100 Marathi Kavita मनाला भावणाऱ्या
marathi kavita महाराष्ट्र ही संतांची भक्ति आहे जगाला भक्ति महाराष्ट्राने शिकवली आहे . अशी भक्तीची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे ,आशा देवाच्या भक्तीत तल्लीन झालेला भक्त हा सहज देवाच्या भेटीचा अनुभव त्याच्या शब्दांत मांडत असतो ते आपण संतांच्या अभंगातून वाचलेल आह तोच अर्थ ,तोच देव भेट करून देणाऱ्या ह्या आमच्या marathi poem on spirituality
माझा मी नाही आता रे उरलो
फेरा
तू माझा सांगाती
मैत्री सख्यत्व
अद्वितीय गणेश
सारेच तूच देवा
अनंत आनंद
आज आनंद झाला
तो तूच का रे कान्हा
हृदय मृदुंग
तुका पांडुरंग
सखा श्रीहरी
गौप्य गुज
माझा मी नाही आता रे उरलो
देवाची भक्ति करता करता कधी त्यात समरस होतो हे ही कळत नाही आणि अत्यंत समाधान अंतकरणात नांदायला लागत हे ह्या marathi kavita मधून अनुभवायला मिळेल .
माझा मी नाही आता रे उरलो ,
अर्पूनिया तुझ्या चरणी
व्यर्थ रे मी श्रमलो ,
तूच माझा आता
न दिसे कोणी माझा मजला,
न पाहता हीनकर्म माझे
कुशीत घे रे मजला,
नको रे मला हे द्वैत
ऐश्वर्य सारे
असाह्य झाले रे हे
संसाराचे निखारे,
दे नेत्र मजला ऐसें
चराचर भासेल तुज जैसे,
दे मजला ऐसें मरणं,
श्वासातही उरावे
तुझे चरण
फेरा
फेरा हा त्याचा युगायुगांतरीचा
घेऊन सोहळा पैलतीरीचा,
जो जो विसावला त्याच्या चरणी
मरुनी उरला तो अशी त्याची करणी,
नाम दिला त्याने
तू स्मरूनी तर बघ,
धावे विश्व टाकुनी मागे
विश्वास अजमावून तर बघ,
साथ तुझी सोडली त्याने
असा क्षण आठवून घे,
आज पर्यंत ज्याने सावरलं
मरण्या आधी एकदा नाम घे,
अरे कृपाळू तो,दयाळू तो
त्याचा सम तोच आहे,
सुदाम तो, शबरी ही तोच
प्रल्हाद ही त्याचा तोच
देह हे निमित्त मात्र
सामर्थ्याच्या पाऊल खुणा आहेत
___________________________________________
तू माझा सांगाती
तारुण्याच्या चिंबवनातुनी
मनाला मनोसोक्त भर दुपारचीच
दुनिया दाखवीत कसे फिरवुनी आणले,
प्रपंच हा आंबटगोड पण गोडचगोड
करून दिले,
दुर्घट ,दुर्लभ परमार्थाचे मर्म अवघे अवघड
सोपे करून दिले,
पांडुरंगा तुझ्या भक्तीच्या पायऱ्या
ओलांडीता मोक्षाचे अधिकारी करणाऱ्या
परमात्म्याचे दर्शन आज तू घडविले,
विधात्याच्या चरणाच्या स्पर्शाने आत्म्याला
वेगळे वळण दिले,
पांडुरंगाने अभंगातून सांगाती राहून
अथांग संसारात धीराने तरायला शिकविले,
संसाराच्या घाटावर आदळणाऱ्या लाटांशी लढायला
याच अभंगाने सामर्थ्य पुरविले …
सखा श्रीहरी
___________________________________________
मैत्री सख्यत्व
देह दोन ही जाणीव
एकच असते ,
ठेच लागता पायी
वेदना दोहींना होते…
भेदभाव संपतो तिथून ही
नदी उगम पावते,
एकच ध्यास ,तोच ध्येय
तिथे नाते हे जन्म घेते,
मार्ग एकच होता मग
मरणाशीही उधार होते,
कवी कलश शिवपुत्र संभाजी
नाते जगण्यास आधार देते,
प्रेमाचा हा गर्भित गोडवा
मैत्री हृदयात विसावते,
पोहे खाऊनी सुदाम्याचे
अवघे त्रैलोक्यपती करते
___________________________________________
अद्वितीय गणेश
आसनावर बसलेला आणि
पाट डोक्यावर घेऊन
घरी आलेला गणेश पहिला…..
मंदिरात विराजलेला आणि
यथाविधी पूजन करता
गणेश पाहिला……
मोदक स्वीकारणारा आणि
मोदकाला आकार देणारा
गणेश पाहिला…..
आरतीने मंत्रमुग्ध झालेला
आणि टाळ वाजवणारा
गणेश मी पाहिला…..
सिंहसनी राजा बनून
झोपडीला महाल बनविणारा
गणेश पाहिला….
गणेश उत्सवात आणि
प्रत्येकाच्या उत्साहात
गणेश मी पाहिला…..
रात्रभर जागून त्याचीच
तयारी करताना
गणेश मी पाहिला…..
फुलांमध्ये रंग सुगंध भरून
स्वतःच स्वीकारणारा
गणेश मी पाहिला…..
हात जोडून तोच
त्याच्याच समोर
त्यालाच आशीर्वाद देता
गणेश मी पाहिला…..
डोळ्याने डोळ्यांत पाहता
डोळ्यातून दोही दिशी एक
गणेश मी पाहिला……
___________________________________________
सारेच तूच देवा
वाऱ्या सवे झाडे हल्ली
देवा तुझीच गीतं गातात
पाखरे सारी झेप घेऊन
पुष्पक विमान भासवतात…..,
झुळूक हल्ली हळूच कानी
तुझाच पत्ता देते ,
गळून पडती पाने सारी
तुझीच सत्ता बोलते….,
पूर्ण होऊन चंद्र हल्ली
जगणे शीतल करतो,
लुकलुकत तारे सारे
की तूच मला बघतो….,
खळखळणारे झरे हल्ली
जणू मंत्र तुझे जपतात,
नदी हल्ली सागरी मिळून
तंत्र तुझे समजवतात…..
– रंजीत शिंदे
___________________________________________
अनंत आनंद
अनंत आनंद
आनंदची अनंत
जाणीव ब्रम्ह
असोनि नसणे ।
मनाचे मरणे
मरून जगणे
अनंतचि धरणे
असोनि नसणे ।
सारेच त्याचे
तोचि हे सारे
दुःख ही सरे
बाजूस सारिता ।
जाणिवेस दृष्ठांत
तरी नकळे अनंत
दृश्याचा अंत होता
अदृश्य अनंत सामोरेची ।
उजेड अंधार
दोही दशी सार
उपजून निपजले
अनंतची साचार
कार्य त्याचे ।।
___________________________________________
आज आनंद झाला
आज आनंद
आनंद झाला
माझा अनंत
अनंत आला ।।
चरण धुळीत मी
न्हाऊन गेलो
मिठीने मी अवघे
ब्रह्मांड प्यालो ।।
सावली अनंताची ती
कवच कुंडल माझी
उल्काही दुरून गेली
धग ही ना आघाताची ।।
त्याचा होऊनि अनंत
माझाच होऊनि ठेला
कुबेर लाजला मज पुढे
मज राव ठेवुनी गेला ।।
अवघे श्वास माझे
झाली अनंताची नगरी
हृदयाची धडधड सारी
झाली अनंताची पंढरी ।।
________________________________________
तो तूच का रे कान्हा
निळ्या नभाचं मला एवढं
का रे आकर्षण कान्हा
तो तुझा वर्ण की
तूच तो का रे कान्हा
काळ्या नभात रात्री का
शोधतो तुला मी कान्हा
चमकणारे तारे सारे
तूच का रे कान्हा
मोरपंख माथी शोभला
तुझ्या रे कान्हा
नक्की तो मोरपंख की
चक्रव्यूहाच्या गुप्त खुणा
ते बासरीचे सूर
का तुझ्या सुरां
मुळे बासरी….
न कळे मला
तुझी भाषा
अन तुझी मुद्रा ती हसरी……
_________________________________________
हृदय मृदुंग
हृदय मृदुंग स्तब्ध होता |
अहंकार गाणं निरव शांतता |
‘मी’ नाचे शरीर मिरवुनी |
‘मी’च हरवे शरीर हरवुनी ||
स्वार्थ ही टेकी हात लाचारी |
रुबाब राजबिंड फिरे माघारी ||
ताल ही धरी ‘मी’च धरुनी |
बेताल मृत्यू तार छेडूनी ||
हृदय मृदुंग श्वास हे गाणे |
शरीर उणे तव ‘मी’ जाणे ||
_________________________________________
तुका पांडुरंग
सहज पंथे चाले श्वास ।
जाणीव तुका पांडुरंग ।।
पांडुरंग नेत्र दृष्टी पांडुरंग ।
पांडुरंग पाही ब्रह्मांड गोल ।।
पंचभूत हा अवघा पसारा ।
पांडुरंग धागा तोचि सहारा ।।
पांडुरंग जाणीव मज ती मुक्ती ।
पांडुरंग भक्ती ध्यान तो पांडुरंग ।।
_______________________
सखा श्रीहरी
अनोखे हे सख्यत्व हरी
मज निःशब्द करी…,
माझा मी न उरे संसारी
परि मज त्याचाच करी…,
काय बोलू ते सोहळे
कल्पनाही ही मावळे…,
मनही मागूते वळे
परमानंदात डोले…,
अंधार उजेडा पलीकडे
नेत्रही पाहू लागती…,
परलोक प्रगटे सामोरी
सारेच एक भासती…,
दृश्या पलीकडे अदृश्य
दृश्य मज दिसले…,
मुंगीकडेही बघता जणू
कृष्णवर्ण हसले……
________________________________________________________________________
गौप्य गुज
पाण्यात बघून माझा
मजला प्रेमात आज पडलो
डोळ्यांत जाता खोल
माझ्यात आज रे बुडलो ।।
अंतःकरणात माझ्या
हिरे ,माणके ,मोती
सुखावलो माझ्यात रे
जाणुनी जीवनाची ज्योती ।।
श्वास मोकळे घेता
आत जेथे स्थिरावले
ठोक्यांचे आवाज येता
ऊँकार मज आठवले ।।
स्वरात त्या गाढता मजला
मुक्तीची वाट जन्मली
मनही मावळे तेथे
उगवली पहाट उन्मनी ।।
स्वरात त्या गाढता मजला
मुक्तीची वाट जन्मली
मनही मावळे तेथे
उगवली पहाट उन्मनी