Marathi friendship kavita मैत्री कविता मराठी.
Marathi Poem On Friendship एक नातं मैत्रीचं ह्या कवितेत मैत्रीचा खरा अर्थ बोध होतो,आयुष्यात सगळ्यात नात्यांमधील एक महत्वाचं नातं म्हणजे मैत्री.सगळे भेदभाव जिथे संपून जातात अशा ठिकाणी मैत्री जन्म घेते.असे हे निस्वार्थ नातं आम्ही या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
एक नातं मैत्रीचं
मुलगा मुलगी आले म्हणजे
प्रेमच असावं अस काही नसतं
म्हणतात ना प्रेमाच्याही पलीकडे
एक मैत्रीचं नातं असतं
जात धर्म भाषा जुळावी
त्यात अस ही काही नसतं
बुडत्यावेली आधाराला जे नातं असतं
सर्वानुमते या नात्याला मैत्री हे नाव बसत
सोबत च रहावे सोबत च फिरावे
त्यात अस ही काही नसतं
सुखदुःखात साथीला मात्र
जे खंबीरपणे असतं
सर्वानुमते या नात्याला मैत्री हे नाव बसत
लहान,मोठा,स्त्री,पुरुष,
याला वयाच बंधन नसतं
पैसा, प्रसिध्दी समान असावी
अस ही काही नसतं
हृदयामध्ये या नात्याला
एक विशिष्ट स्थान असतं
सर्वानुमते या नात्याला मैत्री हे नाव बसत
देवा आता एक दान दे
प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री नावाचं वान दे
प्रत्येकाच्या मैत्रीला मात्र आयुष्य फार छान दे
मैत्री म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं
मी तुझा लाडका भाऊ तू माझी लाडकी बहिण असच काही असतं
सर्वानुमते या नात्याला मैत्री हे नाव बसत.
ही कविता गावातील आपुलकी,प्रेम,जिव्हाळा,सुख,शांती,समाधान,जीवन,हे खरं गावाकडे आहे हे दाखवते.आणि त्यात जर तुमचं गाव कोकणात येत असेल तर स्वर्गाहून सुंदर .जगभरातील अनेक सुंदर पर्यटन स्थलाना ही मागे टाकेल असे सौंदर्य असणारा कोकण आणि त्यातील गाव.
माझ कोकणच गाव
सुखा समाधानाने भरलेली नाव
म्हणजे माझ्या कोकण च गाव
शहराच्या वर्दली मध्ये माणुसकी शिल्लक आहे का ?
राम राम पाव्हणं कसा गेला दिवस
विचारणार कोणी आहे का ?
गावी मात्र चटणी आणि मीठ भाकर
प्रत्येकाच्या नशिबी आहे समाधानाची ढेकर
आता वेड्या तूच ठरव
तुला कशाची हाव
आता म्हणशील शहर शहर
कष्ट करशील रात्रंदिवस
घेशील मोठे बंगले गाडी
सारं काही नव नव
म्हातारपणाच्या काठीला मात्र
विश्रांतीसाठी गाव च हवं
शहर देईल पैसा पाणी
मोठ करेल तुझ नाव
याच्या तुलनेत तोलशिल का
गाव च्या समाधाना च भाव
आम्हीही आता शहरातच रे
बालपण मात्र गावी गेलं
शरीर फक्त शहरी आल
मन मात्र गावीच राहील
जगण्यासाठीच्या धडपडीत
खर जगणं गावीच राहील
आता हे सार गाऱ्हाणं कोणापुढे मांडावं
पुन्हा कधी भेटेल गाव
इथे कोणालाच नाही ठाव
शुभम जाधव
हे ही वाचा