रायगड किल्ल्याचा संपूर्ण इतिहास | Raigad fort information in marathi
Raigad fort information in marathiरायगड किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आपण जाणून घेऊ शकलो तर महाराज आपल्याला कळणे सोपे जातील . महाराजांची कौशक्य क्षमता,बुद्धिमत्ता , दूरदृष्टि ,रेयतेबद्दल भावना ,देवावरची निष्ठा,देव,देश,आणि धर्मजागृती काय असते ह्या सर्वगुनांनी संपन्न महाराज होते . हे जाणून घ्या दुर्गेदुर्गेश्वर श्रीमान रायगड किल्ल्याच्या इतिहासातून Raigad fort information in marathi .
Raigad fort information in marathi
⦁ रायगडाची ओळख [ introduction of raigad ]
⦁ ऐतिहासिक महत्व
⦁ भौगोलिक स्थान
⦁ रायगडाची संरचना
⦁ छत्रपती शिवाजी महाराज आणि raigad संबंध
⦁ गडाचे लष्करी महत्व
⦁ तलाव
⦁ रायगडावर कसे पोहचाल
⦁ सगळ्यात महत्वाची कोणती संरचना पहायलाच हवी
⦁ महा दरवाजा
⦁ राजवाडा
⦁ जगदीश्वराचे मंदिर
⦁ होळीचा माल
⦁ रायगड जवळील पर्यटक स्थल
⦁ रायगड पाहण्यासाठी योग्य वेळ
⦁ गड संरक्षणाचे प्रयत्न
रायगडाची ओळख [ introduction of raigad ]
शत्रूला धूल चारून उद्ध्वस्त करून महाराजांनी अनेक मावल्याना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली . आणि स्वराज्याची राजधानी स्थापन केली ,सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये सगळ्यात कठीण जो शत्रूला चढणे अशक्य अशा रायरी च्या डोंगराला पृथ्वी वरच्या स्वर्गाचे स्वरूप दिले ते म्हणजे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड . छत्रपती शिवाजी महाराजांनाच्या आज्ञेने हिरोजि इंदोलकरानि स्वराज्याच्या राजधानी करिता रायगड उभारला .
महाराज रायगडाचे वर्णन करतात ” दीड गाव उंच . पर्जन्यकाळी गडावर गवत उगवत नाही , आणि धोंडा तासिव एकच आहे , दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा ,परंतु तो उंचीने थोटका ,दौलताबादचे दश गुणीगड उंच असे देखुन बहुत संतुष्ट झाले आणि बोलले,तखतास जागा हाच गड करावा “.
ऐतिहासिक महत्व Raigad fort information in marathi
रायगड किल्ला हा ऐतिहासिक दृष्टहीने खूप महत्वाचा आहे याच रायगडने शिवराज्याभिषेक प्रसंग अनुभवला आहे ,एक मराठा राजा झाला ही गोष्ट सामान्य नव्हे , ही गोष्ट फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील सगळ्यात महत्वाची आहे . ह्या घटनेने संपूर्ण हिंदुस्तानचा भूत ,वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ बदलून टाकला .
भौगोलिक स्थान raigad fort
सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या रायगड आणि त्याची ऊंची समुद्र सपाटी पासून 820 मीटर (2700 फुट )एवढी आहे . रायगडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत ,तसेच गडाच्या पश्चिमेकडे हिरकणी बुरूज आणि उत्तरेकडे टकमक टोक ,श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे आकर्षण आहे. रायगड च्या ऊंची वरुण तोरणा ,राजगड,लिंगणा ,प्रतापगड आणि मानगड हे किल्ले दिसतात . रायगड चा विस्तार तब्बल 1200 एकर मध्ये आहे .
रायगडाची संरचना
14 वर्ष रायगड बांधण्यासाठी लागला ,हा रायगड किल्ला हिरोजि इंदलकरअशा जगातील सर्वश्रेष्ठ अभियंत्याने आपले घरदार गहाण ठेऊन बांधला . गडाचे बांधकाम आणि त्याची पद्धत ही गिरी पद्धत आहे .रायगडावर एकूण अकरा तलाव बांधले,84 पाण्याच्या टाक्या बांधल्या ,350 इमारती बांधल्या. गडाच्या समोरून त्याचा मुख्य दरवाजा शत्रूला दिसून येत नाही . शत्रू गडाच्या दरवाज्यावर हल्ला करू शकणार नाही म्हणून दारवाज्या जवळ तुम्हाला तटबंदी दिसेल U अशा आकाराची जेणे करून तोफाचा हल्ला झाला तरी तो गोळा थेट दरवाजावर आदळू शकत नाही . जागो जागी गडाची रचना ही नियोजन बद्ध केलेली दिसते . पिण्याच्या पाण्यापासून ते सांडपाणी असो,अन्नधान्य असो . प्रत्येकाची जागा ही योग्य त्या प्रमाणे . असं म्हणतात की महाराजांचा दरबार भरायचा तिथे महाराजांचा सिंहासन जिथे होता तिथे कुठेही कोपऱ्यात बोललेल आवाज महाराजाणा ऐकू येत होतं .कारण तिथे एक असलेला मोठा दगड जो अजून रायगड वर तसंच दिसतो . जो कोणी काही बोलला तर त्या मोठ्या कातळाला आवाज आदळून त्याचा ecco सिंहासन जवळ ऐकू येत होतं हा किल्ल्याच्या रचणे मागचा अभ्यासच दिसून येतो .
⦁ छत्रपती शिवाजी महाराज आणि raigad संबंध
रायगड हा पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता , हा रायरी जावळीच्या चंदरराव मोरेंच्या ताब्यात होता ,मोरे हे आदिलशाहीचे सरदार होते ,महाराजांना वाटल मोरे स्वतःहा मराठा आहेत तरी ते आदिलशाहीत् काम करतात ते स्वराज्यात सामील झाले तर खूप बरं होईल . महाराजांनी मोऱ्याना प्रेमाने पत्र लिहल आणि सांगितले तुम्ही ही हिंदू आहात आम्ही ही हिंदू आहोत आपण दोघे मिळून स्वराज्य निर्माण करू ,पण जावलीचे मोरे उर्मट त्यांनी उलट राजाना सुनावले तुम्ही कसले राजे ,या जावळी प्रांतांचे खरे राजे तर आम्ही आहोत ,त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सैन्य जावळीच्या खोऱ्यात पाठवला . चांदरराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंत राव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या कडून मारला गेला,चंदर राव मोऱ्याना वाटलं आता आपला देखील वध होणार म्हणून ,चांदर राव मोरे महाराजांना शरण आले ,जो कोणी शरण येईल त्याला राजे कधी मरण देत नव्हते ,1656 साली महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला .1656 ते 1670 पर्यन्त महाराजांनी रायगड बांधून घेतला.
गडाचे लष्करी महत्व
अभेद्य श्रीमान रायगड आणि त्याला वेडा देणं कोणाला ही शक्य नाही म्हणतात ना गडावर चढाव तर वाऱ्याने ,आणि उतरावे तर पाण्याने ,रायगडावर फक्त मराठे चढू शकतात आणि उतरू शकतात अशी त्याची रचना . ही लष्करा साठी खूप महत्वाची ठरली. त्याचा विस्तार ,त्याची ऊंची,अनेक चोर वाटा,ही रायगडाला अजिंक्य ठेवतात.
तलाव
हत्ती तलाव
पूर्वीच्या काळी हत्तीना पानी पिण्यासाठी आणि हत्तीं ना आंघोळ घालण्यासाठी हा तलाव महाराजांनी निर्माण केला , रायगडावर हत्तीच्या बाबतीत एक घटना घडली होती ती तुम्ही ऐकली किवा वाचली असाल,ती म्हणजे 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला त्यावेळेला एक इंग्रज अधिकारी त्या राज्याभिषेकला उपस्थित होता तो म्हणजे हेनरी ऑक्झेंटर ,त्यांनी पहिले की रायगडावर राज्याभिषेकसाठी 2 महाकाय हत्ती आणले होते हे पाहून त्याला प्रश्न पडला की रायगडावर माणसाणा चढताना नाकी दम होतो तर हे हत्ती गडावर कसे चढले असतील , न राहून त्यांनी एका मावल्याला प्रश्न विचारलं त्याला त्याला उत्तर मिळालं , की महाराजांची दूरदृष्टि होती की पुढे राज्याभिषेक हा रायगडावर करायचा होता म्हणून महाराजांनी दोन हत्ती ची लहान लहान पिल्लं आधीच आणून ठेवली होती त्यांना लागणारे पानी हे ह्या हत्ती तलावातून मिळत असे .
गंगासागर तलाव –
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकवेळी सप्त नद्यांचा पानी आणलं होतं ,आणि उरलेले पानी ते ह्या तलावामद्धे सोडलं गेलं. असं म्हणतात की,या तलावातील पानी बाराही महीने तसाच राहतो ,कितीही दुष्काळ पडला तरी गंगासागर तलाव कधीच अटत् नाही . असं ह्या तलावाचा वैशिष्ठ आहे .
⦁ रायगडावर कसे पोहचाल
मुंबई हून रायगडावर यायचं असेल तर 2 ते अडीच तास लागतात त्यात 109 किलोमीटर अंतर आहे . आणि पुण्याहून रायगड हाच अंतर 3 तास 35 मिनिट लागून अंतर 135 किलोमीटर आहे .
⦁ सगळ्यात महत्वाची कोणती संरचना पहायलाच हवी
1) महाराजांची समाधी 2) राजदारबार 3) बाजारपेठ 4) राजवाडे 5) बालेकिल्ला परिसर 6) हिरकणी बुरूज 7) सप्तमजली मनोरे 8) खलबत खाना 9) टंकसाळ 10) पालखी दरवाजा 11) मेण दरवाजा 12)धान्यांचे कोठार 13) टकमक टोक 14 ) नगारखाना
⦁ महादरवाजा
ह्या दरवाज्याची रचना संपूर्ण यूटर्न पद्धतीची आहे त्यावेळी हिला गायमुख पद्धत म्हणत असतं ,पूर्वी गडावर तोंफेणे हल्ला व्हायचा ,पण तोफा चा गोला थेट दरवाजाला न लगता तो बुरूजला लागत होता आणि दरवाजा कायम सुरक्षित राहायचा या गायमुख पद्धतीमुळे . छत्रपती शिवाजी महराजांच्या राज्याभिषेकचा साक्षी असणारा हा महादरवाजा आहे , जो पर्यन्त आपण जवळ येत नाही तो पर्यन्त दरवाजा दिसत नाही , पूर्वी दरवाजा वर लाकडांच्या ओंडक्यांचा वापर करून हल्ला व्हायचा पण दरवाजा ची पद्धत यूटर्न असल्यामुळे हा हल्ला ही काम करत नसे असा हा सुरक्षित महादरवाजा होता. अजूनही बांधकाम आणि कोरीव काम हे भक्कम पाहायला मिळतं .
⦁ राजवाडा
महाराजांचा राजवाडा रायगडावर होता जिथे महाराजांचा आयुष्यातील महत्वाचा काळ तिथेच गेला होता ,आज तिथे फक्त राजवड्याचे अवशेष आहेत ,जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी देह सोडला ,रायतेचा अखेरचा निरोप घेतला . महाराजांच्या राजवाड्यांच्या काही अंतरावर ,अष्टप्रधानांचे वाडे आहेत. ते जरी अस्तित्वात नसले तरी राजवाड्यांचे अवशेष अस्तित्वात आहेत. आणखी सहा महाल रायगडावर आढळतात ते महाराजांच्या सहा राणीनचे आहेत. 1818 साली इंग्रजांनी रायगड जाळून टाकला , तब्बल 11 दिवस रायगड जळत होता ,हे 11 दिवस रायगडावरील सागवानी लाकडी इमारती जाळून खाक झाल्या . आणि अवशेष उरले.
⦁ होळीचा माल
शिमाग्याच्या वेळी ह्याच माळावर मावळे होली साजरी करत , छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हाताने पेटक्या होळीत नारळ टाकत आणि तो नारळ पेटक्या होळीतून जो कोणी काढेल त्याला महाराज स्वतःच्या हातातून सव्वा किलो सोन्याचे कडा बक्षीस देत असतं . इतिहासामध्ये संभाजी महाराज लहान असताना याच होळीच्या मालवरून पेटक्या होळीतून नारळ काढला होता असा उलेख आढळतो.
⦁ जगदीश्वराचे मंदिर
छत्रपती शिवाजी महाराज दररोज सकाळी आणि संध्याकाळी जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन घ्यायला यायचे ,गडावरील एक पवित्र जागा हे मंदिर आहे . मंदिराची रचना पाहिलीत तर ती एखाद्या मशिदी प्रमाणे होती या मागे ही महाराजांची दूरदृष्टि होती ,शत्रूने खालून हल्ला केला तर त्याला ते मंदिर न वाटता मशीद आहे अस वाटावं आणि तो हल्ला करणार नाही . ह्या मंदिरात श्री शंकरांची पिंड आहे जिची स्थापना प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधते वेळी केली होती .
⦁ रायगड पाहण्यासाठी योग्य वेळ
रायगडाला पृथ्वीवरचा स्वर्ग का म्हणतात हे जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही नक्कीच रायगडाला पावसाळ्यात भेट द्या तुम्हाला रायगडची सुंदरता तुम्हाला भुरळ घालेल . अर्धा शुभ्र धुक्यामद्धे स्वर्गा प्रमाणे विराजलेला रायगड तुम्हाला दिसेल आणि जर रायगडची अभेद्यपणा अनुभवायचा असेल तर तुम्ही भर उन्हाळ्यात एकदा पायी रायगड चढून पहा .
⦁ गड संरक्षणाचे प्रयत्न
आस म्हणतात की रायगड जर पहिल्या सारखा म्हणजे 350 वर्षांपूर्वी महाराजांच्या काळात जस होता तसा पुनः हा बनवला गेला तर जगातील आठवा आश्चर्य ठरेल. रायगड हा फक्त गड किल्ला नाही तर ते स्वराज्याचे ऐश्वर्य आहे आणि ते आपल्याला युगाच्या अंता पर्यन्त जपता यायला पाहिजे त्यासाठी सरकारने देखील काही महत्वाची पावलं उचलणे महत्वाचे ठरेल,कारण पुढल्या पिठीला खऱ्या अर्थाने महाराज कळायचे असतील तर त्यांनी गड किल्ल्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्या साठी गड संरक्षण खूप महत्वाचे आहे. एक नागरिक म्हणून आपण रायगडावर आणि अन्य किल्ल्यावर जातं असतो पण ते फक्त फिरण्याचे ठिकाण नाही ते पवित्र ठिकाण आहे. तिथलं पावित्र्य टिकवता यायला पाहिजे,आपण किल्ल्यावर जाताना पाण्याची बॉटल भरून घेऊन वर जातो ,पण पाणी संपल्यावर रिकामी बॉटल खाली का आणू शकत नाही . ह्या वर विचार करणे गरजेचे आहे. गड किल्ल्याचे संरक्षण करणे हाच महाराजांसाठी आपला मुजरा असेल .
हे ही वाचा – chatrapati shivaji maharaj speech in marathi 2024