100+Marathi Mhani मराठी म्हणी
सारांश: marathi mhani मराठी म्हणी एखाद्या क्रियेला उद्देशून काही मोजक्या अर्थपूर्ण असे शब्द वापरले जातात त्याला म्हणी म्हणतात ,ह्या म्हणी अनेक भाषा प्रमाणे मराठीत ही वापरल्या जातात . आशा म्हणी आपल्याला शालेय दिवसांपासून परिचयाच्या आहेत .योग्य वेळी योग्य म्हणीचा वापर करून आपल्या भाषेत प्रभाव साधता येतो.आशा म्हणी आज आपण अर्थासहित पाहणार आहोत ह्या marathi mhani मराठी म्हणी मधून .
1) शक्ति पेक्षा युक्ति श्रेष्ठ -marathi mhani
अर्थ फक्त शक्ति असून उपयोग नसतो ती शक्ति कुठे आणि कशी वापराची हे ज्ञान नसेल तर ती शक्ति निरुपयोगी ठरते . युक्तीने मुंगी शक्तिशाली हत्तीला ही मारू शकते .
2) नाचता येईना अंगण वाकडे –
अर्थ स्वतःला काहीच येत नाही पण दोष मात्र इतराना देत बसायच म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे .
3) हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये –
अर्थ आपल्याजवळ काय आहे ,आपल्या हातात काय आहे हे पाहण्यापेक्षा कायम जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करणे म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे म्हणून marathi mhani मध्ये वापरले जाते
4) बुडत्याला काडीचा आधार –
जो बुडत आहे त्याच्यासाठी काहीही मिळालं तरी तो आधार म्हणून स्वीकारतो. श्रीमंत व्यक्ति महालात राहते,पण प्रसंग यालाच तर झोपडीचा देखील आधार घ्यावा लागतो.
5) गरजेला हात देतो तोच खरा मित्र –
खऱ्या मित्राची ओळख ही प्रसंगात होत असते आणि प्रसंगात जो आपल्याला मदत करतो तोच मित्र असतो मग तो कोणताही प्राणी असो तो मैत्री ह्या शब्दाला योग्यच .
6) वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा –
माणूस श्रीमंत हे त्याच्या कमाई वर नाही तर कामावलेल्या मधून किती बचत करतो यावर असत . वाचवलेला पैसाच कमाई असते .
7) गडगडत जाणाऱ्या दगडाला शेवाळ चिटकत नाही –
अस्थिर मनुष्याला कधीही यश मिळत नाही. जो आपल्या ध्येयावर एकाग्र नाही त्याला यश चिटकत नाही .
8) शाहण्याला शब्दांचा मार -marathi mhani
ज्याच्या कडे समंजस पणा आहे त्याला फटका मारण्याची गरज नसते एका शब्दाने त्याला आपली चूक कळत असते .
9) अति शहाणा त्याचा बैल रिकामा –
जो जास्त पुढे पुढे करत असतो तीच्या कडे बुद्धीचा भाग हा कमीच समजावा .
10) प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य आसते –
प्रेम मिळवण्यासाठी इतिहासपासून ते आज पर्यन्त माणसाने काय काय केल आहे जे एखादा योद्धा युद्धात करतो म्हणून प्रेमात आणि युद्धात यश मिळवण्यासाठी कधी कधी खोट बोलण ही योग्यच ठरत .या marathi mhani चा वापर होतो.
11) ज्याचा शेवट गोड त्याचे सारेच गोड –
सुरुवात जोशाने करण उपयोगाच नाही ते कार्य शेवटा पर्यन्त घेऊन जाता आल पाहिजे ,सुरुवात कशी असेल पण शेवट उत्तम केला तर सारेच उत्तम .
12) जे चकाकते ते सारेच सोने नसते –
चकाकणाऱ्या वस्तूंकडे माणूस आकर्षित होतो पण चकाकते काच ही हे कळायला हवं हाताला जखम होण्याआधी जर नाही कळलं म्हणून 100+marathi mhani मराठी म्हणी मध्ये ही म्हण येते
13) उथळ पाण्याला खळखळाट फार –
जो आयुष्यात आपल्या ध्येयावर स्थिर आहे तो आवाज करत नाही पण जो अस्थिर आहे ज्याला काहीच येत नसत तो दाखवण्यासाठी खूप बडबड करत असतो .
14) आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून –
आपले दोष नेहमी झाकून ठेवणे आणि दुसऱ्याचे चुका दोष काढत जो राहतो त्यासाठी ही म्हण वापरली जाते .
15) गरजेल ते पडेल काय –
जो मोठ्या आवाजात ओरडत असतो तो तशी क्रिया करत नसतो म्हणजे गर्जणारे ढग ही बरसत नसतात तशी अवस्था , फक्त बोलतो पण क्रिया करण्याची हिम्मत नसते त्यासाठी ही म्हण वापरतात .
16) भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी का –
कष्ट करून कामावलेला धन कमी असेल तरी ते सुखाची झोप देते पण आसुरी वृत्तीने कामावलेले धन कधीच सुख देत नसतं .
17) कधीही न करण्यापेक्षा उशिरा ही करणे योग्य –
फक्त कल्पना रंगावण्यापेक्षा प्रत्यक्ष पाऊल टाकणे योग्य असते मग ते उशिरा का होयना .
18) एकाच माळेचे मणी -marathi mhani मराठी म्हणी
एकाने केलेली चूक सारखी सारखी दुसऱ्यानेही करणे ह्यासाठी ह्या म्हणीचा वापर केला जातो .
19) हाजिर तो वजीर –
एखादा पदार्थाचा वाटप होत असेल आणि तो पदार्थ मोजकाच असेल तर तो जे तिथे उपस्थित आहेत त्यानाच मिळतो ,मग उशिरा येऊन जो विचारतो मला का नाही मिळालं मग त्यासाठी ही marathi mhanवापरतात, हाजिर तो वजीर .
20) गाढवाला गुळाची चव काय –
ज्याला एखाद्या मौल्यवान वस्तूची मौल माहीतच नाही तर त्याला त्या वस्तूचे महत्व काय कळणार .
21) संतोष हेच परमसुख –
आपल्या जवळ जे आहे त्यात संतुष्ट असणे म्हणजेच परमसुख असत.
22)अंथरूण पाहून पाय पसरावेत –
आपली परिस्तिती जशी असेल तशी आपली स्वप्न पाहिजेत नाहीतर ,आपली परिस्थिति नसताना कोटीचा व्यवहार केला तर आपलीच फजिती होणार असते ,म्हणून आपली परिस्थिति पाहून पाऊल उचलता यायला पाहिजे .
23) लवकर निजे, लवकर उठे तया ज्ञान ,आरोग्य ,संपत्ती भेटे –
जीवनात शिस्त आणि मर्यादा खूप महत्वाच्या असतात काय कधी कराव ह्याचा काळवेळ निश्चित असेल तर सगळं ऐश्वर्य प्राप्त होतं.
24) खाली मुंडी पाताळ धुंडी –
साधे पणाचा आव आणणारी व्यक्ति कधी कधी तशी नसते मनात खूप वाईट विचारांच वादळ घेऊनही असते .
25) संकटाच्या सागराला सुखाचा किनारा असतोच –
आयुष्य म्हटल की सुख दुख आलेच ,ज्या अर्थी रस्त्याला चढाव लागतो तसंच उतारही लागतो.
26) चार दिवस सासूचे ,चार दिवस सुनेचे –
सगळेच दिवस चांगले नसतात सगळकही आपल्या मनासारखे होईल असं नाही कधी मना विरुद्ध ही होतं तिथे संयम असायला पाहिजे .
27) घरोघरी मातीच्या चुली –
आपल्याला नेहमी दुसरी व्यक्ति नेहमी सुखी वाटते आणि आपणच दुखी वाटतो पण खर तर श्रीमंत व्यक्तीला संकट असतातच .
28) अति तिथे माती –
कोणतीही सवय प्रमाणाबाहेर गेली तर तिथे आपला नाशच आहे .
29) उपास घडण्यापेक्षा अर्धी भाकरी बारी –
आपल्याला जे मिळालं आहे ते कमी असेल तरी एका कोपऱ्यात जाऊन आनंद घेता यायला पाहिजे नाहीतर अजून पाहिजे म्हणालो तर मिळलेल ही जाण्याची वेळ येते .
30) आरोग्य हीच संपत्ती –
कितीही पैसा कामावला ,करोडो रुपये कमावले पण शरीर रोगी असेल तर ते पैसे कधीच आनंद देत नाहीत म्हणून सगळ्यात महत्वच म्हणजे आरोग्य .
31) प्रामाणिकपणा हेच सर्वश्रेष्ठ धोरण होय –
आपल्या कामाजवळ आपण प्रामाणिक राहण हीच यशाची पहिली पायरी असते
32) गतकाळचा शोक फुका –
जे घडून गेल तो भूतकाळ होता त्यात रमून दुखी राहण्यापेक्षा येणार भविष्यकाळ बदलण्यासाठी वर्तमानकाळात क्रियाशील असणे योग्य असतं .
33) टाळी एका हाताने वाजत नाही –
भांडण हे दोघांमध्ये झालेलं असत त्याचे कारणीभूत कोणी एक नसत . त्यात आपलाही वाटा असतोच .
34) अडला हरी गाढवाचे पाय धरी –
वेळप्रसंगी कोणाचीही नाईलाजास्तव मदत लागते कितीदा ऐकूनही घ्यावं लागतं .
35) ऐकावे जनाचे करावे मनाचे –
कोण काय बोलतो सगळ्यांच मत ऐकावे आणि आपल्याला आपल्यासाठी काय योग्य आहे तेच करावं
36) पूर्ण विचार केल्या शिवाय कृती करू नका
कोणातही काम करताना त्याच्या दाही दिशी विचार करून कार्य करावं .
37) कोल्हा काकडीला राजी
38) तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्या
39) बळी तो कान पिळी
40) पैशा पाशी पैसा जातो
पैशाची केलेली योग्य बचत आणि गुंतवणूक ही पैसा आणतो .
41) दाम करी काम
पैशाने सगळी काम शक्य होतात
42) गरज ही शोधाची जननी आहे
जगातले सगळे शोध हे गरजेमुळे झाले आहेत ,गरजेवरचा उपाय म्हणून नवीन शोध लागतो .
43) कष्टाशिवाय फळ नाही
आयत काही मिळत नसतं जे काही स्वप्न पाहिलं असतात ती पूर्ण फक्त कष्ट केल्याने पूर्ण होतं असतात .
44) काट्यावाचून गुलाब नाही
सुखाचे दिवस पाहिजे असतील तर दुख सहन करावेच लागतात .
45) विस्तावाशिवाय धूर नाही