Motivational Quotes In Marathi । प्रेरणादायी कोट्स मराठी Motivational Status In Marathi
Motivational Quotes In Marathi : आयुष्य हे चढउतारांनी आणि वळनानी भरलेलं आहे.कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात की आयुष्य नकोस वाटतं निर्णय घेता येत नाही आणि काहीजण असं आयुष्य संपून टाकतात. एवढं कठीण आयुष्य होऊन बसले आहे माणसाला,ह्याला आधार काय तर ह्या सगळ्या प्रसंगावर ज्यांनी मात करून आयुष्यावर विजय मिळवला त्याचे विचार,त्याचा प्रवास ऐकणे,वाचणे.त्यामुळे आपल्याला आधार आणि उत्साह मिळत असतो जगण्यासाठी. कारण आयुष्य एकच आहे त्यात स्वतःला प्रसंगा पेक्षा भक्कम बनवता आलं पाहिजे.ते कसं तर वाचनांनी, हाच हेतू पुढे ठेवत काही विचार Motivational Quotes In Marathi मध्ये वाचायला मिळतील.ते तुम्हाला प्रेरणा देऊन,जगण्यात ऊर्जा निर्माण करतील यात आम्हाला शंका वाटत नाही.
हे ही वाचा – Self Love Quotes In Marathi
विरुद्ध किती आहेत फरक नाही पडत,ज्याची साथ आहे तो सगळ्यांना पुरून उरणारा आहे.
आयुष्याने एक गोष्ट शिकवली ,कोणाचा बदला घेण्यापेक्षा, स्वतःला बदल.त्यात खरी मजा आहे.
श्रीमंतांच्या यादीत आपलं नाव येणं गरजेचे नाही.पण माणुसकीच्या यादीत ते कुठे मागे राहता कामा नये.
वेळ प्रत्येकाची येते,मी आता कोणाला काही बोलून दाखवत नाही ,उद्या माझी परिस्थितीच सगळ्यांना उत्तर देईल.
ज्याला परिस्थिती ने रडवलं आहे.त्यांनीच उज्ज्वल भविष्य घडवलं आहे.
स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करूच नका,तुम्ही वेगळे आहात.
दुसऱ्यांसारखं बनण्याचं स्वप्न नाही,मला माझ्यासारखा बनायचं आहे.
तुम्हाला आता जास्त संकट असतील तर हार मानू नका,हीच लक्षण आहेत तुमच्या उद्याच्या यशस्वी भविष्याची.
एक चिमुकली मुंगी भिंतीवर चालताना एकदा पडते,दोनदा पडते,तिसऱ्यांदा पडते,शंभर वेळा पडून देखील हार मानत नाही आणि शेवटी भिंत पार करून जाते,म्हणून हार मानू नका.
आळस हा तुमचा शत्रू आहे.एखादी गाडी चालण्यासाठी बनली आहे,आणि ती एका जागी पडून राहिली तर सडून जाते,तसाच आळस तुमच्या बाबतीत करतो.
आयुष्य एकदाच मिळतो असं काहीतरी करा,की लोकं तुमच्या अनुपस्थितीत तुमची आठवण काढतील.
फक्त स्वतःसाठी जगायचं नाही,तुमच्यासाठी अनेक लोकं आहेत त्यांना आपला आधार होईल असं करा.
दुसऱ्यांच्या तुलनेत कमी धन कमावलं तरी चालेल, स्वतःहा रडलो आणि पडलो तरीही चालेल,पण दुसर्यांना रडवणे आणि पाडणे हे आपल्या तत्वात नसावं.
आपण नेहमी विचारवंत होऊन जगावं, लाचार होऊन आपले विचार बदलू नये .
एक अपमान होणं गरजेचे आहे त्याशिवाय आपली झोप उडत नाही,आणि जोपर्यंत जागे होतं नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही.
सल्ल्यातून शहाणपण मिळेलही पण अक्कल ही अनुभवातून मिळवावी लागते.
चमकायचं असेल तर पहिलं पेटाव लागतं.
आयुष्य पाण्यासारखं जगावं किती खड्डे आले तरी भरून वाहवं.
घरातून बाहेर पडल्याशिवाय जग कळत नसतं .
सहा महीने सगळ्यांपासून दूर रहा आणि मेहनत करा एकही क्षण वाया घालवू नका ,सगळ्यांपेक्षा पाच वर्ष तुम्ही पुढे निघून जाल .
कोणीतरी चांगल बोलावं म्हणून कष्ट करू नका ,चांगल बनण्यासाठी कष्ट करा.
जगात असा कोणी नाही ज्याला प्रसंग नाहीत .
आता कष्ट केलेत तर पुढे राजा सारखे आयुष्य जगता येईल,पण आता कष्ट न करता राजा सारखे राहायला गेलात तर पुढे आराम करता येणार नाही .
Motivational Quotes In Marathi हे तुमच्यात नवीन ऊर्जा पेटविण्यासाठी आहेत. फक्त वाचू नका तर आयुष्यात ते विचार उतरवा.
जेव्हा सार जग झोपेत होते ,तेव्हा मी जगून माझी स्वप्न करीत होतो .
स्वप्न बघण खूप सोपं असतं पण ती सत्यात उतरवणं तितकंच कठीण .
शून्यातूनही राज्य उभं करता येत ,विश्वास बसत नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवा .
सगळं जाऊनही पुन्हा मिळवता येत,महाराजांनी तहात दिलेले सगळे किल्ले पुन्हा परत मिळवले होते .
जेवढा मोठा ध्येय ,तेवढाच मोठा संघर्ष,आणि तेवढाच मोठा विजय.
पाण्याच्या सातत्य पूर्ण वाहण्याने दगडाचा ही आकार बदलतो म्हणून कोणत्याही सातत्य पाहिजेच .
जगाकडे असणारं तुमचं लक्ष ज्या वेळेला तुमच्याकडे येईल तेव्हा पासून तुमच्या यशाच्या प्रवासाला सुरुवात होईल .
सगळ्यात जास्त मौल्यवान माझी वेळ आहे ती एकदा निघून गेली तर पुन्हा येणार नाही
माणसांची ओळख ही सुखामद्धे होतं नसते ,प्रसंग आल्यावर समजत आपला कोण आहे .
समोर अंधार आहे हा विचार करून प्रवास थांबवण योग्य नाही चालायला सुरुवात तर कर,पुढे जाऊन मार्ग दिसेल .
आयुष्यात प्रत्येकाची खूप मोठी स्वप्न असतात पण ती स्वप्न पूर्ण करायला तेवढे कष्ट घेण्याची तयारी असायला पाहिजे ,कधी कधी कष्ट घेताना त्यात अपयश ही येईल पण पुन्हा नव्याने भरारी घेण्याची जिद्द ही असावी . अपयश आल म्हणून कारण सांगू नये आपल्यातली कमतरता ओळखवी आणि ती भरून काढावी . पण हे सगळं करताना खूप संकट ही येतात आपल्याला आपल्या स्वप्नं पासून ध्येया पासून दूर घेऊन जाण्यासाठी अशा वेळी खचून जाऊ नये यासाठी आपण काही motivational video पाहतो तसेच आम्ही काही motivational thoughts in marathi मध्ये आणले आहेत . ते तुम्हाला अशा वेळी नक्की मदत करतील आणि ते तुम्हाला खूप आवडतीलही . यासाठी तुम्ही हे motivational quotes in marathi वाचा .
एक सुरवंट जो कोणालाही आवडत नसतो,पण तोच सुरवंट ज्या वेळेला स्वतःला बदलतो आणि फुलपाखरू बनतो तेव्हा तो सगळ्यांच्या आवडीचा होतो.