विरह मराठी कविता marathi poem on break up
marathi poem on breakup ; ह्या कविता प्रत्येक जो प्रेमात कधीतरी पडला आहे त्यांनी नक्की वाचवा नक्कीच तुमचं प्रेम आणि प्रियसी आठवेल अशा भावनिक कविता आहेत. प्रेम एक सुंदर नात आहे पण एकदा का प्रेमात पडलो की सगळेच दिवस सारखेच नसतात ते जेवढ गोड तितकच ते टोचणार ही आहे एकदा आपल्या मनाला एखाद्या व्यक्तीची सवय झाली की त्या व्यक्ति शिवाय आयुष्य ओसाड बनून जात ,आणि ती व्यक्ति निर्जीव होऊन जाते आस ही प्रेमाच नात दाखवताना आम्ही घेऊन आलो आहोत marathi poem on break up विरह कविता .ज्याच प्रेमाची गोष्ट आधुरी राहिली आहे त्यांची भावना ह्या प्रेम विरह कवितेत आहेत. प्रेम म्हटल की दोन मन ही एकच होऊन जातात तेव्हा आयुष्य बदलून जात ते सकरात्मक घटनेने पण हीच मन ज्यावेळेला वेगळी होतात तेव्हा ही आयुष्य बदलत पण नकारात्मक गोष्टिनी ,काहीच यातून सावरतात तर काहीचण या जगातून निघूनही जातात .
हे ही वाचा – Love Quotes In Marathi
100+ Emotional Breakup Quotes In Marathi
marathi poem on breakup मध्ये पहिली कविता “वाट तुझी” कवितेत अशा भावना आहेत ज्या विरह झालेला खूप काळ लोटला दुख ही संपले पण मात्र आठवणीच्या जखमा अजून ओल्याच राहतात आणि त्या सतत सतावतात त्या कशा तर ही कविता वाचा .
वाट तुझी
वाट पाहणं सोडून दिलं
वाट मात्र तीच आहे…..
दूर गेली क्षितिजापार
वाट मात्र तीच आहे…..
हिरव्यागार कडा सुकून गेल्या दोन्ही
वाट मात्र तीच आहे…..
गेले पावसाळे अनेक आणि उन्हाळे
वाट मात्र तीच आहे…..
कित्येक आले येऊन गेले वाटसरू
वाट मात्र तीच आहे…..
पाऊलखुणा उमटून गेल्या
वाट मात्र तीच आहे…..
कित्येक लोटल्या रात्र
सूर्या सम उजळले दिन
ती वाट मात्र सारखीच आहे…..
कित्येकाने घेतले विसावे
कित्येकाने यावे जावे
ती वाट मात्र तिथेच आहे….
कित्येकाने चुकून अडावे
अन अडून चुकावे
ती वाट मात्र मोकळीच आहे…..
कित्येकाने किती चुकावे
प्रत्येकवेळी माफ करावे
कितीदा करावे मलाच माफ
कितीदा करावं मनास साफ
ती वाट मात्र अशीच आहे…….
कितीदा हसून जगाशी जुळावे
कितीदा दुरावून नव्याने मिळावे
ती वाट मात्र अशीच आहे….
कितीदा व्हावी ओळख नव्याने
कितीदा अनोळखी खोटे बहाणे
ती वाट मात्र तीच ती आहे…..
marathi poem on breakup मधल्या ह्या कवितेला आम्ही नाव दिलं नाही कारण ह्या भावना स्तब्ध करणाऱ्या आहेत जिथे शब्दच नाही उरत . फक्त भावना वाचा तुम्हाला नक्की भावेल .
तू जर खुश
असशील तर
मी ह्या दुराव्याला
सहमत आहे…..
जर आठवण येत
असेल त्या क्षणांची
तर या क्षणाला
मी काय समजू…..
वेळेनुसार बदलत
गेले सारे
पण पुन्हा वेळच बदलली
तर पुन्हा कसा बदलू……
मान्य सारे की
तुझी झाली नवी सुरुवात….
अंत स्वीकारून माझा मी
जगतोय आपल्या त्याच जगात…..
दुरावा ह्या breakup marathi quotes मधे आम्ही निरागस प्रेम मांडलं आहे ज्यात ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या कडून काय अपेक्षा असतात तर काहीच नाही फक्त तिची एक भेट आणि ती भेट असते क्षणिक पण वाट पहावी लागते कधी कधी आयुष्यभर ही . पण ही भेट होईपर्यंत काय मनाची अवस्था होते ते या कवितेत अनुभवला मिळेल ह्या भावना ज्यांनी खरच कोणावर प्रेम केलंय त्यानंच कळेल .
दुरावा
निरागस चिमुकल्या डोळ्यात
स्वप्न असे सजते
आपुऱ्या अशा अपेक्षेने
रोज सजून रोज विसकटते
मन ही भोळे हातुणी
निसटणाऱ्या मृगजळात गुंतते
क्षण क्षण त्यातच रममाण होउनि
शेवटी थकून जाते ..
रोज आठवावे ,रोज मिळावे
रोजचे ही झुरणे ,
रोज बोलावे की अबोलणे हे
वाटे रोजचेच मरणे ..
डोळे स्थिरावती
रोज पाऊल वाटे कडे .
निराशेने झुकती डोळे
पडती अश्रुंचे शिंतोडे ..
स्पर्श वाऱ्याचे मुरता अंगी
मन स्वप्नी मग्न होतो
वारा सरोनि जाता विरह
मान सुन्न करोंनी जातो ..
marathi breakup kavita मध्ये बेरंग कविता ही विरहा नंतरची अवस्था दाखवणारी आहे . प्रेमात तुझ माझ काही नसत ते आपलं म्हणजे समोरच्या व्यक्तीचे सुख आणि दुख हे दोघांचेही होऊन जातात आणि एकमेकाना आधार मिळतो पण जर विरह वाट्याला आला तर मासा पाण्याशिवाय काय असेल ही कल्पनाच करता येत नाही ,असाच काहीस प्रेमात होतं .
बेरंग
फुलातुन सुगंधाने असे
का दुरावे,
सप्तरंग घेऊनि फुलाने
का बेरंग जगावे….
पावसानेही पाण्यावाचून
डोंगरी कुठे बरसावे,
नदीनेही सागराविना
मग कोणामध्ये मिसळावे…..
अधांतरी इंद्रधनुने कोणासाठी
नटावे,
हवेविना सप्तरंगानी का अकस्मात
सुटावे….
हिरव्यागार आयुष्याने
कोणासाठी बहरावे
पाने शुष्क गळाली सारी
कोणा सावलीत पडावे….
आस
आस तुझ्या येण्याची
एक प्रवास सुरू आहे,
पहिल्या पावसाची आस
जशी त्या मातीला आहे,
काहीच नाही मी
तुझ्या भेटीनं काही
व्हायचं आहे,
थकलो नाही अजुनी
आस कायम ही
वाट नवी आहे,
जगलो नाही अजुनी
तो जिवंतपणा सवे
जगायचा आहे,
मरतो रोज क्षणोक्षणी
आस नव्याने जन्मताहे,
न संपणारा,न थकणारा
तुझ्याविना पण तुझ्यासंगे
एक प्रवास सुरू आहे
Prem kavita in marathi मराठी प्रेम कविता
गुलाबी गारवा
स्पर्श तुझ्या
ओढ
पीक अश्रुंचे
निराशा
गुलाबी हा गारवा
रातही काळोखी,
साथ नाही तुझी
एकांतही अनोळखी……,
चांद हा ऐकला
चांदण्या चमकल्या,
साथ ना तुझी
दिशा त्या कुठल्या……,
काळोखी प्रवास
साथ रजनीचर,
वाट ही अधुरी
प्रकाश हा धूसर……,
चालतो एकला
सोबती सावल्या,
थांबलो विसाव्या अन्
रातराणी गंधाळल्या…….
स्पर्श तुझा
प्रत्येक तुझा तो स्पर्श
मज जिवंतपणा तो
देतो…..,
आवाज तुझा तो सखे
मज वाऱ्यासवेही
जाणवतो…..,
अपुरी ही साथ जरी
मज पाऊले दोनी
भासते…..,
स्मरतो सोबतीचा क्षण
श्वासांची धडपड ही
वाढते……,
आठवण तुझी ती येता
दुरी असुनी अंतर
संपवुनी जाते…..,
ऊन पाऊस मिळता
तो इंद्रधनू भुलवुनी
जाते…..,
सोबती तुझ्या चालता
सखे मज ही तैसेचि
होते……
ओढ
ओढ ही तुझी निराळी हा
दुरावा दूर करते,
ओढ ही किमया तुझी
क्षणाला युग भासते,
भेट व्हावी तुझी
अशा या विरहा वेळी,
एक होऊनि दोघे
दुःख संपवू सगळी,
विश्व माझे सगळे
तुझ्यात म्हणे ही ओढ,
जगेन श्वास बनवून तुला
तोडुनी जगाचा दोर,
असह्य विरह हा
अश्रू ते संपले
पाऊले थकले दोन्ही
परी ओढीने तुझ्याकडे
ओढले……
पीक अश्रुंचे
अश्रुंचे दाणे विरहाच्या
मातीत नकळत पेरले जातात ,
कष्ठांचे ढग अन घामाच्या
पावसात अंकुरतात,….
एक एक क्षणाचे मोल
वेचून मातीवर डोकावतात,…
जुन्या जखमेने रोज
नव्या जोशाने वाढतात,….
सूर्याची ती उबदार किरणं
हिरवेगार अन भावुक
करुनि जातात,….
जगाला विसरुनी
वाढता वाढता
जगावर राज्य करतात….
एका विरहाने तेच जगाला
गोडवा देऊन
हृदयात तीच बीज
पेरूनी जातात…..
निराशा
मनातले शब्द बोलण्यात ना आले
चालण्यात माझे अस्तित्व संपले ..
परिस्तिती समोर हातश मी होऊन
स्वप्न मी माझे पुसले ..
खूप बोलवसं वाटत कधी
धनाचे आकर्षण माझ्याकडे ना चमकले
आणि मी ही बोलणे सोडले ..
अकर्षणा शिवाय साथ देईल
असा हात नाही उमगला
आणि मी ही माझा मार्ग शोधला ..
रंगवला होता आकाश सारा
पण सारेच स्वप्न ते ,
वास्तवाने दिला चटका आणि
स्वप्न ही पाहणे सोडले..
सर्वस्त केले उद्ध्वस्त मी
तुलनाच संपली मागण्याची
कारण ही बोलकी सारी
निष्कारण माझ्या जगण्याची ……
एकटाच
हल्ली मी एकटा एकटा रमतो
मनातल्या काहोराला
समुद्रकिनारी शांत करतो…
ना कोणाच्या शोधात
ना कोणी हवं आहे.,
मी नव्याने पाहिलं मला
माझ्यात काही आज नवं आहे…..
मी संपलो नाही अजून
अंत माझा दिसत आहे.,
रोज नव्याने करतो सुरुवात
अंत माझा फसत आहे….
हल्ली मला हसू नाही येत
आयुष्य हे डसत आहे…
आशेची मात्रा लावून
मी माझ्यात रमत आहे…
हल्ली मी माझ्यात रमतो
माझ्यात काही नवं आहे…,
जग नकोस झालं सारं
आणि मी मलाच हवा आहे…..
हे ही वाचून घ्या