Marathi Story | मराठी बोधकथा | Moral Stories In Marathi

Marathi Story | मराठी बोधकथा | Marathi Moral Stories

Marathi Story
Marathi Story प्रत्येकाच्या आयुष्यात कथांचा संबंध बालपणापासून असतो . लहानपणी आजीकडून गोष्ट ऐकल्याशिवाय आपण झोपत नव्हतो . आणि याच marathi katha आपल्यावर संस्कार घडवत असतात,गोष्टीमध्ये रमून जायला प्रत्येकाला आवडत. कारण प्रत्येक गोष्टीची दुनिया ही वेगळी असते ,अशा Marathi Stories ची परंपरा काळाप्रमाणे नाहीशी झाल्याची दिसून येते ,त्याच परंपरेला पुन्हा जीवंत करण्याचा हा आमचा Marathi Moral Stories मधून छोटासा प्रयत्न.


हे ही तुम्हाला आवडेल –  Motivational Quotes In Marathi प्रेरणादायी विचार 

Self Love Quotes In Marathi 

Love Quotes In Marathi प्रेमासाठी 

Birthday Wishes In Marathi


तुमची प्रश्न आणि आमची उत्तरे

1) बोधकथा म्हणजे काय?
उत्तर – बोधकथा म्हणजे असं साहित्य त्याच्यातून अर्थबोध प्राप्त होतो.मग त्या इतिहासातील किंवा पुराणातील ही असू शकतात.ज्या आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवतात.

2) बोधकथा का वाचल्या पाहिजेत ?
उत्तरं – marathi moral story ह्या वाचणं खूप महत्वाचे असते,त्याच्यातून चांगलं काही करण्याची प्रेरणा मिळत असते,

3) बोधकथांचा आयुष्यात उपयोग ?
उत्तर – आपलं चारित्र्य संपन्न आणि आरोग्यासाठी देखील ह्या बोध महत्वाच्या असतात, आपले विचार आणि आपलं व्यक्तिमत्त्व घडत असते ह्या बोधकथानी .आपलं मन प्रसन्न आणि मनाकडे येणाऱ्या विचारधारेला योग्य दिशेने वळवत त्या marathi katha असतात.

4) बोधकथा कोणी वाचव्यात ?
उत्तर – लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने बोधकथा वाचल्या पाहिजेत,बोधकथा ह्या आपल्याला,न्याय-अन्याय,नीती-अनीती,योग्य-अयोग्य,चांगलं-वाईट,सत्य-असत्य ह्यांचा निवाडा करून देत असतात,आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकासाठी आयुष्यात महत्वाच्या असतात म्हणून ह्या marathi katha प्रत्येकांनी वाचल्या पाहिजेत.


माणसातील देव

Marathi story

देव हा एकाच ठिकाणी नसून तो प्रत्येकात आहे अगदी सजीव आणि निर्जीवात ही असतो ,देव हा आपल्याला अनेकांच्या माध्यमातून मदत करत असतो फक्त आपल्याला ओळखता यायला पाहिजे हे दाखवणारी Marathi Katha .

एका निसर्गरम्य गावात एक मंदिर होते . गावकरी रोज मंदिरात जात असत ,मंदिरात एक पुजारी होता तो रोज देवाची पूजा करत असे . मंदिराच्या बाजूने एक नदी वाहत होती ,एक वर्षी त्या नदीला मुसळधार पावसाने पुर आला . संपूर्ण गावात पुराचे पाणी घुसले ,सर्व गावकऱ्यांना सुरक्षित जागी नेण्यात आले,पण मंदिरातील पुजारी काही जायला तयार नव्हते,पाणी गुडघ्या पर्यन्त आले होते ,पहिले त्यांना न्यायला जीप आली होती पण तो पुजारी गेला नाही ,तो म्हणाला,”माझा देव मला वाचवायला येईल ,पाणी वाढल्यानंतर तिथे एक बोट आली ,बोटीतील लोक त्या पूजाऱ्याला न्यायला आले,पुन्हा त्यांनी यायला नकार दिला .म्हणाला माझा देव येईल मला वाचवायला,. लोक तिथून निघून गेली . आता पाणी एवढ वाढल की पूजाऱ्याला मंदिरावर चढाव लागलं . थोड्यावेळाने मंदिराच्या वरुण हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले. पण पुन्हा पूजऱ्याचे उत्तर तेच होते . शेवटी पुर अजून वाढत गेलं आणि त्या पूजाऱ्याला आपला जीव गमवावा लागला . पुढे स्वर्गात गेल्यावर त्या पूजाऱ्याने देवाला विचारल की मी पूजा करून आणि तुझा धावा करूनही मला वाचवल का नाही ,तेव्हा देवाने सांगितल की पहिलं मी जीप मधून आलो ,नंतर मी तुझ्यासाठी बोट घेऊन आलो,आणि तिसऱ्या वेळेला मी हेलिकॉप्टर घेऊन तुझ्यासाठी आलो पण तूच नकार दिला. तू मला ओळखले नाही ,देव काय प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही , तो माणसात शोधावा लागतो .
बोध : देव हा माणसात शोधायचा असतो .


विश्वास

marathi story

आयुष्यात जे काही आपण करतो त्यात विश्वास हा खूप महत्वाचा असतो . त्याच प्रमाणे आपण जय गुरूंचे चरण पकडले त्यावर आपलं विश्वास आपला हित करतो असतो ,आणि अविश्वास आपला अनहित करतो हे ह्या Marathi Story मधून कळून येते.

एकदा एका आश्रमात गुरु आपल्या शिष्या ना मार्गदर्शन करत होते कीर्तनाच्या माध्यमातून . कीर्तन संपले ,आणि आता प्रसादाची वेळ होती ,गुरुने प्रत्येक शिष्याच्या हातात एक एक दगड दिला . आणि शिष्याना आपापल्या घरी जायला सांगितले ,शिष्याना घरी जाताना वाटेत त्याच्या गुरु बद्दल अविश्वास निर्माण झाला आणि आपापसात बोलू लागले ,की एवढ कीर्तन ऐकून मिळालं काय तर हे दगड ,आणि असं बोलून त्यानि दगड नदीमध्ये फेकून दिले ,पण त्यामध्ये एक शिष्य असा होता ज्याचा गुरु वर पूर्ण विश्वास होता त्याने तो दगड आपल्या घरी घेऊन गेलं आणि गुरुनी दिलेला प्रसाद म्हणून आपल्या मंदिरात ठेवला ,दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं आयुष्य बदलून गेले होते घरातील सगळ्या लोखंडी वस्तु सोन्यामद्धे बदलल्या होत्या . त्याला कळून चुकल होतं काय झालं आहे ते ,ही बातमी बघता बघता गावात पसरली . सर्व शिष्य येऊन त्याला विचारू लागले हे कसे झाले तेव्हा त्यांनी सांगितल रात्री कीर्तन संपल्यावर आपल्या गुरुनी जो दगड दिला त्यानेच हे सारे झाले आहे . कारण तो साधा दगड नव्हता तर तो परिस होता ,आणि तुम्ही तो अविश्वासाने नदीत फेकून दिला ,पण मी विश्वासाने तोच दगड घरी घेऊन आलो . हे ऐकून सगळे शिष्य पुन्हा त्या नदी मध्ये रात्री फेकलेला दगड शोधायला गेले पण काही त्यांना सापडलं नाही . म्हणून विश्वास गेला की तो पुन्हा मिळत नाही ,आणि विश्वास असेल तर आयुष्य बदलून जातं .
बोध – गुरुवर नेहमी विश्वास ठेवला पाहिजे त्यातच शिष्याचा हित असतं .


एकाग्रता

Marathi Story

कोणतही काम करताना त्यावर आपण एकाग्र नसू तर आपल्याला ते काम यशस्वी रित्या साध्य करता येत नाही . म्हणून आपल्या ध्येयावर एकाग्र होणं गरजेच आहे हे दाखवणारी Marathi Moral Story .

गुरु द्रोनाचाऱ्यांच्या आश्रमात काही शिष्य धनुर्विद्या शिकत होते खूप दिवस प्रशिक्षण घेतल्यावर ,गुरुनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. सर्व शिष्याना एकत्र बोलवून त्यांना सांगितले की आज तुमची परीक्षा आहे ,चल माझ्या सोबत गुरु सर्व शिष्याना घेऊन जंगलात एका आंब्याच्या झाडाखाली घेऊन आले . आणि म्हणाले तुम्हाला ह्या झाडावरच्या पोपटाचा डोळा फोडायचा आहे जो कोणी त्या पोपटाचा डोळा छेद करेल तो माझा सर्वश्रेष्ठ शिष्य असेल . गुरु एकएकला समोर येऊन ध्येयावर नेम धरायला सांगितले आणि त्या शिष्याला विचारल आता मला सांग ,”तुला या झाडावर काय दिसत आहे,तेव्हा तो शिष्य म्हणाला,मला हे झाड दिसत आहे,झाडाच्या फांद्या दिसतात,झाडावर फळ दिसतात आणि तो पोपटही दिसत आहे ,हे ऐकल्यावर गुरुनी त्या शिष्याला धनुष्य खाली ठेवायला सांगितले. दुसऱ्या शिष्याला बोलवले त्याचे ही उत्तर सारखेच होते अशा सगळ्या शिष्यनि हेच उत्तर दिले . शेवटचा शिष्य होता त्याला गुरुनी नेम धरायला सांगितले आणि विचारल आता सांग तुला काय दिसत आहे . तेव्हा त्याचे उत्तर होते मला काहीच दिसत नाही मला फक्त त्या पोपटाचा डोळा दिसत आहे . आणि गुरूना आनंद झालं आणि त्याला बाण सोडायला सांगितल आणि त्या शिष्याने बाण सोडला आणि पोपटच्या डोळ्याचा छेद केला तो शिष्य अर्जुन होता. अर्जुन परीक्षेत पास झाला होता . गुरुनी सर्व शिष्याला उपदेश केला की जोपर्यन्त तुम्ही एकाग्र होतं नाही तो पर्यन्त तुम्हाला ध्येय साध्य होणार नाही .
बोध – कोणताही काम करताना एकाग्रता असेल तर यश नक्की मिळत .


खरा भक्त कोण

भक्ति प्रत्येकजण करत असतो पण भक्ति करण्याचा प्रत्येकाचा हेतु काय सारखाच नसतो. प्रत्येकजण फक्त मी श्रेष्ठ भक्त हेच दाखवत असतो . प्रत्येकचा भाव ओळखणारा देव असतो हे दाखवणारी Moral Story In Marathi ही सर्वानाच आवडेल .

   एकदा नारदमुनी महाविष्णु कडे आले आणि त्यांना म्हणाले ,की तुमचा श्रेष्ठ भक्त आहे असे तुम्ही मान्य करा. तेव्हा महाविष्णू म्हणाले,नारदा हा तुमचा भ्रम आहे,माझा श्रेष्ठ भक्त तर पृथ्वीवर आहे ,तेव्हा नारदमुनीना आश्चर्य वाटलं की,मी सारखा नाम जपत असतो तरीही महाविष्णु असे का म्हणाले,महाविष्णु ना म्हणाले की असं नाही होऊ शकत माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्ति या विश्वात कोणी नाही ,तेव्हा महाविष्णु म्हणाले,नारदा तुम्ही एक दिवस पृथ्वीवर जाऊन या तुम्हाला माझा श्रेष्ठ भक्त दिसेल ,तो एक शेतकरी आहे . तेव्हा नारदमुनी हे पृथ्वीवर आले आणि त्या शेतकाऱ्याचे निरीक्षण करू लागले . तो शेतकरी घरून शेतावर येताना देवाला नमस्कार करायचा ,जेवताना देवाला नमस्कार करायचा ,झोपताना आणि उठताना ही देवाचे स्मरण करायचा. आणि आपल्या कामावर प्रामाणिक असायचा देवाजवळ काहीच मागायचा नाही कायम देवाचा ऋणी असायचा. हे सगळ नारदमुनी पाहून महाविष्णू कडे पुन्हा आले आणि म्हणाले. भगवंता तो तर एक शेतकरी आहे आणि फक्त तो तुम्हाला नमस्कार करतो बाकी काहीच करत नाही ,मी तर तुमचं प्रत्येक क्षणाला नाम घेतो तरी,तोच का श्रेष्ठ भक्त तुम्हाला वाटतो. त्यावर विष्णु म्हणाले नारदा मी तुम्हाला एक काम सांगतो ,ते जर तुम्ही केलात तर तुम्ही माझे फक्त ,नारद मुनि तयार झाले ,विष्णुनि नारदमुनी च्या हातात एक पाण्याने भरलेला तांब्या दिला आणि म्हणाले आता तुम्ही हा तांब्या घेऊन पृथ्वीची एक प्रदक्षिणा घालायची पण अट आहे की,तांब्यातून एकही थेंब पाणी खाली पाडायचे नाही,नारदमुनी तयार झाले,आणि प्रदक्षिणा घालूनही आले,आणि तेही एकही थेंब पाणी खाली न सांडवता . नारद म्हणाले आता तरी म्हणा की मी तुमचा श्रेष्ठ भक्त आहे , तेव्हा विष्णु हसत म्हणाले,नारदा तुम्ही पाणी नाही सांडवलात पण ते पाणी घेऊन प्रदक्षिणा घालताना माझं स्मरण किती केलात ,तेव्हा नारद म्हणाले,भगवंता पाण्याकडे लक्ष असल्यामुळे मला तुमचं स्मरण करता नाही आलं ,आणि नारदमुनी खाली मान खालून उभे होते,
महाविष्णु म्हणाले आता मला तुम्हीच सांगा माझा खरा भक्त कोण तुम्ही की तो साधा सामान्य शेतकरी .
बोध – भक्तिचा दिखावा करण्यापेक्षा देवाजवळ प्रामाणिक असतो तोच खरा भक्त असतो .


ईश्वराचे अस्तित्व

ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली,आणि मानव नावाच्या अद्भुत प्राण्याची निर्मिती केली . पण मानवाची निर्मिती करताना देवाला खूप त्रास झाला. मानवाचा निर्मिती नंतर देवाचा त्रास आणखी वाढू लागला . तेव्हा ईश्वराने सर्व देवताना बोलावले आणि विचारले .
मानवाला निर्माण करून मी संकटात सापडलो आहे . मला चोवीस तास त्याच्या हाका ऐकाव्या लागतात. सतत वाटत की,मानव हा माझ्या दरवाज्यात उभा राहून तक्रार करतो असतो. त्यामुळे मला झोपही लागत नाही,काय करू ? कुठे जाऊ ? जेथे माणूस माझ्या पर्यन्त पोहचणार नाही . तेव्हा अनेक देवतानी देवाला अनेक जागा सुचवल्या . पण तिथेही माणूस पोहचेल असे ईश्वराला वाटत होते ,तेव्हा एक वृद्ध देवता आली आणि ईश्वराच्या कानात सांगितले ,की तुम्ही कुठेही लपून राहण्यापेक्षा मानवाच्या आतच रहा ,तिथे तो तुम्हाला कधीच शोधणार नाही. ईश्वराने तसेच केले आणि तो सुखी झाला .

बोध – ईश्वराचे अस्तित्व आपल्या आतच आहे,पण आपण बाहेर सगळीकडे शोधत राहतो .