The seven wonders of the world जगातील सात आश्चर्य | जगातील सात आश्चर्य कोणती ?
The seven wonders of the world जगभरात आशा अनेक वस्तू आहेत ज्यांची सुंदरता आणि बनावट अद्भुत, अकल्पनिय, आहे.या गोष्टींचा इतिहास देखील रोमांच उभं करणारा असतो.कोणतीही technology devoloped नसताना केवळ मनुष्यबळ आणि बुद्धी कौशल्याच्या जोरावर ज्या वस्तु उभ्या आहेत त्या अशक्य आहेत . न भूतो न भविष्याती अशी रचना आणि कल्पना आहे आशा वस्तूंचा आज पर्यन्त जो माणसाला शोध लागला आहे त्या पाहून जगाला आश्चर्य वाटल,अशी सात वास्तु जगाच्या पाठीवर आज अस्तित्वात आहेत ज्या आश्चर्य उभं करणाऱ्या आहेत,म्हणून त्या The seven wonders of the world मध्ये सामील होतात .ते प्रत्यक्षात पाहणं सगळ्यानाच शक्य नाही होतं पण त्याबद्दल माहीत असणं गरजेचे आहे . म्हणून ही सात आश्चर्य कोणती व त्यांचा इतिहास काय आहे हे आज आपण जाणून घेऊ.
जगातील सात आश्चर्य कोणती ? The seven wonders of the world
• ताजमहाल (Taj Mahal)
• रोमन कॉलॉजियाम (the roman colosseum)
• पेट्रा (Petra)
• ख्रिस्त द रेडीमर (christ the Redeemer)
• चिचेन इत्जा (chichen itza)
• माचू पिचू (machu pichu)
• चीनची भिंत (the great wall of china)
1) ताजमहाल Taj Mahal
पहिलं आश्चर्य आहे Taj mahal जे प्रत्येकाचे स्वप्न आहे जिथे जाण्याचे ,जे सर्वांचे फेवरेट आहे , भारताचे शान असणारा ताजमहाल आग्रा शहरात स्थित आहे हे सगळ्याना माहीत आहे पण त्यामागचा इतिहास जाणणारे कमीच,The seven wonders of the world मध्ये ताजमहाल देखील डौलाने उभा आहे.डोक्याने स्ट्रक्चर बनत ते काळाच्या ओघात नष्ट होतो पण जे हृदयातून बनत ते कधीच नष्ट होतं नाही ह्याची साक्ष ताजमहाल अजूनही देत आहे .ताजमहाल बद्दल अनेकांची अनेक मतं आहेत उदा . taj mahal हे शिवशंकरांचे मंदिर आहे असेही अनेकजण बोलतात . काहीजण म्हणतात की ताजमहाल मध्ये 22 दरवाजे आहेत ते बंद आहेत . ते उघडले तर त्यात देवदेवतांचे मूर्ती आहेत , दुसऱ्या दरवाज्यात चांगले दिवस आहेत , असे खूप मतं अनेकांचे आहेत आपण ऐकल ही आहे की राजा शाहजहान ने ताजमहाल बांधून पूर्ण झाले तेव्हा मंजुरांचे हात कापले होते कारण दूसरा ताजमहाल बनू नये त्यात कितपत सत्य आहे हे रहस्य आहे . ताजमहाल इसवी सन 1632 मध्ये बनविण्यात आले होते . त्याची रचना पांढऱ्या संगमवर पासून बनवले गेले . आपल्याला जो इतिहास माहीत आहे त्यानुसार ताजमहाल आपण प्रेमाचे प्रतीक मानतो . अशी कलाकृति जगात कुठेही पाहायला मिळणार नाही , ताजमहाल बनविण्यासाठी जवळपास 15 वर्षांचा कालावधी लागला होता . ह्याच सौदर्य अनुभविण्या करिता जगभरातून अनेक लोकं भारताकडे वळतात . तुम्हाला देखील संधि मिळाली तर taj mahal पाहायला नक्कीच जा .
2) रोमन कॉलॉजियाम (the roman colosseum)
रोमन कॉलॉजियाम (the roman colosseum) इटली देशातील रोमन शहराच्या मध्यात स्थित आहे . एक विशाल स्टेडियम आहे ,जेथे प्राचीन काळामध्ये प्राण्यांची लढाई , कुस्ती सांस्कृतिक कार्यक्रम व खेळांचे आयोजन केले जायचे . रोमन कॉलॉजियाम ची निर्मिती त्याकाळातील शासक वेसपीयन ने 70 ते 72 इसा . पूर्व केले होते . रोमन कॉलॉजियाम चे आकार हा अंडाकार कृतीचे आहे . रोमन कॉलॉजियाम मध्ये एकाच वेळी 50 हजार लोकं एकत्रित बसू शकतात .एवढी क्षमता आहे . त्याची विशाळता आणि भव्यता आजही आजरामर आहे , हे पाहण्यासाठी लोकं जगभरातून इटली येथे येतात .आज या ठिकाणी एवढी गर्दी आसते की तिकीट मिळणं शक्य होतं नाही . online तिकीट book करून जरी गेलात तरी भळीमोठी रांग तुम्हाला पाहायला मिळेल एवढी त्याची प्रसिद्धी आणि आकर्षण आहे . तुमच्या जवळ तिकीट नसेल तरीही आतमध्ये न जाता तुम्हाला बाहेरूनही ते पाहता येतं .
3) पेट्रा (Petra)
पेट्रा हे दक्षिण जॉर्डन मध्ये स्थित एक ऐतिहासिक नगर आहे . या शहरात मोठ मोठी दगड कापून त्यापासून कलाकृति बनविण्यात आल्या आहेत. या शहराला rose city देखील म्हणतात . कारण येथे कापलेले सर्व दगड हे लाल रंगाचे आढळतात . पेट्रा (Petra) चे बांधकाम इ. स पूर्व 312 मध्ये करण्यात आले होते . अनेक डोंगर कोरून हे शहर उभारले गेले आहे . त्याच सौदर्य आजही जगाच्या सात आश्चर्य मध्ये टिकून आहे आणि ते पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक petra कडे आकर्षित होतात . पेट्रा (Petra) मध्ये तुम्हाला फिरायचे किवा पूर्ण दर्शन घ्यायचे असेल तर तुमच्यासोबत मार्गदर्शक guide पाहिजेच . कारण इथे एकटे फिरणं हे धोक्याचे ठरू शकते कारण त्याची ऊंची यांनी अरुंद वाटा .उंच टेकड्या आणि त्याही गोलाकार त्यांच्या वाटा फिरून फिरून एकाच जागेवर येतात म्हणून इथे एकटे फिरणे शक्य होतं नाही ,आणि म्हणून ह्या घडीला तिथे मार्गदर्शक व वाहन साधन म्हणून घोडे किवा गाढव ही आढळतात .
4) ख्रिस्त द रेडीमर (christ the Redeemer)
जगातील सात आश्चर्य मध्ये ख्रिस्त द रेडीमर हे देखील आपले वेगळ स्थान घेऊन उभं आहे . ही वस्तु भगवान येशू ख्रिस्त यांची एक प्रतिमा आहे . ही प्रतिमा सर्वात उंचीच्या प्रतिमेमद्धे ही येते . ह्या प्रतिमेची ऊंची 38 मीटर आहे . आणि रुंदी 30 मीटर आहे. या मूर्तीचे वजन 635 टन आहे असे मानले जाते . येशू ख्रिस्तानच्या ह्या मूर्तीचे निर्माण 1922 ते 1931 दरम्यान करण्यात आले होते .
5) चिचेन इत्जा (chichen itza)
चीचेन इत्जा चे निर्माण 600 ई. सा. पूर्व करण्यात आले होते .चिचेन इत्जा (chichen itza) माक्सिकोतील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानलं जातं . या मंदिराचा विस्तार हा पाच किलोमीटर परिसरात पसरला आहे . चिचेन इत्जा (chichen itza)ची रचना आणि आकार पाहायला गेलो तर ते एका प्यारमिड प्रमाणे दिसते . चिचेन इत्जा (chichen itza)ची ऊंची 80 फुट आहे . मंदिरात जायचं असल्यास मंदिराच्या 365 पायऱ्या चढून जावं लागतं ,ह्या 365 पायऱ्या ह्या वर्षातील 365 दिवसांचे प्रतीक आहे . चिचेन इत्जा (chichen itza)परिसरात अजूनही पारंपरिक पद्धतीचे कालनिर्णय तुम्हाला पाहायला मिळतील . तिथली संस्कृति ही जगावेगळी आहे ,तिथे माणसाला बळी देणे पवित्र्याचे मानले जायचे .
6) माचू पिचू (machu pichu)
माचू पिचू (machu pichu)हे ठिकाण दक्षिण अमेरिकेच्या पेरू मध्ये स्थित आहे. माचू पिचू (machu pichu) हे एक ऐतिहासिक शहर आहे . हे शहर एका उंच टेकडीवर वसले आहे . माचू पिचू (machu pichu)हे समुद्र सपाटी पासून 2430 मीटर उंचीवर आहे . एवढ्या उंचीवर असलेल्या माचू पिचू (machu pichu)शहरात 15 व्या शतकात इंका प्रजातीचे लोकं राहत होते . इतक्या उंचीवर हे शहर कसे उभारले आणि एवढ्या उंचीवर हे लोकं कसे राहतं होते ही अजूनही आश्चर्याची बाब आहे . या शहराचे निर्माण राजा पंचकुतीने केले होते . परंतु राजा च्या 100 वर्षानंतर स्पेन ने या शहरावर विजय मिळवला . ईसवी सन 1911 मध्ये अमेरिकेचे प्रसिद्ध इतिहासकार हिरम बिंघम यांनी माचू पिचू (machu pichu)शहराला जगासमोर आणले ,आणि हे ऐतिहासिक व सुंदर शहर जगाच्या इतिहासातील आश्चर्यामद्धे सामील झाले .
7) चीनची भिंत (the great wall of china)
the great wall of china म्हणून ओळखले जाते ह्या भिंतीचे निर्माण 7 ते 16 व्या शतकाच्या दरम्यान केले होते ह्या भव्य भिंतीच्या निर्मितीसाठी लाकूड दगड विटा इत्यादींचा वापर करण्यात आला होतं ,चीनवर होणार उत्तरेकडील आक्रमण रोकखण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांच्या शासकानद्वारे या भिंतीचे निर्माण करण्यात आले होते . चीनची भिंत (the great wall of china) एवढी विशाल भव्य आहे की या भिंतीला अंतरिक्षातून देखील पाहिले जाऊ शकते . ही भिंत 6400 किलोमीटर लांब आणि ऊंची 35 फुट इतकी आहे . ह्या भिंतीवरून 10-15 लोकं आरामशिर चालू शकतील एवढी ती रुंद आहे .ह्या भिंतीचे निर्माण करण्यासाठी जे मजूर होते त्यांची संख्या 20 ते 30 लाख होती एवढ्या मजुरांनी मिळून ह्या भिंतीचे निर्माण केले .
हे ही वाचा – पानिपत युद्ध