Yoga Benefits In Marathi हे आजच्या धावपळीच्या जीवनात का महत्वाचे आहेत. कारण आपण फक्त पैशाच्या मागे धावत असतो असे समजून की,पैसे मिळाले की आपण सुखी होऊ पण पैसे मिळाले तरी सुख काही मिळत नाही.पैसे कमावण्याच्या आधी आपण आपले शारीरिक सांभाळले आणि कमावले पाहिजे. मानसिक स्थिर करण्याआधी आपलं शरीर चांगल निरोगी पाहिजे.
yoga benefits in marathi मध्ये कळेल की,पैसे खूप कमावले पण आपले शरीर रोगी असेल तर तेच पैसे शरीरासाठी खर्च होऊन जातील पण आनंद मिळणार नाही ,म्हणून आता टेक्नॉलॉजीच्या काळात आपली शारिरीक हालचाल कमी होतं चालली आहे आणि हेच आपल्या आजारी आणि दु:खाच कारण आहे म्हणून योगाचे फायदे जाणून घ्या आपल्यासाठी योगा किती महत्त्वाचे आहे.
आपल्या प्रत्येकाची काही स्वप्न असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण अतोनात कष्ट करत असतो पण कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या शरीराची आणि मनाची साथ खूप महत्वाची असते त्याशिवाय काहीही शक्य नाही,हे आपण जाणून “योग” हा प्रकार किंवा साधनेकडे वळलो पाहिजे.
“योगा” म्हणजे काय ? (What Is Yoga ?)
सर्वात आधी आपण योगा म्हणजे काय त्याचा अर्थ काय होतो हे समजून घेऊ. संस्कृत भाषेतील “युज” धातुपासून “योग” शब्द आपल्याला मिळाला. युज या शब्दाचा अर्थ होतो जोडणे. म्हणजेच शरीर ,मन आणि आत्मा यांना एक करणे म्हणजे योगा होय.
योगाचे प्रकार कोणते ? (Types Of Yoga)

योगामध्ये अनेक प्रकार आहेत पण आपल्या शरीराच्या आणि मनाच्या स्थिति नुसार आपण योग्य त्या प्रकाराचा अभ्यास योगाच्या शिक्षकाकडून शिकलो पाहिजे.
मुख्य प्रकार : 1. आसन (Aasana) 2. प्राणायाम (Pranayam) 3. ध्यान (Meditation) 4. यम व नियम
महर्षि पतंजलि यांनी योगाला शास्त्रीय स्वरूप देऊन संपूर्ण जगाला योगाचे अष्टांग योग सांगितले. ते पुढील प्रमाणे आहेत.
- यम 2. नियम. 3 आसन. 4 प्राणायाम. 5 ध्यान 6. प्रत्याहार. 7 धारणा. 8 समाधी. असे आहेत
⦁ योगासनाचे प्रकार ( Bebefits And Types Of Aasans)
1. ताडासन : ह्या योगाने शरीराची height आणि balance सुधारतो
2.वृक्षासन : आसनाच्या ह्या प्रकाराने एकाग्रता आणि पाय मजबूत होतात
3.भुजंगासन : ह्या आसनाने पाठदुखी आणि पंचनसंस्था सुधारते
4. सूर्यनमस्कार : योगासनाचा लोकप्रिय आसन म्हणजे सूर्यनमस्कार ह्या आसनाने संपूर्ण शरीराचा उत्तम व्यायाम होतो तसेच वजन कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
⦁ प्राणायामचे फायदे आणि प्रकार (Benefits and Types Of Pranayam)
- भ्रामरी : मनाची चंचलता नाहीशी होऊन मन स्थिर होते आणि उत्तम निद्रा लाभते
- कपालभाती : पोटावरील Fat कमी होते आणि पचन संस्था सुधारते
- अनुलोम विलोम : अतिशय सुलभ असणारा हा प्राणायाम stress कमी करतो श्वसन क्रिया सुधारते तसेच मुख्य म्हणजे फुफ्फुसाची क्षमता वाढवते.
योगाचे शारिरीक फायदे

नियमित योगा केल्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते त्यामुळे सांधे दुःखी कमी होऊन आराम मिळतो. वारा भरण्याचे प्रकार शरीरातून कमी होतात.आणि स्नायू आणि संध्यातील शक्ती वाढून शरीर निरोगी होण्यास मदत मिळते.
⦁ समजूतदारपणा येऊन सहनशक्ती वाढते
योगाच्या विविध आसन केल्यामुळे शरीरातील Energy Increase होते आणि कामातील उत्साह वाढतो त्यामुळे सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी चिडचिड कमी होऊन सहनशक्ती वाढते.
⦁ वजन कमी होण्यास फायदा
नियमित योगा केल्यामुळे चयापचय क्रियेत सुधारणा होते त्यामुळे वजन योग्य राहते.आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.
⦁ श्वासोच्छवास क्रियेत फायदा
योगासनातील प्राणायाम आसनामुळे श्वसन संस्था मजबूत होते आणि फुफुस जास्त काळ कार्यक्षम राहते.
⦁ योगाचे रक्तभिरणाचे फायदे
योगसनामुळे हृदयाचे आरोग्य सुधारून रक्तभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
योगाचे मानसिक फायदे
तणाव कमी होतो ( depression ) कोणत्याही कामात अपयश आल्यानंतर जे नकारात्मक विचार मनाकडे येतात त्याने खूप त्रास होतो माणूस हृदयविकाराचा बळी होतो.म्हणून मानसिक तणावापासून दूर व्हायचं असेल तर योगा हा सोपा मार्ग आहे.योगा आणि प्राणायाम मुळे मन एकाग्र होते मनाकडे प्रसन्नता येते आणि मन शांती मिळते.
⦁ एकाग्रता वाढते (Concentration)
कोणत्याही कामात यशस्वी व्हायचे असेल तर त्या कामात एकाग्रता असलाच हवी तर तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि ही एकाग्रता योगामुळे मिळते आणि कामातील क्षमता वाढून न थकता काम करू शकता.
⦁ आत्मविश्वास ( confidence)
आत्मविश्वास शिवाय तुम्हाला कुठे खूप लोकांमधे बोलता ही येणार नाही पण नियमित योगा करत असाल तर तुमच्या आरोग्यात सुधारणा होऊन तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल.
⦁ नकारात्मकता ( nigetivity)
योगासनांचे मानसिक फायद्यामधे हा फायदा खूप महत्वाचा मिळतो ते म्हणजे तुमच्या मधील नकारात्मक विचार नाहीसे होऊन ,सकारात्मक विचार वाढण्यास सुरुवात होते.मनावरील अनावश्यक विचारांचे जाळे आणि त्यामुळे आलेला तणाव नाहीसा होतो.
योगाचे अध्यात्मिक फायदे ( spirituality)
नियमित योगासनामुळे तुम्हाला तुमची खरी ओळख होते अहम ब्रम्हास्मी ह्याचा अनुभव होतो.आणि मन शांती मिळते.या शांतीच्या माध्यमातून तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करू शकता आणि आत्म्याची खरी ओळख मिळवू शकता.
⦁ आनंद मिळतो ( happiness)
जीवनाचा खरा अर्थ आणि आनंद तुम्ही योगा मधून मिळवू शकता .योगामुळे मन आतून तृप्त होते त्यामुळे कोणत्याही परीस्थितीत तुम्ही समाधानी राहू शकता. तुम्ही कायम वर्तमान काळात जगता ही खूप मोठी प्राप्ती मानली जाते अध्यात्मात आणि ती योगामुळे शक्य होते.
⦁ चिंतन प्राप्त होते
जीवनातील सगळ्यात महत्वाच्या गोष्टी करू शकतो ,नाहीतर माणसाचा आयुष्य हे जे निरुपयोगी आहे त्याच्या मागेच जातो.त्याला महत्वाचे काय हेच कळत नाही आणि आयुष्य निघून जात पण तुम्ही नेहमी योगा करत असाल तर तुम्ही चिंतनशील होता आणि महत्वाचे कामाला सगळ्यात जास्त महत्व देता.
⦁ नियमितपणा ( consistency)
वरील सर्व फायदे मिळवायचे असतील तर दे एक किंवा दोन दिवसात शक्य नाही म्हणून योगाचे नियमित अभ्यास महत्त्वाचा आहे .सुरुवातील आपण सोप्या आसनाने सुरुवात करायला पाहिजे नंतर हळूहळू थोडे कठीण योगा साठी प्रयत्न करायला पाहिजे आणि हे सर्व प्रकार हे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनातून केल्यास योगाचे फायदे मिळवू शकतो.
योगाचा इतिहास (History Of Yoga)
सुमारे 5000 वर्षाचा इतिहास असणाऱ्या योगाची सुरुवात आपल्या भारतातून झाली होती. पाहायला गेलो तर आपल्या वेदांमधून,उपनिषद,ते गीतांमध्ये देखील योगाचा अभ्यास केलेला आढळतो.
योगा हे प्रकार प्राचीन आहे आपल्या शास्त्र आणि पुराणातही योगाचा उल्लेख मिळतो ,साधू,मुनी तपस्वी हे ब्रम्ह प्राप्ती साठी योगाचा अभ्यास करत असत.आणि ह्याच अभ्यासामुळे आपण आपले मन,तन आणि अध्यात्म समृध्द करू शकतो .म्हणून सगळ्यांवर एक रामबाण उपाय म्हणजे योगा समजला जातो.

नियमित योगा केल्याचे फायदे
तुम्ही कायम उत्साहित राहता तुमचे मन कायम प्रसन्न राहील,तसेच कामात एकाग्रता जाणवेल. रोज योगा केल्याने आयुष्यात एक नियम म्हणजे एक शिस्तबद्ध आयुष्य तुम्हाला जगता येते. हा माझं अनुभव आहे मागील सहा महीने मी योगाची practise करत आहे पण कमी वेळात ही मला आलेला अनुभव हा अतुलनीय आहे. माझ्या आयुष्यात काही गोष्टीमद्धे मला यश मिळायला सुरुवात झाली आहे.
कोण कोण योगा करू शकतो ?
योग हा अगदी लहान मुले,तरुण,स्त्रिया,पुरुष,वृद्ध महिला-पुरुष सगळे करू शकता पण कोणाच्या मार्गदर्शनाखाली केल्यास कोणतीही हानी म्हणजेच दुष्परिणाम होतं नाहीत.पण आपण वरील कोणत्याही गटातील व्यक्ति असू आपल्याला लगेच फरक जाणवत नसतो त्यासाठी सातत्य खूप महत्वाचं आहे.
निष्कर्ष Conclusion
जगानेही ज्याचं महत्व स्वीकारलं असं “योग”हा अमूल्य ठेवा हा जगाला भारताने दिला. योगाने फक्त शरीरसाठी नव्हे तर संपूर्ण मन,अंतकरण शुद्ध होऊन एक सामान्य संतुलित जीवन योगाने प्राप्त होते. खरंच आज वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात योगा ही जीवन आनंदी,समाधानी,निरोगी,जगण्याची नैसर्गिक शैली आहे आणि ती आपण प्रत्येकाने ती आपल्या आयुष्यात स्वीकारली पाहिजे.
आमचे लोकप्रिय लेख
नैसर्गिक पद्धतीने वजन कसे वाढवावे
खोकल्यावर घरगुती उपाय
लवकरात लवकर वजन कमी कसे करावे