Marathi katha मराठी गोष्टी|मराठी कथा

Marathi Katha छान छान मराठी गोष्टी| बोध कथा

Marathi Katha : समाजात एक माणूस म्हणून वावरण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आपला आचरण म्हणजेच एकमेकांजवळ असलेलं आपला व्यवहार आणि तोच योग्य असण्यासाठी आपल्या मनाला वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज असते ,तो बोध आपल्याला कथा करत असतात.

Marathi story for kid’s मैत्री असावी तर अशी.

एक मुंगी होती ती खूप तहानली होती,ती एका विहिरीजवळ  पाणी पिण्यासाठी गेली, विहिरी काठी जाताच तिचे पाय घासरले आणि ती विहिरीत पडली. तितक्यात विहिरीच्या काठी एक झाड होत त्या झाडावर बसलेल्या कबुतराने मुंगीला पाहिले,आणि त्याला मुंगीची दया येऊन त्याने एक पिंपळाचा पान काढून मुंगीच्या जवळ टाकला त्या पानावर बसून मुंगी हळू हळू विहिरी बाहेर आली अशा प्रकारे कबुतराने मुंगीचे प्राण वाचवले . मुंगीने कबुतराचे आभार मानले .
तितक्यात त्या विहिरीजवळ एक शिकारी आला आणि त्याने त्या कबुतराला पाहून त्याच्यावर नेम धरला त्याला मारणार इतक्यात ती मुंगी शिकर्याच्या पायाला कडकडून चावली आणि त्याचा नेम चुकला आणि कबूतर उडून गेला अशा प्रकारे मुंगीने मैत्री जपली.

बोध – अशा प्रकारे प्रसंगात आधार म्हणून उभी राहते ती खरी मैत्री.

मैत्री कशी नसावी

तीन मित्र होते ,त्या तिघांना ही वाटत होतं की आपण एकमेकांचे खरे मित्र आहोत,पण हा गैरसमज दूर झाला,एक दिवशी रात्री ते जंगलातून चालत जात होते त्या जंगलात भयानक वन्यजीव होते.ते तिघेही मित्र चालत असताना त्यांच्या समोर एक अस्वल आलं,स्वतःचा बचाव करण्यासाठी दोन मित्र हे शरीराने बारीक असल्यामुळे पटकन झाडावर चढले आणि जो तिसरा मित्र होता तो शरीराने लट्ट असल्यामुळे त्याला झाडावर चढता आले नाही,आता ते दोघेही मित्र त्याची गंमत पाहत राहले.
पण त्या मित्राला एक युक्ती सुचली आणि तो जमिनीवर निपचित पडून राहिला,अस्वल जवळ येत होते ,अस्वल जवळ आले आणि त्याची वास घेऊन निघून गेले,तेव्हा ते झाडावर चढलेले मित्र खाली उतरले त्यांना आश्चर्य वाटेल की अस्वलाने ह्याला काहीच केलं नाही ,फक्त कानाजवळ काहीतरी केलं आणि निघून गेले,
तेव्हा त्या दोघांनी तिसऱ्या मित्राला विचारले,की अस्वलांने तुझ्या कानात काय सांगितले,त्यावर त्या मित्राने उत्तर दिले की,जे प्रसंगात आपली साथ सोडून पळून जातात त्याजवल मैत्री करू नये, असं बोलून तो मित्र निघून गेला.

बोध – खऱ्या मित्राची ओळख ही प्रसंगात होत असते.

हे ही वाचा –  10 मराठी बोधकथा