तुमच्या प्रमाणे मलाही हा प्रश्न अनेकदा पडतो. AI म्हणजे काय ? what is ai ? आजच्या Digital दुनियेत जगताना Ai चा वापर करतो,शब्दाचा Full Form ही माहीत आहे पण नक्की काम कसं करत, त्याचा योग्य वापर आपण कसे करू शकतो, ai (Artificial Intelligence) मुळे येणारे भविष्य कसे असणार आहे.
झपाट्याने बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात AI चा काय वाटा असणार आहे, की येणारं युग हे AI चंच असणार आहे ह्या सगळ्या प्रश्नांचा आणि आशंकांचे उत्तरं खूप उत्साह निर्माण करतात. आजच्या ह्या लेखात आपण AI बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
दैनंदिन जीवनात AI (Artificial Intelligence)कुठे कुठे वापरतो
मोबाईल
आजच्या काळात आताच्या घडीला Almost सगळ्यांजवळ मोबाइल आहे तिथूनच सुरुवात करू. आपल्या मोबाइल मध्ये voice Assistant असतो आपल्या मनातील प्रश्न google ला विचारण्याची typping पेक्षा सोपी पद्धत म्हणून आपण voice assistant चा वापर करतो. तसेच google map मध्ये सुद्धा ही प्रणाली कार्य करते हे ai मुळेच शक्य आहे.
ऑनलाइन खरेदी (Online Shopping)
मोबाईल मधून आपण घर बसल्या आपल्याला पाहिजे ती वस्तु खरेदी करतो हे AI मुळेच शक्य होतं. online shopping ही क्रांति AI चीच आहे.
गूगल सर्च (google search)
google वर आपण जे काही search करतो त्या संबंधित गूगल आपल्यासमोर हजारो लाखों रिजल्ट माहिती स्वरूपात आणतो हे AI चाच भाग आहे.
स्वयंचलित कार(Driverless car)
आणखी आपण देशात परदेशात स्वयंचलित कार पाहतो चालकाशिवाय वाहन चालताना दिसते तीही AI चीच मोठी मजल,चमत्कार,आहे तिने तंत्रज्ञानाच्या युगाला मोठी भरारी दिले.

AI म्हणजे नक्की काय ? What is Artificial Intelligence ?
वर एवढं सगळं पाहिलं तरी हा प्रश्न उरतोच तो म्हणजे Ai म्हणजे नक्की काय ?
साध्या भाषेत समजून घेऊ एखादा साध्या संगणक (Computer)हा त्याला जी Cammand म्हणजे आज्ञा देऊ तेच आणि तेव्हाच काम करतं. पण AI हा विचार करणे,शिकणे आणि निर्णय घेण्यासाठी सकक्षम असतो. AI मध्ये माणसाप्रमाणे विचार करून,चुका सुधारणे आणि योग्य निर्णय घेऊ शकते. अशी क्षमता एखाद्या यंत्राला देण्याच्या कार्यप्रणालीला AI म्हणतात.
⦁ AI चा थोडक्यात इतिहास
AI (Artificial Intelligence)हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा आणि उपयुक्त असा भाग असला तरी तो तयार करण्यामगे खूप वर्षाची मेहनत,संशोधन,हे शास्त्रज्ञांचे आहे . कित्येक प्रयत्न,प्रयोग,आणि अपयश येऊन सुद्धा हार न मानता सतत प्रयत्नाने आजच्या प्रगत आणि वापरास सोप्या अशा AI चा शोध लागला.
⦁ AI ची संकल्पना कशी आली ?
⦁ कोणताही नवीन शोध हा प्रश्न केल्याने लागतो. असेच का ? हेच का ? हे का नाही ? अशाप्रकारचे अनेक प्रश्न हे एका नवीन क्रांति मागे असतात AI च्या मागे देखील असाच प्रश्न आहे. 1950 साली ब्रिटिश गणिततज्ञ Alan Turning यांनी Can Machines Think ? म्हणजे मशीन विचार करू शकते ? हा प्रश्न उभा केला आणि खऱ्या अर्थाने AI चा प्रारंभ झाला. आपल्या प्रमाणेच एखादी मशीन विचार करू शकते का या विचारांनी AI दिशेने पाऊल पडायला सुरुवात झाली.
AI ला इतकी चमत्कारिक कामं कशी जमतात (How Ai Works)
एवढी कठीण आपल्या बुद्धीच्या पलीकडील काम ai ला एका क्लिकवर कशी शक्य होतात हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.
ह्या प्रश्नाचं उत्तर साध्या भाषेत पाहू. पहा लहानपणापासून आपल्या मेंदू मध्ये जेवढे अनुभव आहेत म्हणजेच माहिती आहे, त्यानुसार आपण एखादी वस्तु ओळखून तिच्या अनुभव करून मग निर्णय घेत असतो.
त्याच प्रमाणे AI हा माहितीवर कार्य करत असतो माहिती म्हणजेच डेटा जेवढा जास्त डेटा तेवढा जलद ai. असं म्हणा ना माहिती हाच AI चा आत्मा आहे. जसे आपण वेगवेगळ्या अनुभवातून शिकतो,तसेच AI हा माहिती मधून शकत असतो.
⦁ माहिती (Data) :
जशी आपला मेंदू माहिती अनेक माध्यमातून गोळा करतो जसे,आवाज,चित्र,स्पर्श. तसेच AI देखील देखील शब्द(Text),चित्र (Picture),आवाज(Audio),विडियो,सेंसेर अशा माध्यमातून AI डेटा गोळा करून घेतो आणि जितका जास्त डेटा तितकाच AI जास्त हुशार.
⦁ नियम गणित पद्धत (Algorithms) :
⦁ कम्प्यूटिंग पावर :

AI चे प्रकार (Types Of Artificial Intellignece)
⦁ Narrow ai
हे AI फक्त काही मर्यादित कार्यासाठी काम करते त्यासाठीच त्याची निर्मिती असते अशा क्षमतेच्या AI प्रणालीला Narrow ai म्हणतात. उदा. Alexa,Siri,Google Assistant,Face Analog. ई. या ai tools ची निर्मिती फक्त त्याच कार्यासाठी असते.
⦁ General AI जनरल एआय
AI चे प्रकार अजून विकसित होत आहे ज्यामध्ये मशीन हे मानवाप्रमाणे कार्य करू शकेल इतकी त्याची क्षमता असेल यावर तज्ञांचे संशोधन चालू आहे.उदा. म्हणजे तुम्ही सोशल मेडियावर एखादा माणसाप्रमाणे बोलणारा,चालणारा,त्याच प्रमाणे सर्व कामे करणार यंत्र मानव( Robot) पाहिला असाल हे त्याचाच एक उदाहरण आहे.
⦁ Super AI (सुपर एआय):
AI चा हा प्रकार अविश्वसनीय आहे पण सध्या AI ची प्रगती पाहता भविष्यात शक्य आहे. ह्या प्रकारात AI हा माणसापेक्षा हुशार आणि स्वावलंबी असू शकतो जो स्वतःचे निर्णय घेऊ शकतो.जो माणसापेक्षा कित्येक पटीने पुढे असेल .
AI चे फायदे आणि तोटे
⦁ AI चे फायदे (Advantages Of AI) :
आज instagram वरील reels creator असो नाहीतर youtuber,नाहीतर student प्रत्येक जण Ai वरून आपले प्रोजेक्ट बनवून स्मार्ट वर्क करत आहे. आणि bloggers आर्टिकल writting AI च्या मदतीने करून पैसे ही कमावत आहेत.
Ai (Artificial Intelligence)मुळे खूप क्षेत्रात मदत होणार आहे. मंद गतीने आणि मनुष्यबळ जिथे लागत होतं त्याजागी AI मुळे ते काम सोप आणि जलद गतीने होईल. त्याच बरोबर पैसा आणि वेळ दोन्ही मोठ्या प्रमाणावर बचत होईल.
एवढेच नव्हे तर AI मुळे 24/7 सुविधा उपलब्ध होतील आणि झालेल्या आहेत आपण पाहतोच.अनेक क्षेत्रात मोठ्या चुका आणि त्यामुळे होणारे नुकसान वाचेल AI मुळे कामातील चुका बंद होतील. आणि जास्तीत जास्त माहिती तीही अचूक शक्य होईल.
शिक्षण क्षेत्रात खूप मोठा वाटा ai घेत आहे त्याच प्रमाणे व्यवसाय हे online पातळीवर घेऊन जायला ai ची मदत होते. मार्केटिंग क्षेत्र हे ai वर अवलंबून आहे ai मुळे मार्केटिंग चा दर्जा गगनाला भिडला आहे.
म्हणून तर AI ला तंत्रज्ञानाचा कणा म्हणतात.

⦁ AI मुळे होणारे तोटे किंवा समोर येणारे आव्हाने :
⦁ AI जर सर्व ठिकाणी योग्य पद्धतीने कमी वेळात कामं करायला लागलं तर त्याचा थेट परिणाम नोकऱ्यांवर होऊ शकतं. येणाऱ्या भविष्यात अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. कारण की Ai चे असे tools विकसित झाले आहेत जे सहज Prompt द्वारे film बनवू शकतं कोणत्याही कलाकाराशिवाय हे आपण पाहतोच आहोत.
याच बरोबर AI मधील data चुकीचा असेल तर निर्णय ही चुकू शकतात आणि त्याचे परिणाम ही मोठे असू शकतात.Ai येणाऱ्या काळात माणसाच्या कल्पनेसारखा विकसित झाला तर माणसावर अवलंबीत राहणं कमी होईल. आणि हे तोटे टाळायचे असतील तर माणसाने जबाबदरीने AI चा वापर करायला पाहिजे.
AI मुळे काय शक्य झालंय ?
⦁ Driverless car :
ai (artificial intelligence)मुळे driverless car ही मोठी क्रांति शक्य झाली. चालकशिवाय वाहन चालू शकते. कारण वाहनामध्ये असणारे machine (computer)हे ai प्रणाली वर कार्य करते आणि वाहन कुठे वळायला पाहिजे,कुठे आणि कधी मागे व पुढे जायला पाहिजे इतकेच नव्हे तर आपल्याला कुठे जायचे आहे तिथे सहज पोहचवू शकते हे सर्व त्या मशीन मध्ये असणाऱ्या डेटा मुळे AI ला शक्य होतं.
⦁ यूट्यूबची सूचकता (Youtube Recommendation)
तुम्ही पाहिलं असेल तुम्ही जेव्हा कोणतही social मीडिया app उघडता तेव्हा तुम्हाला तुमच्या आवडीचे videos किंवा reels दाखवले जातात हे कशामुळे होतं तर तुम्ही आधी काय search केलंत ह्याची माहिती ai कडे असते त्या माहितीच्या आधारे तुम्हाला काय आवडत हे ai निर्णय घेऊन तुम्हाला त्याप्रकरच्या जाहिराती,videos,reels दाखवल्या जातात. आपल्या जी माहिती पाहिजे ती अचूकपणे आपल्या समोर Google ठेवतो हे ai मुळे शक्य झालंय.
ChatGPT आणि Gemini सारख्या ai tools जवळ संवाद साधून अनेक प्रश्नाची उत्तरं, तसेच अनेक निबंध,कविता,भाषण,हे एका सेकंदाचे काम झाले आहे.

AI च्या युगात टिकाव कसा लागेल ?
AI Tools चा वापर :
सर्वच कामे ai करू लागला तर बेरोजगारी वाढेल हे निश्चित पण त्यातही आपल्याला टिकायचा असेल तर मार्ग काढावा लागेल की अशी कोणतही काम आहेत जिथे ai करू शकत नाही त्या कामामद्धे तुम्ही Expert व्हायला पाहिजे. तुम्ही Ai च्या संबधित कामं आताच शिकायला सुरुवात करायला पाहिजेत. उदा. ChatGPT,Canva ,Gemini, सारखे अनेक ai चे tools तुम्हाला यायला पाहिजेत हीच काळाची गरज होणार आहे.
Prompt :
Ai चे tools हे prompt वर चालतात आता Prompt म्हणजे काय तर योग्य सूचना देणे. तुम्ही जे काम ai कडून करून घेणार आहात ते योग्यरित्या होईल की नाही ते तुमच्या prompt वर आहे तुम्ही जे सांगाल तसेच काम ai तुम्हाला करून देईल म्हणून prompt येण खूप गरजेचे आहे. कारण prompt म्हणजे तुम्ही Ai ला दिलेला एक आदेश असतो त्याच प्रमाणे ai चालते.
तुम्हाला एखादा विडियो ai कडून बनवून पाहिजे असेल तर तुम्हाला ai योग्य prompt देता आले पाहिजेत. येणाऱ्या काळात ह्या क्षेत्रात खूप मोठ्या संध्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत शिकत राहणे कारण ह्या क्षेत्रात सतत नवीन updates येत राहतात त्यानुसार तुम्हाला ही updates राहणे गरजेचे असते.
निष्कर्ष Conclusion
Ai हा आपला कोणी शत्रू नाही तर सहाय्यक Assistant म्हणून कार्यरत आहे त्याची निर्मिती म्हणजेच त्याला विकसित आपणच करत आहोत फक्त त्याचा वापर चांगल्या कामासाठी आणि प्रत्येकाच्या प्रगतीसाठी करावा हा आपला हेतु पाहिजे. Ai मुळे आपल्या मेंदूची क्षमता आणि कामाची वेळ ही बचत झाली आहे त्याला दोष न देता काळाची गरज म्हणून स्वीकारून आपल्याला योग्य ती पाऊल उचलायला पाहिजे म्हणजे आपल्याला त्यानुसार भविष्यात ai सोबत पुढे जणीसाठी काही गोष्टी शिकायला पाहिजेत.म्हणून What Is AI ? Ai म्हणजे काय ? ह्या लेखाचे हेतु होतं.
आणखी वाचा – थॉमस एडीसन बायोग्राफी