Self Love Quotes In Marathi सेल्फ लव्ह कोट्स मराठीमध्ये

Self Love Quotes In Marathi मराठीत सेल्फ लव्ह कोट्स: आयुष्य जगत असताना आपल्या तत्वांवर आपला विश्र्वास ठाम असायला पाहिजे.आपण जे करतो ते नक्की योग्य आहे का हे पाहून आपल्याला योग्य मार्गावर,विचारावर ठाम राहता यायला पाहिजे त्यालाच self respect आणि self love म्हणतात.आणि हे असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या वागण्याने आपला आदर करता यायला पाहिजे.आपल्या कर्माने आपल्याला लाज वाटत असेल तर हाच आपला पहिला आपमान असतो.म्हणून सत्याच्या मार्गावर राहून पहिलं स्वतःचा नजरेत आपण योग्य पाहिजे त्याच साठी आम्ही तुमच्यासाठी Self Love Quotes In Marathi मधून काही विचार आणले आहेत ज्या marathi quotes मधून तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकाल.

  • self love quotes in marathi
  • self love quotes in marathi for girls
  • self love quotes in marathi for boys
  • motivational self love quotes in marathi

Self love quotes In Marathi सेल्फ लव्ह कोट्स मराठीमध्ये

Self Love Quotes In Marathi

  • जिथे नातं महत्वाचं असेल तर तत्व सोडून द्या .आणि जिथे तत्व महत्वाची असेल तर नातं विसरा आणि कर्तव्य करा
  • ज्याला तुम्ही काळजी आहे त्यालाच जपा.ज्याला आपल्या असल्या नसल्याने काही फरक पडत नाही तिथे त्याची चिंता सोडून द्या
  • लोकं आपल्या मागून काय बोलतात याने आपल्याला फरक नाही पडला पाहिजे. एवढं तुम्हाला तुमच्या कर्मावर विश्वास पाहिजे
  • तुमचा हेतू योग्य असेल तर,कोणाला  clarification देण्याची गरज नाही.शांत आपले काम करत रहा
  • कोणाच्या वाईट बोलण्याने तुम्ही वाईट होतं नाही पण जर ते बोलणं तुम्ही मनावर घेतले तर तुम्ही वाईट होता
  • आपल्या असण्याने आणि आपल्या नसण्याने कोणाला फरक पडतो ते पहा आणि फक्त त्यांच्या साठी जगा बाकी जग गेलं उडत
  • ह्या जगात तुमचं कुटुंब सोडलं तर तुमचं कोणी नाही हे सत्य आहे
  • खुश राहणं हेच आयुष्याचे ध्येय आहे आणि हे ध्येय पैशाने गाठता येत नाही ते आपल्या कर्माने मिळवता येत

Self love Quotes In Marathi For girl मुलींसाठी प्रेरणादायी विचार

मुलींनी त्यांची मानसिकता बदलायला हवी,मी नाजूककमजोर हीच मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे जग तुम्हाला torcher करत राहणार तुमच्यावर अन्याय होत राहतील.self love quotes in marathi for girl या मधे मुलींमध्ये म्हणजेच स्त्रीशक्ती काय आहे हे फक्त visualize करून देण्याचा आमचा हा marathi quotes मधून प्रमाणिक प्रयत्न आहे.

  • दुर्गा तू,भवानी तू,जगदंबा तूच आहेस फक्त तुला त्याची जाण हवी मग हे जग तुझ्याकडे आदराने पाहेल
  • पुरुषाच्या पुरुषी अहंकाराला न घाबरता तू,स्वाभिमानाने जगायला शिक
  • तू सावध रहा ह्या मानव रुपी रावणा पासून तूच सीता माता,तू, झाशीची राणी आहेस, तूच जिजाऊ आहेस हे लक्षात ठेव
  • फक्त भावावर अवलंबून आता तू राहू नकोस तू स्वावलंबी हो…वेळेला तलवार ही चालवण्याची तुझी तयारी हवी
  • हे महाराजांच राज्य आहे असं समज गनीम पुन्हा चालून आला आहे म्हणून पावलोपावली तू सावध रहा कारण तू शिवकन्या आहेस….
  • तू फक्त कोणाची बहिण नाहीस तू फक्त कोणाची पत्नी नाहीस तू फक्त कोणाची मैत्रीण नाहीस दुर्गा तू,भवानी तू,जगदंबा तूच तू अनंत काळाची माता आहेस…!
  • Self Love Quotes In Marathi
  • जगाच्या प्रगतीत तू पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिलीस मग स्वतःचा संरक्षण करण्यासाठी तू कमजोर का…तीच शक्ती तुझ्यात ही आहे
  • कोणावरही तू लगेच विश्वास नको करू कितीही विश्वासू असला तरीही तू सावध रहा..इथे प्रत्येकजण संधीची वाट पाहतोय
  • ज्या हाताने भावाला राखीचे बंधन बांधतेस त्याच हाताने कानाखाली मारण्याची तुझ्या हातात हिम्मत हवी
  • प्रत्येक घरी मुलीला स्वसंरक्षणाचे बाळकडू मिळायलाच हवे
  • तू संस्कृती जप हाच तुझा तू केलेला आदर आहे हेच तुझ्यावरचे तू केलेले प्रेम आहे
  • तू जिन्स घाल ना पण त्यावर पैंजण ही असायला पाहिजेत
  • तुझी Hair style कोणतीही कर पण कपाळाचा गंध मात्र विसरू नको हेच तुझ सामर्थ्य आहे
  • तू हातावर Tatto काढ ना पण हातातील कंकन विसरू नको हेच तुझे शस्त्र समज

Self Love Quotes In Marathi For Boy मुलांसाठी प्रेरणादायी विचार

एक मुलगा म्हणून कसा असावा. मुलाचं कधी शोभून दिसत ते कोणते गुण आहेत हे marathi quotes मधून पहा. असं म्हणतात ना “पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा”. एक मुलगा त्याचे अनेक पैलू आहेत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्या self love quotes in marathi for boy मधे marathi quotes मधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

  •  मुलगा म्हणून आई वडिलांची जाण पाहिजेच
  • एकबाप गरीब आहे म्हणून लाज वाटू नये तर आपल्याला बाप प्रामाणिक आहे हा स्वाभिमान असावा
  • परस्त्रीचा बहिणीं समान आदर हा गुण मुलांना शोभून दिसतो.
  • एकदा जबाबदारी वाट्याला आली की सगळी मजा मुलगा विसरून जातो
  • Self Love Quotes In Marathi
  • एक मुलगा असणं सोपं नाही करिअर,आई वडील,लग्न आणि वस्तुस्थितीचं ओझं घेऊन चालावं लागतं
  • सगळीच मुलं सारखी नसतातकाही मुलं आई वडिलांच्या संस्कारांवर चालणारी ही असतात
  • Bullet आणि iPhone मिरवणारी मुलंचं standard असतात असं नाही जुने कपडे आणि खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी पेलनाऱ्या मुलांचं Standard वेगळंच असतं
  • आई वडिलांच्या सुखासाठी आपल्या आनंदावर पाणी सोडणारीही मुलं असतात
  • बापाच्या पैशावर व्यसनाधीन होणारी मुलं असतात पण बापाच्या एक एक रुपया विचार करून वापरणारी मुलं असतात
  • मुलगा हा श्रीरामा सारखा असावा आई वडिलांची आज्ञा म्हणून वनवास भोगावा
  • मुलगा हा श्रावण बाळा सारखा असावा मुलाने कधीतरी पुंडलिक व्हावं आणि आई वडिलांची सेवा करावी आणि देवाला ही हेवा वाटावा

Motivational Self Love quotes in marathi प्रेरणादायी विचार

आयुष्य जगताना जगणं मात्र राहून जातं असे आयुष्याचे कोडे आहे.आयुष्यातील प्रश्न,प्रसंग,दुःख काही गेल्या जात नाही,दुःख पर्वता एवढे आणि सुख मात्र जवा एवढेच वाट्याला येते.म्हणून आयुष्याला दोष देऊ नये आयुष्य हे चढ – उताराने भरलेलं आहे त्यालाच तर आयुष्य म्हणतात.म्हणून आयुष्याला समजून घेणं महत्वाचं आहे.म्हणून motivational self love quotes in marathi मधे हे marathi quotes तुम्हाला आयुष्यात सुखी करण्याला हातभार लावतील हे मात्र नक्की.

  • तुमच्या जाण्याने कोणकोणला फरक पडत ते आधी पहा आणि ज्यांना तुमच्या जाण्याने फरक पडतो त्यांच्यासाठीच जगा.
  • तुमच्या कुटुंबा शिवाय तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम कोणी नाही करू शकत.
  • प्रसंग पडल्यावर कुटुंबच धावत येत हे कायम लक्षात ठेवा
  • जागाच मनावर घ्यायचं नाही आपल्या हृदयाचं ऐकायचं आणि तेच करायचं.

Self Love Quotes In Marathi

  • ह्या जगात तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहात म्हणून तुम्ही स्वतःला special समजा.
  • आयुष्य हे ट्रेन सारखं आहेकाही जण थांबतात तर काहीजण
  • पुढे निघून जातात,जी थांबतात तीच आपली असतात.

येथे क्लिक करा – Motivational Quotes In Marathi

Motivational Self Love Quotes In Marathi प्रेरणादायी विचार

आज धावपळीच्या आणि स्वार्थी जगात तुमची दुसर्याकडून आनंदाची ठेवलेली आशा ही तुम्हाला आनंद देईलच असं नाही,म्हणून स्वतःला आनंदी करता यायला पाहिजे,आणि हे ज्याला जमलं तोच एक कलाकार आहे.स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी तुमच्याकडे तुमच्याबद्दलचा कमालीचा सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे तो चांगल्या विचाराने येत असतो असेच ,तुमच्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलणारे विचार आम्ही 100+ motivational Self Love Quotes In Marathi मधून घेऊन आलो आहोत नक्की वाचा.तुमच्यात घडलेला बद्दल हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे.

  • जगण्याची एक सोपी पद्धत आहे,जिथे त्रास होतोय तिथे स्मित हास्य देऊन दुर्लक्ष करा.

motivational thoughts in marathi

  • मी सगळ्यात जास्त तेव्हा खुश असतो, जेव्हा मी माझ्याच सोबत असतो.
  • लोकं जवळ येतात अंदाज लावून आपल्याला ओळखतात आणि त्याचा फायदा असेल तर थांबतात आणि निघून जातात म्हणून आयुष्यात कोणी येवो किंवा जावो मी हसत राहतो.
  • दिखावा संपला की पुढे पुढे करत नाही तरी,मला बघून लोकं इंप्रेस होतात.
  • जेवढी लोकं माझ्यापासून दुरावून, जी पोकळी निर्माण केली ती मी सप्तरंग भरून सुंदर बनवली.
  • पानांवरून ओरघळणार्या दवबिंदूत पाहिलेली दुनिया एका क्षणांत निसटून,मातीत मिसळून सुगंधाने माझ्यात सामावली आणि मी सुखावलो
  • लोकं काय म्हणतात ह्याने मला कधीच फरक पडला नाही.कारण मी माझ्याजवळ प्रामाणिक आहे.

motivational thoughts in marathi

  • आपण उपयोगी पडलो की आपण चांगले,दुसर्यावेळी आपण उपयोगी आलो नाही, तर आपण लगेच वाईट होतो,अशी लोकं गरजे नुसार रंग बदलत असतात म्हणून,लोकं चांगली किंवा वाईट बोलो,मनावर घेत नाही.
  • जगाचा परिणाम माझ्यावर होत नाही,एवढा मी एकाग्र आहे,स्वतःच्या ध्येयावर.
  • मला माझ्याजवळ बोलायला खूप आवडतं.
  • मी खूप आनंदी असतो.मला मी खूप आवडतो.
  • माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते चांगल्या साठीच घडत आहे,एवढा मी सकारात्मक आहे.
  • मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे.जगातील सगळ्यात सुंदर निर्मिती म्हणजे माझे शरीर आहे.
  • कोणीतरी माझ्यासाठी वेळ काढावा ही दुःख देणारी आशा आहे म्हणून माझ्यासाठी मीच वेळ काढतो.

motivational thoughts in marathi

  • दुसऱ्यांमुळे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही.
  • जे क्षणिक आहेत त्यांच्या मुळे मी माझा नाश करत नाही.
  • मला वर्तमान काळात राहायला आवडतं हेच माझ्या आनंदाचे रहस्य आहे.
  • आयुष्य हे एक काव्य आहे फक्त रचता यायला हवं.
  • स्वतःहा वर एवढं प्रेम आहे की,मला माझ्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही.
  • कोणी माझ्याजवळ बोलला तर ठीक आहे नाही बोललं तरी ठीक आहे ,माझा श्वास तर चालू आहे ना,हा विचार मला कायम आनंदी ठेवतो.
  • तू स्वतःहा वर प्रेम केलं नाहीस तर तुझ्यावर कोणी प्रेम करणार नाही.
  • स्वतःला शिस्तबद्ध ठेवणं म्हणजे सेल्फ लव्ह.
  • खूप मेहनत करायची आणि ताठ मानेने समाजात वावरायचे राजा सारखे.
  • कोणी सोडून गेला म्हणून त्या मालावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही, शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्याने बहरायचे काही सोडलं नाही.
  • लोकांना ओळखण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा स्वतःला ओळखून आयुष्य जगावं.