संकष्टी चतुर्थी 2026 | Sankashti Chaturthi Wishes In Marathi

sankashti chaturthi wishes in marathi मध्ये भारतीय संस्कृतीत हिंदू धर्मामध्ये सण आणि उत्सवाना विशेस महत्व आहे प्रत्येक सण आणि उत्सव हा आध्यात्मिक,सांस्कृतिक,आणि भावनिक असा शास्त्रीय अर्थ घेऊन येत असतो. त्यापैकीच एक अत्यंत पवित्र निर्मळ असा सण जो श्रीगणेशाच्या स्मरणाने येतो तो म्हणजे संकष्टी चतुर्थी.
आयुष्यातील विघ्न नष्ट व्हावीत आणि मनातील अंधार नाहीसा होऊन उत्तम कर्म घडवीत आणि यश कीर्ती,प्रताप,प्राप्त होऊन सामर्थ्य,ऐश्वर्य मिळावं यासाठी भक्त मोठ्या शुद्ध भावाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात.
आजच्या तंत्रज्ञान प्रगत युगात मित्र नातेवाईक,आपल्या प्रियजणांना whatsapp, instagram, facebook अशा माध्यमातून संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा मोठ्या प्रमाणात देत असतात म्हणून तुमच्यासाठी खास ह्या लेखात शुभेच्छा आणि महत्व पटवून देणारी माहिती आम्ही घेऊन आलो आहोत.

संकष्टी चतुर्थी कोणत्या दिवसाला म्हणतात ?
प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला हा पवित्र सण किंवा दिवस आपण साजरा करतो. याचा अर्थ सगळ्या संकटातून मोक्ष असा होतो. या दिवशी गणेशाचे जास्तीत जास्त स्मरण केल्याने आयुष्यातील प्रसंग, अडथळे, दुख, पाप नाहीसे होतात अशी श्रद्धा आहे. ह्यादिवशी चंद्रदर्शन झाल्यावरच उपवास सोडतात असा भक्तांचा शुभ भावार्थ आहे.

2026 Sankashti Chaturthi Dates In marathi

Sankashti Chaturthi Feb 2026 : आता नुकतीच जानेवारी 6 रोजी अंगारकी संकष्टी होऊन गेली आता पुढील फेब्रुवारी महिन्यात संकष्टी कधी आहे ?जाणून घ्या .

1). 6 जानेवारी (अंगारकी संकष्टी)
2). 5 फेब्रुवारी (संकष्टी चतुर्थी)
3). 6 मार्च (संकष्टी चतुर्थी)
4). 5 एप्रिल (संकष्टी चतुर्थी)
5) 5 मे (अंगारकी संकष्टी)
6) 3 जून (संकष्टी चतुर्थी)
7) 3 जुलै (संकष्टी चतुर्थी)
8) 2 ऑगस्ट (संकष्टी चतुर्थी)
9). 31 ऑगस्ट (संकष्टी चतुर्थी)
10) 29 सेप्टेंबर (अंगारकी संकष्टी)
11) 29 ऑक्टोबर (संकष्टी चतुर्थी)
12) 27 नोव्हेंबर (संकष्टी चतुर्थी)
13) 26 डिसेंबर (संकष्टी चतुर्थी)

यावर्षी एकूण तेरा sankashti chaturthi आहेत त्यातील तीन अंगारकी चतुर्थी आहेत. आता अंगारकी चतुर्थी म्हणजे काय तर मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात आणि ही चतुर्थी शुद्ध, आणि पवित्र मानली जाते.
धार्मिक महत्व
धर्मशास्त्रानुसार संकष्टी चतुर्थी व्रत केल्याने –

मन स्थिर होऊन शांती मिळते .
आयुष्यातील प्रसंग संकटे अडचणी नाहीशा होतात.
आरोग्य,जय ,ऐश्वर्य लाभते.
श्रीगणेशाची कृपा कायम राहते.

संकष्टी चतुर्थीला पूजा करण्याची पद्धत आणि विधी
यादिवशी पहाटे पासून भक्तगण उपवास धरतात. मंदिरातून दर्शन घेऊन येतात.

sankashti chaturthi wishes in marathi

पूजा कशाप्रकारे करतात
पहाटे लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करून गणेशाची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवतात. आणि अथर्वशीर्ष किंवा गणपती चतुर्थी व्रत कथा वाचून किंवा गणपती आरती,श्लोक,वाचून स्मरण करतात. गणेशाला फळ,मोदक,फुले अर्पण करतात.आणि चंद्रदर्शनानंतर गणेश चतुर्थी उपवास सोडतात. अशा प्रकारे मनोभावे पूजा करून गणेशाला शरण जातात.

⦁ गणेश चतुर्थीच्या अनेक कथा आहेत
त्यातील एक कथा म्हणजे एका राजाचे राज्य हे संपत जाऊन सगळीकडे गरीबी आणि दुखच उरलेलं असते तेव्हा भक्तिपूर्ण भावाने राजा गणेशाचे पूजा व्रत करून उपवास करतो आणि त्याचे फळ म्हणून त्याच्यावर आलेली सगळी संकटे दूर होऊन पुन्हा राज्य आनंदाने नांदायला लागत त्याला ऐश्वर्य,शांती प्राप्त होते. तेव्हा पासून संकष्टी चतुर्थीचे व्रत सामर्थ्यशाली मानले जाते.

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा का द्याव्या ?
प्रत्येक सणाच्या शुभेच्छा देण्यामागचे कारण म्हणजे फक्त औपचारिकता नसून एकमेकांमध्ये सकारात्मक शक्ति प्रसारित करता येते.
धावपळीच्या जीवनात कोणत्याही सणाच्या शुभेच्छा दिल्याने मैत्री,प्रेम,नातं हे घट्ट होते.त्यात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने प्रत्येकातील भक्तिभाव वाढतो. आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते .धावपळीच्या जीवनात आपल्याला कधी कधी विसर पडतो. पण एका शुभेच्छा मसेजने आपल्याला आठवण होते की आज चतुर्थी आहे.

sankashti chaturthi wishes in marathi

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा Sankashti Chaturthi Wishes In Marathi

⦁ तो विघ्नहर्ता आहे तो तुझा अंत पाहेल पण
अंत होऊ देत नाही. विश्वास ठेव.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ तुमचे सगळे दु:ख हारो कारण तो
सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहे.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ तुम्हाला सुख,आरोग्य,संपदा प्राप्त होवो
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

⦁ मागणं काहीच नाही बाप्पा
फक्त माझे प्रयत्न कमी पडू देऊ नको.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ तो देतो एवढं मान्य केलं तरी बाप्पा खूप काही देतो
happy sankashti chaturthi

⦁ तुमच्या आयुष्यातील सगळे प्रसंग,संकटे बाप्पा दूर करो
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
.
⦁ देवाने दिलेले दिसत नसते आणि आपल्याला दिसणारं हवं असतं.

⦁ देवाकडे मागणं आणि सांगणं नाही वागणं चांगलं असावं लागतं
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

sankashti chaturthi wishes in marathi

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा Whatsapp Status साठी

⦁ तुमच्या आयुष्याची सुरुवात आज मंगल होवो हेच मंगलमूर्तीकडे मागणं

⦁ चंद्रदर्शनासोबत तुमच्या मनातही शांतीचे आणि ज्ञानाचे चांदणे पडो.

⦁ तहान आणि भुकेच्या उपवासासोबत कर्मांचा उपवास ही घडो
संकष्टीच्या शुभेच्छा

⦁ प्रत्येक संकटात धिराने आणि संयमाने उभं राहण्याचे बळ बाप्पा तुम्हाला देवो.
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ बाप्पाच्या मोदकाचा गोडवा तुमच्या शब्दात येवो.
संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ गणेशाला विश्वात शोधण्याआधी विश्वासात शोधा.
संकष्टीच्या शुभेच्छा

⦁ विश्वास ठेव बाप्पावर आपल्याला झेपेल तेवढेच प्रसंग देतो.

⦁ कितीही मोठा संकट असो बाप्पा त्यापेक्षा मोठा आहे हा विश्वास ठेव.

⦁ आजचा संकष्टीचा दिवस आनंदी,प्रसन्न जावो.
संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा

sankashti chaturthi wishes in marathi

मित्र मैत्रिणींना आणि कुटुंबाला संकष्टीच्या शुभेच्छा SMS

⦁ तुमच्या कुटुंबावर बाप्पाची कायम कृपा राहो.
संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ मित्रा तुझ्यावरील सगळी संकटे बाप्पा दूर करो.
संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ चांगल्या कार्याचे आरंभ गणेशाच्या पूजनाने होते.
संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ तुझे प्रयत्न बाप्पाने पाहिलेत तो नक्कीच यश देईल.

⦁ मागणं काहीच नाही गणराया तू सोबत आहेस हेच ध्यानात राहो.

⦁ ह्या संकष्टीने बाप्पा तुमची सर्व कार्ये सिद्धीस नेवो.
संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ बाप्पा तुला उत्तम बुद्धी देऊन तुझं भविष्य उज्ज्वल करो.
sankashtichya hardik shubheccha

⦁ तुमच्या कुटुंबाला आरोग्य प्राप्त होवो हीच श्रीगणेश चरणी प्रार्थना.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

संकष्टी चतुर्थी सकारात्मक विचार Sankashti Chaturthi Positive thoughts

⦁ पैशाने सर्व काही विकत घेता येते पण समाधान श्रीगणेशाच्या चरणीच मिळते

⦁ तो देतो सर्वकाही फक्त आपले मिळवण्याचे प्रयत्न कमी पडतात

⦁ आज संकष्टी योग्य दिवस आहे मंगलमय आरंभाचा.

⦁ संयम ठेव अपयशाने खचून जाऊ नको बाप्पा पाहतोय सर्वकाही

⦁ तो देतो आणि त्यावर मात करण्याचे बळ ही देतो

⦁ फक्त शक्ति नाही त्यासोबत गणेशाची भक्ति महत्वाची असते

निष्कर्ष : संकष्टी चतुर्थी हा फक्त व्रत,उपवास,किंवा पूजेचा सण नसतो तर तो भक्ति,विश्वास,निष्ठा,सामर्थ्य,ह्यांचा तो आरंभ,असतो.गणेशाच्या एका स्मरणाने आयुष्यात सकारात्मकता येते. आणि आयुष्यातील प्रत्येक मोठ्या संकटांवर मात करण्याचे बळ येते आणि यश प्राप्त होते. मनाला स्थिरता प्राप्त होऊन आरोग्य लाभते असा संकष्टी चतुर्थीचा महिमा आहे.
संकटांचा नाश करणारा विघ्नहर्ता तुमचं कायम रक्षण करो.
गणपती बाप्पा मोरया..!

FAQ Section

संकष्टी चतुर्थीला आहार काय घ्यावा ?
फळाहार उत्तम अजून उपवासत शेंगदाणे,साबुदाणे,मोदक,दूध हे पदार्थ चालतात.

संकष्टी चतुर्थी व्रत किंवा उपवास केल्याचे फायदे काय आहेत ?
हे व्रत,पूजा,उपवास केल्याने आरोग्याला फायदा होतोच पण,मनही शांत आणि स्थिर होते आणि मन शांत झालं म्हणजे प्रगती म्हणजेच यशाचे मार्ग ही मोकळे होतात.

संकष्टी चतुर्थीचा उपवास कोणी करावा ?
अशी कोणतीही बंधन नाहीत फक्त प्रसंग संकटे आहेत त्यानीच नाही तर प्रत्येकजण हे व्रत करू शकतो अगदी विद्यार्थी ही हे उपवास करून आपली बुद्धी क्षमता वाढवू शकतो.

हा उपवास कधी सोडवा ?
तर पहाटे पासून धरलेला हा उपवास दिवसभर निर्जळी म्हणजे आपल्या भावार्था प्रमाणे करून सायंकाळी चंद्रदर्शन करून हा उपवास सोडतात आणि गणेशाचे पूजन करतात.

आणखी वाचा –
Thomas Adison Biography In Marathi
50+ मराठी कविता संग्रह
शुभ प्रभात सुविचार मराठी