नवरात्रि उत्सव नऊ रंग आणि जाणून घ्या त्यांचे महत्व

नवरात्रि उत्सव नवरात्रीतील नऊ रंग आणि जाणून घ्या त्यांचे महत्व. 

नवरात्रि उत्सव 3ऑक्टोबर पासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे . संपूर्ण भारत देशात हा सण अगदी जोशात साजरा होताना दिसतो . आश्विन महिन्यातील या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र असे म्हणतात ,
नवरात्र मध्ये दरवर्षी नऊ दिवसांमध्ये दुर्गामतेच्या नऊ रूपांची यथाविधि पूजा करण्यात येते ,हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जातात . तसेच या सणामध्ये अनेक जण उपवास करतात . तसेच नऊ रात्री मध्ये नऊ रंगांचे विशेष महत्व मानले जाते .नवरात्र सणाला रंगांचा सण ही समजला जातो ,आपण जो रंगांचा सण साजरा करतो त्या रंगांचे महत्व आपल्याला माहीत पाहिजे ,तर जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्व .

नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्व : पहिला पांढरा रंग हा रंग शैलपुत्रि देवीचा आवडता रंग असून तो रंग निस्वार्थ,निखळपणा ,प्रेम ,आणि शांततेच प्रतीक मानलं जातं .
लाल रंग – ब्रम्ह चारिणी देवीचा लाल रंग हा अत्यंत आवडीचा रंग असून तो पवित्रतेचा आणि शक्तीचा प्रतीक मानला जातो .
निळा रंग – चंद्र घंटा देवीचा निळा रंग आवडीचा आहे आणि तो साहस आणि सत्याचा प्रतीक म्हणून आहे .
पिवळा रंग – पिवळा रंग हा अष्टभुजा देवीचा आवडता रंग असून तो स्नेह आणि ऐश्वर्यचा प्रतीक आहे .
हिरवा रंग – स्कंदमाता देवीला हिरवा रंग आवडतो आणि तो रंग समृद्धी आणि सौभाग्याचा प्रतीक म्हणून संबोधलं जातो .
करडा रंग – कात्यायनी देवीचा आवडता रंग आहे या देवीने महिश्यासुर राक्षसाचा वध केला होता ,करडा रंग हा नवी सुरुवात आणि विकास दाखवतो .
नारंगी रंग – हा रंग देवी पार्वतीचे सातवे रूप असणाऱ्या काली माता देवीचा आवडता रंग आहे आणि हा रंग सामर्थ्य शक्तीचे प्रतीक मानले जाते .
मोरपंखी रंग हा महागौरी देवीला आवडणारा रंग आहे आणि तो सुंदरता ,विश्वास , आदर ,समृद्धी दर्शवतो .
गुलाबी रंग – सिद्धीदातरी देवीचा आवडता असणारा रंग हा महत्वकांक्षा ,सद्भाव,आणि प्रेमाचे प्रतीक आहे .
तर हे होते नवरात्र उत्सवातले नऊ रंग आणि त्यांचे सणातील महत्व .


हे ही वाचा –  birthday wishes for husband