वजन कमी कसे करावे : आजच्या दगदगीच्या जीवनात चुकीचा आहार आणि आपली जीवन जगण्याची पद्धत ह्यामुळे शरीरावर होणार परिणाम हे घातक असतात. त्यातील एक वजन वाढ. ह्याच वजन वाढीमुळे मधुमेह,हृदयविकार असे जीवघेणे आजार होतं असतात.अशी वजन वाढ कमी करण्यासाठी खूप काही गोळ्या,औषधं उपचार करून खूप खर्च करूनही पैसा वाया जात असतो. Weight lost करण्यासाठी आपल्याकडे संयम,शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारून नैसर्गिकरित्या वजन कमी कसे करावे ते आणि वजन कमी करण्याचे घरगुती उपाय ह्या लेखात आपण पाहणार आहोत
संतुलित आणि पोषक आहार स्वीकारा Dietary Changes
सर्वात mahtvacha आणि पहिली पायरी म्हणजे तुमचा आहार तुमच्या आहारात काय असतं त्याकडे लक्ष द्या.कारण वजन कमी करण्यात 70% वाटा आहाराचा आणि 30% वाटा हा व्यायामाचा असतो.
१ . शरीरात चरबी तयार करणारे पदार्थ टाळा
उदाहरणअर्थ साखर,मैदा ह्या पासून बनविलेले पदार्थ रक्तात इनसुलन्सची पातळी वाढवून चरबी तयार करतात. हे पदार्थ कमी केल्यास शरीरात अतिरिक्त पानी आणि चरबी कमी झाल्याचे आढळून येईल.
प्रोटिन युक्त पदार्थ वाढवा : प्रोटिन मुळे भूक कमी लागून स्नायूंचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. प्रोटिन युक्त पदार्थ कोणते तर दूध,पनीर,अंडी,सोयाबीन,डाळ,तसेच कडधान्ये यांसारखे पदार्थ आहारात समाविष्ट करून घेतले पाहिजे.
२. फायबरयुक्त पदार्थ
खाल्ल्याने पोट भरलेले राहून भूक कमी लागते.
रात्रीचे जेवण मर्यादित असावे झोपण्यापूर्वी 2-3 तास आधी करावे.रात्री शक्यतो हलके पदार्थ सेवन करावे.उदा.सूप ,खिचडी,उकडलेल्या भाज्या ई.
३. पाण्याचे प्रमाण
वाढवावे दिवसातून 3-4 लिटर पाणी प्यावे.कधी कधी आपल्याला तहान लागलेली असते आणि आपल्याला वाटतं भूक लागले. जेवण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे त्याने जास्त भूक लागतं नाही. त्यामुळे कॅलरीज कमी घेतल्या जातात त्यामुळे चरबी लवकर जळते. कोमट पाणी प्यायल्याने पचन क्रिया सुधारते.महत्वाचं म्हणजे पाण्याचे योग्य प्रमाण शरीर hydration पासून बचावते.
४. रोज व्यायामाची जोड (Physicial Activity) :

फक्त उत्तम आहार घेऊन वजन कमी होते पण शरीराची उत्तम,सुंदर,सुटसुटीत संरचना करण्यासाठी व्यायाम महत्वाचे ठरते.
व्यायाम म्हणजे Gym मध्ये जायलाच पाहिजे असं नाही तर व्यायामामध्ये तुम्ही कार्डियो करू शकता. उदा. चालणे,धावणे,सायकल चालवणे किंवा पाहणे. यामध्ये जास्त कॅलरीज बर्न होतात.किमान रोज 30-40 मिनिटे व्यायाम ही सुरुवातीला खूप असतो.
५. सूर्यनमस्कार :
सर्व इंद्रिये विकसित करणारा योगासनातील प्रकार याशिवाय अनेक योगासने आहेत जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करून घ्या. त्यातही त्रिकोनासन आणि भुजंगासन हे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतात.
आठवड्यातून दोनदा strenth ट्रेनिंग नक्की करा ज्याने नवीन स्नायू जन्म घेतात आणि विश्रांतीच्या वेळी fat बर्न होते.
मानसिक स्थिति आणि झोप :
वजन वाढी मागे हे दोन मुख्य कारण बनतात हल्ली सोशल मेडियाच्या जगात आपली झोप अपुरी होते आणि मानसिक संतुलन बिघडतो. शरीरातील हरमोन संतुलित राहण्यासाठी शरीराला ७-८ तासांची शांत झोप महत्वाची असते.आपुऱ्या झोपेमुळे शरीरात शरीराला अनावश्यक हार्मोन्स वाढतात त्यामुळे जास्त भूक लागते आणि वजन वाढायला लागते. मानसिक तणाव हे एक वजन वाढी मागील कारण असते. तणाव कमी करण्यासाठी meditation आणि छंद जोपासा त्यामुळे मानसिक स्थिति स्थिरावते.
काही खास वजन कमी करण्याचे घरगुती उपाय (Home Remedies)
काही घरगुती उपाय जे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रगतीला वेग देतील आणि त्यांचा कोणता side effects नसतो.
लिंबू आणि मध सकाळी कोमट पाण्यात मध आणि लिंबू टाकून प्यायल्याने पचन क्रिया सुधारते आणि पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

- दालचीनी चहा : रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त असते
- जिऱ्याचे पाणी : रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्यात जिरे भिजवून सकाळी ते कोमट पाण्यात प्यायल्यास पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते
वजन कमी करताना टाळायच्या गोष्टी (Things To Avoid)
- Soda And Cold Drings : ह्यामध्ये खूप प्रमाणात साखर असते
- Proccesed Foods प्रक्रिया केलेले पदार्थ : पॅकेट मधील अन्न ,जसे चिप्स आणि जंक फूड टाळा.
- एका जागी बसणे : तुमचे एका जाग्यावर बसून तुमचे काम असेल तरी तुम्ही दर १-२ तासांनी ५ मिनिटं तरी चालायला पाहिजे.
प्रयत्नात संयम आणि सातत्य :
वजन कमी करणे म्हणजे काही अचानक चमत्कार होण्यासारखे नाही. काही वेळा बदल जाणवलं नाही तरी हार मानू नका फरक हा हळूहळू दिसत असतो त्यासाठी आपल्याकडे संयम महत्वाचा असतो.
आणि वजन कमी करण्याच्या नादात जास्त उत्सुकता ही घातक असते त्याने मानसिक तणाव येऊ शकतं. वजन कमी करण्यासाठी काहीजण जास्त उपाशी राहतात. वजन हे कमी खण्याने नाही तर योग्य खण्याने होतो.
तुमचे प्रयत्न कधीच कमी पडू देऊ नका. प्रयत्नात सातत्य महत्वाचे असते एका रात्रीत वजन कमी होतं नसत म्हणून संयम बाळगा.
स्वतःला शिस्त लावणे (decipline) :
खाण्याच्या बाबतीत स्वतःला शिस्त लावा.कधी कधी चवीच्या आहारी जाऊन स्वतःच नियंत्रण जाते आणि आपण त्या आहारच्या आहारी जातो ज्याने body fat वाढत म्हणून कोणी आपल्यासमोर काहीही खाल्लं तरी आपल्यावर नियंत्रण आणाव लागेल.
सकारात्मक विचार : शरीरातील कोणतेही बदल करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे Motivate होणे. त्यासाठी चांगली पुस्तक वाचा,चांगले विचार वाचा त्याने मानसिक स्थिर होते.
सूचना : वरील वजन कमी करण्याचे उपाय हे सामान्य आहेत तुम्हाला शरीरात मोठे बदल करायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.
तुम्हाला प्रेरित करणारे काही आरोग्याविषयी विचार marathi Motivational thoughts for health
खाली १० positive thoughts दिले आहेत ज्याने तुम्हाला शरीराचे महत्व पटेल आणि सकारात्मकता मिळेल
- आरोग्य हीच धन संपदा
- कोणत्याही मौल्यवान गोष्टीपेक्षा मौल्यवान तुमचं शरीर आहे
- शरीराच्या आरोग्याशिवाय सर्व शून्य आहे
- कितीही धावपळ असुदया दिवसातील एक तास शरीरासाठी पाहिजेच
- एक लक्षात ठेवा तुमच्या सर्वात जवळचा तुमचं शरीर आहे
- ज्याचं शरीर निरोगी तोच जगातील सर्वसुखी आहे
- शरीर हे मंदिर आहे त्याला स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे
- तुम्ही कितीही पैसा कमवा तुम्ही आजारी पडलात की सोने दागिने काहीच उपयोगाचे नसतात.
- तुमचे शरीर हेच खरे भांडवल आहे त्याची साथ असेल तर तुम्ही कोणतेही ध्येय सहज गाठू शकता
- शरीर उत्तम असेल तर सर्व सुख भोगता येतात
आणखी वाचा
मराठी प्रेरणादायी विचार
आयुष्य बदलणारे प्रेरणादायी विचार