शाळेच्या दिवसांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे , शाळेचा पहिला दिवस ते शेवटा दिवस हा अनुभव प्रत्येकाला आला असेल,गावाकडे आम्ही पायी चालत शाळेत जात असतं. शाळेत तिल पाठ्यपुस्तक नवीन वहीचा सुगंध ,नवीन पेन,नवीन bag तुम्हाला आतापर्यंत आठवली असेलच. हा सगळ्या नवीन उत्साह घेऊन आम्ही आनंदाने शाळेत जात होतो मग जरी शाळा दूर होती तरीही काही वाटत नव्हत,त्याच शाळेतला शनिवार प्रत्येकाचा आवडता असतं,कारण शाळा सकाळी असायची आणि लवकर सुटायची त्याच शनिवार मधील एक शनिवार च अनुभव तुम्हाला या Marathi Articles मध्ये अनुभवायला मिळेल .


      नेहमीप्रमाणे पहाट झाली ,शनिवार होता ब्राम्हमुहूर्ताला डोळे जागे झाले सूर्याच्या त्या धुकट प्रकाशात मला आमचं बालपण मात्र लख्ख दिसू लागलं,एक वाऱ्याची झुळूक आली आणि स्पर्श करताच क्षणी निसर्गाने आपलं चक्र उलट फिरून खूप वर्षे मागे नेऊन सोडले. आताचा मी तेव्हाच्या मलाच पाहत होतो,ती युद्ध पातळीवर लगबग होती शाळेची तयारी ,न्याहारी कसली फक्त चहा आणि खारीच बरी,पण खरंच वाटतं होतं बघायला मलाच भारी.आवरलं एकदाच .

Marathi Articles
मग प्रवास सुरू झाला ,दोन आम्ही चिमुकले ,सोबती होत्या गप्पा ,रस्ता तो नदी सारखा लांबच लांब भासे,खड्डे तर तुडवत निघालो, अजून एक गंमत पहिली मी आमची ,वेळेत पोहचण्यासाठी फास्ट चालण्याची शर्यत लागली त्या स्पीड ची मज्जा तर मला आताच्या बुलेट ट्रेनच्या स्पीड मध्ये पण नाही दिसली , झाडांची कान ओढत ,कान म्हणजे मला झाडांची पानं त्यांचे अनेक कान वाटायचे ,आमच्या गोड गप्पा झाडं ऐकत होती ,खड्डे तेव्हाही होते पण तेव्हा जाणवले नाहीत आताच खड्डे जाणवायला लागेल,कदाचित
आम्ही खड्डे तुडवत जात होतो म्हणून तेच आमच्या वाटेतून बाजूला होतं असावेत,मी पाहिले कल्पनेच्या दुनियेतले आम्ही राजे होतो, रस्त्यात एक ठिकाणी उभं राहावं ,रस्त्यानेच चालून मला शाळेत सोडावं,ही कल्पनाच चालायला जोश भरायची,जर मला उडता आलं तर ….ही कल्पना आम्हाला भुर्रर्रर्र कन घरी घेऊन यायची.तेवढ्यात पुन्हा काळाने आपलं चक्र सरळ फिरवलं आणि आणून ठेवलं वास्तवात पण थोड्या क्षणासाठी का होईना पहाटेच जीवन जगल्या सारखं वाटलं.
_@ranjit


खेळ चंद्र सूर्याचा मराठी लेख Marathi Articles

ह्या लेखाची रचना संपूर्ण काल्पनिक आहे आणि केवळ लेखन कला आणि मनोरंजन म्हणून लेखकाने लिहल आहे हा marathi blog म्हणजे आयुष्य जगत असताना निरागस मनाने घेतलेला जगाचा एक गोड अनुभव आहे. बालपण म्हणजे आयुष्याचा एक अफलातून अनुभव असतो एक वेळगच आपल विश्व असतं जिथे आनंदापेक्षा दुसर काहीच नसतं आणि हा अनुभव प्रत्येकाचा आहे,लहानपणी सहज चालताना वर आकाशाकडे पाहून मला एक वेगळाच अनुभव आला तोच या लेखात मांडला आहे . तुम्हाला हा खेळ चंद्र सूर्याचा मराठी लेख वाचून तुमचाही अनुभव पुन्हा आठवेल यात शंका नाही .

                                                                    Marathi Articles

पहाट झाली
सूर्य देवांची
स्वारी आली……..
सोनेरी नजरेने
आकाशावर
जादू केली…….

पहाट झाली

चिमुकल्यांची किलबिल
कानांवर आली…..
समजली नाही बोली
पण कानांना
मज्जा आली……..

पहाट झाली

तिमिरावर प्रकाशाने
विजयी पताका रोवली……

पहाट झाली

अपयशी प्रयत्नांना
यशाची वाट दाविली…..

पहाट झाली

विरहाची तपश्चर्या
चक्रवाकाची फळास आली…..

पहाट झाली

सूर्य डोंगराला कान लावून
हळूच ऐकत होता…..
उगवण्याचा बहाणा सांगुनी
वेडा कोकिळेचे
गाणे ऐकत होता……

पहाट झाली

सगळ्यांसाठी तो
कोवळी किरणं
देत राहिला …..
पराक्रम पाहुनी आमुचे
तो आगच ओकत राहिला ……
दुपारनंतर तो मावळतीला आला
सुर्यास्ताचा बहाणा सांगून तो
थवेच पाहत राहिला……

पाठ फिरवता सकाळचीच जादू
अथांग सागरावर करू लागला…..

वेडा पुन्हा मावळतीचा बहाणा करुनि
मातेच्या कुशीत विश्रांती पावला…..

मग हळूच आली संध्याकाळ
डोळे मिचकाऊ लागल्या तारका…..

चांदोमामा कुठे दिसत नव्हते
जणू आकाश झाला पोरका…..

मग हळूच आली चांदोमामांची स्वारी
जणू ढगांची गाडी अन ससेमामांवर सवारी…..

मग सप्त चांदण्या
सरसावल्या स्वागताला
दृश्य पाहता ते तो पूर्ण कलेने
बेधुंद झाला……

तिमिर अंधारात मार्ग दिसेनासा झाला
त्या प्रवासात तो माझ्या सोबतीला आला…

शीतल ,शांत,पांढऱ्याशुभ्र चांदण्याने
रातकीडा शांत झाला…..

गर्वाने चमचमनारा तो काजवा
शरमेने अंधारात दिसेनासा झाला…..

ढग पळाले झाले मोकळे आकाश
चकोरावर कृपा झाली अन
पडले लख्ख प्रकाश,
मग खेळ सुरू झाला पळापलीचा
आमचा असा,
भला मोठा प्रश्न मला किती
पळालो तरी चांदोमामा सोबती कसा.

  • रंजीत शिंदे 

Leave a comment