marathi poem on life
marathi poem on life मनाला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत त्यातलं प्रभावी उपाय म्हणजे वाचन आणि त्या वाचनात जर कविता तुम्हाला आवडत असतील तर ही तुमच्या साठी मेजवानी आहेत . आयुष्याचे किती पैलू आहेत ,जन्म ,आयुष्य ,बालपण,तारुण्य ,नाती,असे अनेक पैलू तुम्हाला marathi poem मध्ये अनुभवायला मिळतील .
एक उन्हाळा असाही
शनिवारी शाळेतून येता
Plan आमचे व्हायचे,
उद्या काय अ्न
कोठे कोठे जायचे…..,
सगळ्यात जवळ होती
करवंद,
गोडच जमा करायची
हाच छंद….,
उन्हातून पावलं वळायची
आंब्याकडे,
पाडायची मज्जा पण
खायचे थोडे….,
तिकडे दूरवर जांभळं
वाट पहायची,
कोणी खाल्ली जास्त
जिभेवरून कळायची….,
काजू खायला आणि
बिया खेळायला..,
मज्जाच वेगळी त्या
चोरून आणायला…,
हाताला माती ओरघळणारा
आंब्याचा रस,
खाताना व्हायचो त्यातही
समरस….,
चिंचा ही दिसायच्या
दूर दूर,
त्याही जवळ करून
थांबवला जिभेचा पूर….,
चार वाजले की मग खेळायला
कोण कोण येणार,
जो नाही येणार त्याला रात्री
पळापळी ला नाही घेणार….,
लहान व्हायचं आहे मला
papermint ची डोक्यावर
घेऊन गोळी
देईन मुंगीला टाळी
एवढं लहान व्हायचंय मला….,
लहान व्हायचंय मला
पावसाच्या थेंबाने होईल
अंघोळ,
वेलींवर घसरगुंडीचा मांडेन खेळ
एवढं लहान व्हायचंय मला….,
लहान व्हायचंय मला
फुलपाखरू बनून झुळुकेवर
उडेन,
गवताच्या पाती आड दडेन,
एवढं लहान व्हायचंय मला…,
लहान व्हायचंय मला,
फुलातील मध चाखेन
पाण्यावरही तरंगेन,
एवढं लहान व्हायचंय मला…,
लहान व्हायचंय मला
छिद्र ही पुरेसा बागडण्याला
दोन दिन पुरे जगण्याला
एवढं लहान व्हायचंय मला….
लहान व्हायचंय मला
पानाच्या काठावर अंथरूण,
फुलाची पाकळी पांघरून,
एक दवबिंदू ओलेचिंब करेल
एवढं लहान व्हायचंय मला……
मोठं व्हायचंय मला
गरिबीतही दुःखी नाही,
श्रीमंतीत माज नाही,
एवढं मोठं व्हायचंय मला………
मोठं व्हायचंय मला
आई बाबांची वाटणार नाही
लाज,
शक्य ती मदत करणं होईल
साज,
एवढं मोठं व्हायचंय मला……..
मोठं व्हायचंय मला
चिमुकल्या जीवांचाही
करता येईल आदर,
देहाचीही जमेल कदर,
एवढं मोठं व्हायचंय मला…….
मोठं व्हायचंय मला
सगळ्यांच्या दुःखांवरती,
येईल माझ्या अश्रूंच्या
सागराला भरती ,
एवढं मोठं व्हायचंय मला…….
मोठं व्हायचंय मला
न मागताही देव देईल,
उष्ठी बोरं श्रीराम खाईल,
एवढं मोठं व्हायचंय मला……..
मोठं व्हायचंय मला
आभाळही वाटेल कणभर,
राजाच वाटेन क्षणभर,
एवढं मोठं व्हायचंय मला……..
अस्तित्व ते किती
तुटणारा तारा मी
अस्तित्व माझे ते क्षणिक
स्वतंत्र मजला नभाची पोकळी
हास्य ते माझे किती ……,
तुटून कोसळेल ध्येयावरी
ठसा उठवेन कष्ठांचा
तुटूनही हसतो हास्य खोटे
दुःख ते माझे किती ……,
अपमान करी मज
ठिणगी सम् मार्गस्थ
होण्या बळ देई
विझणे ते माझे किती ……,
रोजचाच प्रवास माझा
अन् बदलते प्रवासी
न विसावता पोहचेन
थांबणे ते माझे किती …..,
श्वास थांबण्या आधी
त्यात विसावू पाहतो
थांबता श्वास सुगंधासम् कीर्ती
श्वासाविना हृदय ते माझे किती ……,
क्षण यावा असा क्षणात
इंद्रधनू प्रगटावे
लक्ष अवघ्यांचे वेधून
एकसाथ रंगानी घ्यावे ,
सात रंगानी त्या साथ अशी घालावी
की जग सारे एकसाथ व्हावे……,
एका क्षणी तेजोमय सूर्य बनावे
दुःखाच्या डोंगरा आडून नव्याने जगावे,
सोनेरी किरणांनी आयुष्य हे परिस व्हावे
स्पर्श होताच परीसाचा विश्व सुवर्णमय व्हावे,
एका क्षणी इच्छा मेघ बनण्याची
गरज ज्याला तिथे बरसण्याची,
तहानलेल्याना तृप्त करण्याची
तापलेल्यानां विसावण्याची,
रडणाऱ्याच्या गालावर उडी मारून
खुदकन हसवण्याची,
एक संधी मिळावी नदी बनण्याची
धबधब्या सारखं प्रश्नांवर तुटून
पडण्याची,
भूतकाळातील प्रत्येक खड्डा
भरून काढण्याची,
वर्तमान काळ भरून वाहण्याची,
दुष्काळी भविष्याला धडक देण्याची ,
एक संधी मिळावी………….
-ranjit shinde
marathi poem on life आयुष्य मराठी कविता
Marathi kavita on life आयुष्य मराठी कविता प्रत्येकाचा जन्म जरी सारखा असला ,शरीर जरी सारखे असले तरी ते असे पर्यंत जगण्याचे आणि जगण्यासाठी होणारी हालचाल, प्रयत्न,धडपड ही वेगवेगळी असते .
ती धडपड दाखवणारी Marathi kavita on life आयुष्य मराठी कविता.
चार पाऊले
चार पाऊलं “स्व”सिद्धतेची
चार दिशेने सुख दुःखाच्या
चार क्षणाला येरझारा
लाचार प्रसिद्धी
साचार विचार
आचार सांगण्या
खटाटोप प्रचार…..
संचार “मी”चा
अभिमानी उच्चार
सदाचार मुखवटा
खोटा पाहुणचार…..
चार खांदे उचलून
घोष दिवस चार
चारचौघे गोड अवघे
दिवस फक्त चार…..
सुविचार चार वाचण्या
गोड गोड फार
मन लाचार वाचून
तरी कोण तो काय उपचार….
———————————————————————————————————————————————–
दूर दूर स्वतःहा पासुनी
दूर दूर स्वतःपासून
सुख ना भेटले
दूर दूर गर्दीत कुठे
व्यर्थ वणवे पेटले…..
दूर दूर स्वतःपासून
स्वप्न अंधळे नटले
दूर दूर नेण्या सगळे
स्तुतिसहित झटले…..
दूर दूर जवळी तरी
पोहचलो कधी ना तिजोरी
तारुण्याची मानुन मज्जा
गुंतोंन मानसिकतेचे भोवरी…..
दूर दूर रसा पासून
तळाशी गेले जगणे
दूर दूर चवी पासुनी
लाळेने अशेवरी ठेविले…..
दूर दूर जीवनापासून
मज्जेत काळ लोटला
दूर दूर मुळापासून
उंचजाण्या दूर दूर झटला…..
दूर दूर एका पासून
दुसरे भोवती दाटले
मी ना झालो कधी माझा
दुसरेही माझेच वाटले…..
————————————————————————————————————————————————
धडपड
घरट्यात भुकेले जीव
चोच शोधीती घास
जाळयात तडफडत माय
चोचीत घेऊन श्वास
पंखांची फडफड सारी
गाठी पिल्लांमधील सुख
नजरेत अवघे विश्व भासे
आली माय ,न आल्याचे दुःख
वाट पाहून भूकही
आल्या पाऊली निघून गेली
चिवचिव करण्या त्राण नाही
माय ही येता येता निघून गेली
जीव होऊन पोरटे
नीज ही येऊन कायमचे ,
ओसाड शांत ते झाले घरटे
नियती मिरवीत झेंडे बदलाचे.
———————————————————————————————————————————————-
बदल
कुणा ओठी हास्य फुलते
पहिल्या मोकळ्या श्वासाचे,
नेत्री कुणाच्या अश्रू भरते
अखेर निरोपाचे…..
लढा कोणाचा हक्काच्या
श्वासाशी ,
मृत्यू कवटाळत झटपट
सारी भुकेच्या शापासी…..,
जन्म कठीण मृत्यू
सहज कवटाळी,
जठराग्नी पोटी अन
हृदय भीतीने जाळी……
दाही दिशी वर्षाव
फक्त संकटांचा,
भोगणे कणखरतेने
सारा हिशोब कर्मांचा…….
____________________________
रत्नपेठी
आयुष्या इतकं कठीण
आयुष्या एवढं सोपं काहीच नाही
आयुष्या इतकं कुरूप
आयुष्या इतकं सुंदर काहीच नाही
आयुष्या इतकं दुर्गंधी
आयुष्या एवढं सुगंधी काहीच नाही
आयुष्या इतकी गुंतागुंत
आयुष्या एवढं सरळ काहीच नाही
आयुष्या इतकं बेरंग
आयुष्या एवढं रंगबिरंगी काहीच नाही
आयुष्या इतकं दुःख ,पण
आयुष्या एवढं सुख कशात नाही
आयुष्या सारख प्रश्न
आयुष्या सारख उत्तर नाही
आयुष्यात एवढं मरणं
आयुष्या इतकं जगणं नाही
आयुष्या इतकी धावपळ
आयुष्या एवढी स्थिरता कुठे नाही
आयुष्या इतकी थकान, पण
आयुष्या एवढी विश्रांती नाही
आयुष्या इतकं दारिद्र्य
आयुष्या एवढी श्रीमंती कोणती नाही
-रंजीत शिंदे
आयुष्यास माझ्या
कितीदा ओतले शब्द
परी अंकुर नाही फुटले
कितीदा तापलो सुर्यापरी
ते नाही किरणांकडे वळले ……
तरी
मला काय हवं हे आयुष्यास
कधीच नाही कळले……..,
कधी जपले क्षण
वेळेसम झिजलो
परी ते नाही दरवळले….,
तरी
मला काय हवं हे आयुष्यास
कधीच नाही कळले……..,
ध्येय जरी गगनासम्
परिस्थिती पायी
पाय परती वळले…..,
तरी
मला काय हवं हे आयुष्यास
कधीच नाही कळले……
सोडून सारे विश्व
माझ्यात मी पाहिले….,
बदलून स्वतःस मी
दुःख हास्यात वाहिले……,
तरी
मला काय हवं हे आयुष्यास
कधीच नाही कळले……..,
काळ खूप मोठा कलाकार आहे खूप वेगात तो आपला खेळ बदलतो आणि संपवतो हाच काळ प्रत्येकासाठी सारखाच नसतो ,कोणाला सुख तर कोणाला दुःख ,ह्या काळाच्या अकलनिय बाजू आहेत आणि त्या दाखवण्याचा आम्ही प्रयत्न Marathi Kavita काळ कलाकार कवितेतून केला आहे.
मराठी कविता ‘”काळ कलाकार”
कोणाचा वाढदिवस
कोणास श्रद्धांजली
काळाची ही कसली
अनोखी साखळी……
कोणास पैसा
काहीच नाही
कोणासाठी तोच
होतो सर्वकाही….
कोणी बुडाला
दुःखाच्या डोही
कोणी तरंगतो
आनंद प्रवाही…..
आहे कोणी खुश
मोजक्या आयुष्यावर….
कोणी पोहचला निर्णयी
आत्महत्येच्या टोकावर…..
काळही पालटत बाजी
कोळसाही होतो हिरा ,
चमकणाराही इथे होतो
क्षणांत मावळणारा……
काळाचे खेळ सारे
क्षणही फासे दोरे,
जिंकलो वाटताच
हे खेळ संपणारे…..
marathi kavita लहानपण
लहानपण किती सुंदर असत जे प्रत्येकाला हवेसे वाटते ,हे दाखवणारे ही कविता
लहान व्हायचं आहे मला
papermint ची डोक्यावर
घेऊन गोळी
देईन मुंगीला टाळी
एवढं लहान व्हायचंय मला….,
लहान व्हायचंय मला
पावसाच्या थेंबाने होईल
अंघोळ,
वेलींवर घसरगुंडीचा मांडेन खेळ
एवढं लहान व्हायचंय मला….,
लहान व्हायचंय मला
फुलपाखरू बनून झुळुकेवर
उडेन,
गवताच्या पाती आड दडेन,
एवढं लहान व्हायचंय मला…,
लहान व्हायचंय मला,
फुलातील मध चाखेन
पाण्यावरही तरंगेन,
एवढं लहान व्हायचंय मला…,
लहान व्हायचंय मला
छिद्र ही पुरेसा बागडण्याला
दोन दिन पुरे जगण्याला
एवढं लहान व्हायचंय मला….
लहान व्हायचंय मला
पानाच्या काठावर अंथरूण,
फुलाची पाकळी पांघरून,
एक दवबिंदू ओलेचिंब करेल
एवढं लहान व्हायचंय मला……
—————————————————————————————————————————————–
मोठं व्हायचंय मला
मोठं व्हायचंय मला
गरिबीतही दुःखी नाही,
श्रीमंतीत माज नाही,
एवढं मोठं व्हायचंय मला………
मोठं व्हायचंय मला
आई बाबांची वाटणार नाही
लाज,
शक्य ती मदत करणं होईल
साज,
एवढं मोठं व्हायचंय मला……..
मोठं व्हायचंय मला
चिमुकल्या जीवांचाही
करता येईल आदर,
देहाचीही जमेल कदर,
एवढं मोठं व्हायचंय मला…….
मोठं व्हायचंय मला
सगळ्यांच्या दुःखांवरती,
येईल माझ्या अश्रूंच्या
सागराला भरती ,
एवढं मोठं व्हायचंय मला…….
मोठं व्हायचंय मला
न मागताही देव देईल,
उष्ठी बोरं श्रीराम खाईल,
एवढं मोठं व्हायचंय मला……..
मोठं व्हायचंय मला
आभाळही वाटेल कणभर,
राजाच वाटेन क्षणभर,
एवढं मोठं व्हायचंय मला……..
_रंजीत शिंदे