ind u19 vs eng u19 : भारत वि. इंग्लंड u19 वर्ल्डकपचा अंतिम सामना भारताने 100 धावांनी जिंकत जगाला दाखवून दिले की भारताच्या क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात आहे.
ठिकाण : U19 World Cup 2026 फायनल. Harare Sports Club , Harare
ind vs eng फायनल मॅच
अंतिम सामन्यात भारताने टॉस जिंकत पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य होता हे सिद्ध करतांना 411 धावांचा इंग्लंड समोर डोंगर उभा केला. इंग्लंडच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला.

भारत बॅटिंग : सुरुवातीला 20 रन्स वर पहिली विकेट्स गेल्यावर कर्णधार Aayush Mhatre आणि Vaibhav Suryavanshi यांनी धुरा सांभाळत धावांचा पाऊस पाडला. vaibhav suryavanshi ने इतिहास रचत धुव्वाधार शतक साजरं केलं. त्यामध्ये 175 रन्स आणि 80 चेंडू आणि त्यात 15 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश होता.
Ind u19 vs eng u19 : भारताची bowling कामगिरी
आर. एस. आमरीक्ष 9 ओवर,56 धावा आणि 3 बळी
दीपेश devendran : 6 ओवर 64 धावा आणि 2 बळी
कनिष्क चव्हाण : 8.2 ओवर 63 धावा आणि 2 बळी.
दुसरी इंनिंग
इंग्लंडने 411 धावांचा पाठलाग करताना सर्वबाद 311 धावांपर्यंत मजल मारली ज्यात Coleb Folconer 115 धावा केल्या. पण दुर्दैवाने ही खेळी अपयशी ठरली.
सामनावीर आणि मालिकावीर U19 World Cup 2026
14 वर्षीय vaibhav suryavanshi विजयाचा खरा शिल्पकार ठरला त्याच्या वादळी खेळीने आणि कर्णधार aayush mhatre च्या 53 धावांच्या साथीने 411 धावांचा टार्गेट इंग्लंड समोर ठेवणं शक्य झाले.
Vaibhav Suryavanshi
एकूण धावा – 439
सरासरी – 62.71
स्ट्राइक रेट – 169.49.
शतक/अर्धशतक – 1 शतक / 3 अर्धशतक
एकूण षटकार – 30 सर्वाधिक
आपल्या कामगिरीने साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणारा वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेटचे भविष्य असेल याची ओळख करून दिली.
u19 world cup : भारताने आजच म्हणजे 6 फेब्रुवारी 2026 ला world cup जिंकत 6 वेळा विश्व विजेता होण्याचा पद पटकावला.
अंडर 19 विश्वकप 2026 मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
- पहिल्या क्रमांकावर इंग्लंडचा Ben Mayes च्या नावे सर्वाधिक 444 धावा आहेत.
- दुसऱ्या क्रमांकावर भारताचा Vaibhav Suryavanshi 439 धावा आणि सर्वाधिक षटकार आहेत.
- तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा Thomas Rew 330 धावा त्याच्या नावे आहेत.
अंडर 19 विश्वकप 2026 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू
| खेळाडू | सामने | विकेट्स |
| Manny Lumsden (इंग्लंड) | 7 | 16 |
| Nooristani Omarzai (अफगाणिस्तान) | 6 | 14 |
| Abdul Subhan (पाकिस्तान) | 5 | 13 |
| Ali Raza (pakistan) | 5 | 13 |
| Md AI Fahad (bangladesh) | 5 | 12 |
| Charles Lachmund (ऑस्ट्रेलिया) | 5 | 12 |
| Henil patel (इंडिया) | 7 | 11 |
U19 विश्वकप जिंकणारे भारतीय कर्णधार
| वर्ष | कर्णधार |
| 2000 | मोहम्मद कैफ |
| 2008 | विराट कोहली |
| 2012 | उन्मुक्त चंद |
| 2018 | पृथ्वी शॉ |
| 2022 | यश धूल |
| 2026 | आयुष म्हात्रे |
कोणत्या संघाने किती वेळा जिंकलाय U19 World Cup
सर्वात जास्त वेळा भारताने 6 वेळा – 2000,2008,2012,2018,2022,2026
ऑस्ट्रेलिया – 4 वेळा – 1988,2002,2010,2024.
पाकिस्तान – दोन वेळा – 2004,2006.
इंग्लंड – 1 वेळा – 1998.
साऊथ आफ्रिका – 1 वेळा 2014.
बांग्लादेश – 1 वेळा 2020.
वेस्ट इंडिज – 1 वेळा 2016.
प्रेक्षकांसाठी Under 19 World Cup 2026 का उत्साहाचा विषय ठरतो
आपापल्या देशातील प्रत्येक खेळाडूचा प्रेक्षकांना अभिमान असतोच पण आपल्या देशातील क्रिकेटचे भविष्य घडवणाऱ्या खेळाडूंना चकाकतांना पाहणं ही एक मेजवानीच ठरते. त्यांना जवळून पाहता येतं त्याच बरोबर कोणता खेळाडू आपल्या देशातील दिग्गज खेळाडूंची कमी भरून काढेल याची जाणीव प्रत्येकजण घेत असतो.
म्हणून Under 19 विश्वचषक पाहणं हे प्रत्येकासाठी खास असतो.
जागतिक क्रिकेटचा पाया म्हणजे U19 World Cup
जगात जरी वरिष्ठ क्रिकेट संघांचा डंका असला तरी त्याची सुरुवात आणि पाया भरणी ही u19 Worldcup पासून होतं असते.
प्रत्येक खेळाडूंचा क्रिकेट मध्ये महान होण्यापर्यंतचा प्रवास हा इथूनच होत असतो.
विराट कोहली, जो रूट, बाबर अजम , केन विल्यमसन, स्टिव स्मिथ, यांसारखे अनेक खेळाडू Under 19 विश्वकप ने जगाला दिले आहेत
Conclusion
म्हणून U19 क्रिकेट हा एका खेळाडूचा खेळाडू म्हणून पाया आहे. याच खेळामधून पुढे येणाऱ्या पिढीमधील खेळाडूवृत्ती,आत्मविश्वास,कष्ट,जिद्द,चिकाटी हे गुण विकसित होतं असतात आणि तेव्हा त्या खेळाडूचा खेळ पाहणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. म्हणून तुमच्या माझ्या सारखा क्रिकेट प्रेमी हा चषक लक्षपूर्वक पाहतो.