मराठी प्रेरणादायी कविता motivationl poem in marathi
- नाळ निसर्गाशी
- भरारी
- हसऱ्या वेदना
- तसा मी बदललो
कवितेचा सारांश Motivational poem in marathi मराठी प्रेरणादायी कविता –आपलं आयुष्य जगत असताना अनेक स्वप्न अनेक ध्येय अनेक आशा,अपेक्षा आणि त्या पूर्ण करायला अनेक प्रयत्न करत असतो पण ते प्रयत्न करून काही प्राप्त होत नाही पण आयुष्य मात्र संपत जातं. पूर्ण आयुष्य ह्यामध्येच जाते.आणि पूर्ण जगण्याला कंटाळून जातो तेच जर निसर्गच चक्र पाहिलं तर आणि त्या चक्राप्रमाणे आपल्याला जोडून घेतलं तर आयुष्य साधं सोपं आणि सहज होऊन जातं ,निसर्गाशी नाळ जोडली की कसं वाटतं ते ह्या कवितेत आम्ही मांडण्याचा प्रयत्न मराठी प्रेरणादायी कविता motivational poem in marathi मध्ये केला आहे .
हे ही वाचा – motivational quotes in marathi
नाळ निसर्गाशी या कवितेत आपण निसर्ग कसा आपल्याला आयुष्य जगायला प्रेरित करत असतो मग निसर्गातले ऋतु असो ,दिन रात्र असो ,विजय कसा प्राप्त करायचा वाईट परिस्थितीवर हे निसर्गा पासून शिकव हे या कवितेतून कळत.
नाळ निसर्गाशी motivational poem in marathi
कड्याकपारी झऱ्यास ह्या
कसे उकल यावे,
त्या झऱ्यासम आयुष्यही
अलगद वाहून जावे….
वाहीन जिथे तिथे
माती ही जीवंत व्हावी,
कोसळेन ज्या दगडावरी
त्यालाही पाझर फुटावी…..
खळखळ हाक माझी
पक्षीही किलबिले,
मलाही हसवत मासे
अन माझ्यातही खेळे……
कधी भरुनी खड्डे
अन कधी उंचवटे,
धावता धावता भेटे
माझे नदीच रूपं प्रगटे…..
ढगांकडे डोळे माझे
माणसांकडे हात मोकळे,
अंत जवळ करिता चाले
मग समुद्रही करिन जवळे…..,
_रंजीत शिंदे
___________________________________________
कवितेचा सारांश –
पाहिलेली स्वप्न ,ठरवलेले ध्येय साधायचं असेल तर योग्य वेळ म्हणजे तारुण्य. ऊर्जा ,उत्साह ,बळ हे सगळं पुरे पूर ,ओतपोत भरलेलं तारूण्य,फक्त ह्या सगळ्याचा वापर योग्य दिशेने ,योग्य ठिकाणी केलं तर आयुष्यात काहीही करू शकतो,स्वप्न सहज पूर्ण करू शकतो,त्याच उर्जे मध्ये वाढ करणारी, तोच उत्साह वाढवणारी ही आमची कविता.
भरारी motivational poem in marathi for success
बुद्धीत उमगली दुनियादारी
मनात जिद्द घेण्या
भरारी,
वेग विजेचा
दिशा निश्चित
रक्त सळसळत
झोप किंचित,
कल्पनेत ध्येय
फुले क्षणोक्षणी,
कष्ठांच्या घोड्यांवर
सवार होऊनि,
जीवन प्रहर हा
मधला,
तारुण्य तेज
तळपला,
ज्ञानामृत प्राशोनी
कर्तृत्व कवच चढवूनि
तारुण्यपण शोभला…….
_रंजीत शिंदे
___________________________________________
कवितेचा सारांश –
जे स्वप्न आपण पहिले ते पूर्ण करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न, कष्ट करावे लागतात मग त्याच होणारा त्रास , होणाऱ्या वेदना ,आपल्यालाच शांत पणे सहन करायच्या असतात. मग कधी कधी अपयश येतील ,कधी मनासारखं नाही होणार पण त्याला कंटाळून प्रयत्न न थांबवता आशा परिस्थितीत शांत पणे आपले प्रयत्न चालू ठेवावे लागतात. कधी लोक हसतात ,कधी चेष्टा करतात,तर कधी कधी आपली वाटणारी आपल्या ह्या काळात दूर जातात ,तरी देखिल आपला मार्ग आपण सोडायचा नाही,मग त्यामार्गावर आपण कसं चालायला पाहिजे हे दाखवणारी कविता
हसऱ्या वेदना (मराठी प्रेरणादायी कविता)
काट्यांवरून चालता
मुखी हसू
पाहिलं आहे,
निखारे हाती घेता
गारवा अनुभवला आहे,
घाम गाळता कष्ठांनी
त्यात विश्रांती
पाहिली आहे,
दुरावा नात्यांचा
सुगंधा सम
स्वीकारला आहे,
ज्वालेने जळता मी
आयुष्य स्वादिष्ट
केलं आहे,
ठेच लागता एक पायी
पण चालायला
शिकलो आहे,
मध्यान्ही तप्तता झेलून
सूर्यास्ता सम
जगलो आहे,,,,
_@ranjit
marathii poem on life तसा मी बदललो
कवितेचा सारांश –
बदल हा निसर्गाचा नियम आहे ,काळाच्या ओघात सगळ्या गोष्टी बदलत असतात आणि नाही बदलल्या तर काळ वेळ त्याला बदलून टाकते ,काळ आणि वेळेने केलेला बद्दल हा सहन होणारा नसतो म्हणून माणसाने स्वतःला परिस्थिति नुसार बदलण आवश्यक असत . आणि हा बदल निसर्गप्रमाणे असावा हे दाखवणरी आमची कविता “marathii poem on life तसा मी बदललो “.
पावसाच्या सातत्य पूर्ण बरसण्याने
ओठा जसा पुरात बदलतो
तसा मी बदललो ..
घणाचे घाव सहन करून
दगड जसा बदलतो
परिस्थितीमुळे
तसा मी बदललो ..
मेणबती अग्नि ने बदलते
तसा मी बदललो ..
पानी जसा उष्ण होऊन वाफेत
बदलतो तसा मी बदललो ..
कोळसा जसा हिऱ्यात बदलतो
तसा मी बदललो ..
रडणारे ओठ हस्यात बदलतात
तसा मी बदललो ..
बीज जसे झाडात बदलते
तसा मी बदललो ..
कळी जशी फुलात बदलते
तसा मी बदललो ..
चंद्र कोर जशी पौर्णिमेत बदलते
तसा मी बदललो ..
उन्हाळा जसा पावसाळ्यात बदलतो
तसा मी बदललो ..
माती जशी आकारात बदलते
तसा मी बंदललो ..
दुख जसे सुखात बदलते
तसा मी बदललो ..
सोनं जसे अलंकारत बदलते
तसा मी बदललो ..
भांडयानुसार पानी आकारते
परिस्थिति नुसार
तसा मी बदललो ..
शुष्क माळरान जशी हिरवी शाल
पांघरते तसा मी बदललो ……
– रंजीत शिंदे