आरोग्य जपणं हे खूप महत्त्वाचे आहे आणि ते जपण्यासाठी फार काही खर्च करण्याची गरज नसते हे walking benefits in marathi मधून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. कामातून योगा व व्यायाम करायला ही कारण सांगितली जातात.आपण काही वेळा एका जागेवर एका खुर्चीत बसून screen समोर तासन्तास काम करतो असतो पण त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून एक साधा सोपा व्यायाम जाणून घ्या जो सहज शक्य आहे. शरीराची ही क्रिया जरी साधी असली तरी तिचे फायदे हे संपूर्ण शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत, ती क्रिया तो व्यायाम म्हणजे पायी चालणे.
रोज पायी चालण्याचे (Walking Benefits In Marathi)शारीरिक,मानसिक,हृदयाला होणारे अद्भुत फायदे आपण सविस्तर पाहणार आहोत.
चालणे म्हणजे काय ? What Is Walking
प्रश्न अगदी सामान्य असला तरी ही शरीराची नैसर्गिक क्रिया समजून घ्या किती अद्भुत आणि असामान्य फायदे देत असते. शरीरातील अनेक स्नायू एकाच वेळेला एकत्रितपणे सक्रिय होऊन समप्रमाणात कार्यरत असतात.
आणि त्याचे फायदे शरीराला मिळत असतात. कोणत्याही स्नायूवर जास्त दाब न देता ही exercise होते. व्यायामाचा हा प्रकार एवढा सोपा आहे की कोणत्याही वयोगटातील व्यक्ति रोज 20-40 मिनिटे चालून आपल्या आरोग्याला जपू शकते.

दररोज चालण्याचे फायदे Daily Walking Benefits In Marathi
दररोज चालण्याने शरीराला जे अद्भुत आणि तेही अगदी मोफत कोणते फायदे मिळतात ते खाली पाहू.
रोज चालण्याने शरीराला होणारे फायदे
1. नियमित चालण्याने हृदयाचे स्नायू बळकट होतात त्यामुळे Blood Pumpping करण्याची हृदयाची क्षमता सुधारते.
2. रोज अर्धा तास चालण्याने High Blood Pressure संतुलित राहण्यास मदत होऊन Blood Pressure Control मध्ये येते.
3. आजकाल हृदयविकाराचा झटका म्हणजे Heart Attack चे प्रमाण वाढलेले दिसते आणि त्याचे कारण आपली बदललेली जीवनशैली आहे. रोज चालण्याने ब्लॉकेजेस होण्याची शक्यता कमी होते, हृदयाला ऑक्सीजनयुक्त रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारून Heart Attack चे प्रमाण कमी होते.
4. वजन कमी होण्यास मदत होते, दररोज चालल्यामुळे खूप प्रमाणात कॅलरीज बर्न होतात आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते म्हणून डॉक्टरही जाड व्यक्तींना चालण्याचा सल्ला देतात.
5. आपल्या नॉर्मल चालण्याच्या क्रीयेपेक्षा जास्त वेगाने चालल्यास ग्लुकोजची पातळी सुधारते.त्यामुळे डायबिटीसचा त्रास ज्यांना आहे ते नियंत्रित राहतं.
6. नियमित चालण्याने स्नायू सुधारतात त्यातील लवचिकता सुधारते त्यामुळे सांधे दुःखी ही कमी झालेली दिसून येते. बॅलन्स ही नियंत्रित होते ,त्याच सोबत फुफ्फुसांची क्षमता वाढते आपल्या पायी चालण्याने ऑक्साजन आणि कार्बन
डायऑक्साइड जी देवाणघेवाण झाल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढून आपल्या चालण्याची क्षमता ही वाढते हे दिसून आलं.
7.आपण पाणी पितो, जेवतो ही क्रिया रोज करतो, पण त्याच सोबत नियमित चाललो, तर जठराची क्षमता वाढते, पोटाचे विकार कमी होतात.
8.रोज चालणारी माणसं जर तुम्ही पाहिलीत तर, ती सुंदर दिसतात त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज दिसून येतो.त्वचेमध्ये फरक दिसतो.आपल्या शरीराचा shape बदलतो,कामावर एकाग्रता वाढते.रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यासाठी डॉक्टर ही कधी कधी आपल्याला चालण्याचा सल्ला देतात .आजकाल माणसं चालताना step ही मोजतात digital watch मार्फत.त्यातून त्यांना कळत असतं की दिवसभरात किती चाललेत
चालण्याने वजन नियंत्रित राहते

- आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपली जीवनशैली बदलल्यामुळे सगळ्यात मोठी समस्या झाली आहे ती म्हणजे वजन वाढ. आणि त्यावर जर सर्वात सोपा आणि मोफत जर कोणता उपाय असेल तर तो म्हणजे दररोज चालणे.
- दररोज कमीत कमी 30-40 मिनटे चालले पाहिजे त्यामुळे शरीरातील 200-250 कॅलरीज बर्न होतात त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
- तुम्हाला जर फरक पाहायचा असेल तर तुम्ही कमीतकमी एक महिना दररोज 40 मिनटे चाला आणि सातत्य ठेवा तुम्हाला फरक दिसून नक्की येईल.
चालण्याचे मानसिक आरोग्य फायदे Walking Benefits For Mental Health
नियमित चालण्याने शरीरासोबत मानसिक फायदे ही होतं असतात जे अत्यंत आवश्यक असतात.
Stress कमी होतो
दररोजच्या कामातील, आर्थिक किंवा नातेसंबंध आणि भविष्याची चिंता हे तणाव प्रत्येकाच्या आयुष्यात असतात.
दररोज चालण्याने शरीरात Happy Hormones तयार होतात त्यामुळे ताण तणावा सारख्या समस्येवर Positive परिणाम दिसून येतो.
चिंता कमी होते
उगाच उदास वाटणे, मन सतत दुखी राहणे, सतत वेगवेगळे विचार मनात गोंधळ घालणं. यामुळे सतत भीती वाटते,
अस्वस्थता वाढणे असे प्रकार चालण्याने खूप कमी होतात आणि मनात आत्मविश्वास वाढलेला दिसतो.
खरंच चालणे हा साधा नैसर्गिक व्यायाम हा डिप्रेशन सारख्या समस्येवर औषधा प्रमाणे काम करतो.

सकाळी चालण्याचे फायदे Morning Walking Benefits in marathi
पहाटे चालण्याचे फायदे जाणून घ्या. आणि स्वतःहा अनुभवा खरच तुमच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल झालेला दिसेल.
- सर्वात पहिले म्हणजे पहाटेचे वातावरण शांत,प्रसन्न,आणि साकारात्मक असते त्यामुळे मन स्थिर होते.
- पहाटे रिकाम्या पोटी चालण्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्याची प्रक्रिया ही फास्ट होते म्हणून सकाळी चालणे हे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना लवकर यश देते.
- सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये चालण्याने हाडे मजबूत होण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ति वाढण्यासाठी जे Vitamin D लागतं ते योग्य प्रमाणात नैसर्गिक पद्धतीने मिळते.
- दिवसाची सुरुवात अशी प्रसन्न आणि साकारात्मक झाल्यामुळे आयुष्य Refresh होते आणि संपूर्ण दिवस हा एका नव्या सुरुवातीप्रमाणे साकारात्मक जातो.

रोज किती वेळ चालावे
तुमच्या कामानुसार तुम्ही कोणतीही एक वेळ ठरवा सकाळ किंवा संध्याकाळ. सुरुवातीला 20 मिनिटे चालणं ही पुरेसे असते. हळूहळू तुम्ही तो वेळ वाढवून अर्धा तास करू शकता. असे करताना तुम्ही सातत्य ठेवा किमान आठवड्यातून 5 दिवस तरी चालायला पाहिजे.
चालताना कोणती काळजी घ्यावी
चालण्याची प्रक्रिया नैसर्गिक असली तरी थोडी दक्षता आपण ही घ्यायला पाहिजे. सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला कोणता आजार किंवा कोणती समस्या आहे का त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
त्यानंतर चालताना Comfortable अशा चपला किंवा शूज वापरा. त्याच बरोबर चालताना शरीराची position म्हणजे पाठीचा कणा सरळ ठेवा. सावकाश चालण्याची सुरुवात करा एकदम वेग वाढवू नका. सोबत पाणी असेल तरी उत्तम आहे.
आणखी वाचा
Yoga Benefits In Marathi
खोकल्यावर घरगुती उपाय
How To Gain Weight In Marathi
लवकरात लवकर वजन कमी कसे करावे
Conclusion
Walking Benefits In Marathi मधून समजले की,चालणे हा अत्यंत सोपा आणि नैसर्गिक असणारा व्यायाम प्रकार फक्त एखाद्या विशिष्ट समस्येवर उपाय नाही तर तो आपल्या मनावर,मेंदूवर,हाडांवर,हृदयावर,आणि संपूर्ण आयुष्यावर सकारात्मक बदल घडवून आणतो. आणि एवढा अद्भुत परिणामकारक उपाय हा अगदी मोफत असतो. म्हणून आपण प्रत्येकांनी आपल्या धावपळीच्या जीवनशैली मधून थोडा वेळ चालण्यासाठी काढायला हवाच.