Motivational Thoughts In Marathi | प्रेरणादायी मराठी विचार

motivational thoughts in marathi आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जाणून घ्या  प्रेरणादायी मराठी विचार

आरोग्य धनसंपदा Health Is Wealth 

संपत्ती (Wealth)

आरोग्य (Health)

motivational thoughts in marathi मध्ये आज तुम्हाला तुमची वेळ आणि तुमचं शरीर किती महत्वाचे आहे कळेल,त्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील.आणि नेमका त्याच गोष्टींकडे प्रत्येकजण दुर्लक्ष करतो.

motivational thoughts in marathi | प्रेरणादायी मराठी विचार

तुम्ही इंग्रजी मध्ये एक ऐकली किंवा वाचली असाल , “health is wealth “आरोग्य हीच संपत्ती,पण मनाला आकर्षित करणाऱ्या भौतिक आनंद मिळवण्यासाठी तुम्ही जीवाचं रान करता, आणि स्पर्धेच्या युगात मृगजलाच्या मागे धावत असता.अनेक प्रयत्नानंतर सगळं मिळवल्यानंतर ही दुःखच मिळत ,असं का ? तर ह्याच उत्तरं पुढे आहे.

संपत्ती (Wealth)motivational thoughts in marathi 

 कारण बाहेर धावता धावता तुम्ही स्वतःपासून दूर गेलात,स्वतःच्या जवळ कधी आला नाहीत ,स्वतःजवळ येण्यासाठी थांबावं लागतं, स्वतःला कधी ओळखलं नाही,स्वतःसाठी वेळच दिला नाही आणि वेळच निघून गेली,ही सगळी कारणं आहेत तुमच्याकडे सगळं असून दुःखी राहण्याची.

आयुष्यात जगण्यासाठी पैसा महत्वाचा आहेच पण त्याच बरोबर पैशा पेक्षा ही महत्वाचं आणि तुमच्या जवळच कोण असेल तर ते म्हणजे,तुमचे शरीर,आणि मन ह्या साठी दिवसातील 24 तासातून एक तास काढत नसाल तर तुम्ही मूर्ख आहात.

तुमची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल,त्यासाठी दुसरं कोणी येणार नाही,वेळ कधी निघून जाईल कळणारही नाही.वेळीच सावध नाही झालात तर,कमावलेले सगळे पैसे शरीरामागे खर्च करावे लागतील.मग आनंद कोणता ,तुमच्याकडे गाडी ,बांगला,संपत्ती असूनही,त्याचा आनंद घेऊ शकणार नाही.

आरोग्य (Health)motivational thoughts in marathi 

motivational thoughts in marathi | प्रेरणादायी मराठी विचार

तुमचं शरीर निरोगी नसेल तर कोणतीही गोष्ट, कार्य करताना तुमच्याकडे ऊर्जा ,आत्मविश्वास कधीच येणार नाही याचा परिणाम म्हणजे तुम्हाला अपयश येईल, म्हणून दिवसातून 1 तास तरी तुम्ही तुमच्यासाठी काढावा लागेल,त्या एक तासात तुम्ही काय करू शकता.

Motivational quotes in marathi

1. तुमच्या जवळची सगळी gadgets बाजूला ठेवा,उदा.mobile.

2. तुम्ही बागेत एकटे फिरायला जाऊ शकता.

3. काही पुस्तक वाचू शकता.

4. एक तास योगा, किंवा व्यायाम करू शकता शरीराच्या आणि मनाच्या तंदुरुस्ती साठी.

5. तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.

6. योग्य आहार घ्या .

7. स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्या.

Motivational quotes in marathi

ह्या सवयीचा अमल आयुष्यात केला तर एक ते दोन महिन्यात तुम्हाला परिणाम दिसून येईल ,ते म्हणजे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला शरीरात जाणवेल,जी ऊर्जा तुम्ही कधीच अनुभवली नसेल , तो शरीराचा आणि मनाचा तुम्हाला तुमच्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच असेल जो आनंद पैसे खर्च करून मिळत नाही ,म्हणून ह्या आनंदासाठी तुम्ही तुमच्यात आजच बदल करा.अपेक्षा आहे की bolbhava.com वरील motivational thoughts in marathi हा लेख तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडवून आणेल.


यशस्वी लोकं वेगळ्या गोष्टी करत नाहीत,तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. (motivational thoughts in marathi )
___________________________________________

नोकरी नाही मिळत म्हणून व्यवसाय करायचा नाही,तर व्यवसाय करायचा आहे म्हणून व्यवसाय करायचा.
___________________________________________

आपल्याला स्वतःसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील🎯
तेच तेच करून काही होणार नाही🎯विचार बदलावे लागतील,risk पत्करावी लागेल🎯नाही जमणार ते जमवावे लागेल🎯मार्ग बदलावा लागेल🎯माणसांपासून थोडं वेगळं चालावं लागेल🎯तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळवू शकता🎯🎯
___________________________________________

जगावे तर महाराजांसारखे
शत्रू कोणीही असो,कितीही मोठा असो,🎯
कितीही बलवान असो,त्याला बेधडक सामोरे जायचे,आणि आपला विजय हासिल करायचा🎯
___________________________________________

उद्या मला कोणीतरी मदत करेल ह्या आशेवर आजही तुम्ही बसून राहिलात ,तर वर्तमान काळासह तुम्ही भविष्य ही अवघड करून बसाल🎯
_रतन टाटा
___________________________________________

आपलेपणाने कोणतेही काम केले तर त्यात आवड निर्माण होते आणि कामाचा त्रास वाटत नाही🎯🎯
___________________________________________

चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे जी संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून जातं नाही,तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील.🎯🎯
___________________________________________

बऱ्याचदा आयुष्य पाहिजे तसं जगता येत नाही,कारण आपले आवडीचे छंद जबाबदारी कडे गहाण ठेवावे लागतात.
___________________________________________

कोणी ढकलून देई पर्यंत दारात उभे राहू नका🎯मान सन्मान त्यांनाच द्या जे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जातील🎯
___________________________________________

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून घडत असतो.

स्वतःच्या मेहनती वर आणि क्षमतेवर विश्वास असेल तर बोटं ठेवणारीही कालांतराने टाळ्या वाजवायला लागतात .


जीवनात एवढ व्यस्त रहा की, पश्चाताप ,भीती,दुख आणि कोणाचा द्वेष करायला वेळच मिळणार नाही .

भूतकाळातील गोष्टी सोबत घेऊन जायचे की मागे सोडून पुढे जायचे ह्यावर आपले सुख दुख अवलंबून असते . थोडा विचार करा मग समजेल .


मुळात तुम्हाला आयुष्य बदलण्याची इच्छा च नाही आहे – तुमच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी फसल्या असतील , भरकटल्या असतील तर त्याचं एकमेव कारण फक्त तुम्ही आहात , जरा कटू आहे पण सत्य आहे . आणि आता तुम्हाला आयुष्य बदलण्याची संधि असताना देखील तुम्हाला बदल करायचं नाही आहे , !!!फक्त एकदा स्वतः हा कडे उघड्या डोळ्याने पहा , स्वतःच्या आयुष्याचे खोल अवलोकन करा , अगदी प्रामाणिक पणे कोणतेही कारण सांगू नका ,जे तुम्हाला मागे खेचत आहे , त्या सर्वाना हद्दपार करा , मग ते लोकं असोत नाहीतर तुमच्या सवयी नाहीतर अन्य काही , आयुष्य एकदाच मिळणार आहे मारायचेच आहे तर असं काही करून मरा की, तुमच्या मागे तुमच्याकडे बघून लोकं जगतील . 


जेवढे तुम्ही वेगाने मोठे होतं आहात ना त्या वेगाने तुमचं बाप वृद्ध होतोय हे लक्षात ठेवा आणि हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला कधी आळस किवा अन्य काही कष्टापासून थांबवू शकत नाही . 

जर तुम्ही कोणीतरी आहात हे कोणाला दाखवाच असेल तर ते लोकाना दाखवू नका , तुम्ही कोणीतरी आहात हे जो पर्यन्त आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना करून दाखवा .


येणारी वेळच सांगेल तुम्हाला , तुम्ही काय गमावला आणि मी काय कामावल .

पैशाला स्वतःवर इन्वेस्ट करा आणि इतरांच्या पुढे जा –एलोन मस्क 

जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष आणि रिस्क खूप महत्वाचे आहे – मुकेश अंबानी 

जेवढ्या लवकर होतं असेल स्वतःचा व्यवसाय सुरू करा . आणि स्वतःचे मालक व्हा .-बिल गेट्स 


हे ही वाचा – जगातील सात आश्चर्य 

पैशांचा ‘अनेस्थेशिया’ ची भूल माणसाला कशाचं ही भान ठेवत नाही.

एक बंद घड्याळ ही दिवसातून दोन वेळा योग्य वेळ दाखवतो म्हणून कोणाला कमी समजू नका.

स्वभाव आणि विचार हे चांगले असतील तर बोलणं नाही झालं तरी आपण कायमस्वरूपी एखाद्याच्या मनात राहतो.

जे झालं आहे ते चांगलं आहे, जे घडत आहे ते चांगलं आहे आणि जे होणार आहे ते देखील चांगलंच होणार आहे.

कोणतीही व्यक्ती जन्माने नाही तर कर्माने महान बनते.

सतत संशय घेणारा माणूस आयुष्यात कुठेही कधीच आनंदी राहू शकत नाही.

जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तो आपल्या शत्रू प्रमाणे काम करतो.

कर्म करत रहा,फळाची अपेक्षा करू नका.

खाली मान घालून मेहनत करायची,यश डोक्यात जाऊ द्यायचं नाही,आणि अपयश मनाला लागून घ्यायचं नाही.- मुकेश अंबानी.

हिम्मत हारायची नाही ,आज हसणारे उद्या नक्कीच टाळ्या वाजवतील.

व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्त्व म्हणून जागा,कारण कालांतराने व्यक्ती संपते,पण व्यक्तिमत्त्व तसेच राहते.

आपल्याला किती लोक ओळखतात ह्याला महत्व नाही ,तर ते आपल्याला का ओळखतात ह्याला महत्व आहे.

ज्याची सुरुवात इमानदारी,स्वकष्ट ,आणि शून्यातून होते त्यांना हरण्याची,घाबरण्याची,ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते.ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अपोआप मिळत राहतात.

आयुष्यात कितीही अपयश आले तरी चालेल ,पण एकवेळ अशी भरारी मारा की लोकांच्या कायम लक्षात राहील.

कोणत्याही क्षेत्रात तेव्हाच्या माघार घ्या जेव्हा आपली माणसं हारत असतील.

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर बगळ्यांची संगत सोडावी लागते . 

स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पेटून उठायला शिका,नाहीतर समोरचा व्यक्ति त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धूर बनवून जाईल – मुकेश अंबानी