marathi quotes on life आयुष्य सुंदर जगता येईल असे विचार
आयुष्याच्या अनेक बाजू आहेत प्रत्येकाच आयुष्य जगण्याची बाजू वेगळी असते मात्र सगळ्यांसाठी आयुष्य सारखंच असत . हे दाखवणारे काही विचार आम्ही marathi quotes on life मधून घेऊन आलो आहोत जे प्रत्येकाला आपलेच वाटतील .
————————————————————————
रात्र (marathi quotes on life)
* पावलांखाली चंद्राचे चांदणे
डोळ्यात काजवयाचे चमकणे
कानात रातकिडयाचे कुजबुजणे
नाकात रातराणी दरवळणे
ह्या सगळ्याना एक सोबत घेऊन
प्रवास सोपा करणारा मी मोजकाच असावा .
* पूर्ण चंद तू जरी पौर्णिमेचा
अधुरा तू तो डाग विरहाचा
शितळता जरी ती विसावणारी
एकटाच मी तरी ती सतावणारी .
आजच्या रात्रीने साकारलेल्या लखं आकाशात
चमकदार रांगोळी मधल्या चंद्र तारे ढगांचा ,वाऱ्या सरशी बदळणारा खेळ पाहून
मी हरवून गेलो , काळ वेळ निघून गेली नकळत , पण अजूनही मी मला सापडलो नाही ,
तसा प्रयत्न करावा वाटल ही नाही , कारण हे नसणं खूप काही असल्या सारखं वाटत होतं .
मनाच्या क्षितिजावरून विचारांचे थवे हळूहळू नाहीसे झाले की मग , सूर्याच्या गोळ्या प्रमाणे मन निद्रेच्या कुशीत मावळून जातं .
ब्रम्ह मुहूर्त (marathi quotes on life)
अवघे विश्व निद्रिस्त असता
अवकाशातून तेजाची बरसात
बरसते त्यात भिजून त्या तेजाचे
वाटेकरी होणारे कमीच त्यात माझाही कणभर
वाटा असावा ही माझ्या यशाची व्याख्या .
====================================================
सूर्याविण पहाट नव्हती
आज त्याच्या वीणा उजाडत आहे
सूर्यास्ता शिवाय सायंकाळ वेडी
चंद्रानेच भागवत आहे .
====================================================
Marathi quotes on life
न कळता मावळून उगवण
कोण कोणत्या भयाण जंगली
सुमन दरवळ कोमेजून
मातीला ठाव न लागता विलीन होतो
कुठेतरी मधी च्या अंशी अनोळखी त्याचे अस्तित्व
कोणाच्या मुखी लागत असते ,ही निसर्गाची
निष्कामता वाखणण्याजोगी वाटते .
====================================================
सूर्यासम जगणे
सामोरी येणाऱ्या अनेक वाटानी ,
टोचणाऱ्या पायीच्या काटयांनी ,
क्षणोक्षणी रोखणाऱ्या ठेचानी ,
सामर्थ्य वाढवणाऱ्या संकटाणी ,
अनेकदा रोखून पाहिल ,
पण रोखणं क्षणिक ठरल
आणि तो पुन्हा तेजाळून निघाला .
====================================================
भक्ति
भक्तीगीत सुरेल गाऊन भक्ति कळत नसते
हृदयातील धडधड सारी कृष्ण कृष्ण व्हावी लागते .
====================================================
प्रेम
तुझ्या हृदयाच्या कोपऱ्यात नेहमी मी वसते
हृदयातून तुटलेला तारा मीच पाहिला पाहते
हृदयातून प्रेमाच्या छेडते मी तारा
जणू आकाशातून पडणाऱ्या मंद मंद गारा .
====================================================
एकांत
एकांतात मिसळून मी
रातीत अंधाऱ्या उजळलो
एकाने प्रकाशित मी दाट दुखातून उगवलो .
====================================================
बहीण भावंड
बालपणीच्या प्रत्येक गुणात आणि
बालपणीच्या प्रत्येक गुन्ह्यात
वाटेकरी असणारी
बोलेन मी वागा तशी सक्ती
मी , हर्षद , हृषी
आणि ही जशी मुक्ती .
====================================================
सखा श्रीहरी
रातहि हवीशी वाटे मना |
तिमिराचे भय मज वाटेना |
प्रेम मजवरी त्या आनंताचे |
भय राती डोळ्यात तोची साचे ||
====================================================
एक प्रवास
बाइक वर प्रवास करताना अचानक पाखरासोबत
सुरू झालेली शर्यत मी अजून पर्यन्त जिंकलो नाही
पण हारण्याचा याआधी असा आनंद कधीच झाला नाही .
====================================================
मोल
आपली किंमत एखाद्या रत्न पेक्षा कमी नसते ,
फक्त आपण ज्याला किंमत नाही त्याच्या संगतीत जाऊन
ती कमी करतो .
====================================================
प्रवास आयुष्याचा
प्रवासात पावलांची मागे पुढे होणारी धडपड सारी , दोन पावलांमधील अंतराचे सारखेपण , चालण्याचा वेग , चालताना बदळणारी दिशा , वेळोवेळी तोल जाताना साधला जाणारा समतोल , हेवेत हलणारे हात करत असतात . आता पर्यन्त प्रवास म्हटल की पावल दिसतात ,हातांचा हात त्यात दिसत नाही , माणसांच्या बाबतीत ही अनेकदा हेच होतं .
====================================================
दृष्टी
काळाच्या ओघात माणसं ,डोळ्यांपेक्षा जास्त
कॅमेऱ्याने पाहायला लागलीत , जसे विचार तशी दृष्टी ,
जशी कॅमेऱ्याची quality तसे तुमचे आनंदाचे क्षण प्रत्येकाला दिसतात .
====================================================
दोघांच भांडण तिसाऱ्याचा लाभ पण तिसरा भांडणा पासून दूर राहिला तर .
=============================================
=======
* काळाचा क्रम सोडून जबाबदारी जेव्हा आपल्या वाटेत उभी ठाकते
तेव्हा प्रवासाचा वेग स्थिरावतो .
* माणसं जवळ येतात अंदाजे ओळखतात आणि दुरावतात म्हणून नेहमी हसत राहायच .
* जो हसला तो मी होतो , परिस्थिति रडकी होती , नव्याने उभारला तो मी होतो ,निराशा मस्तकी भार होती .
* ओठांमध्ये दु:ख दाबले ,की मनातली वादळे शांत होऊन , डोळ्यात अश्रु सुकून जातात ,मग डोळ्यात दिसलेली स्वप्न, हृदय सत्यात उतरायला सुरुवात करते.
* माणसाची धाव निराळी ,खेळ निराळा एक दिसाचा , मातीत उतरून सारा दरारा , वाहून आवरे क्षणात पसारा .
* “मी ही तसं केलं तर कसं होणार”ही वाक्य आयुष्यात खूप गोष्टींवर नियंत्रण मिळवून देते .
* शांत राहतोय कारण आता एकच लक्ष आहे ,आपल स्वप्न पूर्ण करायच ,बाकीच नंतर बघू .
* दिखावा बंद झाला की माणूस पुढे पुढे दिसत नाही ,तरीही त्याला पाहून माणसं आकर्षित होतात .
*जेवढी लोकं माझ्या पासून दुरावून जी पोकळी निर्माण झाली , ती मी सप्तरंग भरून सुंदर बनवली .
हे ही वाचा – प्रेरणादायी कविता
Top 100+ Marathi Quotes On Life आयुष्य हे क्षणोक्षणी बदलणारे असते त्या प्रमाणे आपल्याला ही बदलाव लागतं आणि बदलताना माणूस जे धडे शिकतो त्याच वर्णन ही सुखावणारा असतो ही दाखवण्याचा प्रयत्न आम्ही ह्या Top 100+ Marathi Quotes On Life मध्ये केला आहे जो तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यात अनुभवल असेल .
Top 100+ Marathi Quotes On Life :
1) ह्या मार्गावरचा प्रवास खूप सुखद असतो ,
फक्त ह्या मार्गावर आयुष्याची गाडी
आणता यायला पाहिजे
2) हिरवं सामर्थ्य झटकून
सोनेरी सौदर्य चढवून
पान हवे सरशी निघून
आपल्या परतीच्या वाटेवर उभी राहिली
म्हणजेच झाडाची संधीच नव्यासाठी ..
3) खिडकीतून आत येणाऱ्या येणाऱ्या किरणांमुळे
जर घरातील धूल चमकत असेल , तर खिडकीतून
बाहेर दिसणाऱ्या अंधारामुळे अंतराळातील धूळ चमकते .
4) पावसाच्या धारे सारखं लखं व्हावं
सगळ्यांवर सारखंच बरसून त्यांचाच होऊन
अलगत वाहून जावं .
5) सकाळी लवकर शाळेत जाऊन केलेली शेकोटी
आणि नंतर गुरुजींच्या छडीचा मार , दोघांमध्ये ही वेगळीच ऊब होती
थंडी उडून जायची .
6) मी स्वतः वर खूप खुश असतो कारणं असं काहीच नाही आहे
जे मला हवं होत आणि त्यासाठी मी प्रयत्न केला नाही .
7) नात्यात अपेक्षांच्या गुंनात्यात गुंतून दुखी राहण्यापेक्षा
समंजसपानाच्या स्वातंत्र्यात नात्याला बागडू द्यावं
म्हणजे त्याचा आनंद दोघांनाही मिळतो .
8) लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमधून क्षणार्धात तुटून जाणारा तारा पुन्हा मागे वळून पाहत नाही पण जाताना एका क्षणात अंधाराची सुंदरता वाढवून जातो .
9) आयुष्याचा चित्रपट साकारताना script आणि रंगमंच आपला आपण उभारलेला असेल तर जगण्याचा अभिनय अजरामर असतो .
10 ) पाण्यावरील हवेच्या वाट्याला आलेले तरंग पाहताना
सूर्यही त्यात बुडून जातो अशी सांजवेळ घर गाटणाऱ्या पक्षांच्या
रोज वाट्याला येते त्याचा पुरावा रोज मी असतो .
आयुष्य हे प्रत्येकाला बेरंग मिळत आणि कमी जनाना ते रंगेबेरंगी बनवता येतं .
श्वास आणि शरीर यांची साथ म्हणजे आयुष्य .