10+marathi story मराठी कथा

10+marathi story मराठी कथा 

मराठी बोधकथा marathi story सारांश – आयुष्यात आपल्याला यशस्वी व्हायच असेल तर पहिले त्याला लागतं ते स्वतः जवळ चा स्वतःशी असलेला प्रामाणिकपणा , स्वतःला शिस्त लावली तर अर्ध यश आपल्या बाजूने आलेल असतं , आपल्या सवयीच आपल्या यशाच्या आड येत असतात , त्या बाजूला करण खूप गरजेच असत. आयुषात अनेक चढउतार येत असतात त्यावर मात करण्यासाठी माणसाला कोणत्या तरी उदहरणातून प्रेरणा घ्यावी लागते त्यासाठी आम्ही मराठी कथा marathi story घेऊन आलो आहोत .

  • वाईट सवयींचा त्याग 
  • माय लेकराचं नातं 
  • लाख मोलाचं आयुष्य 
  • मोठेपणा 
  • जशी दृष्टी तशी सृष्टिmarathi story

Image By freepik

  • वाईट सवयींचा त्याग marathi story

गुरु त्यांच्या शिष्या सोबत एका वनामध्ये राहत होते. गुरु त्यांच्या शिष्या सोबत जंगलात फिरत होते .गुरूंनी शिष्याला पुढे चालायला सांगून ते त्याच्या मागून चालत होते, चालता चालता त्यांना वाटेत एक फुट उंचीचे एक रोपटे दिसले, ते गुरूने शिष्याला उपटून वाटेतून बाजूला फेकण्यास सांगितले , गुरूंची आज्ञा स्वीकारून शिष्याने ते रोपटे सहज उपटून बाजूला टाकले. आणि ते पुढे वाटचाल करू लागले , थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना वाटेत पुन्हा एक रोपट दिसल आता ते रोपट पहिल्या रोपट्या पेक्षा थोड मोठं म्हणजे सहा फुट उंच होतं , पुन्हा गुरूंनी शिष्याला आज्ञा केली की हे ही रोपट आपल्या वाटेतून बाजूला कर ,पुन्हा शिष्याने गुरुची आज्ञा स्वीकारून ते रोपट उपटून बाजूला केले पण ते उपटण्याकरीता पहिल्या पेक्षा जास्त बळ लावावा लागला .पुन्हा थोडं पुढे गेल्या नंतर गुरु आणि शिष्य एका मोठ्या झाडाजवळ आले आणि थांबले , पुन्हा गुरु म्हणाले की आता हे ही झाड आपल्या वाटेतून बाजूला कर तेव्हा शिष्याने झाडाकडे पाहून ही शक्य नाही होणार असे उत्तर दिले आणि शांत बसला .

बोध – तेव्हा गुरूंनी स्मित हास्य करत त्याला उपदेश केला , की आपण जेव्हा वाईट कर्माला सुरुवात करतो तेव्हा ए लहान असते , त्याला आपण सहज बाजूला करू शकतो आपल्या आयुष्याच्या वाटेतून , पण त्या वाईट कर्मात आपण खोलवर गुंतून गेलो की , त्यातून बाजूला होणं अशक्य होतं आणि आपल्या आयुष्याच्या वाटेत भळामोठा अडथळा बनून ते वाईट कर्म उभं राहत . म्हणून जो पर्यंत ते वाईट कर्म लहान आहे तो पर्यन्त ते सोडून दिलेल चांगल असतं .
हे ऐकून शिष्य पुन्हा गुरुना हात जोडून शरण गेला .


नातं माय लेकरांच (marathi story)

एक गृहस्त असतात त्यांना तबला वाद्य शिकण्याची आवड होती खूप कष्ट करून ते तबला शिकले . ते रोज आपल्या घरी रियाज करत असतं . नेहमी प्रमाणे संध्याकाळच्या वेळी रियाज करायला बसले असता, त्यांच्या घराच्या दरवाज्यात एक बकरीचा लहान पिल्लू येऊन उभं होतं , ते गृहस्त तबला वाजवे पर्यन्त ते पिल्लू तिथेच होते .
असे एक आठवडा असच घडत राहिलं , ते गृहस्त तबला वाजवायला बसले की ते बकरीचा पिल्लू धावत तिथे दरवाज्यात येऊन ते ऐकत राहायच , त्या गृहस्ताने ही चित्र महिनाभर पाहिलं आणि न राहून त्या बकरीच्या पिल्लाला जवळ जाऊन विचारलं , की तू असं का करतोस , मी तबला वाजवायला बसलो की तू धावत येऊन दरात उभा का राहतोस ? तुला ही तबल्याची भाषा कळते का ? की तुलाही तबला शिकायच आहे का ?
त्यावर ते बकरीचा पिल्लू डोळ्यात पाणी येऊन म्हणाले , की मला ही तुमची तबल्याची भाषा कळत नाही ,मला तबला शकायचा ही नाही , पण मी रोज तुमची तबला वाजवायची वाट पाहत असतो . कारण की , तुम्ही जो तबला वाजवता त्या तबल्याला जे कातडं लावलेला आहे ना ते माझ्या आईचं आहे . आणि जेव्हा तुम्ही तबला वाजवता तेव्हा ते स्वर मी ऐकतो तेव्हा मला माझी आई माझ्या जवळ बोलल्याचा भास होतो म्हणून मी रोज तुमच्या दरात तबला ऐकायला येतो .

बोध – आई आणि बाळाचं नातं आणि त्याची नाळ ही आतुट असते ते एकमेकांशीवाय जगू शकत नाहीत , बाळाच्या फक्त रडण्याने आई ला समजत की बाळाला काय झालं आहे .


लाख मोलाचे आयुष्य marathi story 

ही गोष्ट आहे संत तुकाराम महाराजांच्या काळातील .संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून आणि कीर्तनातून लोकांना मोलाचे उपदेश करत असत .
असच एकदा तुकाराम महाराज त्यांच्या घराच्या बाहेर मध्यरात्री पर्यन्त काम करत बसले होते ते जेवणाच्या पत्रावल्या झाडांच्या पानांपासून बनवत होते . ते आपल्या कामात मग्न होते .
रात्री मध्यरात्री त्यांच्या घराजवळून एक व्यक्ति अंधारात विहीरीच्या दिशेने जाताना त्यांना दिसली , त्यांनी त्या व्यक्तीला आवाज दिला आणि जवळ बोलावले ,अवढ्या रात्री तिकडे अंधारात जंगलाकडे जाण्याचे कारण त्यांनी त्या व्यक्ति ला विचारले .
त्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रु होते तिने रडत रडत संत तुकाराम महाराजांना सगळ सांगण्यास सुरुवात केली . ती म्हणाली की मला माझ आयुष्य आणि संसार नकोसा झाला आहे कारण माझ्यावर सावकारांचं कर्ज इतकं झालं आहे की त्याची फेड होणं मला शक्य नाही . ना माझ्याकडे काम ना धंदा , म्हणून मी माझी पत्नी आणि लेकर झोपली असता , मी आत्महत्या करायला जातो आहे .
संत तुकाराम महाराजांनी सर्वकाही शांत पणे ऐकल आणि म्हणाले , तू चांगला निर्णय घेतला आहेस ,चल मी पण येतो तुझ्यासोबत जीव द्यायला . आता दोघेही विहिरी जवळ आले . आणि तुकाराम महाराज म्हणले की , पहिल विहिरीत मी उडी मारेन , त्या आधी मी बनवलेल्या पत्रावल्या विहिरीत टाकतो . ते बघून ती व्यक्ति म्हणाली, महाराज हे तुम्ही काय करत आहात , ह्या पत्रावल्या तुम्ही एवढे कष्ट करून ,रात्रभर जागून बनवल्या आहेत आणि त्या एका क्षणात नष्ट का करता .
त्यावर तुकाराम महाराज म्हणाले अरे ह्या मी पत्रावल्या बनवण्याचे कष्ट तुला दिसले , पण तुझा शरीर ज्या देवाने निर्माण केले त्याचे कष्ट तुला नाही दिसले का ,की तू लगेच ते संपवण्यासाठी निघाला होतास ,तुझ्या वर तुझी मुळबाळ तुझ्यावर अवलंबून आहेत त्यांच काय होईल तो देव तुला क्षमा करेल का . हे संत तुकाराम महाराजांचे शब्द ऐकून , तुकाराम महाराजांना शरण केला , त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी नव्याने धिराणें कष्ट करायला सुरुवात केली आणि थोड्याच वर्षात सर्व कर्ज फेडून सुखी जीवन जगू लागला .
बोध – कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा उपाय नसतो . कष्ट आणि संयम यांमध्ये एवढ बल असत की कोणत्याही प्रसंगावर सहज मात करता येते .

———————————————————————————————————————————–

मोठेपणा marathi story 

एका गरूडाणे कुराणात चरत असलेल्या मेंढया च्या काळपतील एका कोकरावर झडप घातली आणि त्याला पळवून घेऊन गेलं , त्याचे धाडस आणि सामर्थ्य पाहून जंगलातले पशू पक्षी गरुडाकडे आदरयुक्त भीतीने पाहू लागले . गरुडाने पळवला त्यापेक्षा मोठं कोकरू आपण पळवल तर आपला मान सन्मान ही वाढेल ,त्याच्या इतकंच प्रतिष्ठा आपल्याला मिळेल असं डोमकावल्याला वाटू लागले , म्हणू त्याने नजर ठेऊन एका मोठ्या थोराट अशा कोकराच्या पाठीवर बसवून उचलण्याचा प्रयत्न केला . पण ते कोकरू उचळण्या अवजी डोमकावल्याचे पाय ही कोकाराच्या पाठीवरच्या लोकरात अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने केलेली धडपड ही मेंढ पालाच्या कानी पडले .

तो मेंढ पाल तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडवले व पिंजऱ्यात कैद केले , व त्याला स्वतःच्या मुलाच्या स्वाधीन केले ,मुलांनी मेंढपाळला विचारले ,बाबा ह्या पक्षाचे नाव काय हो , यावर मेंढ पाल हसत म्हणाला ,या मूर्ख पक्षाला जर तुम्ही त्याचे नाव विचारले तर तो स्वतःला गरुडा पेक्षाही श्रेष्ठ असं पक्षी म्हणून स्वतःची ओळख करून देईल , पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा भिकार डोमकावळा आहे .

तात्पर्य :काही लोकाना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते , यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सुज्ञ लोकं त्यांची पात्रता जाणून असतात . 


मराठी कथा “जशी दृष्टी तशी सृष्टि

आपल्या आयुषाची चडणघडण होत असताना संस्कार किती महत्वाचे असतात ही आपल्याला मराठी बोध कथेतून शिकता येत आशा अनेक मराठी कथा प्रचलित आहेत . अगदी महाभारत ,रामायण असो किवा संत मंडळी असो सध्या भाषेत माणसावर चांगले संस्कार घडवण्याचे प्रभावी साधन म्हणजे बोध कथा . अगदी आपल्या बालपणात आपल्याला आपल्या आई ने आपल्या आजीने देखील खूप छान छान गोष्टी सांगितल्या त्या आपल्याला आठवत असतीलच . अशीच एक मराठी कथाआम्ही आज तुमच्या समोर घेऊन आलो आहोत “जशी दृष्टी तशी सृष्टि”.
जशी दृष्टी तशी सृष्टि
भगवान श्रीकृष्णाने एकदा एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले. त्यासाठी भगवान श्रीकृष्णनी युधिष्ठिर आणि दुर्योधनाला बोलावले . त्यांनी युधिष्ठिरला बोलावून सांगितले, या यज्ञात आपल्याला एका माणसाला आहुती द्यायचा आहे.
त्यासाठी एखादा दृष्ठ दुर्जन माणूस तू आपल्या राज्यातून शोधून काढ.
आपण त्याचा बळी देऊ, त्यानंतर श्रीकृष्णांनी दुर्योधनाला बोलावले , श्रीकृष्ण त्याला म्हणाले , मी एक यज्ञ करू घातला आहे , या यज्ञात आपल्याला एका सज्जनाचा सत्कार करावयाचा आहे . तेव्हा एखादा सज्जन पवित्र माणूस शोध, आपण त्याचा यथोचित सत्कार करू.
युधिष्ठिर एका दृष्ठ माणसाच्या शोधत निघाला,आणि दुर्योधन एका सज्जन माणसाच्या शोधात निघाला .
युधिष्ठीरला त्या राज्यात एकही दृष्ठ माणूस सापडला नाही, त्याला प्रत्येक माणूस चांगलाच वाटत होता. तो श्रीकृष्णाकडे
आला व म्हणाला, भगवंता !! आपल्या राज्यात कोणीही दृष्ठ नाही , आणि आपल्याला यज्ञात बळी द्यायला माणूस हवा आहे,तर तुम्ही मलाच बळी द्या , तुमचा यज्ञ तरी पार पडेल.
थोड्या वेळाने दुर्योधन आला व श्रीकृष्णांना म्हणाला, देवा!! मी खूप शोध घेतला पण आपल्या राज्यात माझ्याशीवाय एकही सज्जन माणूस आढळला नाही. तेव्हा देवा एक सज्जन म्हणून माझा सत्कार करा.
या कथेचं तात्पर्य काय तर – जशी आपली दृष्टी तशी आपल्याला सृष्टी दिसत असते.

हेही वाचा – Marathi Moral Story

100+Sad Quotes In Marathi

Leave a comment